Maharashtra Live News : ज्युनिअर ठाकरेंवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता
Maharashtra Live News : आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलली तातडीची बैठक बोलावली आहे. तर दुसरीकडे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमानवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
आज दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरात दोन आंदोलन
आज दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरात दोन आंदोलन होणार आहेत. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनामासाठी मनसे आणि सीजीपी आक्रमक होणार असून, मनसेकडून आज स्वाक्षरी मोहीम राबवली जाणार दुसरीकडे ठाकरे सेनेचं दडपशाही विरोधात मूक आंदोलन होणार आहे, हातात तिरंगा घेऊन आंदोलनात सामील होण्याचं ठाकरेंच्या शिवसेनेने नागरिकांना आव्हान केलं.
-
आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ येथे ‘हुतात्मा केसरी २०-२०’ बैलगाडा शर्यतींचा थरार
नवरात्रोत्सवानिमित्त आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ येथे ‘हुतात्मा केसरी २०-२०’ बैलगाडा शर्यतींचा थरार रंगला. पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील नामांकित बैलगाड्यांनी या शर्यतीत सहभाग घेतला. या शर्यती पाहण्यासाठी बैलगाडा शौकिनांनी मोठी गर्दी केली.
-
-
नवरात्र उत्सवा निमित्त शिवनेरी गडावर आई शिवाई मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
राज्यभरात आज नवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत असून, पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील ऐतिहासिक शिवनेरी गडावरही आई शिवाई मातेच्या उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. कुसूर ग्रामपंचायतीच्या वतीने हा उत्सव साजरा केला जातो. गडावर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आई शिवाई मातेच्या नावावरून ठेवण्यात आल्याची ऐतिहासिक परंपरा आहे. त्यामुळे शिवाई मातेच्या दर्शनाला विशेष महत्त्व असून, राज्याच्या विविध भागांतून भाविक आणि पर्यटक शिवनेरी गडावर येत असतात. नवरात्र उत्सवा निमित्त आई शिवाई मातेच्या दर्शनासाठी भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर शिवनेरी गडावर भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, आई शिवाई मातेच्या दर्शनासाठी भाविकांची लगबग सुरू आहे.
-
जालन्याच्या जाफराबाद तालुक्यातील जिवरेखा मध्यम प्रकल्पाचा पाणी साठा केवळ 0.042 टक्क्यांवर
जालना जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच आली असल्याचे चित्र पाहायला मिळतंय. कारण मागच्या दोन महिन्यापासून जालना जिल्ह्यात पाऊस झाला असल्याने जलस्रोत आटायला सुरुवात झाली, जाफराबाद तालुक्यातील सर्वात महत्त्वाचा आणि मोठा असलेला जीव रेखा मध्यम प्रकल्पात पाणीसाठा देखील आता 0.042 टक्क्यावर येऊन पोहोचला असून आता फक्त मृतसाठाच शिल्लक राहिलाय, या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या 10 ते 12 गावांचा पिण्याच्या पाण्यासह हजारो हेक्टर शेतीच्या सिंचनाचा प्रश्न गंभीर बनलाय. दरम्यान येणाऱ्या काळात हीच परिस्थिती यापेक्षाही बिकट होणार हे देखील तितकच खरं आहे,दुष्काळी परिस्थितीचं विदारक चित्र दाखवणारा ड्रोन व्हिडिओ देखील समोर आला
-
मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाच आस्थापनांवर कारवाई
मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाच आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे. साई प्रितम, गोदावरी लॉजिंग, सफरॉन लॉजिंग, पंचमी हॉटेल-लॉज आणि पंचवटी एक्स्प्रेसचा समावेश करण्यात आला आहे. पाहुण्यांची संपूर्ण माहिती नोंदवणे, ओळखपत्रांची पडताळणी करणे बंधनकारक असणार आहे. १६ सप्टेंबरपर्यंत माहिती सादर करण्याचे आदेश; मात्र पालन न केल्याचे तपासात उघड. पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. ध्वजारोहण सोहळ्यासाठी देश-विदेशातून भाविक आणि पर्यटक येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यावर पोलिसांचा भर आहे.
