AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Election Results LIVE Streaming : महाराष्ट्राचा महासंग्राम, मतमोजणीचे अपडेट कुठे पाहाल ? फक्त एक क्लिक करा आणि…

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Result 2024 LIVE Streaming: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला राज्यभरात एकाच टप्प्यात मतदान करण्यात आलं. आज थोड्याच वेळात मतमोजणीला सुरूवात होऊन निकाल लागणार आहेत. या निकालाचे प्रत्येक अपडेट्स आम्ही तुम्हाला देणार आहोत. हे अपडेट्स जाणून घेण्यासाठी तुम्ही टीव्ही9 मराठीचे चॅनल आणि टीव्ही9 मराठीच्या संकेतस्थळावर जाऊन क्लिक करू शकता.

Maharashtra Election Results LIVE Streaming : महाराष्ट्राचा महासंग्राम, मतमोजणीचे अपडेट कुठे पाहाल ? फक्त एक क्लिक करा आणि...
महाराष्ट्राचा महासंग्राम
| Updated on: Nov 23, 2024 | 6:44 AM
Share

महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघासाठी बुधवार (20 नोव्हेंबर) एका टप्प्यात मतदान झालं. राज्यभरात यंदा मतदानाचा टक्का वाढलेला दिसून आला. एकूण 66 टक्क्यांच्या आसपास यंदाच्या निवडणुकीत मतदान झालं असून 4136 उमेदवारांचं भविष्य मतपेटीत बंद झालं. निवडणुकीचा निकाल आता अवघ्या काही वेळातच लागणार आहे. थोड्याच वेळात मतमोजणीला सुरूवात होणार पहिला कौल हाती येईल. राज्यात महायुतीचे सरकार येणार की महाविकास आघाडीचे की इतरांच्या मदतीने कुणाचे सरकार येणार हे आज स्पष्ट होणार असून या निकालाकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यात महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. 20 तारखेला झालेल्या मतदानात मतदारांनी कोणाला कौल दिला, बिग फाईट्समध्ये कोण विजयी होतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे राज्यात सत्ता कोण स्थापन करत याची सर्वांनाच उत्सुकता आहे. त्याचाच निकाल आतात थोड्या वेळात समोर येणार आहे.

महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात तीव्र लढत आहेत. या निवडणुकीत विविध पक्षांच्या अनेक बंडखोरांनी देखील आपलं नशिब आजमावलं आहे. या बंडोबांचं बंड रोखण्यात त्या त्या पक्षांना काही ठिकाणी अपयश आल्याने काही ठिकाणी तिरंगी लढत देखील होत आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीचे उमेदवार यांच्यातच या निवडणुकीत थेट लढत आहे.

मुंबईत एकूण 36 विधानसभा मतदार संघ आहेत. तर ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातून एकूण 244 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यातील 138 कल्याण पश्चिम, 140 अंबरनाथ (अ.जा), 141 उल्हासनगर, 142 कल्याण पश्चिम, 145 मीरा भाईंदर, 150 ऐरोली विधानसभा या 6 मतदारसंघातील निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांची संख्या जास्त आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील 21 मतदारसंघात एकूण 303 उमेदवार उभे आहेत.

टीव्ही9 मराठीची विशेष तयारी

या सर्वांच्या भविष्याचा उद्या निकाल लागणार असून राज्यातील जनतेला मतमोजणी आणि निकालाची प्रत्येक अपडेट मिळावी म्हणून टीव्ही9 मराठीने खास तयारी केली आहे. तुम्ही टीव्ही9 मराठी चॅनल, टीव्ही9 मराठी युट्यूब लाइव्ह, टीव्ही 9 मराठी संकेतस्थळ आणि टीव्ही9 मराठीच्या लाइव्ह टीव्हीवर जाऊन निकालाची संपूर्ण माहिती घेऊ शकता. सर्वात फास्ट अपडेट्स तुम्हाला टीव्ही9 मराठीवर पाहायला मिळणार आहेत.

मतमोजणी आणि निकालाचे अपडेट कुठे पाहाल?

https://www.youtube.com/watch?v=qcZNKRVp7G4

https://www.youtube.com/watch?v=PXRUc5O4J84

https://www.tv9marathi.com/live-tv

https://www.tv9marathi.com/

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.