AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baba Adhav : माझ्यासारखी माणसं मरण पत्करतील पण… बाबा आढाव यांचा अजितदादांना समोरच इशारा

Baba Adhav Warning to Government : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी 95 व्या वर्षी निवडणुकीतील गैरप्रकार आणि ईव्हीएमविरोधात आत्मक्लेश आंदोलन सुरू केले आहे. पुण्यातील महात्मा फुले वाड्यात, आंदोलन स्थळी अजितदादांनी भेट दिली. त्यावेळी बाबा आढाव यांनी त्यांची रोखठोक भूमिका मांडली.

Baba Adhav : माझ्यासारखी माणसं मरण पत्करतील पण... बाबा आढाव यांचा अजितदादांना समोरच इशारा
बाबा आढाव, अजित पवार
| Updated on: Nov 30, 2024 | 4:43 PM
Share

राज्यात महायुतीला अभूतपूर्व बहुमत मिळाले असले तरी ईव्हीएमविरोधात मोठे आंदोलन उभे राहत आहे. अनेक ठिकाणी पराभूत उमेदवारांनी फेर मतमोजणीसाठी पैसे जमा केले आहेत. अनेक गावात मतदार आणि मतदानाची संख्या जुळत नसल्याचा त्यांचा आरोप आहे. राज्यात ईव्हीएमविरोधात रान पेटत असतानाच दुसरीकडे पुण्यात 95 वर्षींय समाजसेवक बाबा आढाव यांनी या सर्व प्रकाराविरोधात आत्मक्लेश आंदोलन सुरू केले आहे. या विधानसभा निवडणुकीत पैशांचा धुमाकूळ झाल्याचा आरोप त्यांनी केला. ईव्हीएमवर त्यांनी संशय व्यक्त केला. शरद पवार यांच्यानंतर आज अजित पवार यांनी आंदोलन स्थळी भेट दिली. त्यावेळी बाबा आढावांनी मोठा इशारा दिला.

लोकसभा-विधानसभा निकालात इतका फरक कसा?

ईव्हीएमच्या घोटाळ्यावर बाबा आढाव यांनी घाणाघात केला. ईव्हीएमचं निराकरण झालं पाहिजे. आम्हाला दाबायचा प्रयत्न करू नका. आम्हाला दाबायचा प्रयत्न केला तर असं होणार नाही. माझ्यासारखी माणसं मरण पत्करतील पण दाबले जाणार नाही. आम्हाला हे स्वातंत्र्य असं नाही मिळालं. आम्हाला संघर्ष करावा लागला आहे. दोन तीन प्रश्न आहेत. त्याचं निराकरण करा. लोकसभा आणि विधानसभेतील मतदान आणि निकालात फरक कसा. याचा छडा लागला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

आंदोलन निकाराने पुढे जाईल

आम्ही शत्रू नाही. आपण मित्रच आहोत. पण प्रश्नाचं निराकरण झालं पाहिजे. मी नमस्कार म्हणत नाही. जिंदाबाद म्हणतो. दादा तुम्ही आलात मी दोनदा जिंदाबाद म्हणतो. तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद देतो, आढाव हे दादांना म्हणाले. मला वाटतं काही प्रयत्न निघाला नाही तर आम्ही हे आंदोलन शांततामय मार्गाने पुढे नेईल. ते वाया जाऊ देणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

प्रसंगी मरण पत्करेल

ईव्हीएममधील गैरप्रकार सिद्ध करण्याचे काम आपलं आहे. घटनेला 75 वर्षे होतायेत. मी आत्मक्लेश सुरू केला आहे. हे सरकार कुणालाच जुमानतच नाही. मतपेटीत जे झालं, त्याचा छडा लागलाच पाहिजे. याचं निराकरण झालं पाहिजे. हे प्रकरण दाबायचा प्रयत्न केला तर आम्ही माघारी हटणार नाही. माझ्यासारखी माणसं प्रसंगी मरण पत्करतील पण मागे हटणार नाहीत, असा इशाराचा ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांनी दिला.

आमचं आंदोलन दडपू नका

कोर्टात मार्ग निघत नाही म्हणून जनआंदोलन केलं जातं. त्याने केलं म्हणजे आम्ही केलं असं होत नाही. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार आहोत. फक्त दडपू नका. तसा शब्द द्या. आतापर्यंत खूप दडपण्याचा प्रयत्न केला, थेट आरोप आढावा यांनी सरकारवर केला. कोर्टाच्या जजपेक्षा मला जनतेची न्यायबुद्धी महत्त्वाची आहे. आमचं आंदोलन चिरडलं जाऊ नये. नाही तर चिघळलं जाईल. चळवळी उभ्या करणं आमचं काम आहे. हे आंदोलन सुरू झालं. त्यात विधायक बाजू आहे. चळवळीच्या हक्काच्या बाजू आहेत. ते चिरडलं जाऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

1952 पासून निवडणूका पाहिल्यात मात्र यावेळी सरकारी यंत्रणाचा खूप वापर झाला. तुम्ही सरकार आहात. तुम्ही पवार आहात मी काय बोलणार. याचं निराकण झालं पाहिजे दाबायचं प्रयन्त केला तर लोकं बाहेर पडणार असा इशारा त्यांनी दिला. मी कधी दगड हातात घेतला नाही, शिव्या दिल्या नाहीत, मला अटक झाली. मी नमस्कार म्हणत नाही मी झिंदाबाद म्हणतो, असे ते म्हणाले.

अजित पवारांच्या निधनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया...
अजित पवारांच्या निधनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया....
फडणवीस, शिंदेंकडून सुनेत्रा पवारांचं सांत्वन; बारामतीत अलोट गर्दी
फडणवीस, शिंदेंकडून सुनेत्रा पवारांचं सांत्वन; बारामतीत अलोट गर्दी.
अजित पवारांच्या निधनाने राज्यावर शोककळा! छगन भुजबळही बारामतीत दाखल
अजित पवारांच्या निधनाने राज्यावर शोककळा! छगन भुजबळही बारामतीत दाखल.
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या वेळीचा आणखी एक व्हिडीओ समोर
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या वेळीचा आणखी एक व्हिडीओ समोर.
अजितदादांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कुठे ठेवलं जाणार?
अजितदादांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कुठे ठेवलं जाणार?.
मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे बारामतीच्या रुग्णालयात दाखल
मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे बारामतीच्या रुग्णालयात दाखल.
Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या सासरवाडीत कडकडीत बंद!
Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या सासरवाडीत कडकडीत बंद!.
अजितदादा वाचतील असं वाटलेलं; पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया
अजितदादा वाचतील असं वाटलेलं; पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया.
विमान अपघाताचं प्राथमिक कारण काय? मुरलीधर मोहोळांनी दिली माहिती
विमान अपघाताचं प्राथमिक कारण काय? मुरलीधर मोहोळांनी दिली माहिती.
अश्रूंचा बांध फुटला! बारामतीत पोहोचताच सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर
अश्रूंचा बांध फुटला! बारामतीत पोहोचताच सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर.