अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा, आता हा निधी मदतीला येणार, काय दिले आदेश?
District Annual Plan funds : अतिवृष्टीने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहेत. अजूनही शेतात पाणी तुंबलेले आहे. तर नद्यांना पूर आहे. त्यामुळे मदत आणि पंचनाम्यांना अडचण येत आहे. अशात अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा दिला आहे. शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.

अतिवृष्टीने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. जमीन खरडून गेली आहे. पिकं सडली आहेत. अजूनही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचलेले आहे. सरकारने मदतीची घोषणा केलेली आहे. निकष बाजूला ठेवत मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहेत. दरम्यान अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा दिला आहे. शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.
जिल्हा वार्षिक योजनेतील निधीची मदत
अतिवृष्टीमधील जिल्ह्यांना जिल्हा वार्षिक योजनेतील निधीतून मदत मिळणार आहे. नैसर्गिक आपत्तीत नागरिकांना तात्काळ मदत करण्यासाठी शासन निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना मदतीसाठी सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा करावी लागणार नाही. मराठवाडा, परभणी, अमरावती, अकोला, धाराशिव, सोलापूर जिल्ह्यांना मदत होणार आहे. या जिल्ह्यात आता प्रशासनाला मदतीसाठी निधी उपलब्ध होणार आहे.
एकूण जिल्हा वार्षिक निधीच्या ५ टक्क्यांपर्यंत खर्च करण्याची मुभा देण्यात आली आहे. यापूर्वी केवळ टंचाईसाठी निधी वापरण्याची मुभा होती. आता पूर,अतिवृष्टी, गारपीट यासाठी देखील जिल्हा वार्षिक योजनेतील निधी वापरता येईल. त्यामुळे ग्रामीण भागातील नुकसानीसाठी भरपाईची तरतूद करता येईल.
येथे वाचा निर्णय Government Resolution
साथीचे रोग येऊ नये यासाठी उपाययोजना
महाराष्ट्रात ४-८ दिवसांत जो पाऊस पडलाय त्याचे परिणाम दिसत आहेत. अजूनही सरकार नागरिक, यंत्रणा, काम करत आहेत. यात आमची देखील जबाबदारी महत्त्वाची आहे. आरोग्य विभागाकडून साथीचे रोग येऊ नये यासाठी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करत आहे. ब्लिचिंग पावडर, इतर गोष्टींच्या उपाययोजना होत आहेत. ग्रामपंचायतींबरोबर देखील आम्ही संपर्क ठेऊन आहोत, अशी माहिती आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांनी दिली आहे. महापुराचे प्रमाण बघितल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी आम्हाला सांगितलं होतं की बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करा.
जितकी मदत पाहिजे तेवढी मदत करण्याचे प्रयत्न केले जाईल. केंद्र आणि राज्याच्या नियमांप्रमाणे पंचनामे होतील. एकीकडे नुकसान आणि शेतकऱ्यांची अपेक्षा असते मदत लवकर व्हावी मात्र नियमावली आहे. आपण हे समजून घ्या अजूनही काही ठिकाणी पाऊस आहेत, अशात पंचनामे होऊ द्या. तलाठी ते महसूल सचिव जबाबदारीने काम करत आहेत, असे अबिटकर म्हणाले.
आम्हाला पावसाची सवय आहे, मात्र विदर्भ मराठवाड्यात इतका पाऊस होत नाही. अशात, परिस्थिती तिथल्यासाठी नवीन आहे. सरकारला त्यांनी सूचना जरी केल्या तरी आम्ही ती मदत करायला तयार आहे. आमचं कामच मूळात चांगलं आहे. महाराष्ट्रातील सत्ता आणण्यास आमचा सिंहाचा वाटा असे ते म्हणाले.
