Marathwada Region Election Result 2024 Highlights Updates : धनंजय मुंडे यांची मुसंडी, राजेश टोपे यांना धक्का
Marathwada Region MLA Vidhan Sabha Election Result 2024 Highlights Updates: मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर आणि हिंगोली असे आठ जिल्हे आहेत. या आठ जिल्ह्यात विधानसभेचे ४६ मतदारसंघ आहेत. सध्या महायुती आणि महाविकास आघाडीत काँटे की टक्कर दिसून येत आहे.

Marathwada Region Election Result 2024 Highlights Updates : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे कौल हाती येण्यास सुरुवात आली आहे. सकाळी ८ वाजल्यापासून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतांची मोजणी सुरु झाली आहे. महाराष्ट्रातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मराठवाडा विभागाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर आणि हिंगोली असे आठ जिल्हे आहेत. या आठ जिल्ह्यात विधानसभेचे ४६ मतदारसंघ आहेत. यंदा मराठवाड्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस पाहायला मिळाली. त्यामुळे यंदा मराठवाड्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
Worli election Result 2024 : वरळीमध्ये आदित्य ठाकरे यांचा विजय
तिरंगी आणि चुरशीची लढत असलेल्या वरळीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांचा विजय झाला आहे. त्यांच्यासमोर मनसेचे संदीप देशपांडे आणि शिवसेना शिंदे गटाचे मिलिंद देवरा यांचे आव्हान होते.
-
रोहित आर आर पाटील यांचा विजय
तासगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित आर आर पाटील विजयी झाले आहेत. स्वर्गीय माजी गृहमंत्री स्वर्गीय आर आर आबा पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटलांनी मिळवला आहे. 28 हजारांच्या मताधिक्याने विजय नोंदवला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार व माजी खासदार संजय काका पाटील यांचा रोहित पाटलांनी पराभव केला आहे.
-
-
धनंजय मुंडे 77924 आघाडीवर
परळी विधानसभा तेराव्या फेरी अखरीस. धनंजय मुंडे 77924 आघाडीवर
-
परंडा विधानसभा मतदारसंघात आठव्या फेरी अखेर तानाजी सावंत आघाडीवर
परंडा विधानसभा मतदारसंघात आठव्या फेरी अखेर तानाजी सावंत आघाडीवर
तानाजी सावंत यांना 218 मतांची आघाडी
शरद पवार गटाचे राहुल मोटे आणि तानाजी सावंत यांच्यात कडवी झुंज
-
विशाल कदम 38 हजार 929 मतांनी आघाडीवर
गंगाखेड विधानसभा मतदारसंघात सहाव्या फेरी अखेर ठाकरे गटाचे विशाल कदम 38 हजार 929 मतांनी आघाडीवर आहेत. रासपचे रत्नाकर गुट्टे यांना 38 हजार 167 मते मिळाली आहेत.
-
-
अजित पवार मुख्यमंत्री… बीडमध्ये बॅनर झळकले
बीड: अजित पवार मुख्यमंत्री… बीडमध्ये बॅनर झळकले
अजित पवार समर्थकांकडून बीडमध्ये बॅनर बाजी
मुख्य चौकात लावले बॅनर
बॅनरवर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचाही फोटो
-
महायुतीसह एमआयएम आघाडीवर
धनंजय मुंडे, तानाजी सावंत, इम्तियाज जलील यांना मराठवाड्यात आघाडी मिळाली आहे. तर अमित देशमुख पिछाडीवर आहेत.
-
कैलास पाटील सहावी फेरीअखेर 24 हजार 82 मतांनी आघाडीवर
कळंब मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे कैलास पाटील सहावी फेरीअखेर 24 हजार 82 मतांनी आघाडीवर
-
राणाजगजितसिंह पाटील सहाव्या फेरी अखेर 8257 आघाडीवर
तुळजापुर – महायुतीचे राणाजगजितसिंह पाटील सहाव्या फेरी अखेर 8257 आघाडीवर
राणाजगजितसिंह पाटील हे जिल्ह्यातील भाजपाचे एकमेव उमेदवार –
कॉग्रेसचे धीरज पाटील विरुद्ध भाजपाचे राणाजगजितसिंह पाटील अशी थेट झाली होती लढत
-
MuktaiNagar Election Result 2024 : मुक्ताईनगरमध्ये चंद्रकांत पाटील आघाडीवर
मुक्ताईनगरमध्ये चंद्रकांत पाटील आघाडीवर, शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे पिछाडीवर आहेत.
