Amit Shah Maharashtra Visit LIVE : जिल्हा बँकामध्ये हजारो कोटींचा घोटाळा कुणी केला? रिझर्व्ह बँकेने केले का? : अमित शाह

| Updated on: Dec 19, 2021 | 6:04 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं केंद्रीय सहकार मंत्रालयाची स्थापना केल्यानंतर त्याची जबाबदारी अमित शाह यांच्याकडे देण्यात आली. अमित शाह यांनी केंद्रीय सहकार मंत्रालयाची जबाबदारी स्वीकरल्यानंतर ते पहिल्यांदाच महाराष्ट्रात येणार आहेत.

Amit Shah Maharashtra Visit LIVE : जिल्हा बँकामध्ये हजारो कोटींचा घोटाळा कुणी केला? रिझर्व्ह बँकेने केले का? : अमित शाह
अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) आज महाराष्ट्र (Maharashtra) दौऱ्यावर आहेत. प्रवरानगर येथे देशातील पहिली सहकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. अमित शाहांच्या उपस्थितीत सहकार परिषद व शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. माजी विरोधी पक्षनेते आणि भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड , चंद्रकांत पाटील तसेच माजी मंत्री पंकजा मुंडे यांची उपस्थिती असणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं केंद्रीय सहकार मंत्रालयाची स्थापना केल्यानंतर त्याची जबाबदारी अमित शाह यांच्याकडे देण्यात आली. अमित शाह यांनी केंद्रीय सहकार मंत्रालयाची जबाबदारी स्वीकरल्यानंतर ते पहिल्यांदाच महाराष्ट्रात येणार आहेत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 18 Dec 2021 02:17 PM (IST)

    मी सहकार तोडायला नाही जोडायला आलोय: अमित शाह

    लज्जत पापड,अमूल यांचा अभ्यास करायला जगातून लोक येतात. साखर कारखान्याचे सुरू राहावेत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. एकही साखर कारखाना प्रायव्हेट होऊ नये यासाठी प्रयत्न करतोय. मी सहकारात तोडायला नाही जोडायला आलोय. – पण राज्य सरकार ने देखील राजकारणा पलीकडे जाऊन याचा विचार करावा. राज्य सरकारने संस्थांवर कोण आहेत हे बघायला हवं. मला सल्ला देण्यापेक्षा तुम्ही स्वतः बघा, मी मूक प्रेक्षक म्हणून हे बघू शकत नाही, असं अमित शाह म्हणाले. माझ्या समोर एखादा विषय आला तर सहकारी संस्था कोण चालवत आहे, यापेक्षा कसा चालतोय हे मी बघणार आहे. पण राज्य सरकार ने देखील हेच करावं, असा सल्ला अमित शाह यांनी दिला. येणाऱ्या दिवसात नवीन सहकार नीती आणणार आहे. महाराष्ट्रातील सहकार मजबूत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने मिळून राज्यातील सहकार टिकवणं आणि वाढवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं अमित शाह म्हणाले.

  • 18 Dec 2021 02:04 PM (IST)

    जिल्हा बँकामध्ये हजारो कोटींचा घोटाळा कुणी केला? रिझर्व्ह बँकेने केले का? : अमित शाह

    स्वातंत्र्यांच्या 75 वर्षापर्यंत कुणाला सहकार मंत्रालय स्थापन करावं वाटलं नाही. नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारानं सहकार मंत्रालय स्थापन करण्यात आलं. आज सहकार क्षेत्र अडचणीत आहे. मात्र, सहकारातल्या व्यक्तींनी आपल्यातील दोष आहेत त्यातून स्वत: ला मुक्त करण्याची जबाबदारी आपली आहे. आज महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा बँक आदर्श मानल्या जात होत्या. आज फक्त तीन बँका आहेत. हजारो कोटींचा घोटाळा कुणी केला? रिझर्व्ह बँकेने केले का? असा सवाल अमित शाह  यांनी केला.

