Maharashtra News LIVE : शिवसेना शिंदे गटाने दसरा मेळाव्याचा टीझर लॉन्च
Maharashtra News LIVE : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज वाशिम जिल्हा दौऱ्यावर आहेत. दुष्काळी परिस्थितीची पाहणी करत शेतकऱ्यांच्या नुकसानीचा घेणार आढावा. मालेगाव तालुक्यातील दही, वाशिम तालुक्यातील पांडव उमरा येथे शेतशिवार पाहणी करून शेतकऱ्यांशी साधणार संवाद.

राज्य सरकारने दुष्काळी तालुक्यांची संख्या 265 वरून 305 केली. पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि आंबेगाव तालुक्याचा देखील दुष्काळग्रस्त मध्ये समावेश. पुणे जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांची संख्या 8 वरून 10. आंबेगाव आणि जुन्नर तालुक्याचा समावेश. जुन्नर आणि आंबेगाव मधील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येणार.दोन्ही तालुक्यांना दुष्काळी निकष होणार लागू. आमदार संग्राम जगताप यांनी नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले. राज्यात दुष्काळाचे सावट आहे. पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. पाण्याचा वापर गरजेपुरता वापर करावा, अतिरिक्त पाण्याचा वापर टाळावा. आमदार संग्राम जगताप यांच्याकडून आवाहन. राज्यात फार मोठे दुष्काळाचे सावट, पिण्याच्या पाण्याची अवस्था अत्यंत गंभीर आहे. येणाऱ्या काळात पाण्याची अधिक तीव्रता वाढत जाणार. त्यामुळे पाण्याचा वापर जपून करावा. पुणे महापालिकेने दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून,या निर्णयामुळे पुणेकरांना पाणी नियोजन करावे लागणार आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
बोदलकसा धरणातून चार दिवसांपासून पाण्याचा विसर्ग.
बोदलकसा धरणातून चार दिवसांपासून पाण्याचा विसर्ग.
धरणाचा पाणीसाठा 95 वरून 62 टक्क्यांवर
धरणाची मातीची खचली
रब्बी हंगामाच्या पाणी उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह….
बोदलकसा धरणातील पाणी रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाचे युद्धपातळीवर प्रयत्न
-
नवी मुंबईकरांना पाणी कपातीपासून दिलासा
राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विविध महानगरपालिका क्षेत्रांमध्ये पाणी कपातीचे धोरण राबवले जात असताना नवी मुंबईकरांसाठी मात्र दिलासादायक बातमी समोर आली आहे. नवी मुंबईत पाणी कपात करण्याची आवश्यकता नसल्याची स्पष्ट भूमिका राज्याचे वनमंत्री आणि ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी घेतली आहे. नवी मुंबईला पुढील दोन महिन्यांत अतिरिक्त ५० एमएलडी पाणी मिळणार आहे.
-
-
उद्या मुंबईमध्ये सीजेपीचं आंदोलन, पोलिसांनी दिली परवानगी
उद्या मुंबईच्या आझाद मैदानात CJP कडून लहरा दो तिरंगा आंदोलन
पोलिसांनी दिली आंदोलनाला परवानगी
आशुतोष रांका आणि सौरभदास यांच्या अटकेविरोधात आंदोलन
आझाद मैदानात करणार आंदोलन
आंदोलनाला पोलिसांकडून परवानगी मिळाली
-
आता सुट्या मसाला पावडरच्या विक्रीवर निर्बंध; FDA चे कठोर निर्देश
मसाल्यांमधील भेसळ आणि प्रतिबंधित रंगांचा वापर रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर कठोर अन्नसुरक्षा अनुपालन आदेश जारी केला आहे. त्यानुसार मसाला पावडर आणि मिश्र मसाल्यांचे योग्य पद्धतीने पॅकिंग व सीलिंग करूनच विक्री करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे विनापॅकिंग सुटे मसाले विकणाऱ्या व्यावसायिकांना नियमांनुसार विक्री पद्धतीत बदल करावा लागणार आहे.
-
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यासाठी रवाना
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यासाठी रवाना
पुण्यात महर्षी पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार
तर पुणे शिक्षक पदवीधर निवडणुकी संदर्भात देखील स्थानिक नेत्यांशी चर्चा होण्याची शक्यता.
एकनाथ शिंदे महायुतीत नाराज असल्याची चर्चा , या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्वाचा
-
-
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यासाठी रवाना
पुण्यात महर्षी पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजेरी लावणार. त्याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे पुण्यासाठी रवाना झाले आहेत . तसेच पुणे शिक्षक पदवीधर निवडणुकी संदर्भात देखील स्थानिक नेत्यांशी चर्चा होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे महायुतीत नाराज असल्याची चर्चा असून त्या या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्वाचा आहे.
