Maharashatra News Live : मुंबई: दादरच्या स्टार मॉल मध्ये भीषण आग
Maharashtra News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

राज्यातील काही भागात पावसाची शक्यता आहे. तर थंडीची चाहूल लागली आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून थंडी जाणवत आहे. सकाळी आणि संध्याकाळी मफरल, लोकरी टोपी बाहेर आली आहे. भारतीय महिला विश्वचषक विजेत्या संघाचा राज्य सरकारकडून आज सत्कार करण्यात येणार आहे. पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहार प्रकरणात आपला काही संबंध नसल्याचे अजितदादा यांनी माहिती दिली. तर याप्रकरणात चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. आमदार भास्कर जाधव यांच्या मुलावर मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा सुरू आहे. दगाबाज रे या संवाद दौऱ्यानिमित्ताने ते सरकारवर टीका करत आहेत. तर मनोज जरांगे यांच्या जीवाला धोका असल्याप्रकरणी खासदार बजरंग सोनवणे यांनी संरक्षण देण्यासाठी पत्र लिहिले आहे. तर मनोज जरांगे आज पत्रकार परिषद घेऊन याविषयी माहिती देणार आहेत. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
LIVE NEWS & UPDATES
-
भाजप आमदार सुरेश धस यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट
भाजप आमदार सुरेश धस यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेलती आहे. सुरेश धस यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली, धस यांच्या भेटीपूर्वी आमदार नारायण कुचे यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे.
-
वर्सोवा गावातील दुकानाला भीषण आग
अंधेरी पश्चिमेकडील वर्सोवा येथील एका दुकानाला भीषण आग
आगीची माहिती मिळतात वर्सोवा पोलीस, मुंबई अग्निशमन दल आणि आदानी इलेक्ट्रिसिटीचे कर्मचारी घटनास्थळावर दाखल
अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू
आगीत दुकान जळून खाक, मोठं नुकसान
आग नेमकी कशामुळे लागली? कारण अस्पष्ट
-
-
आमदार नारायण कुचे यांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
भाजप आमदार नारायण कुचे यांनी आज मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली, यावेळी जरांगे पाटलांना सुरक्षा पुरविण्याच्या संदर्भात आमदार नारायण कुचे यांनी जालन्याच्या पोलीस अधीक्षकांसोबत फोनवरून चर्चा केली आहे.
-
नेपाळ सारखी महाराष्ट्रात परिस्थिती होईल – राजू शेट्टी
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचे आरोप होत आहेत, यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. ‘अजितदादा तुम्हाला बसम्या रोग झाला आहे का 70 हजार पचवले, अजून तुमचं चालूच आहे, हे आता थांबवा, लोकांना राग येण्याचा अतिरेक करू नका,अन्यथा नेपाळ सारखी महाराष्ट्रात परिस्थिती होईल असं शेट्टी म्हणाले आहेत.
-
बेळगाव: हत्तरगी टोल नाक्यावर पोलिसांचा शेतकऱ्यांवर लाठीचार्ज
बेळगावमध्ये ऊस उत्पादकांना प्रति टन 3500 रुपये भाव मिळावा या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला गंभीर वळण लागले असून निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. बेळगाव जिल्ह्यातील हत्तरगी टोल नाक्यावर ही घटना घडली आहे.
-
-
तटकरेंचा राजकीय डाव, गोगावलेंच्या समर्थकाला राज्य पातळीवर पद
रायगडच्या राजकारणात पुन्हा एकदा सुनिल तटकरेंचा डाव चर्चेत आला आहे. मंत्री भरतशेठ गोगावले यांचे सुपुत्र आणि युवासेना कोकण सचिव विकास गोगावले यांना तटकरेंनी अप्रत्यक्षरित्या जोरदार धक्का दिला आहे. गोगावलेंचे खंदे समर्थक सुशांत जाबरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ हातात बांधत पक्षप्रवेश केला आहे. एवढ्यावरच थांबत नाही, तटकरेंनी सुशांत जाबरे यांना थेट युवक राष्ट्रवादीच्या राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती दिली आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुका तोंडावर असताना तटकरेंनी टाकलेला हा नवा फासा रायगडच्या राजकारणात मोठी चर्चा निर्माण करत आहे.
