AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : बीड – किरकोळ कारणावरून वाल्मीक कराडच्या समर्थकाचा गोळीबार

| Edited By: | Updated on: Aug 12, 2026 | 7:56 PM
Share

Maharashtra News LIVE : शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी आहे. या सुनावणीकडे देशाच्या नजरा आहेत.

Maharashtra News LIVE : बीड – किरकोळ कारणावरून वाल्मीक कराडच्या समर्थकाचा गोळीबार
live breaking

LIVE NEWS & UPDATES

  • 12 Aug 2026 06:34 PM (IST)

    बीड – किरकोळ कारणावरून वाल्मीक कराडच्या समर्थकाचा गोळीबार

    किरकोळ कारणावरून वाल्मीक कराडचा समर्थक सफवान खानने गोळीबार केला आहे. पैशाच्या जीवावर तो दहशत माजवतोय, आमच्या दिशेने चार राऊंड त्याने फायर केले असा आरोप पीडित तरूणाने केला आहे. यापूर्वी देखील त्याने मशिदीत घुसून राडा केला होता, त्याला अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी पीडित तरुणांनी केली आहे.

  • 12 Aug 2026 06:15 PM (IST)

    रत्नागिरी : खेडमध्ये भरपावसात तिरंगा रॅलीचा जोश; देशभक्तीपर घोषणा

    स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर खेड पंचायत समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली भव्य तिरंगा रॅली भरपावसातही मोठ्या उत्साहात संपन्न झाली. हातात तिरंगा ध्वज घेतलेल्या नागरिकांनी दिलेल्या देशभक्तीपर घोषणांनी खेड शहर दुमदुमून गेले. विशेष म्हणजे या रॅलीमध्ये मुस्लिम समाजाची लक्षणीय उपस्थिती राहिली, तर विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

  • 12 Aug 2026 05:55 PM (IST)

    चर्चेसाठी वेळ निश्चित करा… अमित शाह यांनी अध्यक्षांना पत्र लिहिलं

    अमित शाह यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं की,  “मी निर्धारित वेळेत सभागृहात उपस्थित राहून या विषयावरील चर्चेत सहभागी होण्यास आणि विरोधी पक्षांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार आहे. लोकशाहीत, चर्चा आणि संवादातूनच तोडगा निघतो. माझा लोकशाही आणि लोकशाही संस्थांवर अढळ विश्वास आहे आणि माझा विश्वास आहे की हे सभागृह चर्चा आणि संवादासाठीच आहे.”

  • 12 Aug 2026 05:46 PM (IST)

    शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत संजय राऊत म्हणाले की…

    उबाठा शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, ‘निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत दिलेल्या निर्णयाविरोधात आम्ही याचिका दाखल केली होती, ज्यात म्हटले होते की आमचा पक्ष आणि निवडणूक चिन्ह बेकायदेशीरपणे कोणत्यातरी ‘अज्ञात व्यक्तीला’ देण्यात आले आहे.’

  • 12 Aug 2026 05:35 PM (IST)

    CBSE ने इयत्ता 12वीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर

    केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सीबीएसई इयत्ता 12वीच्या पुरवणी परीक्षा 2026 चा निकाल जाहीर केला आहे. मंडळाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, यावर्षी इयत्ता 12वीच्या पुरवणी परीक्षा 2026 साठी एकूण 2,91,576 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 2,75, 287 उमेदवार परीक्षेला उपस्थित होते.पुरवणी परीक्षा दिलेले विद्यार्थी आता डिजीलॉकर रिझल्ट्स पोर्टलवर जाऊन निकाल तपासू शकतात.

  • 12 Aug 2026 05:25 PM (IST)

    सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्याकडून मोठी घोषणा

    सीजेपी संस्थापक अभिजीत दीपके यांनी एक मोठी घोषणा केली आहे. ‘जंतर मंतर’चा दुसरा सीझन कधी सुरू होणार? यावर इन्स्टाग्रामवर अनेक लोक कमेंट करत होते. “मला त्यांना सांगायचे आहे की, ‘जंतर मंतर’चा दुसरा सीझन लवकरच सुरू होणार आहे.”  गावातील सरकारी शाळांची स्थिती सुधारण्यासाठी देशव्यापी मोहीम सुरू केली जाईल.

  • 12 Aug 2026 05:17 PM (IST)

    मथुरा ईदगाह वाद प्रकरणावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलली

    सर्वोच्च न्यायालयाने मथुरा येथील श्री कृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह वाद प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली आहे. पुढील सुनावणी 2 सप्टेंबर रोजी होणार आहे. दोन्ही पक्षांनी आज सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती केली होती.

