AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार यांच्या आमदाराने घेतली अजित पवारांची भेट, रोखठोकपणे भेटीचे दिले कारण

Ajit pawar and Sharad Pawar: वडगाव शेरीचे आमदार बापू पठारे यांनी अजित पवार यांची भेट घेतली. आमदार पठारे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट होताच राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे आमदार पठारे यांनी तातडीने स्पष्टीकरण दिले.

शरद पवार यांच्या आमदाराने घेतली अजित पवारांची भेट, रोखठोकपणे भेटीचे दिले कारण
| Updated on: Dec 23, 2024 | 2:16 PM
Share

Ajit pawar and Sharad Pawar: राज्यात महायुतीचे सरकार दणदणीत बहुमताने सत्तेवर आले. सरकारकडे २३० आमदार असल्यामुळे विरोधी आमदारांची संख्या नगण्य राहिली आहे. त्यामुळे काही विरोधी आमदार सत्ताधाऱ्यांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे एकमेव आमदाराने अजित पवार यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चांना मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली आहे.

भेट घेतल्याने चर्चांना उधाण

वडगाव शेरीचे आमदार बापू पठारे यांनी अजित पवार यांची भेट घेतली. आमदार पठारे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट होताच राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे आमदार पठारे यांनी तातडीने स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, अजित दादा यांच्या या भेटी दरम्यान मतदारसंघातील विविध कामांसंदर्भात चर्चा केली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा नाही, असा दावा त्यांनी केला.

शरद पवार पक्षाचे एकमेव आमदार

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर बापू पठारे हे शरद पवार यांच्या गटात राहिले. विधानसभा निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तिकीट देण्यात आले. त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे यांचा पराभव केला. पुणे जिल्ह्यातून शरद पवार यांच्या पक्षाला मिळालेले हे एकमेव यश होते. विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाला केवळ दहा जागांवर विजय मिळाला. दुसरीकडे अजित पवार यांनी दमदार कामगिरी केली. त्यांच्या पक्षाला ४१ जागांवर यश मिळाले.

पुण्यात अजितदादांची दादागिरी

बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाला अपयश आले होते. परंतु विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनीच बाजी मारली. पुण्यातील दहापैकी पाच ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी विरुद्ध ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांची राष्ट्रवादी, अशी थेट लढत झाली होती. त्यामध्ये पाचही जागा अजित पवार यांनी जिंकल्या. त्यामुळे अजित पवार यांनी आपणच पुणे जिल्ह्याचे दादा आहोत, हे दाखवून दिले होते.

शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.