-
गडचिरोली – भाजप पक्षाचा नगरसेवकाला लाच घेताना अटक, एसीबीची कारवाई
अहेरी नगरपंचायत अंतर्गत विद्युत कामाच्या करारापोटी अधिकृत नगरसेवक असलेल्या अमोल गोडेलीवार यांनी कंत्राटदाराकडून 1 लाख 20 हजार रुपयाची मागणी केली होती. आज अहेरी बाजार वाडीत लाचेची रक्कम स्वीकारताना लाच लुजपत प्रतिबंधक विभाग एसीबीने या नगरसेवकाला रंगेहात अटक केली
-
तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय; मसाल्यांबाबत FDA ची नवी नियमावली जाहीर
तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय; मसाल्यांबाबत FDA ची नवी नियमावली जाहीर. मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग मिसळल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला.
सुटे मसाले विक्रीवर निर्बंध; पॅकिंग आणि लेबलिंग बंधनकारक असेल. तसेच मसाले वाळवण्यासाठी रस्ते, गटारे आणि कचराकुंड्यांजवळ वापर करण्यास मनाई करण्यात आली. व्यापाऱ्यांकडून नियम पाळण्याचे आश्वासन, परंतु सर्व मसाले पॅकिंग करणे शक्य नसल्याचे मत व्यक्त करण्यात आलं.
-
नवी मुंबई – इरिडियमच्या नावाखाली ३०० गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक; दोघांना अटक
नवी मुंबई – इरिडियम धातूच्या विक्रीतून कोट्यवधींचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सुमारे ३०० गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी नवी मुंबई गुन्हे शाखेने दोघांना अटक केली. तीर्थंकर तुषार कांति सेनगुप्ता आणि जयंत ओक अशी दोघांची नावं आहेत. मुख्य आरोपी सेनगुप्ता हा तुर्भे येथील एका आलिशान हॉटेलमध्ये मुक्कामाला होता. त्याने ओक याला एजंट म्हणून नेमले होते. पाच लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 9 ते 28 कोटी रुपये परत देण्याचे आमिष दाखवलं. पोलिसांनी ग्राहक बनून सापळा रचला आणि एक लाख रुपये आगाऊ घेताच दोघांना अटक केली.
-
ललित पंचमीला विठ्ठल-रुक्मिणी मातेचा अलंकारिक साज
नवरात्र महोत्सवातील ललित पंचमीच्या पाचव्या माळेनिमित्त श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला पारंपरिक पोशाखासह विविध अलंकार परिधान करण्यात आले. रुक्मिणी मातेला वनदेवी मातेचा पारंपरिक पोशाख तसेच आकर्षक फुलांची साडी नेसवण्यात आली. श्री विठ्ठलास सोन्याचा मुकुट, कौस्तुभ मणी, मोत्याचा तुरा, मोहरांची माळ व मोत्याची कंठी, तर रुक्मिणी मातेला सोन्याचा मुकुट, सोन्या-मोत्यांचे चांदवड, हिरवी चिंचपेटी, मोठी नथ आणि मोत्याचा कंठा असे आकर्षक अलंकार परिधान करण्यात आले.
-
अभिनेता इमरान खानच्या समर्थनार्थ तुषार गांधींचं ट्विट
अभिनेता इमरान खानच्या समर्थनार्थ तुषार गांधींचं ट्विट. भारत सोडून जाण्यासाठी दिलेल्या नोटीसचा निषेध. मी सरकारबद्दल रोष व्यक्त करणाऱ्या प्रत्येकाच्या पाठिशी आहे-तुषार गांधी
-
ब्लड डोनेशन संदर्भात एफडीएकडून नवी नियमावली
ब्लड डोनेशन संदर्भात एफडीएकडून नवी नियमावली. ब्लड डोनेशन सामाजिक संस्था करू शकत नाहीत, ब्लड बँकच या कॅम्पचं आयोजन करू शकतात- तुकाराम मुंढे
-
वाशिंद- आसनगाव दरम्यान माल गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड
वाशिंद- आसनगाव दरम्यान माल गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड. डाऊन मार्गावर आसनगाव दरम्यान रेल्वे विस्कळीत. CSMT वरुन येणारी लोकल वाशिंदपर्यंत चालवण्यात येत आहे. तांत्रिक बिघाड दुरुस्त करुन रेल्वे सुरु करण्यात येणार, रेल्वे कर्मचाऱ्यांची माहिती
-
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी, हायकोर्टाचे आदेश
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी, हायकोर्टाचे आदेश. फटाक्यांची निर्मिती आणि विक्रीवर कोणतीही बंदी नाही. डीजे, डॉल्बी, लाऊडस्पीकर आणि लेझर लाईट्सच्या वापरावरही निर्बंध. आठवडाभरात नियमावली तयार करून कठोर अंमलबजावणीचे आदेश. हरित फटाक्यांसह दिवाळी साजरी करण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याची सूचना. जनजागृतीसाठी सेलिब्रिटींची मदत घेण्याचे प्रशासनाला आदेश
-
यापुढे सुटे मसाले विक्री करता येणार नाही- तुकाराम मुंढे
यापुढे सुटे मसाले विक्री करता येणार नाही. राज्यातले मसाले उत्पादन आणि विक्रीबाबत FDAकडून नवी नियमावली, ‘कृत्रिम रंग, निकृष्ट कच्चा माल वापरल्यास कारवाई’- – तुकाराम मुंढे
-
मनालीसह हिमाचल प्रदेशात पहिली बर्फवृष्टी
हिमाचल प्रदेशमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या मनाली आणि उच्च पर्वतीय भागांमध्ये हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे मान्सूनोत्तर बर्फवृष्टी झाली आहे. रोहतांग पास, लाहुल, शिंकुला आणि बारालाचा पास या प्रमुख उच्च पर्वतीय क्षेत्रांमध्ये ६ इंचांपर्यंत बर्फवृष्टी नोंदवली गेली आहे. बर्फवृष्टीमुळे या संपूर्ण परिसराने पांढऱ्याशुभ्र बर्फाची चादर ओढली असून पर्यटकांनी या आल्हाददायक आणि विलोभनीय वातावरणाचा मनसोक्त आनंद घेतला आहे.
