Nagpur | नंदी पाणी, दूध पिण्याचा चमत्कार करून दाखवणाऱ्याला बक्षीस

Nagpur | नंदी पाणी, दूध पिण्याचा चमत्कार करून दाखवणाऱ्याला बक्षीस

| Edited By: | Updated on: Mar 07, 2022 | 5:12 PM

नंदी (Nandi) दूध (Milk) आणि पित असल्याची अफवा (Rumors) वाऱ्यासारखी पसरली आणि भाविक नंदीला पाणी, दूध पाजायला लागले. पण हा चमत्कार नसून, नंदी दूध आणि पाणी पित असल्याचा चमत्कार सिद्ध करणाऱ्याला २५ लाखांचं बक्षीस देऊ, अशी घोषणा अंनिसनं केलीय.

नंदी (Nandi) दूध (Milk) आणि पित असल्याची अफवा (Rumors) वाऱ्यासारखी पसरली आणि भाविक नंदीला पाणी, दूध पाजायला लागले. नागपूरसह विदर्भाच्या अनेक भागात ही अफवा पसरली. पण हा कुठला चमत्कार नसून, नंदी दूध आणि पाणी पित असल्याचा चमत्कार सिद्ध करणाऱ्याला २५ लाखांचं बक्षीस देऊ, अशी घोषणा अखिल भारतीय अंद्धश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय महासचिव हरीश देशमुख यांनी केलीय. मागच्या दोन दिवसांपासून नंदी दूध पित असल्याची अफवा विदर्भात आणि राज्याच्या अनेक भागांत पसरली आहे. त्यामुळे विविध मंदिरांमध्ये भाविक नंदीला दूध पाजण्यासाठी गर्दी करत आहेत. दरम्यान, कालही अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं अशाप्रकारे अफवा पसरवल्या जाऊ नयेत, असं आवाहन केलं होतं. तर अशाप्रकारच्या अंधश्रद्धांना आळा घालण्याच्या दृष्टीनं अंनिसनं आता 25 लाखांची घोषणा केलीय.