-
मुंबई: दादरच्या स्टार मॉल मध्ये भीषण आग
दादरच्या स्टार मॉल मध्ये भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले आहे. या आगमीमुळे मॉल मध्ये मोठ्याप्रमाणत धूर पसरला आहे, त्यामुळे मॉल रिकामा करण्यात आला आहे. शॉट सर्किट मुळे आग लागल्याची माहिती समोर आली आहे.
-
अहमदाबाद विमान अपघात प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली
अहमदाबाद विमान अपघात प्रकरणी पायलटच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय आणि इतर पक्षांकडून चार आठवड्यांच्या आत उत्तर मागितले आहे.
-
जापान : अस्वलांना पकडण्यासाठी सैन्य तैनात
जापानमध्ये अस्वलांना पकडण्यासाठी लष्कर तैनात करण्यात आले आहे. गेल्या सात महिन्यांत अस्वलांनी 100हून अधिक हल्ले केले आहेत. यात 12 लोकांचा मृत्यू झाला आहे.
-
धनंजय मुंडे यानेच हा कट केलेला असणार, करूणा मुंडे यांचा आरोप
जो स्वतःच्या बायकोला सोडत नाही गेल्या अनेक वर्षापासून तो मला त्रास देत आहे. मनोज जरांगे पाटील यांचा पण कट मुंडे यांनी केला असेल, असा खळबळजनक आरोप करूणा मुंडे यांनी केला आहे. जरांगे पाटील यांची आतील टीम फोडण्याचं काम मुंडे यांने केलं. पोलिसांच्या कैदेत असलेला आरोपी दादा गरुड माझ्याकडे येऊन गेला आहे.. धनंजय मुंडे यांनी त्याला मेसेज केला होता सॉरी म्हणून..पाच लाख रुपये सुद्धा त्याने त्याला पाठवले होते, असंही करूणा मुंडे यांनी पुढे सांगितलं.
-
इंडोनेशिया: जकार्ता मशिदीत स्फोट, 50 हून अधिक जखमी
इंडोनेशियाची राजधानी जकार्तामधील एका मशिदीत स्फोट झाला आहे. यात 50 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. नमाज पठण सुरू असताना हा स्फोट झाला.
-
धाराशिवमध्ये ऊस कारखान्यांकडे राहिलेल्या थकीत बिलासाठी शेतकरी आक्रमक
तुळजापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेतकऱ्यांनी आमरण उपोषण आंदोलन सुरू केलं आहे. आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे असलेले शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिल लवकरात लवकर मिळावे अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. उसाला योग्य भाव आणि थकीत असलेले ऊस बिल मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची शेतकऱ्यांची भूमिका आहे.
-
होऊन जाऊदे दूध का दूध, पानी का पानी; धनंजय मुंडेंच्या उत्तरानंतर जरांगे पाटलांचे थेट चॅलेंज
धनंजय मुंडेंनी पत्रकारपरिषद घेत जरांगे पाटलांच्या आरोपांना प्रत्यूत्तर दिलं. त्यावर आता जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया देत “होऊन जाऊदे दूध का दूध, पानी का पानी.आता माघार नाही” असं म्हणत मुंडेंना जरांगेंनी थेट चॅलेंज दिलं आहे.
-
मी दोषी असतो तर कुणालाही आव्हान दिलं नसतं; धनंजय मुंडेंच्या उत्तरानंतर जरांगे पाटलांचे उत्तर
धनंजय मुंडेंच्या पत्रकारपरिषदेनंतर जरांगे पाटलांनी प्रत्यूत्तर दिलं आहे. “मी दोषी असतो तर कुणालाही आव्हान दिलं नसतं.” असं म्हणत “माझ्या हत्येचा कट रचणारे सूत्रधार धनंजय मुंडेच” असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
-
पार्थ पवार जमीन प्रकरणी राहुल गांधींचा ट्विट करून सवाल
पार्थ पवार जमीन प्रकरणी राहुल गांधींचा ट्विट करून सवाल उपस्थित केला आहे. “महाराष्ट्रात दलितांसाठी राखीव असलेली 1 हजार 800 कोटी किंमतीची सरकारी जमीन एका मंत्र्याच्या मुलाच्या कंपनीला फक्त 300 कोटींना कशी विकली?” असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला आहे.