-
शिवसेना शिंदे गटाने दसरा मेळाव्याचा टीझर लॉन्च
शिवसेना शिंदे गटाने दसरा मेळाव्याचा टीझर लॉन्च केले आहे. या टीझरमध्ये ‘भगवा खांद्यावर घेऊन शिवसैनिक दिसेल बांधावर’ अशा आशय दर्शवण्यात आला आहे. सध्या परिस्थिती गंभीर आहे, पण शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणारा शिवसैनिक खंबीर आहे अशा आशयाचा हा टीझर चर्चेत आहे.
-
नवी मुंबईच्या पामबीच मार्गावर तीन गाड्यांची एकमेकांशी टक्कर
नवी मुंबईच्या पामबीच मार्गावर तीन गाड्यांचा विचित्र अपघात घडला आहे. वाशीवरून बेलापूरच्या दिशेने जाताना भरधाव गाड्यांचा अपघात झाला आहे. मोराज सर्कल जवळ तीन गाड्यांनी एकमेकांना ठोकर दिली आहे. या अपघातात जीवितहानी झाली नाही मात्र गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
-
जळगावमध्ये भीषण अपघात, अख्खं कुटुंब संपलं, 6 जणांचा मृत्यू
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात मालदाभाडी जवळ भीषण अपघात झाला आहे. ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातात दुचाकीवरील सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मयत सर्व एकाच कुटुंबातील असून अपघातात अख्ख कुटुंब संपलं आहे.
मयतांमध्ये तीन बालकांचा समावेश
मयत मध्य प्रदेश मधील बराणपुर येथील रहिवासी
आज दुपारी चार वाजेच्या सुमारास घडला अपघात
-
अभिनेता इम्रान खान पाल यांना भारत सोडण्याची FRRO ने पाठवलेली नोटीस समोर
अभिनेता इम्रान खान पाल यांना भारत सोडण्याची FRRO ने पाठवलेली नोटीस समोर आली आहे. मुंबईतील परदेशी नोंदणी कार्यालयाकडून 14 ऑक्टोबर रोजी नोटीस जारी करण्यात आली. इम्रान खान पाल हे अमेरिकेचे नागरिक असल्याचा नोटीसमध्ये उल्लेख आहे. Immigration and Foreigners Act, 2025 मधील तरतुदींचे उल्लंघन केल्याचा FRRO चा आरोप आहे. 28 ऑक्टोबर 2026 पर्यंत भारत सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आदेशाचे पालन न केल्यास संबंधित कायद्यांतर्गत कारवाई आणि खटला चालवण्याचा इशारा देण्यात आला.
-
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगलीतील सोनहिरा साखर कारखान्यावर धडक
सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगलीतील सोनहिरा साखर कारखान्यावर धडक दिली आहे. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सोनहिराचा कारखान्याचा सुरु असलेले गाळप बंद पाडला आहे. कारखान्याच्या काटा गेटवर राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
-
जनावरांसह शेतकरी रस्त्यावर; तुळजवाडी फाट्यावर रास्ता रोको चारा
अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील भगवानगड परिसरातील शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. कल्याण–निर्मल राष्ट्रीय महामार्गावरील तुळजवाडी फाटा येथे बैलगाड्या आणि जनावरांसह रास्ता रोको करण्यात आला. जनावरांसाठी चारा, पिण्याचे पाणी आणि शेतकऱ्यांना हाताला काम मिळावे, अशा प्रमुख मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या आहे.
