Maharashatra News Live : नांदेड : आजोबासोबत जात असलेल्या 4 वर्षाच्या मुलाला ट्रकने चिरडले
Maharashtra News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीवर पुन्हा टांगती तलवार आहे. ओबीसी आरक्षणावरून झालेल्या वादावर आज सुनावणी होणार आहे. आज सर्वोच्च न्यायालयाचा याबाबत फैसला येण्याची शक्यता आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिंदे सेना आणि भाजपमधील वाद शिगेला पोहचल्याचे समोर येत आहे. कोकणात पैसे वाटपावरून राणे बंधु आमने-सामने दिसत आहेत. तर अजितदादांच्या राजीनाम्यासाठी अंजली दमानिया या दिल्लीत दाखल झाल्या आहेत. त्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटणार आहेत. तर शरद पवार यांनी राम खाडे यांना फोन करून तब्येतीची विचारपूस केली. मुख्यमंत्री हे रजनीकांत असल्याचे वक्तव्य बन यांनी केले आहे. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
LIVE NEWS & UPDATES
-
गुंड गजा मारणेला जामीन
कुख्यात गुंड गजा मारणे याला जामीन मिळाल्यानं आता त्याची कारागृहातून सुटका झाली आहे. मात्र त्याला दररोज पोलीस आयुक्तालयात हजेरी लावावी लागणार आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीबाहेर राहण्याच्या अटीवर त्याला जामीन मंजूर करण्यात आल्यानं तो जामीन मिळताच शहराबाहेर रवाना झाला आहे.
-
गणेश नाईकांच्या टीकेला श्रीकांत शिंदे यांचं जोरदार प्रत्युत्तर
अंबरनाथ नगरपरिषद निवडणूक
उगाच तोंडाची वाफ कशाला वाया घालवायची ?
लोक २ तारखेला उत्तर देणार
गणेश नाईकाच्या विधानावर खासदार श्रीकांत शिंदे यांचा जोरदार पलटवार
-
-
25 व्या नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार सोहळ्याला थोड्याच वेळात सुरुवात
25 व्या नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार सोहळ्याला थोड्याच वेळात माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात सुरुवात होणार आहे. या सोहळ्याला राजकारण आणि अभिनय क्षेत्रातील विविध दिग्गज व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.
-
नांदेड : आजोबासोबत जात असलेल्या 4 वर्षाच्या मुलाला ट्रकने चिरडले
नांदेडमधून अपघाताची बातमी समोर आली आहे. आजोबासोबत पायी जात असलेल्या 4 वर्षाच्या नातवाला भरधाव हायवा ट्रकने चिरडले आहे. नांदेडच्या आय जी ऑफिससमोर ही घटना घडली आहे. यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आता पोलिसांकडून हायवा ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे.
-
पुण्यात MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
पुण्यातील सदाशिव पेठील पूना हॉस्पिटल समोर असलेल्या कुंभारवाडा येथे बुलढाण्याहून आलेल्या 26 वर्षीय सागर पवार या तरुणाने स्पर्धा परीक्षेमध्ये यश न मिळाल्याने नैराश्यात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत विश्रामबाग पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत अधिकचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
-
-
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येऊन निवडणुका जिंकतील का ? चंद्रकांत पाटील
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज आणि उद्धव ठाकरेंच्या महापालिकेतील युतीवर टोला लगावला आहे. त्यांनी म्हटले की, ‘अजून निवडणुका जाहीर व्हायच्या आहेत. तिकीटवाटप व्हायचंय, कार्यकर्त्यांचा रोष व्यक्त व्हायचा आहे, पण दोन भावांनी एकत्र यावं, मात्र एकत्र येऊन निवडणुका जिंकतील का ? माहित नाही. उद्धव ठाकरेंचे विद्यमान 75 नगरसेवक शिवसेना शिंदे गटात गेलेत, त्यामुळे त्यांना आधी 75 उमेदवार शोधावे लागतील.’
-
अजितदादांनी एसटी महामंडळाला भरपूर निधी दिला – मंत्री प्रताप सरनाईक
मत दिलं तर निधी मिळणार या अजित दादाच्या वक्तव्यावर सरनाईक यांनी भाष्य केलं आहे. सरनाईक म्हणाले की, ‘अजित दादा हे अर्थमंत्री असल्याने तसे म्हणले असतील, परंतु आमच्या एसटी महामंडळाला अजितदादांनी भरपूर निधी दिला, त्यामुळे मी आठ हजार एसटी बस खरेदी करू शकलो.
