AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : धाराशिवमध्ये उपचारात हलगर्जीपणा, एका महिला डॉक्टरसह कर्मचाऱ्यांचे निलंबन

| Edited By: | Updated on: Jun 09, 2026 | 6:52 PM
Share

Maharashtra News LIVE Updates: अपक्ष उमेदवार गोकुळ गीते हे विधान परिषद निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. यामुळे महायुतीला मोठा झटका बसला आहे. कारण महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यास गोकुळ गीते यांनी नकार दिला आहे.

Maharashtra News LIVE : धाराशिवमध्ये उपचारात हलगर्जीपणा, एका महिला डॉक्टरसह कर्मचाऱ्यांचे निलंबन
Maharashtra news live updates Image Credit source: Tv9

LIVE NEWS & UPDATES

  • 09 Jun 2026 06:52 PM (IST)

    धाराशिवमध्ये उपचारात हलगर्जीपणा, एका महिला डॉक्टरसह कर्मचाऱ्यांचे निलंबन

    धाराशिवमधून मोठी बातमी समोर आली आहे. उपचारात हलगर्जीपणा करणं महिला डॉक्टरला भोवलं आहे. उपचारात हलगर्जीपणा केल्याने एका महिला डॉक्टरसह कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आलं आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शैलेंद्र चौहान यांनी ही कारवाई केली आहे.

    धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतर्गत असलेल्या स्त्री रुग्णालयात उपचारात हलगर्जीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांकडून आरोप करण्यात आला होता. त्यानंतर स्त्री रोगतज्ज्ञ डॉक्टर तृप्ती राडकर आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी सौरभ जाधव याचं निलंबन करण्यात आलं आहे.

  • 09 Jun 2026 06:22 PM (IST)

    वर्ध्यातील पुलगाव-आर्वी रोडवरील विरुळ जवळ अपघात, 2 दुचाकींची समोरासमोर धडक, तिघांचा मृत्यू

    वर्ध्यातील पुलगाव-आर्वी रोडवरील विरुळ जवळ अपघात झाला आहे. या अपघाताता 2 दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. एक दुचाकी पुलगावच्या दिशेने तर एक दुचाकी विरुळच्या दिशेने जात होती. दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने अपघात झाला. त्यामुळे तिघांचा मृत्यू झाला. दरम्यान पुलगाव पोलिसांनी मृतदेह रुग्णालयात पाठवले आहेत.

  • 09 Jun 2026 06:13 PM (IST)

    अन्न-औषध प्रशासन एक्शन मोडमध्ये, शिर्डी साई मंदिर परिसरातील प्रसाद विक्रेत्यांवर धाडसत्र

    अन्न आणि औषध प्रशासन गेल्या काही दिवसांपासून एक्शन मोडमध्ये आलं आहे. अन्न आणि औषध प्रशासनाकडून शिर्डी साई मंदिर परिसरातील प्रसाद विक्रेत्यांवर धाडसत्र सुरु आहे. बुरशीयुक्त पेढ्याबाबत भाविकांकडून तक्रारी मिळाल्या. त्यानंतर प्रशासन एक्शन मोडवर आलं आहे. प्रसादाबाबत बातमी प्रसारित होताच शिर्डीत धडक कारवाईला सुरूवात झाली आहे. पेढा प्रसादाचे नमुने गोळा करण्यास सुरुवात झाली आहे. प्रसादाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत. दोषी आढळल्यास पेढा उत्पादकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे भेसलखोरांचे धाबे दणाणले आहेत.

  • 09 Jun 2026 05:49 PM (IST)

    टीएमसी सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानी सीआयडी

    पश्चिम बंगाल: कोलकाता येथे ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानाबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तपासासाठी सीआयडी दाखल झाली असून, या घटनेचे चित्रीकरण केले जात आहे.

  • 09 Jun 2026 05:37 PM (IST)

    दोन-तीन दिवसात मान्सून राज्यात आणखी काही भागात दाखल होणार

    पुढच्या दोन तीन दिवसात राज्याच्या आणखी काही भागात मान्सून दाखल होणार आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहात आहे. पावसाच्या आगमनानंतर पेरणीच्या कामांना वेग येणार आहे.

  • 09 Jun 2026 05:24 PM (IST)

    पुण्याच्या मावळमध्ये एमआयडीसीतील कंपनीत गॅस गळती, दोघांचा मृत्यू

    पुण्याच्या मावळमध्ये एमआयडीसीतील कंपनीत गॅस गळती झाली आहे. कंपनीतून कार्बनडायऑस्काईडची गळती झाल्याने दोन कामगार अत्यावस्थ झाले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले आहेत. एमआयडीसीतील शॅफ्लर इंडिया कंपनीत गॅस गळतीची घटना घडली.