-
सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
महाराष्ट्रातील बहुतांश तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातही चित्र काही वेगळे नाही. यावर्षी पाऊस कमी झाल्याने येथे पाण्याची उपलब्धता कमी आहे. तसेच शेतीक्षेत्राचेही मोठे नुकसान झाले आहे. परंतु तरीही या तालुक्याचा समावेश दुष्काळी तालुक्याच्या यादीत झाला नाही. माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की कृपया आपण याची नोंद घेऊन मुळशी तालुक्याचा समावेश दुष्काळी तालुक्यांच्या यादीत करावा, असं पत्र सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना लिहिलं आहे.
-
राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाने बजावली नोटीस
नवी दिल्ली – राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाने नोटीस बजावली आहे. निवडणूक आयोगाविरोधातील मोर्चात घोषणाबाजी, गोंधळ आणि पत्रकाराशी गैरवर्तन केल्याच्या आरोपांप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. काही वकिलांनी ही याचिका दाखल केली आहे.
-
‘जंतर मंतर’वरून सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला नोटीस
‘जंतर मंतर’वरून सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. केंद्र सरकारने आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतरमंतर हटवलं होतं. त्यावर जंतरमंतर आंदोलन स्थळातून हटवण्याचं कारण काय, असा सवाल कोर्टाने केला आहे.
-
विधान परिषद निवडणुकीवरून महायुतीमधील अंतर्गत तणाव वाढला?
विधान परिषद निवडणुकीवरून महायुतीमधील अंतर्गत तणाव वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे. महाडीबीटीच्या बैठकीला एकनाथ शिंदे गैरहजर राहिले आहेत. शिंदे पुन्हा एकदा गैरहजर राहिल्याने नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
-
एका याचिकाकर्त्याला माफी मागावी लागेल- सुप्रीम कोर्ट
एका याचिकाकर्त्याला माफी मागावी लागेल. सुप्रीम कोर्टाला कुणी धमकावू शकत नाही. याचिकाकर्त्याला वर्तणुकीबद्दल स्पष्टीकरण द्यावं लागेल, अशी टिप्पणी सुप्रीम कोर्टाने राहुल गांधी यांचं नाव न घेता केली.
-
सुप्रीम कोर्टावरील मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कोर्टाचे निर्देश
सुप्रीम कोर्टावरील मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कोर्टाने निर्देश दिले आहेत. आम्ही काल्पनिक दुनियेत राहत नाही. कोर्टाबाहेर कोण काय बोलतं, आम्हाला सर्व माहीत आहे, असं कोर्टाने म्हटलंय. राहुल गांधींच्या याचिकेवरून कोर्टाने ज्ञानेश कुमार यांना नोटीस बजावली आहे. कोर्ट परिसरातील सीसीटीव्ही आणि इतर रेकॉर्ड जपून ठेवा, असंही कोर्टाने नमूद केलं.
-
येवल्यात कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव ठप्प
येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव ठप्प झाली आहे. व्यापाऱ्यांच्या अंतर्गत वादाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. अनेक व्यापारी लिलावात सहभागी न झाल्याने लिलाव विस्कळीत झाली आहे. कांदा विक्रीसाठी आलेले शेतकरी संतप्त झाले आहेत. कांदा लिलाव सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. लिलाव सुरू न झाल्याने शेतकऱ्यांचे मालेगाव-अहिल्यानगर राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू आहे. सभापती आणि प्रशासक मंडळाच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. व्यापाऱ्यांना लिलाव सुरू करण्याचे निर्देशानंतर कांदा लिलाव पुन्हा सुरू आहे.
-
राहुल गांधींच्या याचिकेवरून ज्ञानेश कुमार यांना नोटीस
राहुल गांधींच्या याचिकेवरून ज्ञानेश कुमार यांना नोटीस जारी करण्यात आली आहे. तसेच राहुल गांधींच्या कोर्टातील वर्तुवणुकीवर कोर्टाने स्पष्टीकरण मागितलं आहे. सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना फटकारलं आहे.
-
जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात वाढ
जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात किरकोळ वाढ तर चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात 100 रुपयांची वाढ तर चांदीच्या दरात 8 हजारांची घसरण झाली आहे. सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 50 हजार 998 रुपये झाली आहे. चांदीचे दर जीएसटी सह 2 लाख 16 हजार 300 रुपये झाली आहे.
-
ऊसाचा दर कारखानदारांनी 5000 रुपये द्यावा, अन्यथा…राज शेट्टींनी पुकारलं आंदोलन
स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन सुरू झालं आहे. राजू शेट्टी कारखान्याच्या आंदोलन स्थळी पोहोचले आहेत. राजू शेट्टी म्हणाले, काटा बंद आंदोलन असून दर जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करू नये. केंद्र सरकारने नेमलेली समिती ही वेळ काढूपणाचं काम करत आहे. आज आंदोलनानंतर पुन्हा कारखाने सुरू केल्यास पुन्हा आंदोलन करणार आहे. ज्यांना कारखाने सुरू करायचे आहेत. त्या कारखानदारांनी 5000 रुपये दर जाहीर करून कारखाने सुरू करावे, असे राजू शेट्टी म्हणाले.