-
वंदे मातरम गीताला १५० वर्षे पूर्ण, सोलापुरात साकारली भारताच्या नकाशाची मानवी प्रतिकृती
सोलापुरातील दयानंद महाविद्यालय आणि ‘आई प्रतिष्ठान’ यांच्या संयुक्त विद्यमाने वंदे मातरम गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एक भव्य सामूहिक गायन आणि देशप्रेम जागवणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, विद्यार्थी-विद्यार्थिनींनी एकत्र येऊन १५०० फूट लांबीच्या भारताच्या नकाशाची मानवी प्रतिकृती साकारली आणि त्याचवेळी सामूहिकरित्या ‘वंदे मातरम’ गीत गायले. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेला ‘आई प्रतिष्ठान’चा हा अनोखा उपक्रम सोलापुरात देशभक्तीचा जयघोष करणारा आणि युवा पिढीला प्रेरणा देणारा ठरला, ज्याचे उपस्थित नागरिकांनी विशेष कौतुक केले.
-
दिव्यात बेकायदा बांधकाम केलेल्या इमारती जमीनदोस्त, २७५ कुटुंबे बेघर; संतप्त रहिवाशांचा पालिकेला घेराव
ठाणे महानगरपालिकेने केलेल्या कारवाईत दिव्यातील सात बेकायदा बांधकाम केलेल्या इमारती जमीनदोस्त केल्यामुळे सुमारे २७५ कुटुंबे एका क्षणात बेघर झाली आहेत. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज पालिकेच्या मुख्यालयाला घेराव घातला. रहिवाशांनी आपली तीव्र मागणी प्रशासनासमोर ठेवली आहे: एकतर आम्हाला तात्काळ घरे द्या, नाहीतर सध्याच्या बाजारभावाप्रमाणे भरपाई द्या. तसेच, या बेकायदा बांधकामासाठी जबाबदार असलेल्या बिल्डरवर कठोर गुन्हे दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली. आपल्या मागण्या मान्य न झाल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा या बेघर नागरिकांनी दिला आहे.
-
उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यात चोरट्यांकडून हात साफ; लातूरच्या भूसणीत गर्दीचा गैरफायदा घेत खिसे कापले
लातूर जिल्ह्यातील भूसणी येथे उद्धव ठाकरे यांच्या सभेदरम्यान चोरीच्या घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. सभेच्या ठिकाणी जमलेल्या प्रचंड गर्दीचा फायदा घेऊन या चोरट्यांनी अनेक नागरिकांचे खिसे कापले. प्राथमिक अंदाजानुसार, दोघा-तिघांचे मिळून जवळपास ५० हजार रुपये घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. खिसे कापल्याचे लक्षात येताच नागरिकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तातडीने हालचाल करत गर्दीतील काही संशयितांना ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे. राजकीय दौऱ्यांच्या ठिकाणच्या गर्दीचा गैरफायदा घेऊन चोरटे असे प्रकार करत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
-
बावधन पोलिसांकडून पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीचे दस्तऐवज जप्त
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया’ कंपनीने केलेल्या वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणाची चौकशी आता अधिक तीव्र झाली आहे. बावधन पोलिसांनी आज, गुरुवार (६ नोव्हेंबर २०२५) रोजी बावधन येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयात धाड टाकून जवळपास दोन तास कसून तपासणी केली. या तपासणीमध्ये, पोलिसांनी अमेडिया कंपनीने खरेदी केलेले महत्त्वाचे दस्तऐवज (डॉक्युमेंट्स) हस्तगत केले आहेत.