  • 09 Jun 2026 05:12 PM (IST)

    उपमुख्यमंत्री शिंदेंना कार्यक्रमाचं निमंत्रण न दिल्याने शिवसेनेचे मंत्री नाराज

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नवी मुंबई विमानतळावरील शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरपणाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं नव्हतं. त्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत याचे पडसाद उमटले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोरच नाराजी व्यक्त केली.

  • 09 Jun 2026 05:05 PM (IST)

    नाशिकमध्ये महायुतीसमोर अडचणी कायम, गोकुळ गीते लढण्यावर ठाम

    नाशिकमध्ये विधानपरिषद निवडणुकीचा घोळ कायम आहे. त्यामुळे महायुतीच्या अडचणी वाढल्या आहे. गोकुळ गीते लढण्यावर ठाम आहेत. दराडेंना पाठिंबा देण्यास स्पष्ट नकार दिल्याचं गोकुल गीते यांनी सांगितलं. गोकुळ गीतेंशी चर्चा सुरू असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे.

  • 09 Jun 2026 03:54 PM (IST)

    परभणी : एटीएममध्ये कॅश उपलब्ध नाही, नागरिक हैराण

    परभणीमध्ये मागील 2 महिन्यांपासून कॅशचा तुकडा जाणवत आहे. बँकांमध्ये कॅश उपलब्ध नसल्याने याचा आर्थिक व्यवहारावर मोठा ताण पडत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. दुसरीकडे कॅश नसल्याने बँकांसमोरील एटीएम बंद करण्याची वेळ आली बँक प्रशासनावर आली आहे.

  • 09 Jun 2026 03:40 PM (IST)

    शिरूर : मान्सूनपूर्व पावसाची चाहूल अन् भुईमूग काढणीला वेग

    शिरूर तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची चाहूल लागल्याने शेतकऱ्यांनी शेतातील कामांना वेग दिला आहे. पारोडी गावातील शेतांमध्ये सध्या भुईमूग काढणीची लगबग पाहायला मिळत असून या कामात महिलांनी आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे श्रमाचा ताण हलका करण्यासाठी महिलांनी पारंपरिक लोकगीते गात भुईमूग काढणी केली, त्यामुळे संपूर्ण शिवारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • 09 Jun 2026 03:26 PM (IST)

    सावंतवाडी : तुंबलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने कार गटारात कलंडली

    सावंतवाडी शहरातील वनविभागाच्या कार्यालयासमोर तुंबलेल्या पाण्यात अंदाज न आल्याने चारचाकी गाडी गटारात कलंडली. गाडी बाहेर निघत नसल्याने अखेर टोईंग व्हॅन बोलवावी लागली. जवळपास एक तासाच्या प्रयत्नानंतर गाडी बाहेर काढण्यात आली. मात्र रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. तसेच एसटी बस अडकून पडल्या होत्या. यामुळे नागरिकांसह प्रवाशांना देखील नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

  • 09 Jun 2026 03:10 PM (IST)

    जालना : अप्पर पोलीस अधीक्षकांनी घेतली रेकॉर्डवरील गुन्हेगारांची परेड

    जालन्याचे अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांनी आज जालना उपविभागाअंतर्गत येणाऱ्या पाच पोलीस स्टेशनच्या हद्दीतील 2 पेक्षा अधिक गुन्हे असणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची परेड घेतली. यावेळी पोलिसांनी त्यांना समज दिली असून भविष्यात कोणताही गुन्हा करू नये यासाठी गुन्हेगारांकडून बॉण्ड देखील लिहून घेतले जाणार आहे.

  • 09 Jun 2026 02:55 PM (IST)

    बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांचे पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या

    २ जून रोजी अमरावतीच्या मार्डी रोडवर काजल इंगळे या महिलेची अमानुष हत्या करण्यात आली. अत्यंत संताप जनक पद्धतीने तिचा मृतदेह जाळून टाकण्यात आला होता. या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी आणि नराधम आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी बच्चू कडू यांच्या प्रहार सामाजिक संघटनेच्या वतीने अमरावतीच्या पोलीस आयुक्त कार्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

  • 09 Jun 2026 02:45 PM (IST)

    चांदवड तालुक्यातील वागदरडी परिसरात वादळी वारा

    नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वागदरडी परिसरात संध्याकाळच्या सुमारास जोरदार पाऊस सुरु झाला आहे. वादळी वाऱ्यामुळे शेतकरी लक्ष्मण पगार यांच्या 2 एकरातील डाळिंब बागेला फटका बसलाय. ऊन आणि पावसापासून बचावासाठी त्यांनी बागेवर नेट अंथरली होती. मात्र वादळी वाऱ्याने तिचे नुकसान झाले

  • 09 Jun 2026 02:30 PM (IST)

    हिंगोलीत ठाकरे शिवसेनेच्या वतीने आक्रोश आंदोलन

    उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने हिंगोली शहरातील गांधी चौकात कर्जमाफीच्या जी आर ची होळी करण्यात आली. त्यावर भाकरी थापत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून आक्रोश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल नाही घेतली तर यापेक्ष्या तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे.