-
संजय शिरसाट आघाडीवर, राजू शिंदे पिछाडीवर
शिंदे सेनेचे संजय शिरसाट आघाडीवर तर उद्धव सेनेचे राजू शिंदे पिछाडीवर
-
केज मतदारसंघात पृथ्वीराज साठे आघाडीवर
केज मतदारसंघात फेरी क्र. : 5 नमिता मुंदडा – 15683 पृथ्वीराज साठे – 18135 आघाडी-2452 (पृथ्वीराज साठे)
-
परळीत धनंजय मुंडे यांची 22 हजार मतांची आघाडी
परळीत धनंजय मुंडे यांची 22 हजार मतांची आघाडी, देशमुख यांना मोठा फटका
-
जालना जिल्ह्यातील पाचही जागांवर महायुती आघाडीवर
जालना जिल्ह्यातील पाचही जागांवर महायुती आघाडीवर
-
महाविकास आघाडीचे प्रवीण स्वामी 2721 मतानी पुढे
उमरगा विधानसभा मतदारसंघ चौथ्या फेरी अखेर महाविकास आघाडीचे प्रवीण स्वामी 2721 मतानी पुढे
-
Kalyan East Election Result 2024 : कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात चौथ्या फेरीत काय स्थिती
कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात चौथ्या फेरीत काय स्थिती? जाणून घ्या.
१. सुलभा गायकवाड (भाजप ) 2262
२. धनंजय बोडारे (उद्धव सेना ) 2613
३. महेश गायकवाड ( अपक्ष) 1732
सुलभा गायकवाड 3301 मतांनी आघाडीवर आहेत.
-
अभिमन्यू पवार तिसऱ्या फेरीत 6515 मतांनी आघाडीवर
लातुर–औसा ,भाजपा अभिमन्यू पवार तिसऱ्या फेरीत 6515 मतांनी आघाडीवर
-
Konkan Region Election Result 2024 LIVE Updates : कोकणाचा कौल महायुतीला, 7 जागांवर आघाडी
Konkan Region Election Result 2024 LIVE Updates : कोकण विभागातील विधानसभा मतदारसंघामध्ये महायुती आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. कोकणात भाजप 7 जागांवर आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ शिवसेना शिंदे गट 8 जागांवर आघाडीवर आहेत. तर अजित पवार गट 2 जागांवर आघाडीवर आहे. तर महाविकासआघाडीमध्ये ठाकरे गट 1 जागांवर आघाडीवर आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गट हे 2 जागांवर आघाडीवर आहेत.
-
धनंजय मुंडे 15992 आघाडीवर
परळी विधानसभा निवडणुकीत चौथ्या फेरी अखेरीस धनंजय मुंडे 15992 आघाडीवर
-
गणेश हाके 3492 मतांनी आघाडीवर
लातुर– अहमदपूर मतदारसंघातील गणेश हाके हे चौथ्या फेरीत 3492 मतांनी आघाडीवर
-
राणाजगजितसिंह पाटील चौथी फेरी आखेर 5550 मताने आघाडीवर
धाराशिवमधील तुळजापूर मतदारसंघातून भाजपाचे राणाजगजितसिंह पाटील चौथी फेरी आखेर 5550 मताने आघाडीवर
-
संभाजीराव पाटील निलंगेकर सहावी फेरी, 5442 मतांनी आघाडीवर
लातुर जिल्ह्यातील निलंगा, भाजपा संभाजीराव पाटील निलंगेकर सहावी फेरी, 5442 मतांनी आघाडीवर
-
अतुल सावे यांना धक्का, इम्तियाज जलील २४,००० मतांनी आघाडीवर
भाजपाचे अतुल सावे यांना धक्का, तर एमआयएमचे इम्तियाज जलील २४,००० मतांनी आघाडीवर
-
घनसावंगीत राजेश टोपे १९०० मतांनी पिछाडीवर
घनसावंगीत शरद पवार गटाचे राजेश टोपे १९०० मतांनी पिछाडीवर
-
तिसऱ्या फेरीत राणा जगजितसिंह आघाडीवर
तिसऱ्या फेरीत राणा जगजितसिंह आघाडीवर
-
उमरखेडमध्ये भाजपाचे किसन वानखेडे हे आघाडीवर
उमरखेडमध्ये भाजपाचे किसन वानखेडे हे आघाडीवर असल्याचे समोर येत आहे.
