AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी दोन आमदारांचा बाप, हरलात तर भर चौकात… भाजपच्या बड्या नेत्याचे थेट चॅलेंज

जालन्यात रावसाहेब दानवे यांची विरोधकांवर जोरदार टीका केली. मी दोन आमदारांचा बाप आहे' म्हणत त्यांनी खासदार कल्याण काळे यांना लक्ष्य केले आणि विकासकामांच्या मुद्द्यावर विरोधकांना जाहीर उठबश्या काढण्याचे आव्हान दिले.

मी दोन आमदारांचा बाप, हरलात तर भर चौकात... भाजपच्या बड्या नेत्याचे थेट चॅलेंज
raosaheb danve
| Updated on: Jan 08, 2026 | 8:12 AM
Share

निवडणुकीत माझा पराभव झाला असला तरी मी खचलेलो नाही. मी आमदार नाही, पण एका नाही तर दोन-दोन आमदारांचा बाप आहे. सरकार माझं आहे आणि जालन्याच्या विकासासाठी जितका निधी लागेल, तितका खेचून आणण्याची धमक माझ्यात आहे, अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले. जालना महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य भरण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर बैठकीत रावसाहेब दानवे बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या खास शैलीत फटकेबाजी करत राजकीय विरोधकांचा समाचार घेतला.

एका सामान्य घरातील कार्यकर्ता

यावेळी रावसाहेब दानवे यांनी लोकसभा निवडणुकीतील निकालावर भाष्य केले. मी पडल्यानंतर माझं तोंड वाकडं झालं नाही किंवा मी कोणावर आरोप करत बसलो नाही. निकालाच्या दुसऱ्याच दिवशी मी जनतेत गेलो आणि संपूर्ण मराठवाड्याचा दौरा केला. मी जरी आमदार नसलो तरी एका सामान्य घरातील कार्यकर्ता आहे, असे रावसाहेब दानवे म्हणाले.

यावेळी खासदार कल्याण काळे यांचा उल्लेख करत त्यांनी उपरोधिक टोला लगावला, “मला पाडलं तर पाडलं, कल्याण निवडून आला. आता करून घ्या कल्याण, तुमचं सध्या बरं चाललंय ना? गेल्या दोन वर्षात जालन्यासाठी दोन लाख रुपये तरी आणले का? असा सवाल रावसाहेब दानवे यांनी विचारला. या विधानावर उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. यावेळी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनीही त्यांनी काहीच आणले नाही म्हणूनच मी तुमच्याकडे आलो, असे म्हटले. ज्यामुळे बैठकीत एकच हशा पिकला.

भर चौकात कान धरून ५ उठबश्या मारायच्या

रावसाहेब दानवे यांनी केवळ टीकाच केली नाही, तर विरोधकांना थेट मैदानात येण्याचे आवाहन दिले. ते म्हणाले, आम्ही स्वबळावर महानगरपालिका लढण्याची हिंमत केली आहे. कार्यकर्त्यांनी आता गप्प बसू नये. आपल्या वॉर्डातील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना एकत्र बोलवा आणि समोरासमोर विकासाचा हिशोब मागा. तुम्ही काय केलं आणि आम्ही काय केलं, हे जनतेसमोर येऊ द्या. जो या स्पर्धेत हरेल, त्याने भर चौकात कान धरून ५ उठबश्या मारायच्या, असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले.

“आम्ही ओरडून सांगतोय, आता तुम्हीही तोंड उघडा. शेजाऱ्या-पाजाऱ्यांशी संवाद साधा, त्यांना चहा प्यायला बोलवा आणि जालना महानगरपालिका भाजपच्या ताब्यात का असायला हवी, हे पटवून द्या. जालन्याचा कायापालट करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही,” असे आश्वासन रावसाहेब दानवे यांनी दिले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...