-
-
कल्याणमध्ये सोसायटीत घुसून मास्टर कीने दुचाकी चोरी; चोरटा पसार
कल्याणमध्ये सोसायटीत घुसून मास्टर कीने दुचाकी चोरी केल्यानंतर चोरटा पसार झाला. ही घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. दोन दिवसांनंतरही गुन्हा दाखल नसल्याचा दावा करण्यात येत आहे. कल्याणच्या शहाड-मोहने रोडवरील गुरु दर्शन इमारतीत मध्यरात्री भिंतीवरून उडी मारून चोरट्याने प्रवेश केला. हँडल लॉक तोडून मास्टर कीने दुचाकी सुरू केली आणि सोसायटी सदस्याप्रमाणे बंद गेट उघडून दुचाकी घेऊन पसार झाला. दुचाकी चोरीला दोन दिवस उलटूनही खडकपाडा पोलिसांकडून गुन्हा दाखल झाला नसल्याची तक्रार रमेश जाधव यांनी केली आहे, उच्चभ्रू सोसायटीतील चोरीमुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
-
धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढण्याचे संकेत!
धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढण्याचे संकेत वर्तवण्यात येत आहे. जिल्ह्यातील भूजलस्तर आता ८.८६ मीटरवर आला आहे. ऑक्टोबर हिट आणि दुष्काळी परिस्थितीमुळे दिवसेंदिव पाणी पातळी झपाट्याने खाली आली आहे. २० दिवसांत १.६६ मीटरने पाणी पटली घटली. जिल्ह्यातील ११४ निरीक्षण विहिरींची भूजल विभागाकडून तपासणी केली जात आहे, कमी पाऊस आणि वाढत्या पाणी उपशामुळे भूजलपातळीत मोठी घट झाली आहे. आगामी काळात पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता नोंदवण्यात येत आहे.
-
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचे त्रंबकेश्वरच्या साधूंकडून स्वागत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचे त्रंबकेश्वर च्या साधूंनी स्वागत करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतर ठिकाणी पाहणी करायला पाहिजे होती अशी अपेक्षा साधूंनी व्यक्त केली. यापुढेही मुख्यमंत्र्यांनी अचानक कामांची पहाणी करण्याची मागणी केली. रविवारी देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक आणि त्रंबकेश्वरच्या कामाची पाहणी केल्याने यंत्रणेची धावपळ उडाली होती.
आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्ञानेश कुमारांविरोधात ज्युनिअर ठाकरेंनी रविवारी आंदोलन केलं. तर शिवसेना भवानासमोर पोलीस आणि ठाकरेंच्या शिवसेमेमध्ये झटापट झाली. याच कारणामुळे ज्युनिअर ठाकरेंवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलली तातडीची बैठक बोलावली आहे. मनसेचे सर्व नेत्यांची शिवतीर्थावर बैठक होणार आहे. काल झालेल्या सीजीपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलण्यात आली आहे. मनसेची पुढच्या आंदोलनाची आज रणनीती आखली जाणार आहे. आज सकाळी 11 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनराव यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्यानंतर विद्यार्थ्यांकडून जल्लोष करण्यात येत आहे. आणखी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख प्रदीप पुर्णेकर हत्येतील मुख्य फरार आरोपी संतोष कनोजिया उर्फ टल्ली आणि अमित सिंग यांना प्रयागराज येथून अटक केल्यानंतर ठाण्यातील गुन्हे शाखा या ठिकाणी आणण्यात आले आहे. यासह राज्य, क्रीडा, मनोरंजन आणि राष्ट्रीय क्षेत्रातील इतर घडामोडी जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा..
Published On - Oct 12,2026 8:08 AM