-
Karmala Vidhan Sabha Election Result 2024 : करमाळा मतदारसंघात कोण आघाडीवर
करमाळा मतदारसंघात तिसऱ्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे नारायण पाटील पुढे आहेत. त्यांना 9714 मतं मिळाली आहेत.दिग्विजय बागल यांना 8801 मतं मिळाली आहेत. संजयमामा शिंदे यांना 6157 आघाडीवर आहेत. तिसऱ्या फेरी अखेर मतांनी महाविकास आघाडीचे 913 उमेदवार नारायण पाटील आघाडीवर आहेत.
-
कालीचरण यांचे वक्तव्य भोवले, संजय शिरसाट यांची पिछेहाट
संजय शिरसाट यांच्या मतदारसंघात कालीचरण महाराज यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती. आता संजय शिरसाट मागे पडले आहेत.
-
गंगाखेड मतदारसंघात विशाल कदम आघाडीवर
गंगाखेड विधानसभा मतदार संघात सध्या उद्धव ठाकरे गटाकडे विशाल कदम यांना ५२६४ , तर डॉ.रत्नाकर गुट्टे हे ३९८७ मतांनी पिछाडीवर आहेत.
-
संजना जाधव आघाडीवर पती हर्षवर्धन जाधव पिछाडीवर
शिंदे गटाच्या उमेदवार संजना जाधव आघाडीवर तर पती हर्षवर्धन जाधव पिछाडीवर पडले आहेत. तर दुसरीकडे बदनापूर मतदारसंघात कुचे यांनी आघाडी घेतली आहे.
-
अमित देशमुख पहिली फेरी,167 मतांनी पुढे
लातुर शहर, अमित देशमुख पहिली फेरी,167 मतांनी आघाडीवर
-
Kothrud Assembly Election Result 2024 : कोथरूडमधील मतमोजणीला सुरुवात
कोथरूड विधानसभा मतदारसंघात चंद्रकांत पाटील 5700 मतांनी आघाडीवर आहेत.
-
प्रविण स्वामी जवळपास 12 17 मतानी आघाडीवर
उमरगा विधानसभा दुसऱ्या फेरीत ठाकरे शिवसेनेचे प्रविण स्वामी जवळपास 12 17 मतानी आघाडीवर .
-
Shivajinagar Vidhan Sabha Election Results 2024 : सिद्धार्थ शिरोळे यांची आघाडी
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे पहिल्या फेरीत आघाडीवर आहेत.
-
भाजपाच्या मेघना बोर्डीकर बिछाडीवर
परभणीमधून शिंदे गटाचे आनंद भरोसे हे आघाडीवर आहेत. तर भाजपाच्या मेघना बोर्डीकर यांना 3481, शरद पवार गटाचे विजय भांबळे यांना 3924 मते, भांबळे 443 ची लीड
-
संतोष दानवे १२०० मतांनी आघाडीवर
भोकरदन मधून भाजपचे संतोष दानवे 1200 मतांनी आघाडीवर आहे
-
कैलास पाटील 2800 मतांनी आघाडीवर
उस्मानाबादमध्ये महाविकास आघाडीचे कैलास पाटील 2800 मतांनी पहील्या फेरीत आघाडीवर
-
राणा जगजितसिंह पाटील ७०० मतांनी पुढे
तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून पहिली फेरीत राणा जगजितसिंह पाटील ७०० मतांनी आघाडीवर आहेत.
-
तानाजी सावंत, संतोष दानवे, योगेश क्षीरसागर आघाडीवर
पोस्टल मतदानात संतोष दानवे यांनी आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे परतूर मतदारसंघातून भाजपचे बबनराव लोणीकर, जालना मतदारसंघातून अर्जुन खोतकर, औरंगाबाद पूर्वमधून अतुल सावे, मध्य मधून प्रदीप जैस्वाल आघाडीवर आहेत. दुसरीकडे भाजपचे प्रशांत बंब आघाडीवर, बीडमधून योगेश क्षीरसागर आघाडीवर आहेत. तर परंडामध्ये तानाजी सावंत आघाडीवर आहेत.