  • 09 Jun 2026 02:15 PM (IST)

    परभणीत अनेक एटीएममध्ये कॅश उपलब्ध नसल्याने गोंधळ

    परभणीतील अनेक एटीएममध्ये कॅश उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळत आहे. कॅश संपल्याने sbi, idbi सह इतर अनेक बँक समोरील एटीएम करण्यात आले बंद. तूरळक एटीएम मध्येचं कॅश मिळत असल्याने नागरिकांना रांगेत ताटकळत उभ राहण्याची आली वेळ

  • 09 Jun 2026 01:55 PM (IST)

    कल्याण फाटा रोडवर टायर गोदामाला आग

    कल्याण फाटा रोडवर टायर गोदामाला आग. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

  • 09 Jun 2026 01:44 PM (IST)

    नाशिकमध्ये प्रसाद हिरेंची माघार, नरेंद्र दराडेंना पाठिंबा

    नाशिकमध्ये भाजप बंडखोर प्रसाद हिरेंची निवडणुकीतून माघार… गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्या मनधरणीला यश… गोकुळ गीतेंचा मात्र अद्याप पाठिंबा नाही…

  • 09 Jun 2026 01:29 PM (IST)

    काँग्रेस आमदार विकास ठाकरेंची साप्ताहिक मार्मिकला नोटीस

    काँग्रेस आमदार विकास ठाकरेंची साप्ताहिक मार्मिकला कायदेशीर नोटीस. मार्मिकविरोधात 2 कोटींचा मानहानीचा दावा. 15 दिवसांच्या आत बिनशर्त माफी मागा, अन्यथा कारवाईला सामोरं जा. प्रतिमा मलिन होईल असा मजकूर प्रसिद्ध केल्याबद्दल मार्मिकला नोटीस. स्तंभलेखक विकास झाडेंनी त्यांच्या लेखात बदनामी केल्याचा विकास ठाकरेंचा दावा

  • 09 Jun 2026 01:13 PM (IST)

    शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात मोर्चा

    शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात मोर्चा… मोर्चात शेतकरी नेते राजू शेट्टी, सतेज पाटील आणि मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त शेतकरी मोर्चात सहभागी… मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त…

  • 09 Jun 2026 01:00 PM (IST)

    खानापूर तालुक्यात शक्तिपीठ महामार्गाच्या ड्रोन सर्व्हेला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

    खानापूर तालुक्यात प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गासाठी सुरू असलेल्या ड्रोन सर्व्हेला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला. नागेवाडी, भाग्यनगर, माहुली, चिखलहोळ, घानवड, भिकवडी बुद्रुक, वलखड आणि विटा परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र येत घोषणाबाजी करत आक्रमक झाले. महामार्गामुळे सुपीक शेती संपादित होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

    ड्रोन सर्व्हेसाठी प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, तहसीलदार योगेश्वर टोम्पे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी पोलिस बंदोबस्तात गावांमध्ये दाखल झाले. यावेळी शेतकऱ्यांनी “शक्तिपीठ महामार्ग रद्द करा” अशा घोषणा देत मोजणीला विरोध केला. शेती आणि उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नसल्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला.

  • 09 Jun 2026 12:50 PM (IST)

    तीन वाहनाच्या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू

    जळगावच्या अमळनेर तालुक्यातील मंगरूळजवळ कार , एस टी आणि दुचाकी अशा तीन वाहनाच्या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात कारमधीलमधील एकाच कुटुंबातील दोन्ही सख्खे भाऊ व देरानी जेठानी अशा चौघांचा तर दुचाकीवरील दोघांचा अशा एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. कारमधील सुरेश विक्रम महाजन, अनिता सुरेश महाजन, निर्मला नंदलाल महाजन, नंदलाल गोपाल महाजन अशी मयत सख्खे भाऊ आणि देरानी जेठानीची नावे असून गुजरात मधील व्यारा येथील रहिवासी आहेत. दुचाकीवरील 25 वर्षीय निलेश सुखदेव तावडे आणि 22 वर्षीय फालगुनी एकनाथ भोई हे दोन्ही देखील जागीच ठार झाले आहे

  • 09 Jun 2026 12:40 PM (IST)

    शिवसेना ठाकरे गटाचे नालेसफाई आंदोलन

    ठाण्यातील दिवा शहरामध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून अनोखे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. ठाणे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गटर पूजन आंदोलन करण्यात आले. शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीण विधानसभा उपजिल्हाप्रमुख रोहिदास मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. दिव्या मध्ये अनेक ठिकाणी नालेसफाई अर्धवट झाल्यामुळे पावसाळ्यात पाणी साचण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तवली जात आहे.