-
देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या मुळावर उठले; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेत. त्यामुळं या आसमानी आणि सुलतानी संकटात शेतकरी पुरता होरपळून निघालाय. काल जाहीर केलेलं पाच हजाराचं अनुदान म्हणजे शेतकऱ्यांच्या खळखळून वाहणाऱ्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी वाशिम मध्ये माध्यमांशी बोलताना केलीये. तर त्यांच्या या उलट्या काळजाच्या व्यवहाराचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. आणि शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी एक लाख रुपये अनुदान मंजूर करावं अशी मागणीही सपकाळ यांनी केलीये.
-
संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला, चर्चांना उधाण
संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचले आहेत. दिल्लीतील घडामोडींवरून दोन्ही देशांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंच्या शीवतिर्थ निवासस्थानी ही भेट झाली.
-
अमरावती शिक्षक मतदारसंघावर बच्चू कडू यांची मोठी प्रतिक्रिया, नेमंक काय म्हणाले?
बच्चू कडू यांचा नवा व्हिडिओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे. प्रत्येकापर्यंत प्रसाद पोहोचल्याने चर्चांना उधाण आलं आहे. त्याचबरोबर त्यांनी मुस्लिम मतांवरही लक्ष केंद्रीत केलं पाहिजे, असे त्यांनी म्हटलं आहे. माध्यम फक्त ब्रेकिंग न्यूज शोधत असतात, असेही त्यांनी म्हटलं.
-
जळगावत महापालिकेच्या कचरा घंटागाड्यांवरील कामगार संपावर
जळगावत महापालिकेच्या कचरा घंटागाड्यांवरील कामगार संपावर गेले आहेत. घंटागाड्यांवरील चालक आणि हेल्पर असे एकूण सर्व तब्बल २८५ कामगार संपावर. ऐन सणासुदीच्या काळात पगार वेळेवर मिळत नसल्याने कामगार आक्रमक झाले आहेत.
-
सरकारच्या विरोधात बोलायचे असल्यास पैसे द्यावे लागणार- नाना पटोले
विरोधात बोलला तर तुम्ही देशद्रोही, अशी सरकारची भूमिका. सरकारच्या विरोधात बोलायचे असल्यास तुम्हाला पैसे द्यावे लागणार आहेत. ही कसली लोकशाही असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे.
-
निफाडमध्ये बिबट्याचा बछडा पडला विहिरीत
निफाड तालुक्यातील विंचूरजवळील किसानवाडीत बिबट्याचा बछडा पडला विहिरीत. वन विभागाच्या रेस्क्यू टीमकडून बिबट्याच्या बछड्याचा यशस्वी रेस्क्यू करण्यात आला आहे. लासलगाव आणि निफाडच्या रेस्क्यू टीमची संयुक्त मोहीम.
-
दिल्लीतील CJP आंदोलनच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयात याचिका
दिल्लीत उद्या होणाऱ्या CJP आंदोलनच्या पार्श्वभूमीवर दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. उद्या होणार आंदोलन थांबवल पाहिजे अस म्हणत याचिका दाखल करण्यात आली आहे.
-
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडीची मोठी रणनीती
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी इंडिया आघाडीची आंदोलनाची मोठी रणनीती. ‘दिल्ली ते गल्ली’ आंदोलन करण्याचा इंडिया आघाडीचा मानस.
-
जालन्यात डॉमिनोज पिझ्झावर FDA ची कारवाई
जालन्यातील FDA कडून धडक कारवाई करत प्रसिद्ध डॉमिनोज पिझ्झा आउटलेटचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आले. Safe Food Safe Maharashtra या मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या अचानक तपासणीत स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचं समोर आलं आहे.
-
धाराशिव जिल्ह्यात सरकारने दिलेल्या पाच हजार रकमेवर शेतकऱ्यांची तीव्र नाराजी
राज्य सरकारकडून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पाच हजार रुपयांच्या अग्रीम मदतीवर शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. तेलाचा डबा तब्बल २७०० रुपयांना मिळत असेल, तर सरकारने दिलेल्या पाच हजार रुपयांत दिवाळी कशी साजरी करायची, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. एकीकडे हाताला काम नाही, शेतीतून उत्पन्नाची आशा नाही, तर दुसरीकडे दिवाळीचा सण तोंडावर आहे. अशा परिस्थितीत पाच हजार रुपयांची मदत पुरेशी कशी ठरणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
-
जालन्यात डॉमिनोज पिझ्झावर FDA ची कारवाई
जालन्यातील FDA कडून धडक कारवाई करत प्रसिद्ध डॉमिनोज पिझ्झा आउटलेटचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आलाय.Safe Food Safe Maharashtra या मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या अचानक तपासणीत स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचं समोर आलं आहे.जालन्यातील शकुन प्लाझा येथील मे.ज्युबिलंट फूडवर्क्स लिमिटेडच्या डॉमिनोज पिझ्झा आउटलेटची तपासणी करण्यात आली.