-
मला काहीही नको, माझा पक्ष निर्णय घेईल: डीके शिवकुमार
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी राज्यातील नेतृत्वाच्या वादात म्हटले आहे की, “मी निश्चितच दिल्लीला जाईन. ते आमचे मंदिर आहे. काँग्रेसचा इतिहास मोठा आहे आणि दिल्ली नेहमीच आमचे मार्गदर्शन करेल. जेव्हा ते मला, पक्षाच्या नेत्यांना आणि मुख्यमंत्र्यांना बोलावतील तेव्हा आम्ही तिथे जाऊ. मला काहीही नको आहे; माझा पक्ष निर्णय घेईल.”
-
गोल्डी ढिल्लन गँगचा सर्वात मोठा गुंड सिप्पूला कॅनेडियन पोलिसांनी केली अटक
कॅनडाच्या पोलिसांनी गोल्डी ढिल्लन टोळीतील सर्वात प्रमुख सदस्य असलेल्या सिपूला अटक केली आहे. सिपूला दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे.
-
अमर सिंग प्रकरणात आझम खान यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली
अमर सिंह यांच्या मुलींबद्दल भाष्य केल्याबद्दल आझम खान यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या खटल्यात निकाल देण्यात आला आहे. आज आझम खान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे खासदार-आमदार न्यायालयात हजर झाले. आझम खान यांनी आक्षेपार्ह भाष्य केल्याचा आरोप करत अमर सिंह यांनी गोमती नगर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. या प्रकरणात न्यायालयाने आझम खान यांची निर्दोष मुक्तता केली आहे.
-
दुसऱ्या तिमाहीत भारताचा जीडीपी वाढला
अमेरिकेच्या शुल्कामुळे भारताचा जीडीपी प्रभावित झालेला नाही. भारत सरकारने म्हटले आहे की 2025-2026 या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत वास्तविक जीडीपी वाढ 8.2 टक्के राहण्याचा अंदाज आहे, जो 2024-2025 या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 5.6 टक्के होता.
-
शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचे काम केलं : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचे काम केलं. पुढील 5 वर्षे ही योजना अशी सुरू राहील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाशिममध्ये म्हणाले. तसेच सोलरच्या माध्यमातून पुढील वर्षात 24 तास 365 दिवस सगळ्यांना वीज मिळणार आहे, असंही फडणवीस यांनी सांगितलं.
-
जोपर्यंत देवा भाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना सुरू राहील : CM फडणवीस
विरोधक म्हणत होते लाडकी बहीण योजना आता बंद होईल. मात्र एक वर्ष पूर्ण झालं आणि जोपर्यंत देवा भाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत ते सुरू राहील. लाडक्या बहिणी आता केवळ लाडक्या बहिणी राहणार नाही, तर त्या लखपती दीदी बनणार आहेत. आम्ही आत्तापर्यंत 50 लाख लखपती दीदी तयार केल्या आहेत. तसेच आणखी 50 लाख लखपती दिली तयार करायचे आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाशिममध्ये म्हणाले.
-
नियोजनशून्य विकासामुळे प्रदूषण वाढलं : उद्धव ठाकरे
मुंबईतील हवेचा दर्जा खालवला आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्याला धोका संभवला आहे. उबाठा गटाच्या उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या हवेवरुन भाष्य केलं आहे. “मुंबईतील हवा आरोग्यासाठी घातक आहे. मुंबईत भ्रष्टाचाराच्या प्रदुषणाचे ढग दिसत आहेत. नियोजनशून्य विकासामुळे प्रदूषण वाढलं”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
-
नाशिकमध्ये पालकमंत्री का निवडला जात नाही? उद्धव ठाकरे यांचा सवाल
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून नाशिकच्या पालकमंत्रिपदावरुन प्रश्न उपस्थित केला आहे. महायुती सरकारमध्ये अजूनही रायगड आणि नाशिक या 2 जिल्ह्यांना पालकमंत्री नाही. या 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कायम आहे.