-
मी ही येतो, तुम्हीही या, एकदाचा फैसला होऊन जाऊ द्या – धनंजय मुंडे
धनंजय मुंडे या पृथ्वीतलावरच नसावा, असे मनोज जरांगेंना वाटते. मी १७ तारखेच्या सभेत त्यांना दोनच प्रश्न विचारले होते. त्याचं अजून उत्तर मिळालेलं नाही. मराठा समाजाला खरंच ओबीसी की EWS मध्ये जाऊन फायदा आहे का, मी ही येतो, तुम्हीही या, एकदाचा फैसला होऊन जाऊ द्या – धनंजय मुंडे
-
मराठा आरक्षणासाठी सभागृहात आवाज उठवला – धनंजय मुंडे
मी कधीही जात पाहून राजकारण केलेले नाही. गेले ३० वर्ष मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रीय आहे. परळीत आंदोलन झालं, त्याला जागा देण्यासाठी मी जरांगेंना मदत केली. मराठा आरक्षणासाठी सभागृहात आवाज उठवला, असे धनंजय मुंडे म्हणाले.
-
वाळू साठवण प्रकरणात तहसीलदार निलेश होनमोरे निलंबित
गडचिरोली वाळू साठवण प्रकरणात निष्काळजीपणा केल्यामुळे सिरोंचा येथील तहसीलदार निलेश होनमोरे यांना आज निलंबित करण्यात आले. महसूल विभागाचे अप्पर सचिव यांनी चौकशी करून निलंबित आदेश पारित केला आहे.
-
नंदुरबार शहरातील नेहरू चौक परिसरात परिसरात भीषण अपघात
नंदुरबार शहरातील नेहरू चौक परिसरात परिसरात भीषण अपघात झाला आहे. प्रवासी वाहतूक करणारी टॅक्सी चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातात चार जण जखमी तर रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या चार ते पाच मोटरसायकलींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
-
एकनाथ शिंदे आणि जे पी नड्डा यांचा एकाच विमानाने प्रवास
बिहारमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जे पी नड्डा यांचा एकाच विमानाने प्रवास. राज्यातील राजकारण, बिहार निवडणुकीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे म्हटले जाते.
-
अमरावती जिल्ह्यात इच्छुक उमेदवारांची तुफान गर्दी
अमरावती जिल्ह्यात होऊ घातलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांची तुफान गर्दी झाली आहे. नगराध्यक्ष पद आणि नगरसेवक पदासाठी 1 हजार पेक्षा इच्छुक उमेदवार. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखडे, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी घेतल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती.
-
आज मध्य रेल्वेचा रात्री विशेष ब्लॉक
आज मध्य रेल्वेचा रात्री विशेष ब्लॉक. मुंबईहून शेवटची जाणारी अंबरनाथ आणि कर्जत लोकल रद्द. अंबरनाथ रेल्वे स्थानकावर गर्डर टाकाच्या कामासाठी हा मेगाब्लॉक तर लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या या पनवेल मार्गाने रवाना करण्यात येणार. हैदराबादहून मुंबईकडे जाणारी एक्सप्रेस गाडी ही वांगणी रेल्वे स्थानकावर उभी करण्यात येणार. रात्री दीड वाजता या मेगा ब्लॉकला होणार सुरुवात.
-
पवार पिता-पुत्रांविरोधात घोषणाबाजी
पुण्यात वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन सुरु. पवार पिता-पुत्रांविरोधात घोषणाबाजी. मूळ मालकांना जमीन परत देण्याची मागणी. पार्थ पवार पुण्यातील जमीन खरेदी व्यवहार प्रकरणात अडचणीत आलेत.
-
मुंब्रा रेल्वे अपघात अंतरिम जामीन अर्जावर सुनावणी
मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी अभियंत्याच्या अंतरिम जामीन अर्जावर सुनावणी सोमवारी होणार. आज झालेल्या सुनावणीत जामीन अर्जावरची सुनावणी प्रलंबित ठेवण्यात आली आहे. सोमवारी रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेला अहवाल आणि रेल्वे पोलिसांचा अहवाल तपासून दिला जाणार निर्णय.
-
अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला
उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला. आजही अजित पवार माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर न देताच निघून गेले. कालही अजित पवार असेच माध्यमांशी न बोलता निघून गेले होते.