-
“पाच हजारांत दिवाळी कशी साजरी करायची?” शेतकऱ्यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल!…
“पाच हजारांत दिवाळी कशी साजरी करायची?” शेतकऱ्यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल!…आम्हीच तुम्हाला पाच हजार रुपये देतो, तुम्ही दहा हजारांत दिवाळी करून दाखवा!”दिवाळीपूर्वी जाहीर केलेल्या पाच हजारांच्या अग्रीम मदतीवर शेतकऱ्यांचा संताप!.. पंचनामे पूर्ण, मग तुटपुंजी मदत कशासाठी? शेतकऱ्यांचा सवाल!..तात्पुरती मदत नको, तातडीने ठोस नुकसानभरपाई द्या; शेतकऱ्यांची मागणी!…पाच हजारांची मदत म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार; शेतकऱ्यांचा आरोप!..
-
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमध्ये भव्य ध्वजस्तंभाचे पूजन
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमध्ये भव्य ध्वजस्तंभाचे पूजन..कुशावर्त तीर्थावर उभारला ३१ फूट उंच सिंहस्थ ध्वजस्तंभ. कुंभमेळामंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आज ध्वजस्तंभ पूजन..स्टीलच्या पाईपवर ६२ किलो पितळाचा मुलामा; ध्वजस्तंभाला आकर्षक स्वरूप. समुद्रमंथनातील चौदा रत्ने, अमृतकलशधारी गरुड आणि गणेशप्रतिमांमुळे धार्मिक-सांस्कृतिक वैशिष्ट्य
-
दांडिया खेळण्यासाठी गेलेल्या वीस वर्षीय तरुणाला आठ ते दहा जणांकडून मारहाण
परभणी शहरातील माळी गल्लीत दांडिया खेळण्यासाठी गेलेल्या वीस वर्षीय तरुणाला आठ ते दहा जणांकडून मारहाण. लाकडी दांडे आणि फायटरने केली मारहाण. मारहाणीत 20वर्षीय तरुण जखमी,जुन्या वादातून मारहाण झाल्याची चर्चा. घटनेचा cctv आला समोर मात्र अद्याप पोलिसात गुन्हा दाखल नाही..
-
अमरावती जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यावर काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया…
अमरावती जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यावर काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया…पाच हजाराची मदत म्हणजे भीक देण्यासारख आहे -यशोमती ठाकूर यांचा हल्लाबोल. ४० दिवसांमध्ये ३६ शेतकऱ्यांची आत्महत्या होत असेल तर परिस्थिती किती गंभीर आहे हे सरकारने लक्षात घेतलं पाहिजे – यशोमती ठाकूर
-
जालना जिल्ह्यात मागील दोन महिन्यापासून पावसाचा मोठा खंड
जालना जिल्ह्यात मागील दोन महिन्यापासून पावसाचा मोठा खंड पडल्याने खरीप हंगामातील कपाशी सोयाबीन मका यासह इतर पिके करपून गेल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय, इतकच नाही तर याचा फटका आता जनावरांना सुद्धा बसल्याचं शेतकरी सांगतायत.सध्या परिस्थिती खूप गंभीर झाली आहे की, छोटे मोठे जलसाठे आणि विहिरी देखील आटल्यामुळे जनावरांसाठी चारा आणि पाणी कुठून आणायचा असा सवालही शेतकऱ्यांनी उपस्थित केला.
-
अभिनेता इम्रान खानकडे भारत सोडून जाण्याची नोटीस
अभिनेता इम्रान खानकडे अमेरिकेचे नागरिकत्व असल्याने भारत सोडून जाण्याची नोटीस बजावण्यात आली आहे, २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडायचे आदेश देण्यात आले आहे. कारण भारतीय नागरिक नसूनही आंदोलनात सामील झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
-
इंडिया आघाडीच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणीवर संजय राऊत काय म्हणाले?
राहुल गांधीसह इंडिया आघाडीच्या नेत्यांनी याचिका दाखल केलेली, इंडिया आघाडीच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. आयोगाविरोधात एकूण ११ याचिका दाखल केले, आम्ही आशावादी आहोत की कोर्ट आमचे म्हणणे ऐकून घेईल, संजय राऊत यांनी म्हटले आहे.
-
नांदेड – कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
नांदेड – कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या, हिमायतनगर तालुक्यातील वटफळी येथील घटना. गळफास घेऊन संतोष मारोती वंटेवाड (44) यांनी संपविले जीवन. मुलीच्या लग्नाचा बोजा,ग्रामीण बँकेचे ,खाजगी सावकाराच्या कर्जाला कंटाळून जीवन संपविल्याची नातेवाईकांची. घरचा कुटुंब प्रमुख गेल्याने कुटुंब अडचणीत. कुटुंबाची अत्यन्त नाजूक आर्थिक परिस्थिती. लहान भाऊ,आई, पत्नी, मुलगी आणि दोन लहान मुले मयताच्या पश्चात
-
डोंबिवलीत बॅटरी विक्रेत्याला दुकानात घुसून बेदम मारहाण!
