Raj-Uddhav Thackrey : मुंबईकर म्हणून घराबाहेर पडताना लाज वाटते… राज आणि उद्धव ठाकरेंसमोर महेश मांजरेकर थेटच म्हणाले ? संयुक्त मुलाखतीत आणखी काय?
राज आणि उद्धव ठाकरे जवळपास दोन दशकानंतर आगामी महापालिका निवडणुकीसाठी एकत्र आले आहेत. शिवसेना-मनसे युती महाराष्ट्रातील राजकारणाची समीकरणं बदलणार आहे. मतदानाच्या आधी त्यांची संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांनी घेतलेली संयुक्त मुलाखत चर्चेचा विषय ठरली आहे. यात महेश मांजरेकर यांनी दोन्ही बंधूंसमोर मुंबईबद्दल एक थेट विधान केलं, ज्याची सर्वत्र चर्चा आहे.

राज आणि उद्धव हे दोन्ही ठाकरे बंधू जवळपास दोन दशकानंतर एकत्र आले असून आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना-मनसे युती एकत्र लढणार आहे. या दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीने राज्यातील समीकरणं प्रचंड बदलणार असून महाराष्ट्रातील नागरिक त्यांच्यावर विश्वास ठेऊन मत देतो का हे थोड्याच दिवसांत स्पष्ट होईल. 15 तारखेला राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदान होणार असून 16 जानेवारीला निकाल लागणार आहे. निवडणुका अवघ्या आठवड्याभरावर आलेल्या असतानाच विविध ठिकाणी राज (Raj Thackrey) व उद्धव ठाकरे ( Uddhav Tahckrey) यांच्या सभांचा धडाकाही उडणार आहे. मात्र त्यापूर्वीच राज आणि उद्धव यांची एकत्रित, संयुक्त मुलाखत देखील नागरिकांना पहायला मिळणार आहे.
संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांनी दोन्ही ठाकरे बंधूंची ऐतिहासिक मुलाखत घेतली असून त्याचा पहिला टीझरही समोर आला आहे. या मुलाखतीत दोन्ही भावांनी विविध विषयांवर मनमोकळेपणाने उत्तर दिली असून त्यातच राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र चढवल्याचेही पहायला मिळाले. महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना 8 आणि 9 जानेवारी रोजी ही महामुलाखत पाहता येणार आहे.
भ्रष्टाचाराच्या गोष्टी फडणवीसांनी करूच नयेत – राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राजठाकरे यांनी या संयुक्त मुलाखतीमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. भ्रष्टाचाराच्या गोष्टी फडणवीसांनी करूच नयेत असं राज ठाकरे म्हणाले. तर राज्यकर्त्याचं प्रेम हे राज्यावर असलं पाहिजे, सत्तेवर नव्हे असं उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं.
याच मुलाखतीत ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनही राज व उद्धव यांच्याशी संवाद साधत त्यांना काही प्रश्न विचारले. एक मुंबईकर म्हणून आज मी जेव्हा घरातून बाहेर पडतो ना , खरं सांगू तर मला लाज वाटते असं मांजरेकर म्हणाले. बाहेर पडलो तर जिथे जायला मला 10 मिनिटं लागत होत, तिथे आता 1 तास लागतो, असं म्हणत मांजरेकर दुरावस्थेबद्दल थेट बोलले.
या मुलाखतीत राज व उद्धव यांचा आक्रमक अंदाज पहायला मिळाला. मुंबई खराब व्हायला एक काळ लोटला, पुणं ते बघणार नाही. पुणं लवकरात लवकर बरबाद होईल असं राज ठाकरे म्हणाले. काही गोष्टींकडे राज्यकीय पक्ष म्हणून न बघता राज्य म्हणून पाहणं गरजेचं आहे, असं मला वाटंत, असंही राज ठाकरे यांनी नमूद केलं.
राज्यकर्त्याचे प्रेम हे राज्यावर असले पाहिजे सत्तेवर असता कामा नये! ऐतिहासिक महामुलाखत… संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांनी घेतलेली दणदणीत आणि खणखणीत मुलाखत उद्यापासून… भाग १ गुरुवारी ८ जानेवारी रोजी फक्त सामनावर @rautsanjay61 @OfficeofUT @RajThackeray pic.twitter.com/rHCvVwlvyT
— Saamana Online (@SaamanaOnline) January 7, 2026
बातमी अपडेट होत आहे.
