AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज बारावा दिवस, मराठा समाज आक्रमक..

| Updated on: Sep 09, 2026 | 8:17 AM
Share

Maharashtra News LIVE : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा बारावा दिवस आहे. मराठा समाज आक्रमक होताना दिसतोय. राज्यात दुष्काळाचे संकट आहे.

Maharashtra News LIVE : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज बारावा दिवस, मराठा समाज आक्रमक..
live blog

LIVE NEWS & UPDATES

  • 09 Sep 2026 08:40 AM (IST)

    पावसाअभावी सोयाबीनचे पीक जळाले; शेतकऱ्यांनी उभ्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर

    सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली पाहिजे व बीड जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. परळी तालुक्यात गेल्या दीड महिन्यापासून पाऊस नसल्याने खरीप हंगामातील सोयाबीनचे उभे पीक अक्षरशः जळून गेले आहे. पिकातून उत्पन्न मिळण्याची कोणतीही आशा उरली नसल्याने काही शेतकऱ्यांनी नाईलाजास्तव सोयाबीनच्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवला आहे.

  • 09 Sep 2026 08:30 AM (IST)

    जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा बारावा दिवस

    29 ऑगस्ट 2023 पासून ते आतापर्यंत एकूण 11 वेळा उपोषण, तीन वर्षात 83 दिवस झाले उपोषण. 12 तारखेला अतरवालीत होणार राज्यव्यापी बैठक. सरकारने एकही मागणी पूर्ण केली नसल्याचं सांगत 12 तारखेला मुंबईत जाण्यासाठीची तारीख ठरवली जाणार असं जरांगे पाटलांनी स्पष्ट केलेलं आहे.

  • 09 Sep 2026 08:20 AM (IST)

    शरद पवारांची साथ सोडण्यामागील खरं कारण अन् महायुती सरकारला निर्वाणीचा इशारा

    राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अनेक नेत्यांनी पक्षांतरामागे विकासाचे कारण पुढे केले होते. मात्र, शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री आणि आमदार दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडण्याचे खरे कारण उघड केले असून, त्यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. “डिंभे धरणातून निघणारा बोगदा रद्द करण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता, केवळ आणि केवळ त्या एका शब्दासाठी मी साहेबांची साथ सोडली,” असा थेट आणि खळबळजनक खुलासा वळसे पाटलांनी केला आहे.

  • 09 Sep 2026 08:12 AM (IST)

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसीय लंडन दौऱ्यावर रवाना

    आज ९ आणि १० सप्टेंबरला ब्रिटिश संसदेत विशेष कार्यक्रमहाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप . रिकग्निशन’ पुरस्कार. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ‘स्टेट्समनशिप अवॉर्ड’ने गौरव. महाराष्ट्राच्या विकासाचे व्हिजन आणि भारत-यूके संबंधांवर शिंदे मार्गदर्शन करणार. महाराष्ट्र मंडळातर्फे ‘ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कार

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे मोठे आंदोलन सुरू आहे. आज जरांगे यांच्या आंदोलनाचा बारावा दिवस आहे. राज्यात इतरही ठिकाणी मराठा समाज आक्रमक होताना दिसतोय. विखे पाटील यांनी मराठा समाजाच्या मागण्यांवर मोठे विधान केले. 29 ऑगस्ट 2023 पासून ते आतापर्यंत एकूण 11 वेळा उपोषण, तीन वर्षात 83 दिवस झाले उपोषण. 12 तारखेला अतरवालीत होणार राज्यव्यापी बैठक होईल. सरकारने एकही मागणी पूर्ण केली नसल्याचं सांगत 12 तारखेला मुंबईत जाण्यासाठीची तारीख ठरवली जाणार असं जरांगे पाटलांनी स्पष्ट केलेलं आहे. दरम्यान सरकार काही हालचाली करतं की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यादरम्यानच राज्यात पावसाचे मोठे संकट आहे. पावसाने पाठ फिरवली आहे. शेतकरी चिंचेत आहेत. यासह राज्यातील, देश-विदेशातील, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

Published On - Sep 09,2026 8:11 AM

Follow Us
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाडा-उत्तर महाराष्ट्रात 35% कमी पाऊस...
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाडा-उत्तर महाराष्ट्रात 35% कमी पाऊस; सरकारचा मोठा निर्णय
राहुल गांधींच्या विमानाला लँडिंगवेळी तांत्रिक अडचण! पहिला प्रयत्न फसला
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या विमानाला लँडिंगवेळी तांत्रिक अडचण! पहिला प्रयत्न फसला; दुसऱ्या प्रयत्नात विमान सुखरूप उतरलं
मराठा आरक्षणाच्या मागणीने लातूरमध्ये तणाव! जरांगेंच्या एका फोननंतर...
Latur | मराठा आरक्षणाच्या मागणीने लातूरमध्ये तणाव! जरांगेंच्या एका फोननंतर नेमकं काय घडलं?
संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
Santosh Pandit Case | संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार...
Uday Samant on Uddhav Thackeray | धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार, म्हणाले काँग्रेसच्या मांडीवर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! रोहित पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये!
Devendra Fadnavis | भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मुख्यमंत्र्यांनी काय दिले आदेश?
दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का?
Uddhav Thackeray | दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी सरकारला घेरलं
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी...
Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल; एकाच गाडीवर तब्बल...
PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट..
मोठी बातमी! PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट PMO IDसह तरुण ताब्यात