डोंबिवलीत बॅटरी विक्रेत्याला दुकानात घुसून बेदम मारहाण! शिंदे गटाचे पदाधिकारी प्रकाश म्हात्रे आणि मुलाचे नाव समोर; CCTV व्हिडिओ व्हायरल. डोंबिवली सागांव परिसरात टायर आणि बॅटरी विक्रेत्याला दुकानात घुसून लाठी-काठ्यांसह हातात मिळेल त्या वस्तूने मारहाण. मारहाणीचा संपूर्ण प्रकार दुकानातील CCTV कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी प्रकाश म्हात्रे आणि त्यांच्या मुलाचे केली मारहाण. दुकानातील व्यक्तीने शिवीगाळ करत आपल्या एका व्यक्तीला मारहाण केल्याने संतापल्याची प्रकाश म्हात्रे यांची माहिती. संबंधित व्यक्ती नशेत वारंवार शिवीगाळ आणि मारहाण करत असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिल्याचा म्हात्रेंचा दावा. राजकीय पदाधिकाऱ्यांकडून अशा प्रकारे मारहाण होणे कितपत योग्य, यावर चर्चा सुरू; प्रकरणात पोलिसांची भूमिका महत्त्वाची.
-
राज्यातील शिक्षण पदवीधर निवडणूकीचा पेच सुटेना
शिवसेनेकडून पुण्याची जबाबदारी देण्यात आलेले मंत्री उदय सामंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची ११.३० वाजता भेट घेणार असल्याची माहिती दिली. अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठींबा देण्याबाबत शिवसेनेत कुजबूज ऐकू येत आहे. एकनाथ शिंदेंकडून युती धर्म पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिक्षक पदवीधर निवडणूकीत भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षात समन्वयाचा अभाव असल्याची चर्चा आहे.
-
श्री तुळजाभवानी मातेची प्रक्षाळ पूजा व गरुड वाहनावर छबीना मिरवणूक
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवात चौथ्या माळेनिमित्त छबिना मिरवणूक भक्तिभावात पार पडली. यावेळी देवीची गरुड वाहनावर छबिना मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी अभिषेक आणि पूजाविधी झाल्यानंतर देवीची चांदीची मूर्ती छबिना वाहनावर विराजमान करण्यात आली. त्यानंतर मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. दरम्यान आज पाचव्या माळे दिवशीपासून तुळजाभवानीची विशेष अलंकार पूजा असणार आहे
-
बेशुद्ध चिमुकलीला रुग्णवाहिकेतून उतरवल्याचे प्रकरण डॉक्टरच्या अंगलट
बीडच्या माजलगाव तालुक्यातील दिंद्रूड प्राथमिक आरोग्य केंद्रात बेशुद्ध अवस्थेतील 11 वर्षांच्या चिमुकलीला डिझेलचे पैसे न दिल्याने शासकीय रुग्णवाहिकेतून खाली उतरवल्याचा आणि पैसे नाहीत तर लेकरं कशाला पैदा केले असे अपशब्द वापरल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर आरोग्य प्रशासनाने तातडीने कारवाई केली आहे. डॉ. निलेश ढाकणे यांच्याकडील वैद्यकीय अधिकारी पदाचा कार्यभार तात्काळ काढून घेण्यात आला आहे. तसेच त्याच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करत निलंबनाचा प्रस्ताव आरोग्य सेवा आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पथकाने दिंद्रूडमध्ये दाखल होत कुटुंबियांसह कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत.आता डॉ. ढाकणेवर निलंबनाची कारवाई होणार का? याकडे लक्ष लागलं आहे.
-
सरकारच्या मदतीवर कृषी तज्ज्ञ विजय जावंधिया यांची टीका
सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी पाच हजारांची मदत केली, ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. पाच हजार रुपयांत शेतकऱ्यांच्या दिवाळीचा किराणाही होत नाही. फळं, भाजीपाला आणि कपडेही शेतकरी खरेदी करु शकत नाही. त्यामुळे पाच हजारांची मदत ही थट्टा आहे, शेतकऱ्यांना सरसकट ५० हजारांची मदत करावी. सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचं सातव्या वेतन आयोगाचं वेतन बंद करावं, सहाव्या वेतनानुसार त्यांना वेतन द्या आणि विचारा त्यांना दिलासा आहे का? अशी टीका कृषी तज्ज्ञ विजय जावंधिया यांनी केली.