  • 09 Jun 2026 12:30 PM (IST)

    टर्न घेताना चारचाकीचा ताबा सुटला आणि चारचाकी गाडी घुसली थेट घरात

    मिरज शहरातील मंगळवार पेठ येथील बॉम्बे स्टार बेकरीसमोर आज सकाळी एक धक्कादायक अपघात घडला. टर्न घेत असताना चारचाकी वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने वाहनाने प्रथम एका दुचाकीला धडक दिली आणि त्यानंतर थेट एका घरात घुसली. मंगळवार पेठ परिसरातील बॉम्बे स्टार बेकरीसमोर हा अपघात घडला. चारचाकी वाहन वळण घेत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन भरधाव वेगाने पुढे गेले. यावेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला धडक देत वाहन थेट घरात घुसले. या घटनेत घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घरमालक इम्तियाज सौदागर यांच्या मालमत्तेची हानी झाली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला.

  • 09 Jun 2026 12:19 PM (IST)

    समीर सत्तार यांचा उमेदवारी अर्ज बाद

    जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत अर्ज बाद झाल्याने दिग्गजांना फटका बसला. कन्नडच्या आमदार आमदार संजना जाधव यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला. ब्दुल सत्तार यांचे पुत्र सिल्लोडचे नगराध्यक्ष समीर सत्तार यांचा सुद्धा अर्ज अवैध ठरला. जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक पदाच्या निवडणुकीसाठी आक्षेपणानंतर उमेदवारी अर्ज अपात्र ठरले. क्षुल्लक कारणावरून आमचा अर्ज बाद केलाय आम्ही कोर्टात धाव घेणार. समीर सत्तार यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर अब्दुल सत्तार यांची फोनवरून प्रतिक्रिया आली आहे.

  • 09 Jun 2026 12:10 PM (IST)

    नागपुरात 1.49 कोटींच्या मुद्देमालासह 150 किलो गांजा जप्त

    आज सकाळी नागपूरच्या पारडी पोलिसांनी आणि गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करत भंडारा-नागपूर महामार्गावरील जोगेंद्रसिंग ढाब्यासमोर 150 किलो 520 ग्रॅम गांजा जप्त केला. या कारवाईत गांजा, ट्रक, स्टील कॉईल आणि मोबाईल असा एकूण 1.49 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात ओडिशातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून दोन फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणी पारडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 09 Jun 2026 12:00 PM (IST)

    कुदळवाडी परिसरात अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त, नागरिकांचा रोष

    पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून आज पहाटेच्या सुमाराला चिखली कुदळवाडी परिसरात अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आली. त्या मध्ये मशीद आणि मंदिराचा ही समावेश.असल्याची माहिती आहे. या कारवाई दरम्यान संतप्त जमावाने आक्रमक होत तोडफोड केली. यात काही जण जखमी असल्याची माहिती ही मिळत आहे. महापालिकेने पहाटे केलेल्या या कारवाईत 28 हजार चौरस फूट बांधकाम पडण्यात आले…या कारवाई दरम्यान प्रचंड तणावाचे वातावरण होते. आता परिस्थिती नियंत्रणात आहे.

  • 09 Jun 2026 11:44 AM (IST)

    सरकारच्या कर्जमाफी विरोधात शेतकरी सेना रस्त्यावर

    राहुरी / अहिल्यानगर –  सरकारच्या कर्जमाफी विरोधात शेतकरी सेना रस्त्यावर उतरली . नगर – मनमाड महामार्गावर राहुरी येथे रास्ता रोको आंदोलन सुरू आहे.  शिंदे गट शिवसेना पक्षाचे शेतकरी सेनेचे राज्य उपाध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू असून स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील आंदोलनात सहभागी झाली आहे. सरकारने फसवी कर्जमाफी केल्याचा आरोप करत आंदोलन करण्यात येत असून शेतक-यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी आहे.

  • 09 Jun 2026 11:30 AM (IST)

    नागपूरमध्ये मनसेचं जिल्हा परिषद कार्यालयात अर्धनग्न आंदोल

    नागपूरमध्ये मनसेकडून जिल्हा परिषद कार्यालयात अर्धनग्न आंदोलन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी मिळणाऱ्या निधीत कपात करण्यात आली आहे.  गणवेशासाठीचा निधी 300 वरून 240 रुपये करण्यात आला, याच्या निषेधार्थ मनसेकडून आंदोलन सुरू आहे.

