Maharashtra News LIVE : शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज कोर्टात सुनावणी..
Maharashtra News LIVE : शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे. येत्या 30 ऑक्टोबरपर्यंत या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करण्याचे न्यायालयाने सूचित केलं होतं.

LIVE NEWS & UPDATES
-
नांदेडमधील 51 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ
शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी अखेर प्रसिद्ध झाली असून यामध्ये नांदेड जिल्ह्यातील ५१ हजार ७२५ पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलाय. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १ लाख ९७ हजारांपेक्षा जास्त शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. ही यादी ग्रामपंचायती आणि बँकांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली असून शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन त्वरित आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
-
सीजेपी नेत्यांना पाच दिवसांचा कारावास -अजिंक्य शिंदे
सीजेपी नेते आशुतोष रांका आणि सौरव दास यांना पाच दिवसांच्या कारावासाची शिक्षा झाली. त्यांनी आधी लेखी दिली होते. त्यांनी फक्त भारताचा झेंडा फडकवला. तर त्यांना अटक करत असेल तर सरकारला लाज वाटली पाहिजे. साध आंदोलन करणाऱ्यांना अटक केली जाते, असा पलटवार नेते अजिंक्य शिंदे यांनी केला.
-
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर
रोजगारासाठी आवश्यक दोन मोठ्या प्रकल्पांचे मुख्यमंत्री फडणवीस करणार उद्घाटन. तळेगाव एमआयडीसी मध्ये फडणवीसांच्या हस्ते दोन मोठ्या प्रकल्पांचे उद्घाटन. मुख्यमंत्री ह्युंदाई मोटर इंडियाच्या पुण्यातील उत्पादन प्लांटचे करणार उद्घाटन. इलेक्ट्रिक हेव्ही ड्युटी कमर्शियल व्हेहिकल कॉम्प्लेक्सचे फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन
-
नालासोपारा येथील प्रकरणानंतर हिंदू संघटना झाली सतर्क
शारदीय नवरात्र उत्सवाच्या गरबा कार्यक्रमात नालासोपारा येथील एका तरुणानं मुलींना टार्गेट करून त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार करून लव्ह जिहादसारखा गंभीर प्रकार केल्याचा गंभीर प्रकार काल समोर आला. यापूर्वी भंडाऱ्यासह राज्यभरातील हिंदू संघटनांनी गरबा उत्सवात केवळ हिंदूंना प्रवेश द्यावा, गरबा उत्सवात सहभागी होणाऱ्या तरुणांचे आयकार्ड चेक करावे, किंवा माथ्यावर टीळा लावावा, अशी घोषणा केली होती. मात्र, काल नालासोपारा येथील उघडकीस आलेल्या घटनेनंतर भंडारा येथील हिंदू संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
-
21 तास पुणे बेंगलोर महामार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी हे आंदोलन सुरू
21 तास पुणे बेंगलोर महामार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे. मात्र अजूनही केंद्र सरकारने हे आंदोलन गांभीर्याने घेतलेले नाही. सरकार आमच्या आंदोलनाला अंडरस्टिमेट करायचा प्रयत्न करतेय. पोलीस आणि प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकारी आमच्याशी संपर्क साधत आहेत. हायवे वरील वाहतूक हळूहळू ठप्प होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. कर्नाटक मधील रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी काही मध्यस्थ बोलण्याचा प्रयत्न करत आहेत
-
-
कोल्हापूर राजू शेट्टी यांचे स्वीय सहाय्यक स्वस्तिक पाटील आणि कर्नाटक पोलिसांमध्ये वाहनांना वाट करून देण्याच्या मुद्द्यावरून वाद
भोर तालुक्यातील करंदी -कामथडी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार VIDEO आंबेगाव तालुक्यातील पहाडदरा मार्गे अवसरीकडे जाणाऱ्या घाट रस्त्यात बिबट्याचे वारंवार दर्शन VIDEO पालघर शहराच्या पूर्वेकडील नवली परिसरातील मानवी वस्ती लगत बिबट्या दिसून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
-
आयटीआयमध्ये मिळणार पाळीव प्राण्यांची काळजी घेण्याचे प्रशिक्षण
पुण्यातील पेटकेअर एज्युकेशन अँड ट्रेनिंग संस्थेच्या धर्तीवर मुंबईतही पेटकेअर शिक्षण व प्रशिक्षण संस्था सुरू करण्यासाठी कौशल्य विकास विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पुढाकार घेतला आहे. राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) पेटकेअरविषयक विशेष अभ्यासक्रम सुरू करून या क्षेत्रात रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्यास चालना मिळेल
-
राज्य मंत्रिमंडळाची बैठक दुपारी 12 वाजता सह्याद्रीवर होण्याची शक्यता आहे. अभिजीत दिपके सकाळी नागपूर विमानतळावरून इंडिगो फ्लाईटने दिल्लीकडे जाणार आहेत. दिल्लीत मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. सीजेपीच्या महत्वाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी आज दुपारी 2 वाजल्यानंतर सरन्यायाधीश यांच्या पीठासमोर सुनावणी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर मध्ये काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनाला काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, खासदार कल्याण काळे खासदार, रवींद्र चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार आहेत. दुपारी बारा वाजता पैठण गेट ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत हा मोर्चा असेल. यासह राज्य, क्रीडा, मनोरंजन आणि राष्ट्रीय क्षेत्रातील इतर घडामोडी जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा..
Published On - Oct 14,2026 8:20 AM