“नाशिकमध्ये पालकमंत्री का निवडला जात नाही? कुंभमेळ्यामुळे नाशिकचं पालकमंत्रिपद अडलंय का?”, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
-
पैशाचा वापर करुन मतं मागितली जात आहेत : उद्धव ठाकरे
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पैशांचा पूर दिसतोय. निवडणुकीत पैशांचा पाऊस आणि पूर पाहायला मिळतोय. पैशाचा वापर करुन मतं मागितली जात आहेत. राज्यकर्त्यांच्या वागणुकीतून सत्तेचा माज दिसतोय”, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
-
गजानन मारणे यांनी कुठलाही गुन्हा केलेला नाही – वकिल विजयसिंह ठोंबरे
गजानन मारणे यांनी कुठलाही गुन्हा केलेला नाही. त्यांना फक्त याच्यामध्ये संशयावरून गुंतवण्यात आलं होतं. हीच बाजू आम्ही न्यायालयाच्या निदर्शनात आणून दिली आणि त्यांचा जामीन मंजूर झाला. किरकोळ मारहाण झालेली होती याच्यामध्ये गजानन मारणे यांचा कुठलाही हात नव्हता. पण त्यांना मकोका सारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकवण्यात आलं. गजानन मारणे याला एक लाख रुपये जाचमुचलक्यावरती जामीन मंजूर करण्यात आला. काही चुका झाल्या होत्या, त्या आम्ही न्यायालयाच्या निदर्शनात आणून दिल्या, असे गुंड गज्या मारणे वकिल विजयसिंह ठोंबरे म्हणाले.
-
शहरी आणि ग्रामीण मराठ्यांनी एकत्र आले पाहिजे – मनोज जरांगे पाटील
आम्ही आलो शिकायला. परिवर्तन करायचे असेल तर खर बोलावं. आम्ही तुमचं ज्ञान शिकायला आलो आहे. मी तुमच्याकडून शिकतोय. पण आता तब्येत साथ देत नाही. पुढे एक कोटी मराठा एकत्र करतोय. मुंबईत सर्व घडयाळावर चालतोय. तुमचा आणि आमचा ताळमेळ जमला का शहरी आणि ग्रामीण मराठ्यांनी एकत्र आले पाहिजे. शिकलेल्या माणसांच्या ज्ञानचा आम्हाला फायदा करून द्या, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.
-
दहिसर परिसरात अनेक घरांमध्ये चोरी, सीसीटीव्ही फुटेज समोर
मुंबईतील दहिसर परिसरातील एका चोरीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या टोळीने अनेक घरांमध्ये चोरी केली आहे. सीसीटीव्हीमध्ये दोन्ही चोर सहजपणे एका घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करताना दिसत आहेत. सध्या, व्हिडीओ समोर आल्यानंतर, दहिसर पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
-
कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची माजी विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी घेतली भेट
कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची माजी विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी भेट घेतली. हर्षवर्धन जाधव हे शिंदे शिवसेनेच्या आमदार संजना जाधव यांचे पती आहेत. कन्नड नगर परिषद निवडणूक अनुषंगाने ही भेट महत्वाची मनली जाते. कन्नड मध्ये उबाठा आणि काँग्रेस एकत्र तर भाजपा आणि शिंदे गट स्वतंत्र लढत आहे
-
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आदर करू- एकनाथ शिंदे
सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलाय त्याचा आदर करू. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणेच शासन पालन करेल. सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय आलेला आहे वाचून घेऊन मग त्याच्यावर मत व्यक्त केलं तर बर होईल. ही युती बाळासाहेबांनी अटल बिहारी वाजपेयी आणि अडवाणी साहेबांनी केली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार सुरू आहे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
-
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन घेणार नरेंद्र मोदींची भेट
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर. पुतीन भारतात येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. त्यांचा हा दौरा 4 आणि 5 डिसेंबरला आहे. भारत आणि रशियामध्ये द्विपक्षीय चर्चा होणार.
-
महाराष्ट्राला अमृत योजनेतून 50 हजार कोटी दिले- देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्राला अमृत योजनेतून 50 हजार कोटी रूपये मोदीजींनी दिले. मला विश्वास आहे की यावेळी जनतेने निर्णय केला की काहीही झालं तरी भारतीय जनता पक्ष्याचा नगराध्यक्ष होणार. राहुल लोणीकर तुम्ही जसा नगरपालिकेचा आराखडा तयार केला, तसा च आराखडा मी तुमच्या संदर्भात तयार करतो असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
-
मुख्यमंत्र्यांचे आदेश तासगाव भाजप अध्यक्षांनी लावले उडवून
मुख्यमंत्र्यांचे आदेश तासगाव भाजप अध्यक्षांनी उडववून लावले आहेत. संदीप गिड्डे पाटील यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. ऐन निवडणूकीत तासगाव नगरपरिषदेत भाजपात फूट पडल्याचे चित्र आहे.