-
धनंजय मुंडेंनी मला मारण्याची सुपारी दिली – मनोज जरांगे यांचे आरोप
धनंजय मुंडेंनी मला मारण्याची सुपारी दिली. आता सगळं षडयंत्र बाहेर पडणार, धनंजय मुंडे कच रचणारा मुख्य सूत्रधार – मनोज जरांगे यांचे आरोप
-
मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी गुन्हा दाखल केलेल्या दोन्ही अभियंत्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी
ठाणे – मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी गुन्हा दाखल केलेल्या दोन्ही अभियंत्यांच्या जामीन अर्जावर आज ठाणे सत्र न्यायालयात सुनावणी होणार. याच दोन अभियंत्यांवर गुन्हा दाखल केल्याप्रकरणी काल सीएसएमटी स्थानकात रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. अभियंत्यांना न्यायालयातून जेल होते की जामीन मिळतो हे पाहणं महत्वाचं ठरेल.
-
जेवणात विष टाकून मारण्याचा कट रचला – मनोज जरांगे पाटील
बीडमधील एका व्यक्तीपासून या घटनेची सुरूवात झाली. मला मारण्यासाठी अडीच कोटींची डील झाली . जेवणात विष टाकून मारण्याचा कट रचला – मनोज जरांगेंनी सांगितला कटाचा संपूर्ण घटनाक्रम
-
माझ्या समाजासाठी लढायला मी खंबीर आहे – मनोज जरांगे पाटील
माझ्या समाजासाठी लढायला मी खंबीर आहे. माझ्यावरील हल्ल्याआधीच त्यांचे डाव उघड पाडले – मनोज जरांगे पाटील
-
उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांशी संवाद
जमीन नव्हे शेतकऱ्यांचं आयुष्य वाहून गेलंय. जनावरं वाहून गेल्याची दृश्य अत्यंत विदारक – उद्धव ठाकरे
-
उद्धव ठाकरे टोमणे मारतात असं मुख्यमंत्री बोलतात – उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे टोमणे मारतात असं मुख्यमंत्री बोलतात, न्याय मागितला तर टोमणे मारतात असं बोलतात… शेतकऱ्यांचं एका पावसात सगळं वाहून गेलं आहे… अनेक ठिकाणी पंचनामे झालेले नाहीत… जमीन नाही तर, शेतकऱ्यांचं आयुष्य वाहून गेलं आहे.. असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
-
लक्ष्मण हाकेयांच्या समोर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी….
ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक धनाजी साखळकर एकमेकांसमोर भिडले… ओबीसी नेते लक्ष्मण हाके आज पंढरपुरात आले असता त्यांच्यासमोरच मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली… एक मराठा लाख मराठा जारांगे पाटील आगे बढो अशी घोषणाबाजी केली… मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वय धनाजी साखळकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली म्हणून धनाजी साखरकर आणि लक्ष्मण आखे यांच्यात झाली बाचाबाची…
-
नाशिक–छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावर दुचाकीचा अपघात…
अपघातात दुचाकीस्वार तरुण व्यवसायकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू… निफाड तालुक्यातील विंचूर येथील अपघाताची घटना… पिंपळस रामाचे–येवला दरम्यान कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू… एका बाजूने रस्त्याचे कॉंक्रिटीकरण काम सुरु… तर दुसऱ्या बाजूला वाहतूक सुरु असलेल्या रस्त्यात खोल खड्ड्याचे साम्राज्य… या खड्ड्यात विंचूर येथे दुचाकी अडकल्याने तरुण व्यावसायिक दहा ते पंधरा फूट फेकल्या गेल्याने जागीच मृत्यू… 34 वर्षीय अनिल जाधव राहणार चांदवड तालुक्यातील वाकी येथील अपघातात मृत्यू झालेल्या तरुण व्यवसायकाचे नाव….
-
मनोज जरांगे पाटलांना झेड प्लस सुरक्षा द्यावी, आमदार विजयसिंह पंडितांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याचं उघडकीस आल्यानंतर आमदार विजयसिंह पंडित यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे. या पत्राद्वारे मनोज जरांगे पाटील यांच्या जिवीतास निर्णय झालेला धोका लक्षात घेऊन त्यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करावी अशी मागणी केली आहे.
-
मालेगावात सामूहिक वंदे मातरम् गीत गायन…
मालेगावच्या कॉलेज मैदानावर वंदे मातरम् गीत सामूहिक जयघोष… शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत केला जयघोष… शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी सहभागी… अपर जिल्हाधिकारी,प्रांत, तहसीलदार यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित..
-
मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा द्या आमदार प्रकाश सोळंके पत्र
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची हत्या करण्याचा कट बीडमध्ये रचला गेला यासाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी ठरली अशी तक्रार जालना पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलिसांनी बीडमधून दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रकाश सोळंके यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. यामध्ये सुपारी देऊन हत्या घडवण्याच्या कटाची वरिष्ठ पातळीवर चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी आणि जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे.
-
नाशिक जिल्ह्यातील पारा घसरला नाशिक मध्ये 14.2 अंश तर निफाड चा पारा १३ अंशावर
यंदाच्या हंगामात पाहिल्यादाच पारा १३ अंशावर. गेल्या चार दिवसांपासून वातावरणात झाला आहे बदल. पारा घसरल्याने गुलाबी थंडीची चाहूल. पुढील काही दिवसांमध्ये राज्यात थंडी वाढण्याचे दाट संकेत आहेत.
-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून बावडीत उतरून मतदार शोधण्याचा प्रकार
काल दहिसर विधानसभा येथील शिवाजी नगर भागात एका मतदाराचे चक्क 2 वेळा नाव नोंदवल्याचा प्रकार उघडकीस आला. यावर मनसे कार्यकात्यांनी चक्क बावडीत उतरून मतदाराचा शोध घेतला आहे. या वेळी विशेष पूजा करुन आणि बावडीला नारळ देऊन मतदार सापडू दे अशी हाक मनसे उपविभाग अध्यक्ष किरण नकाशे यांनी केली. या वेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या अशा प्रकारच्या मतदार शोध मोहिमे नंतर राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलय.
-
रात्रीची नाशिक दिल्ली हवाई सेवा पंधरा दिवसांसाठी बंद
इंडिगो कंपनीने नुकतीच सुरू केली होती सकाळच्या सेवेसह अतिरिक्त सेवा. दिल्लीत धावपट्टीसह अनेक तांत्रिक कामांचा फटका नाशिकला. 20 नोव्हेंबर पर्यंत ही सेवा राहणार बंद, पर्यटनाला बसणार फटका
-
कल्याण ९० फूट रोड’वर अवजड वाहनांची झाडाला धडक
धडकेत रस्त्याच्या कडेची अनेक झाडे मुळासकट तुटली. पहाटे या रस्त्यावरती मॉर्निंग वॉक साठी येणाऱ्या नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण. काही दिवसांपूर्वी अवजड वाहनाने केलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यानंतर नुकसान नंतर आता झाडाच्या झालेल्या लोकांना मुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; सुरक्षेचा प्रश्न गंभीर.मनमानी करणाऱ्या वाहनचालकांवर तातडीने कारवाई करण्याची नागरिकांची तीव्र मागणी!
-
27 गावाची स्वतंत्र नगरपालिका करण्याची मागणी
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील 27 गावाची स्वतंत्र नगरपालिका करण्याची मागणी पुन्हा पेटली. कल्याण-शिळ रोडवर खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आज डोंबिवलीत सर्वपक्षीय संघर्ष समितीचं मोठे आंदोलन होणार आहे. डोंबिवलीतील मानपाडा (मानगाव) चौकात हे आंदोलन असून आंदोलकांनी केडीएमसी प्रशासनावर टॅक्स घोटाळा,रस्ता घोटाळा ,आरोग्यसेवा घोटाळा ,पाणी घोटाळा,कचरा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप करत २७ गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे.
-
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे संकेतस्थळ बंद
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे संकेतस्थळ अनेक दिवसापासून बंद असल्याने बेरोजगार तरुणांची गैरसोय होत आहे.अनेक लाभार्थ्यांना आपली प्रकरण दाखल करण्यात अडचणी येत आहेत.महामंडळाच्या कारभाराचा फटका बसत असल्यानं सकल मराठा समाजाने बैठक बोलावली आहे. महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे
-
पुण्यात पंधरा दिवसात वन विभागाकडून 12 बिबटे जेरबंद
पुण्यात पंधरा दिवसात वन विभागाकडून 12 बिबटे जेरबंद करण्यात आले आहे. ग्रामस्थांत घबराट असून 43 हून अधिक पिंजरे बसवण्यात आले आहे. ऊस तोडणी सुरू झाल्यापासून जुन्नरसह शिरूर आंबेगाव खेड तालुक्यांमध्ये बिबट्यांचा प्रश्न चिघळला असून गेल्या पंधरा दिवसात वन विभागाने 12 बिबट्यांना जेरबंद केलेय तर एका व्यक्तीला गोळ्या घालून मारण्यात आले
-
नागरिकांनी स्वखर्चाने बुजवले खड्डे
वसईच्या चिंचोटी भीवंडी राज्य महामार्गाची दुरवस्था पाहता नागरिकांनी स्वखर्चाने खड्डे बुजवले. रजनीकांत म्हात्रे फाऊडेशन आणि युवा ग्रुपच्या तरुणांनी स्वखर्चाने जीसीबी लावून चिंचोटी ते नागल्या परेंत रस्ता दुरुस्त केला आहे .चिंचोटी ते भिवंडी राज्य महामार्ग हा रहदारीचा मुख्य महामार्ग आहे या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात अपघात होऊन अनेकांचे जीव जात आहेत मात्र राज्य शासन आणि PWD विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे स्थानिक गावकऱ्यांनी एकत्र येऊन प्रशासना विरोधात तीव्र संताप व्यक्त करत स्वाखर्चाने खड्डये बुजवून सरकारला जाब विचारला आहे
-
माजी आमदार बाळा काशीवार यांची भाजपमध्ये घरवापसी
काही महिन्यांपूर्वी बंडखोर उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे भाजपने आपले ज्येष्ठ कार्यकर्ते माजी आमदार बाळा काशीवार यांची पक्ष सदस्यता रद्द केली होती. मात्र आता त्यांनी पुन्हा एकदा पक्षावर विश्वास दाखवत भाजपमध्ये पुनरागमन (घरवापसी) केली आहे. “प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर मला पूर्ण विश्वास आहे. विकासाच्या राजकारणात पुन्हा सक्रिय भूमिका बजावण्यासाठी मी भाजपमध्ये परत आलो आहे.” त्यांच्या प्रवेशावेळी जिल्ह्यातील भाजप आमदार परिणय फुके यांची उपस्थिती होती. पक्षाने त्यांचे स्वागत करत “बाळा काशीवार यांचे पुनरागमन हे भाजपसाठी बळ देणारे ठरेल,” असे मत व्यक्त केले आहे. या निर्णयानंतर भंडारा जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये नव्या चर्चांना उधाण आले आहे
-
छत्रपती संभाजीनगरमधील सिडको बसस्थानकाचा काया पालट होणार
मराठवाडा आणि विदर्भाला जोडणाऱ्या सिडको बस स्थानकाचा काया पलट होणार आहे, सध्या असलेली एक मजली इमारतीच्या स्थानकाच्या जागेवर आठ मजली स्थानक उभारण्यात येणार आहे. या कालावधीत या बस स्थानकाचे स्थलांतर चिकलठाणा येथील बस कार्यशाळेत होणार आहे. सिडकोचा हा नवीन बस स्थानकाचा प्रकल्प बीओटी तत्वावर उभारला जाणार आहे.
-
पार्थ पवारांविरोधात मूळ मालकांचे आंदोलन
कोरेगाव पार्क परिसरातील ताडीवृत्ता चौक येथे मोक्याची जागा पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनी घेतलेय,ही जागा परत करावी अशी मूळ मालकांची मागणी आहे..या मागणीसाठी मूळ मालक आक्रमक आंदोलन करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
Published On - Nov 07,2025 8:06 AM