  • 09 Jun 2026 11:20 AM (IST)

    ऑनलाइन खत विक्रीचा राज्य सरकारचा पायलट प्रोजेक्ट शेतकऱ्याच्या मुळावर

    छत्रपती संभाजीनगर – ऑनलाइन खत विक्रीचा राज्य सरकारचा पायलट प्रोजेक्ट शेतकऱ्याच्या मुळावर आला आहे.  छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑनलाइन खत बुकिंग ॲपविरोधात शेतकरी आणि विक्रेते आक्रमक झालेत.  खत घ्यावं की नवीन मोबाईल ? खत बुकिंग करूनही नो रेकॉर्ड फाउंड चा ॲपमध्ये मेसेज आलेत.  खत उपलब्ध असूनही ॲपच्या अटींमुळे विक्री करता येत नसल्याची विक्रेत्यांची तक्रार आहे. ऑनलाइन प्रणाली रद्द करून पूर्वीप्रमाणे ऑफलाइन खत विक्री सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे.

  • 09 Jun 2026 11:10 AM (IST)

    शासकिय रुग्णालयामध्ये रुग्णाला स्ट्रेचर नसल्याने रुग्णाला पाठीवर नेलं, बच्चू कडूंनी रुग्णालयात संबंधितांना झापलं

    अमरावती – अकोला शहरातील शासकिय रुग्णालयामध्ये रुग्णाला स्ट्रेचर नसल्याने रुग्णाला पाठीवर नेण्याची वेळ आल्याचे प्रकरण समोर आल्याने खळबळ माजली होती.  बच्चू कडू यांनी त्या रुग्णालयात जाऊन संबंधितांना झापलं.  दोनच दिवसांपूर्वी रुग्णाला पाठीवर नेण्यात आल्याचा  व्हिडिओ व्हायरल झाला होता .  रुग्णांना झालेल्या गैरसोयीवरून बच्चू कडूंनी अधिकाऱ्यांना सुनावलं.

  • 09 Jun 2026 10:57 AM (IST)

    गडचिरोलीत वादळाचा तडाखा, वीज पुरवठा 12 तासांपासून ठप्प, जनजीवन विस्कळीत

    गडचिरोली: काल रात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागाला मोठा फटका बसला असून, आलापल्ली ६६ केव्ही विद्युत पुरवठा वाहिनी खंडित झाली आहे. या पहिल्याच वादळामुळे आलापल्लीपासून ते सिरोंचा तालुक्यापर्यंतच्या जवळपास ४५ ते ५० गावांचा वीज पुरवठा गेल्या १२ तासांपासून पूर्णपणे बंद आहे. अचानक वीज गुल झाल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. याचा सर्वाधिक फटका स्थानिक नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा योजनांना बसला असून, नागरिकांची घरगुती कामे आणि शेतकऱ्यांच्या शेती पंपांचे कामही ठप्प झाले आहे. या दीर्घकालीन वीज संकटामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून, विद्युत पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्याची मागणी करण्यात येत आहे.

  • 09 Jun 2026 10:46 AM (IST)

    शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज कोल्हापुरात विराट मोर्चा; सतेज पाटील, राजू शेट्टी करणार नेतृत्व

    कोल्हापूर: शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलनाचा भडका उडाला असून, ‘शक्तीपीठ विरोधी कृती समिती’च्या वतीने एका भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेस नेते सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली हा मोर्चा ऐतिहासिक दसरा चौक येथून निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या आंदोलनात पश्चिम महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. कोणत्याही प्रकारची कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी दसरा चौक आणि परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. विशेष म्हणजे, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कालच कृती समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत, मात्र तरीही आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम असून आज कोल्हापुरात जोरदार शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यता आहे.

  • 09 Jun 2026 10:37 AM (IST)

    नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना वेग, गणेश गितेंच्या पाठिंब्यासाठी किशोर दराडे मैदानात

    नाशिकमध्ये सध्या राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला असून, महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे बंधू तथा शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी थेट गणेश गिते यांच्या निवासस्थानी भेट दिली आहे. गोकुळ गिते यांचा निवडणुकीसाठी अधिकृत पाठिंबा मिळवण्यासाठी दराडे यांच्याकडून हे जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे समजते. या दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात आता जोरदार चर्चा रंगू लागली असून, आगामी काळात याचे काय राजकीय परिणाम होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • 09 Jun 2026 10:27 AM (IST)

    बदलापुरात खळबळ; मनसे पदाधिकारी राजेश शेटे यांना भरधाव कारने उडवले

    बदलापूरमधील पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलावर एक भीषण अपघाताची घटना घडली असून यामध्ये मनसेचे स्थानिक पदाधिकारी राजेश शेटे गंभीर जखमी झाले आहेत. शेटे हे आपल्या दुचाकीवरून राँग साईडने (विरुद्ध दिशेने) येत असताना समोरून येणाऱ्या एका भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली. हा संपूर्ण अपघात उड्डाणपुलावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून तात्काळ फरार झाला असून, गंभीर जखमी झालेल्या राजेश शेटे यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलीस आता फरार कार चालकाचा शोध घेत आहेत.