-
मी स्वत: पोलीस संरक्षण नाकारले आहे – मनोज जरांगे पाटील
“मुंबईत व्यावसायिक कार्यक्रम आहे तो बघायला आलो आहे. एक कोटी मराठे व्यवसायाकडे वळवायचे आहेत. त्यासाठी मी शिकून जाणार आहे. आता मी बिगर पोलिसांचा आलो आहे. मी स्वत: पोलीस संरक्षण नाकारले आहे. आमच्या अस्तित्वासाठी आम्ही मुंबईत आलो होतो” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
-
नगरपरिषद, नगरपालिका निवडणुकी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
नगरपरिषद, नगरपालिका निवडणुका ठरलेल्या वेळेत होणार. निवडणुकीला कोणतीही स्थगिती नाही. सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय. 57 नगरपालिका, नगर परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली जात होती. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांच लक्ष लागलं होतं.
-
कुख्यात गुंड गजानन मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर
शहरातील गज्या मारणे गँगकडून पुण्यातील भाजप नेते व केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यावर हल्ला करण्यात आला होता. शिवजयंतीच्या दिवशी दुचाकीस्वार अभियंता देवेंद्र जोग या तरुणाला कुख्यात गुंड गज्या मारणेच्या गुंडांनी मारहाण केली होती. या प्रकरणात गजा मारणे सह त्याच्या टोळीवर मकोका कारवाई करण्यात आली होती.
-
पाण्यात नारळ फोडून वंचितकडून प्रचाराचा शुभारंभ
वंचित बहुजन आघाडीने बीड नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षासह एकूण पाच उमेदवार निवडणूक रिंगणात उभे केले आहेत. बीडमधील अनेक भागात नागरी सुविधांचा अभाव आहे. हेच लक्ष वेधून घेण्याचे काम वंचितने केलं आहे. शहरातील मुख्य रस्ता असलेल्या धानोरा रस्त्यावर खड्डे पडले आहेत. नाल्याचे काम अपूर्ण असल्याने पाणी रस्त्यावर साचते आणि याच खड्ड्यातील पाण्यात नारळ फोडून वंचितने प्रचाराचा शुभारंभ केला. ढोल ताशाच्या गजरात वंचितकडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे.
-
डोंगराळे (मालेगाव) येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्या प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांची इंदुरीकर महाराजांनी घेतली भेट, केलं सांत्वन
डोंगराळे (मालेगाव) येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्या प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. समाज प्रबोधनकार इंदुरीकर महाराज यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. त्यांनी पीडित मुलीच्या आई-वडील, काका, आजी-आजोबा यांची भेट घेऊन त्यांना धीर दिल्याचे समजते.
-
सिंधुदुर्गात पोलिसांकडून वाहनांची तपासणी सुरू
सिंधुदुर्गात पोलिसांकडून वाहनांची तपासणी सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही तपासणी सुरू आहे. भारतीय जनता पक्षाकडून पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला होता.
-
सोलापुरात ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
– सोलापुरात ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून ऊसाला पहिली उचल 3 हजार 400 रुपये द्या या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे रास्ता रोको आंदोलन सुरु आहे. सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर होनमुर्गी फाट्यावर रस्तारोको आंदोलन करण्यात येत असून दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली आहे.
-
भाजप आमदार श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले अडचणीत येण्याची शक्यता
प्रशासकीय अधिकारी व मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव असलेले विद्याधर महाले यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे सह माजी सरपंच मनोज लाहुडकर यांनी तक्रार केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिले जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
-
ठाणे सिव्हिल रुग्णालयात सात महिन्यात 4271 शस्त्रक्रिया यशस्वी
ठाणे सिव्हिल रुग्णालयात सात महिन्यात 4271 शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. या शस्त्रक्रियेमध्ये 2326 मेजर आणि 1945 मायनर प्रकरणाचा समावेश आहे. दररोज 500 ते 600 रुग्ण उपचारासाठी येत असून जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दर महिन्याला सुमारे पाचशे ते सहाशे शस्त्रक्रिया होत आहेत..