    सहकारी बँकांच्या पाठिशी नरेंद्र मोदी आहेत. प्रोफेशनल युवकांच्या हाती आपल्याला सहकार चळवळ द्यावी लागेल. पद्मश्री विखे पाटील यांनी सुरु केलेल्या सहकारी चळवळीला अजून शंभर पुढे घेऊन जायचं आहे. सहकार चळवळीसाठी नरेंद्र मोदी सरकार 24 तास काम करत आहेत. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी स्थापन केलेला सहकारी कारखाना अजून सहकारी आहे याचा आनंद आहे. मित्रांनो आपण आज जमलोय त्यावेळी सहकाराच्या इतिहासाला जागृत करायला हवा.

  • 18 Dec 2021 01:59 PM (IST)

    Amit Shah Live: सहकाराच्या क्षेत्राला काम करणाऱ्या व्यक्तींनी प्रवरानगरला येऊन कपाळाला इथली माती लावावी: अमित शाह

    छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची जी स्थापना केली त्याच्या पायावर आपला देश उभा आहे. या भूमीत आलो आहे मी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीला अभिवादन करतो. ही भूमी संत ज्ञानेश्वरांची आहे, त्यांनी भक्ती आंदोलनाची सुरुवात केली. ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदान लिहिलं. ही भूमिका श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र देणाऱ्या साई बाबांची आहे. साई बाबांनी जगाला विश्वबंधुत्व आणि सर्वधर्मसमभाव दिला त्यांना अभिवादन करतो. प्रवरानगरची भूमी काशी जितकीच पवित्र आहे. या भूमीत सहकाराची पायाभरणी करण्याचं काम झालं. पद्मश्री विखे पाटील आणि गाडगीळ साहेब यांनी सहकाराच्या चळवळीला गती दिली. देशात सहकाराच्या क्षेत्राला काम करणाऱ्या व्यक्तींनी प्रवरानगरला येऊन कपाळाला इथली माती लावावी, असं अमित शाह म्हणाले.

  • 18 Dec 2021 01:52 PM (IST)

    देशातील पहिला साखर कारखाना उभा राहिला, त्याठिकाणी देशाचे पहिले सहकार मंत्री इथे आलेत हा योगायोग: देवेंद्र फडणवीस

    - पहिले सहकार मंत्री आणि दमदार गृहमंत्री अमित शहा यांचे स्वागत -देशातील पहिला साखर कारखाना उभा राहिला, त्याठिकाणी देशाचे पहिले सहकार मंत्री इथे आलेत हा योगायोग - अमित शहा हे सहकारी चळवळीतून तयार झालेले कार्यकर्ते - सहकाराच्या मुळापर्यंतची ज्यांना जाणीव त्यांनाच मोदींजींनी सहकार मंत्री केले - इन्कम टॅक्स च्या जाचातून अमित शहा यांनी साखर कारखान्यांना सोडवलं - आम्ही यासाठी अनेक वर्षे भांडलो - कोट्यवधी रुपये खर्च केले - आमच्या सरकारने सहकाराला अडचणीतून बाहेर आणण्यासाठी निर्णय घेतले

  • 18 Dec 2021 01:11 PM (IST)

    सहकाराच्या पंढरीसाठी आज सोन्याचा दिवस: राधाकृष्ण विखे पाटील

    राधाकृष्ण विखे पाटील भाषण - सर्वप्रथम दत्त जयंतीच्या शुभेच्छा - सहकाराच्या पंढरीची आज सोन्याचा दिवस - सहकार पंढरीत अमित शहा यांचे मनःपूर्वक स्वागत - कोव्हिडं नंतर पहिल्यांदाच एवढी मोठी सभा - आपण सहकार मंत्री झालात आणि सहकार चळवळीला ताकद मिळाली - देशासमोर प्रवरा कारखाना हे मॉडेल - मधल्या काळात सहकार सहकारी चळवळीची पीछेहाट - आपण सहकार मंत्री झाल्याने नवी संजीवनी मिळेल - राज्यातील सहकारी कारखानदारीचे खाजगीकरण मोठ्या प्रमाणात - अनेकांनी खाजगी कारखाने काढले आणि सहकाराला दोष दिला

  • 18 Dec 2021 12:51 PM (IST)

    केंद्रीय मंत्री अमित शाह प्रवरानगरमध्ये दाखल

    केंद्रीय मंत्री अमित शाह प्रवरानगरमध्ये दाखल झाले असून  तांच्यासोबत  माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित आहेत.