  • 09 Jun 2026 10:15 AM (IST)

    पंडित नेहरुंनी कोणतेही पक्ष फोडले नाहीत – संजय राऊत

    पंडित नेहरुंनी कोणतेही पक्ष फोडले नाहीत. कधीही विरोधकांचे पक्ष फो़डले नाहीत. १२ वर्षात मोदींनी एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही. मोदींनी केदारनाथमध्ये जाऊन आत्मचिंतन करावं – संजय राऊत

  • 09 Jun 2026 10:07 AM (IST)

    अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत नवा ट्विस्ट; विप्लव बाजोरियांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता

    अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत माजी आमदार विप्लव बाजोरिया यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज त्रुटींचे कारण देत बाद करण्यात आला होता. या निर्णयाला बाजोरिया यांनी आधी नागपूर खंडपीठात आव्हान दिले, मात्र न्यायालयाने अंतरिम दिलासा न देता १७ जूनला पुढील सुनावणी ठेवली. त्यामुळे बाजोरिया यांनी तात्काळ सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले असून, न्यायालयाने त्यांची याचिका दाखल करून घेतली आहे. ९ किंवा १० जून रोजी यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता असून, जर न्यायालयाने बाजोरिया यांना दिलासा दिला आणि त्यांचा अर्ज मंजूर झाला, तर अमरावती विधान परिषदेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा चौरंगी लढत पाहायला मिळून मोठा राजकीय ट्विस्ट निर्माण होऊ शकतो.

  • 09 Jun 2026 09:50 AM (IST)

    जळगावच्या अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथे तिहेरी अपघातात जण सहा ठार झाल्याची घटना

    कार , एस टी आणि मोटरसायकल अशा तीन वाहनांमध्ये अपघात झाल्याची माहिती. अमळनेर धुळे रस्त्यावर मंगरूळच्या पुढे हॉटेल वृंदावन जवळ अपघात झाल्याची घटना. या अपघातात दुचाकीस्वार स्वार जागीच तसेच चार चाकीतील महिला आणि पुरुष अशा एकूण सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. गावकरी , पोलीस आणि एस टी कर्मचारी यांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले.

  • 09 Jun 2026 09:40 AM (IST)

    संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी यंदा तीन बैलजोड्या

    जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थांच्या वतीने संत तुकाराम महाराजांच्या 341 व्या देहू ते पंढरपूर पालखी सोहळ्याची तयारी सुरू केली आहे. यंदाच्या पालखी रथ सेवेसाठी खिल्लार जातीच्या तीन बैलजोड्या संस्थान स्वतः खरेदी करणार आहे. पालखी रथासाठी ताकदवान व उंच बैलजोड्याची निवड केली जाते,गेल्यावर्षी संस्थानच्या वती

  • 09 Jun 2026 09:32 AM (IST)

    देशातील जनता हैराण आहे- विजय वडेट्टीवार

    देशातील जनता हैराण झाली आहे, १२ वाजले आहेत, असे मोठे विधान नुकताच विजय वडेट्टीवार  यांनी केले. यादरम्यान त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

  • 09 Jun 2026 09:30 AM (IST)

    केज तालुक्यातील पवारवाडीत आर्थिक व्यवहारातून एका व्यक्तीला तिघांकडून मारहाण

    केज तालुक्यातील पवारवाडी येथे कैलास पवार नामक व्यक्तीला आर्थिक व्यवहारातून तीन जणांनी लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. तुझ्या वडिलांसोबत चा आमचा व्यवहार मिटवून टाक असे म्हणत मारहाण केल्याची केज पोलीसांकडे तक्रार. जखमी व्यक्तीवर केज उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.

  • 09 Jun 2026 09:20 AM (IST)

    शक्तीपीठ महामार्गावर शेतकऱ्याची अनोखी मागणी; बॅनरची राज्यभर चर्चा

    धाराशिव जिल्ह्यातील चिखली येथील शेतकरी धनु तांबे यांनी शक्तीपीठ राष्ट्रीय महामार्गाबाबत एक अनोखी मागणी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. महामार्गासाठी आपली 2 एकर जमीन मोफत देण्याची तयारी दर्शवत, त्या बदल्यात आपल्या जमिनीतून जाणाऱ्या महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

  • 09 Jun 2026 09:05 AM (IST)

    पतीचा खून करून प्रेयसी-प्रियकराचा एकमेकांना कॉल ; म्हणाले ‘कार्यक्रम ओके’

    हत्येनंतर अपघाताचा बनाव रचून रस्त्याच्या कडेला टाकला होता मृतदेह, नेकनूर पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा अवघ्या पाच दिवसांत लावला. बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे प्रियंका सोनवणे हिने आपल्या प्रियकराच्या मदतीने पती किरण सोनवणे यांची गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर हा प्रकार केवळ अपघात दिसावा म्हणून आरोपींनी मृतदेह दुचाकीखाली दाबून रस्त्याच्या कडेला टाकला होता.