-
इंद्रायणी तांदूळ महागण्याची शक्यता
निसर्गाचा लहरीपणा आणि एल निनो चे सावट त्याचा फटका भात शेतीला बसला असून मावळ हा इंद्रायणी भाताचा आगार आहे. पण यंदा मावळच्या याच इंद्रायणी भातावर दुष्काळाचं संकट ओढवलंय. ज्या शेतात हिरवीगार भाताची रोपं डोलायला हवी होती, तिथंच आज जमिनीला मोठमोठ्या भेगा पडल्यात,पाण्याअभावी भाताची रोपं खुंटलीत तर काही ठिकाणी उभं पीक अक्षरशः करपून गेलंय. पावसाने ओढ दिल्यानं मावळच्या भातशेतीची ही दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. परिणामी साडेबारा हजार हेक्टर पैकी 65 ते 70 टक्के क्षेत्रावर याचा परिणाम झालाय. त्यामुळे यंदा उत्पादनात घट होणार आहे. एरव्ही 500 ते 550 टन भाताचं उत्पादन होतं, पण यंदा केवळ 150 ते 200 टन उत्पादन होणार आहे. परिणामी प्रति किलो 20 रुपयांनी इंद्रायणी तांदूळ महागण्याची शक्यता व्यक्य करण्यात येत आहे
-
पिंपरी-चिंचवडमध्ये ई-चलानच्या ‘तिसऱ्या डोळ्या’ला खीळ,80 सीसीटीव्ही कॅमरे बंद
पिंपरी-चिंचवड शहरात वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर नजर ठेवणारी ई-चलान यंत्रणाच आता कमकुवत झाली आहे. शहरातील 249 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी तब्बल 80 कॅमेरे बंद आहेत. म्हणजेच प्रत्येक तीनपैकी जवळपास एक कॅमेरा निष्क्रिय आहे. त्यामुळे नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात मर्यादा येत आहेत. बंद कॅमेऱ्यांची दुरुस्ती आणि नवीन कॅमेरे बसविण्याची मागणी होत असताना, महापालिका प्रशासनाकडून याबाबत काय पावले उचलली जाणार, याकडे लक्ष लागले आहे.
-
धाराशिवमध्ये भूजल पातळीत ८.८० मीटरची घट; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती
धाराशिव जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असतानाच आता भूजल पातळीतही मोठी घट नोंदवण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत यंदा सप्टेंबर महिन्यात भूजल पातळी तब्बल ८.८० मीटरने खालावल्याची माहिती भूजल सर्वेक्षण विभागाने दिली आहे. जिल्ह्यातील ४१ पाणलोट क्षेत्रांमधील ११४ विहिरींचे निरीक्षण केल्यानंतर ही बाब समोर आली आहे. लोहारा, उमरगा, धाराशिव आणि तुळजापूर या तालुक्यांमध्ये भूजल पातळी सर्वाधिक खालावल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. आधीच दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या धाराशिव जिल्ह्यासमोर आता भूजल पातळीतील घसरणीमुळे लवकरच पाणीटंचाईचे संकट उभे ठाकण्याची चिन्हे आहेत.
-
मुंबईत पाणीटंचाईचे संकट
परतीचा पाऊस अपेक्षेप्रमाणे न झाल्याने मुंबईत पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले असून आतापासूनच पाणी कपात सुरू झाली आहे. बदललेल्या वातावरणाचा फटका सर्वसामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि शाळकरी मुलांना बसत असून वाढत्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.पावसाअभावी दुष्काळाचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता असून, त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला असून, बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासही सुरुवात केली आहे.
-
शिवसेना शिंदे गटाच्या सोशल सैनिक महासंघटन आणि संवाद मेळावा पार पडला
शिवसेना शिंदे गटाच्या सोशल सैनिक महासंघटन आणि संवाद मेळावा पार पडला. सोशल मीडिया सेलची जिल्हा आढावा बैठक पार पडली. शिवसेनेची विचारधारा, जनहिताची भूमिका आणि पक्षाचे कार्य समाजमाध्यमांद्वारे जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले. शिवसेना सोशल मीडिया विभागाच्या तब्बल 261 पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. सोशल मीडिया उपराज्यप्रमुख माननीय प्रतीक शर्मा यांच्या नेतृत्वात हा मेळावा पार पडला.
-
डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरण, नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांना ओळखलं
शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणाची कल्याण न्यायालयात सुनावणी. शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणात डॉ. वैभव साळुंखे यांची साक्ष. नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे, रमेश पवार, प्रमोद निकम आणि साधना कारंडे यांना ओळखलं. विशेष सरकारी वकील अॅड. प्रकाश साळसिंगीकर यांच्या उपस्थितीत आरोपींची ओळख पटवली. डॉ. साळुंखे यांनी आपल्यासह डॉ. सृष्टी बाविस्कर यांना मारहाण झाल्याचा घटनाक्रम सांगितला.
-
पुणे शहराच्या पाणी पुरवठ्याबाबत महापालिकेचा मोठा निर्णय
पुणे महापालिकेने दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून,या निर्णयामुळे पुणेकरांना पाणी नियोजन करावे लागणार आहे. कमी पर्जन्यमान आणि भविष्यातील पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
Published On - Oct 15,2026 8:41 AM