  • 18 Dec 2021 12:25 PM (IST)

    महाराष्ट्रातील सहकार चळवळीतील अडचणी सुटाव्यात यासाठी आजची सहकार परिषद: प्रविण दरेकर

    महाराष्ट्रातील सहकार चळवळीतील अडचणी सुटाव्यात यासाठी आजची सहकार परिषद

    महाराष्ट्रातील सहकार चळवळीला उर्जितावस्था येईल

    सहकार मंत्रालय हे सहकार वाढवण्यासाठी आणि काही दोष असतील ते दुरुस्त करण्यासाठी आहे

    सहकार खातं वाढवण्यासाठी असतं याची जाणीव राष्ट्रवादीला आहे

    आतापर्यंत राज्यात सहकार कोणी चालवला आणि तो जर मोडीत काढला असेल तर हा आरोप त्यांच्यावर होतो

    आजच्या सहकार परिषदेमुळे महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाली आहे

    अमित शहा यांनी गावपातळीपासून सहकारात काम केलं त्यामुळे त्यांना सहकार चांगलंच माहिती आहे

  • 18 Dec 2021 12:01 PM (IST)

    अमित शहांचा मुक्काम पुण्यातील व्हीव्हीआयपी सर्किट हाऊसमध्ये

    अमित शहांचा मुक्काम पुण्यातील व्हीव्हीआयपी सर्किट हाऊसमध्ये,

    उपमुख्यमंत्री अजित पवारांंनी त्यांचा राखीव सूट दिला मुक्कामासाठी अमित शहांना ,

    ठखाजगी ठिकाणी मुक्कामाची सोय नको अमित शहांच्या कार्यालयानं कळवलं होतं जिल्हा प्रशासनाला,

    पुण्यातील व्हीव्हीआयपी सर्किट हाऊसमध्ये दोन सुट आहेत त्यापैकी एक सुट कायमस्वरूपी मुख्यमंत्र्यांना राखीव असतो,

    तर दूसरा उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासाठी,

    याच दालनात अजित पवार बैठक घेत असतात,

    मात्र ही गोष्ट अजित दादांच्या कानावर जाताच त्यांनी त्यांचा सूट अमित शहांना मुक्कामासाठी दिलाय...

  • 18 Dec 2021 11:36 AM (IST)

    केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा बारा वाजता शिर्डी विमानतळावर पोहचणार

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बारा वाजता शिर्डी विमानतळावर पोहचणार... अमीत शहांच्या दौ-यात बदल होण्याची शक्यता.. साईदर्शनाने होणार होती दौ-याची सुरूवात... मात्र बारा वाजता साईबाबांची आरती सुरू होत असल्याने दर्शनरांग असते बंद... अमित शहा आता थेट सहकार परिषदेला पोहचण्याची शक्यता... सहकार परिषदेनंतर साईदर्शन घेण्याची शक्यता... अमित शहांच्या स्वागतासाठी भाजपाचे राज्यातील अनेक नेते विमानतळावर दाखल... साधारण बारा वाजता अमित शहा शिर्डी विमानतळावर पोहचणार...

  • 18 Dec 2021 11:35 AM (IST)

    विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस , विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर तसेच माजी मंत्री गिरीश महाजन साई दरबारी

    विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस , विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर तसेच माजी मंत्री गिरीश महाजन साई दरबारी .... साई समाधीचे घेतले दर्शन.... केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या दौ-या निमित्ताने भाजपचे अनेक नेते शिर्डीत...

Published On - Dec 18,2021 11:26 AM

Follow us
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.