  • 09 Jun 2026 09:00 AM (IST)

    नवनीत राणा यांच्याकडून राष्ट्रवादीच्या प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम

    भारतीय जनता पार्टीची मी प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्ता आहे. मी कोणत्याही पदासाठी आपली विचारधारा बदलणार नाही. मी सदैव भारतीय जनता पार्टीचे कार्य प्रामाणिकपणे करत राहीन, अशी पोस्ट लिहित नवनीत राणा यांनी राष्ट्रवादीच्या प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आदरणीय सुनेत्रा वहिनी, अजितदादा पवार आणि पार्थदादा पवार यांनी मला राज्यसभेवर पाठवण्याबाबत इच्छा व्यक्त केली होती. मात्र राज्यसभेच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची अट मला मान्य नव्हती, असं त्यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून मी सुनेत्रा वहिनी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्यसभेची जागा भारतीय जनता पक्षाला सोडण्याची विनंती केली होती. परंतु काही कारणास्तव हे शक्य झाले नाही. तरी देखील माझ्यावर विश्वास ठेवून मला राज्यसभेची संधी देण्याचा विचार केल्याबद्दल मी सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांचे आणि पार्थ दादा पवार यांचे आभारी आहे, असं त्यांनी म्हटलंय.

  • 09 Jun 2026 08:50 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगर- बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्जांवरील आक्षेपांची सुनावणी पूर्ण

    छत्रपती संभाजीनगर- बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्जांवरील आक्षेपांची सुनावणी पूर्ण असून आज पात्र आणि अपात्र उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार आहे. या निकालाकडे जिल्ह्याच्या राजकीय आणि सहकार क्षेत्राचे लक्ष लागून आहे. काँग्रेसचे खासदार कल्याण काळे, आमदार संजना जाधव, आमदार रमेश बोरनारे, अब्दुल सत्तार यांचा मुलगा समीर सत्तार, मंत्री संजय शिरसाट, हर्षदा शिरसाट यांच्यासह अन्य उमेदवारांच्या अर्जांवर आक्षेप घेण्यात आले होते.

  • 09 Jun 2026 08:40 AM (IST)

    वसंत देशमुखांची उमेदवारी जाहीर करताना पक्षाने विचारातच घेतलं नाही- अभिजीत पाटील

    “वसंत देशमुखांची उमेदवारी जाहीर करताना पक्षाने विचारातच घेतलं नाही. माहिती न होताच पक्षाने देशमुखांना उमेदवारी दिली. मोहिते पाटलांनी अकलुजच्या बैठकीलाही मला बोलवलं नाही. पक्ष उमेदवार देणार हेच माहिती नव्हतं. अर्ज भरतानाही माहिती नव्हती.  पंढरपुरच्या सभापतीपदाच्या निवडीवेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष असलेल्या वसंत देशमुखांनीच तुतारीचा उमेदवार पाडून भाजपचा उमेदवार निवडून आणला. मग आता आम्ही त्यांना मतं का द्यायचं? विरोधी उमेदवार असलेले राजेंद्र राऊत हे भेटून गेले, तीन वेळा फोन आला. मात्र पक्षाच्या वसंत देशमुखांचा साधा एकही फोन नाही, भेटही नाही. आता मला माझा पर्याय काढावा लागेल,” अशा शब्दांत आमदार अभिजीत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.

  • 09 Jun 2026 08:30 AM (IST)

    ट्रेनमधून उतरा आणि थेट मेट्रोत चढा; जोगेश्वरी टर्मिनसवर प्रवाशांना सुविधा

    मुंबई : जोगेश्वरी टर्मिनसला मुंबई मेट्रो नेटवर्कशी जोडण्याच्या दृष्टीनेही पश्चिम रेल्वेने तयारी केली आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवाशांना थेट लोकल सोबतच मेट्रो सेवा उपलब्ध होणार आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही योजना सध्या अंतिम टप्प्यात असून, ती पूर्ण झाल्यावर या टर्मिनसला मेट्रो मार्ग क्रमांक ६ आणि ७अ सोबत थेट जोडणे शक्य होणार आहे.

  • 09 Jun 2026 08:20 AM (IST)

    नाशिक – अपक्ष उमेदवार गोकुळ गीते निवडणूक लढण्यावर ठाम

    नाशिक – अपक्ष उमेदवार गोकुळ गीते निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यास त्यांनी नकार दिला आहे. मंत्री उदय सामंत आणि गिरीश महाजन यांच्या भेटीनंतर गोकुळ गीते यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मतदारांचा कौल माझ्याकडे असल्याने मी पाठिंबा दिल्यास मतदारांचा घात होईल, असं ते म्हणाले.

  • 09 Jun 2026 08:16 AM (IST)

    फसव्या संदेशांबाबत सतर्क राहा; नागरिकांना आवाहन

    मुंबई : लोकअदालतीच्या नावावर दंड भरण्यासाठी मोबाईलवर एसएमएस, व्हॉट्सअॅप संदेश किंवा पेमेंटसाठी ऑनलाईन लिंक पाठवली जात नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या कोणत्याही फसव्या संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मुंबई शहर जिल्हा विधि सेवा प्राधिकरणातर्फे करण्यात आले आहे.