-
धनंजय मुंडे 4000 मतांनी आघाडीवर
परळीत धनंजय मुंडे हे 4000 मतांनी आघाडीवर आहे. तर राजेसाहेब देशमुख हे पिछाडावरी आहेत.
-
श्रीजया चव्हाण, अमित देशमुख आघाडीवर
अमित देशमुख पोस्टल फेरीत आघाडीवर आहेत. पोस्टल फेरीत धिरज देशमुख आघाडीवर आहेत. तर भोकर मतदारसंघात श्रीजया चव्हाण आघाडीवर आहे.
-
Solapur South Vidhan Sabha Election Result 2024 : सोलापूर दक्षिणमध्ये कोण आघाडीवर?
सोलापूर दक्षिणमधून पोस्टल मतमोजणीत भाजपचे सुभाष देशमुख आघाडीवर आहे. भाजपचे सुभाष देशमुख आघाडीवर तर ठाकरे गटाचे अमर पाटील पिछाडीवर आहेत.
-
धनंजय मुंडे, राजेश टोपे, अर्जुन खोतकर आघाडीवर
जालन्यात शिंदे गटाचे अर्जुन खोतकर हे आघाडीवर आहेत. तर घनसावंगीमध्ये राष्ट्रवादीचे राजेश टोपे तर परळीतून धनंजय मुंडे हे आघाडीवर आहेत.
-
संजय बनसोडे यांच्या विजयाचे लागले बॅनर
लातूरच्या उदगीर मध्ये संजय बनसोडे यांच्या विजयाचे बॅनर लावण्यात आले,निकाला अगोदरच झळकले बॅनर, मंत्री संजय बनसोडे यांच्या विजयाचे बॅनर
-
लातुरमध्ये पोस्टल मतमोजणीला सुरुवात
लातुर शहर -पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे. लातुर ग्रामीण -पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
-
संतोष बांगर भावी मंत्री म्हणून बॅनर
शिंदे सेनेचे उमेदवार विद्यमान आमदार संतोष बांगर यांचे हिंगोली शहरात भावी मंत्री म्हणून बॅनर लागले आहेत.
-
संजय शिरसाट, रमेश बोरणारे, अब्दुल सत्तार आघाडीवर
बीड जिल्ह्यातील परळीमध्ये पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे. तर धाराशिवमध्ये पण मतमोजणीला सुरूवात झाली आहे. कैलास पाटील हे धाराशिवमधून आघाडीवर आहेत. तर संजय शिरसाट आणि सिल्लोडमधून अब्दुल सत्तार आणि रमेश बोरणारे आघाडीवर आहेत.
-
छत्रपती संभाजीनगरमधून पहिला कल, अतुल सावे आघाडीवर
औरंगाबाद पूर्व भागात भाजपचे अतुल सावे हे आघाडीवर असल्याचा पहिला कल आला आहे. त्यांच्याविरोधात एमआयएमचे इम्तियाज जलील हे आहेत.
-
पोस्टल मतमोजणीला सुरूवात
पोस्टल मतदानाच्या मतमोजणीला आता सुरूवात झाली आहे. अगदी थोड्यावेळात काही मतदारसंघातील निकाल हाती येतील.
-
थोड्याच वेळात सुरू होणार मतमोजणी
मराठवाड्यात थोड्याच वेळात मतमोजणीला सुरूवात होईल. मराठवाड्यात सिल्लोड मतदारसंघात 80.01 टक्के इतके सर्वाधिक मतं झाले. अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात टक्का वाढला आहे. त्यानंतर पैठण, वैजापूर या मतदारसंघात पण जोरदार मतदान झाले.
-
Marathwada Region Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीत महायुतीचा दारुण पराभव
Marathwada Region Election Result 2024 : मराठवाडा विधानसभा मतदारसंघात आठपैकी सात जागा महायुतीला गमवाव्या लागल्या होत्या. यात काँग्रेसने तीन (लातूर, जालना, नांदेड) तर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने तीन (धाराशिव, परभणी, हिंगोली), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने एका (बीड) जागेवर विजय मिळविला; तर शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाने छत्रपती संभाजीनगर या एकाच जागेवर विजय मिळविला.
Published On - Nov 23,2024 7:47 AM