-
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा एकेरी उल्लेख…
कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचेवर अदखलपात्र गुन्हा दाखल… ऋषिकेश सरोदे यांच्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा दाखल… 26 नोव्हेंबर रोजी सचिन गुजर यांचे अपहरण करून करण्यात आली होती मारहाण… शिवप्रहार संघटनेचे चंदू आगे आणि त्याच्या चार साथीदारांनी कार मध्ये जबरदस्तीने आत टाकत केली होती मारहाण… मारहाण करणारे आरोपी अटकेत… आता कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचेवर भावना दुखावल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता 353(2) अन्वये गुन्हा दाखल…
-
ठाण्यात ५५० भटक्या श्वानांचे लसीकरण
ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने भटक्या कुत्र्यांवर लसीकरण मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेत गेल्या १० दिवसांत ५५० भटक्या श्वानांचे लसीकरण केल्याची माहिती मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी दिली आहे.
-
महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी व हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन
आज सकाळी 6.30 वाजता दीर्घ आजाराने घेतला अखेरचा श्वास वयाच्या 68 वर्षी मिर्झा एक्सप्रेसचा प्रवास झाला थांबला… त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व दोन कन्या असा परिवार अंत्यसंस्कार दुपारी दोन नंतर ईदगा कब्रस्तान, अमरावती येथे होणार. ६ हजारांवर काव्यमैफिलींचे सादरीकरण करून महाराष्ट्र जिंकले… ५० वर्षे विदर्भ मराठवाड्यातील कवी संमेलनांचे ते केंद्रबिंदू राहीले… २० काव्यसंग्रह मिर्झाजी कहिन हा स्तंभ प्रचंड लोकप्रिय आहे.वऱ्हाडी भाषेला देशभर ओळख देणारे लोककवी म्हणून ख्याती होती…
-
ठाणे सिव्हिल रुग्णालयात सात महिन्यात 4271 शस्त्रक्रिया यशस्वी
या शस्त्रक्रियेमध्ये 2326 मेजर आणि 1945 मायनर प्रकरणाचा समावेश. दररोज 500 ते 600 रुग्ण उपचारासाठी येत असून जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दर महिन्याला सुमारे पाचशे ते सहाशे शस्त्रक्रिया होत आहेत..
-
भाजप आमदार श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले अडचणीत येण्याची शक्यता
प्रशासकीय अधिकारी व मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव असलेले विद्याधर महाले यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे सह माजी सरपंच मनोज लाहुडकर यांनी केली तक्रार . राज्य निवडणूक आयोगाने दिले जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश..
-
सोळंकेंचा पंकजा मुंडेंना सवाल
माजलगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीसह भाजप स्वबळावर लढत आहे. मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या सभेदरम्यान दर तीन महिन्याला माजलगावच्या नगरपरिषदेची बैठक घेणार असे म्हटले होते. यावर रात्री प्रचार सभेदरम्यान बोलताना आमदार प्रकाश सोळंके यांनी मंत्री पंकजा मुंडेंवर टीका केली आहे.
-
अनिकेत तटकरे यांचे महेंद्र थोरवेंना प्रतिउत्तर
सुनील तटकरे यांच्या डीएनएवर टीका करून आमदार महेंद्र थोरवेंनी केलेल्या वक्तव्यावर आता माजी आमदार अनिकेत सुनिल तटकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. थोरवे यांच्या “डीएनए चेक” टीकेवर प्रतिक्रिया देताना अनिकेत तटकरे म्हणाले, महेंद्र थोरवे नीच प्रवृत्ती रायगडची जनता या निवडणुकीत ठेचून काढेल. मी सुसंस्कृत कुटुंबात जन्माला आलो आहे;
-
शरद पवार गट आणि अजित पवार गट आमने सामने
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार रमेश कदम आणि भाजपचे प्रचार प्रमुख सोमेश क्षीरसागर यांनी एकमेकांना हस्तांदोलन करत एकमेकांना नमस्कार केला. मोहोळमध्ये नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अश्विनी जाधव तर भाजप कडून शितल क्षीरसागर निवडणुकीच्या रिंगणात आहेत
-
पारोळ्यात अजितदादा राष्ट्रवादी आणि ठाकरेसेना एकत्र
जळगावच्या पारोळा येथील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांच्या सुनबाई वर्षा पाटील नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना ठाकरे गटाने इतर पक्षांसह केलेल्या जनाधार आघाडीच्या वर्षा पाटील ह्या नगरसेवक पदाच्या उमेदवार असून भाजप शिवसेनेच्या उमेदवाराविरुद्ध त्यांचा सामना होत आहे. ही निवडणूक कार्यकर्त्यांनी हातात घेतली असून सासरे माजी मंत्री सतीश पाटील यांचा खंबीर पाठिंबा असल्याने आत्मविश्वासाने निवडणुकीला सामोरे जात असल्याचे वर्षा पाटील यांनी सांगितलं.
-
तपोवन वाचवण्यासाठी मोठा लढा
तपोवन वाचवण्याचा लढा पंतप्रधानांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. शुक्रवारपासून शाळा जॉगिंग ट्रॅक, कॉलेज परिसरात स्वाक्षरी मोहीम राबवली जाणार आहे. राष्ट्रपती पंतप्रधान सरन्यायाधीश मुख्यमंत्री यांच्यापर्यंत स्वाक्षरी मोहीम पोहोचविण्याचा वृक्षप्रेमींचा निर्णय आहे. तर रविवारी वृक्षांखाली कवी संमेलन होणार आहे. वृक्ष वाढवा वृक्ष जगवा वृक्ष तोड थांबवा या विषयावर कवी संमेलन घेण्यात येणार आहे. ५० कवींनी सादर केलेल्या कवितांचे संयुक्त निवेदन देण्यात येईल.
-
आधारभूत किंमत योजनेअंतर्गत सोयाबीनची खरेदी
केंद्र सरकारच्या वतीने यंदा शासकीय आधारभूत किंमत योजनेअंतर्गत सोयाबीनची खरेदी होणार. 5 हजार 328 रुपये इतका हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. सोयाबीन नोंदणी 6 नोव्हेंबर पासून सुरू होईल. येवला येथील खरेदी-विक्री केंद्रावर 327 सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केली. बारदाणा अभावी सोयाबीन खरेदी रखडली होती. तातडीने बारदाणा उपलब्ध करून देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.
-
भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची प्रचार रॅली आमने सामने
मोहोळ नगरपरिषदेच्या प्रचारादरम्यान भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची प्रचार रॅली आमने सामने आले. मात्र कोणताही राजकीय द्वेष न बाळगता एकमेकांना हस्तांदोलन करत दोन्ही प्रचार प्रमुखांनी समजूतदारपणा दाखवला.राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार रमेश कदम आणि भाजपचे प्रचार प्रमुख सोमेश क्षीरसागर यांनी एकमेकांना हस्तांदोलन करत एकमेकांना नमस्कार केला. मोहोळमध्ये नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अश्विनी जाधव तर भाजप कडून शितल क्षीरसागर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकीकडे राजकीय आरोप प्रत्यारोप शिगेला पोहोचले असताना भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांनी दाखवलेले सामंजस्य सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे
-
प्रताप सरनाईक धाराशिव दौऱ्यावर
शिवसेना आणि भाजप वादाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रताप सरनाईक धाराशिव दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील धाराशिव आणि उमरगा तसेच भूम आणि परंडा या चार नगरपालिकेत शिवसेना भाजप वाद टोकाला पोहचला आहे. उमरगा धाराशिव आणि कळंब तीन ठिकाणी पालकमंत्री प्रताप सरनाईक प्रचार सभा घेणार आहेत.दोन दिवसाच्या दौऱ्या दरम्यान पालकमंत्री प्रताप सरनाईक शिवसैनिकांची समजूत काढणार का? भाजप शिवसेना वाद कायम राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-
मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने
मराठा आंदोलक मनोज जरांगे छत्रपती संभाजीनगरहून मुंबईला रवाना झाले आहेत, त्यांच्या उपस्थिती मध्ये मुंबई मध्ये मराठा बिजनेस कॉनक्लेव्ह पार पडणार आहे. मराठा तरुणांनी उद्योग क्षेत्रात आले पाहिजे असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
-
भाजपने निवडणूक आजच जिंकली
निवडणूक आजच जिंकली आहे असा गोंदियात भाजपने दावा केला आहे. गोरेगाव व तिरोडा नगरप्रशासनावर भाजपाची सत्ता येणार असे आमदार विजय रहांगडाले यांनी दावा केला. 2 तारखेला मतदार हे कमळाचे बटण दाबतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.काही आमच्याकडून काँग्रेसकडे गेले तरी फरक पडणार नाही असे रहांगडले म्हणाले.
-
शिखा पांडेवर 2.4 कोटी रुपयांची बोली
भारताची वरिष्ठ वेगवान गोलंदाज शिखा पांडे हिला यूपी वॉरियर्सने 2.4 कोटी रुपयांना खरेदी केले. आता तिची कामगिरी कशी राहते याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष आहे.
Published On - Nov 28,2025 8:06 AM