  • 09 Jun 2026 08:15 AM (IST)

    ‘एलएलएम सीईटी’चे हॉल तिकीट उपलब्ध

    मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ साठीच्या सेंटर बेस्ड ऑनलाइन एल.एल.एम. कॉमन एन्टरन्स टेस्ट २०२६ परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहे. ही परीक्षा शुक्रवार, १२ जून रोजी दुपारी २ ते ३ आणि आणि संध्याकाळी ५ ते ६ या दोन सत्रात ऑनलाइन घेतली जाणार आहे. या परीक्षेचे हॉल तिकीट विद्यार्थी विद्यापीठाच्या संकेत स्थळावरून डाऊनलोड करू शकतात.

  • 09 Jun 2026 08:15 AM (IST)

    विद्यापीठ स्पर्धा परीक्षा संपन्न; नागरी सेवा परीक्षेसाठी १२८ विद्यार्थ्यांनी नोंदणी

    मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर सेंटर ऑफ एक्सेलेंस केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या मोफत मार्गदर्शन योजनेअंतर्गत विविध स्पर्धा परीक्षांसाठी आयोजित प्रवेश परीक्षा नुकत्याच यशस्वीरीत्या पार पडल्या. यातील नागरी सेवा परीक्षेसाठी १२८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, ७९ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते.

  • 09 Jun 2026 08:14 AM (IST)

    ज्वेलर्स व्यावसायिक देवकृष्णा सागर यांच्या कुटुंबाची ८ लाखांची फसवणूक

    मुंबई : कफ परेड येथील ज्वेलर्स व्यावसायिक देवकृष्णा सागर यांच्या कुटुंबाची सायबर भामट्यांनी ८ लाखांची फसवणूक केली. महानगर गॅसचे बिल अपडेट करण्याच्या नावाखाली व्हॉट्सअॅपवर एपीके फाइल पाठवून ती इन्स्टॉल करण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर मोबाईलवरील कॉल व मेसेज फॉरवर्ड करून बँक खात्यातून ८ लाखांची रक्कम लंपास करण्यात आली. याप्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे.

  • 09 Jun 2026 08:13 AM (IST)

    सायन-प्रतीक्षानगरवासीय ‘बेस्ट’ विरोधात आक्रमक

    मुंबई : सायन-प्रतीक्षानगर परिसरातील बेस्टचा वीज पुरवठा गेल्या वर्षभरापासून वारंवार खंडित होत असल्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. उन्हाळा संपत आला तरी या समस्येतून नागरिकांची सुटका झालेली नाही. गेल्या तीन ते चार दिवसांपासून तर सतत वीज पुरवठा खंडित होत असून, नागरिक आता वीज पुरवठा नीटनेटका व्हावा, याकरिता आंदोलन करणार आहेत.

गोकुळ गीते निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यास गोकुळ गीते यांनी नकार दिला आहे. मंत्री उदय सामंत आणि गिरीश महाजन यांच्या भेटीनंतर गोकुळ गीते यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाशिकच्या ओझर विमानतळावर अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी महायुतीतील नेत्यांची भेट घेतली होती. मतदारांचा कौल माझ्याकडे असल्याने मी पाठिंबा दिल्यास मतदारांचा घात होईल असं ते म्हणाले. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यास स्पष्ट नकार दिल्याची गोकुळ गीते यांची माहिती आहे. तर दुसरीकडे आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस) गणेशमूर्तीच्या विसर्जनाबाबत पर्यावरणपूरक आणि व्यवहार्य धोरण निश्चित करण्याची मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि बृहन्मुंबई महापालिकेकडे केली. समितीने पीओपीच्या उंच मूर्तीवर तात्काळ सरसकट बंदी घालण्याऐवजी विसर्जनानंतर मूर्ती संकलित करणे, त्यांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे आणि त्यावर पुनर्प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची मागणी केली आहे. यासह देश-विदेशातील, मनोरंजन, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील अपडेट्स एका क्लिकवर जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

Published On - Jun 09,2026 8:11 AM

Follow Us
लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला ठाकरेंचा थेट इशारा
Uddhav Thackeray | लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला उद्धव ठाकरेंचा थेट इशारा
दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! आदित्य -अमित एकाच मंचावर
Dadar | दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा महासागर; आदित्य ठाकरे-अमित ठाकरे एकाच मंचावर
पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
Pm Narendra Modi | पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत....
Rahul Gandhi | विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र प्रधानांच्या राजीनाम्याचं काय?
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय? काय म्हणालं सरकार?
पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा...
NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय
CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
मोठी बातमी! CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप