Nagpur | Nawab Malik यांच्या ED कारवाईविरोधात NCPचं आंदोलन
मंत्री नवाब मलीक (Nawab Malik) यांना ईडीने (ED) अटक केल्याच्या निषेधार्थ नागपुरात राष्ट्रवादीने (NCP) आंदोलन केले आहे. काळ्या फिती लावून, केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नवाब मलीक यांच्या समर्थनार्थ आंदोलन केले.
मंत्री नवाब मलीक (Nawab Malik) यांना ईडीने (ED) अटक केल्याच्या निषेधार्थ नागपुरात राष्ट्रवादीने (NCP) आंदोलन केले आहे. काळ्या फिती लावून, केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नवाब मलीक यांच्या समर्थनार्थ आंदोलन केले. व्हेरायटी चौकातील या आंदोलनात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार, इश्वर बाळबुधे, चिंटू महाराज यांच्यासह अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. केंद्र सरकार, मोदी-शाह यांच्या पायाखालची वाळू सरकत असून त्यातूनच अशा कारवाया होत आहेत. राज्यातले महाविकास आघाडीचे सरकार चांगले चालत असून त्यांना विनाकारण त्रास देण्याचे काम केंद्र सरकार अशा तपास संस्थांच्या मार्फत करत असल्याचा आरोप आंदोलक कार्यकर्त्यांनी केला आहे. राज्यभरात राष्ट्रवादी आंदोलन करत असून भाजपाच्या सूडाच्या राजकारणाचा सर्वत्र निषेध केला जात आहे, असे कार्यकर्ते म्हणाले.