  • 12 Aug 2026 05:14 PM (IST)

    एफसीआरए विधेयक मागे घ्यावे: प्रियंका गांधी

    संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या तीव्र गदारोळानंतर सरकारने हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे सविस्तर चर्चेसाठी पाठवले आहे. एफसीआरए विधेयक जेपीसीकडे पाठवण्यावर काँग्रेस खासदार प्रियांका गांधी म्हणाल्या, “आमची भूमिका आहे की हे विधेयक मागे घेण्यात यावे.”

  • 12 Aug 2026 04:13 PM (IST)

    निवडणूक आयोगाचा निर्णय बेकायदशीर- संजय राऊत

    संजय राऊत यांनी नुकताच कोर्टाच्या सुनावणीवर म्हटले की, निवडणूक आयोगाचा निर्णय बेकायदेशीर होता.

  • 12 Aug 2026 04:02 PM (IST)

    आजची सुनावणी संपली..

    शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी कोर्टात संपली आहे.

  • 12 Aug 2026 04:00 PM (IST)

    कपिल सिब्बल यांचा मोठा दावा

    आपले पारडे जड असल्याचा दावा कपिल सिब्बल यांनी केला. यासोबतच निवडणूक आयोगाकडून मिळालेली पोहच पावती आपल्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले.

  • 12 Aug 2026 03:58 PM (IST)

    विधीमंडळात पक्ष कसा विकला जाऊ शकतो- कपिल सिब्बल

    पक्षप्रमुख म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडे अधिकार आहेत, विधीमंडळात पक्ष कसा विकला जाऊ शकतो, कपिल सिब्बल यांचे विधान.

  • 12 Aug 2026 03:53 PM (IST)

    विधीमंडळात फूट पडली आयोगाने मान्यता दिली…

    विधीमंडळात फूट पडली आयोगाने मान्यता दिली… नंतर शिंदेंनी सत्ता बनवली, अशी सत्ता कुठेही बनली नाही, ही लोकशाहीची थट्टा, असे कपिल सिब्बल यांनी म्हटले.

  • 12 Aug 2026 03:52 PM (IST)

    शिवसेना संघटना कायमच ठाकरेंकडे होती- कपिल सिब्बल

    शिवसेना संघटना कायमच ठाकरेंकडे होती, असा दावा कपिल सिब्बल यांनी कोर्टात केला. पक्षफुट आणि विधीमंडळ फूट वेगळी असल्याचा दावा कपिल सिब्बल यांनी केला.

  • 12 Aug 2026 03:48 PM (IST)

    एकनाथ शिंदेंवर कपिल सिब्बल यांचा आरोप

    शिवसेना पक्षात संघटना अत्यंत महत्वाची असल्याचे कपिल सिब्बल यांनी म्हटले. पूर्वी शिंदेंना संघटना योग्य वाटायची पण त्यानंतर दोषपूर्ण वाटली कपिल सिब्बल.

  • 12 Aug 2026 03:46 PM (IST)

    कोर्टाला कपिल सिब्बल यांची मोठी विनंती

    तुम्ही आमची कागदपत्रे पाहा, कोर्टाला कपिल सिब्बल यांची मोठी विनंती. शिवसेना पक्षप्रमुख्यांना सर्व अधिकार असल्याचे स्पष्ट सिब्बल यांनी केले.

  • 12 Aug 2026 03:45 PM (IST)

    शिंदेंची कृती आयोगाच्या तत्वांना धरून नव्हती- कपिल कपिल

    18 जुलैला झालेल्या बैठकीची माहिती आयोगाला दिली. शिंदेंची कृती आयोगाच्या तत्वांना धरून नव्हती, कपिल कपिल यांचा दावा.

  • 12 Aug 2026 03:43 PM (IST)

    शिंदेंनी निवड कायद्याला धरून नाही- कपिल सिब्बल

    नुकताच कपिल सिब्बल यांनी कोर्टात मोठा दावा केला. कपिल सिब्बल यांनी म्हटले की, एकनाथ शिंदे यांची निवड कायद्याला धरून नाही. तुम्ही आमची कागदपत्रे पाहा. सर्व समजेल.

  • 12 Aug 2026 03:38 PM (IST)

    कुठल्याही संघटनेच्या माहितीची शहनिशा न करता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आले

    कुठल्याही संघटनेच्या माहितीची शहनिशा न करता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आल्याचा दावा कपिल सिब्बल यांनी केला.

  • 12 Aug 2026 03:36 PM (IST)

    मुख्यमंत्री शिदेंची निवड बेकायदेशीर होती- सिब्बल

    कोर्टात युक्तीवाद करताना कपिल सिब्बल यांनी म्हटले की, एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदाची निवड बेकायदेशीर होती.

  • 12 Aug 2026 03:34 PM (IST)

    एकनाथ शिंदेंना आमदारांच्या बळावर मुख्यमंत्रीपद दिले

    एकनाथ शिंदेंना फक्त आमदारांच्या संख्याबळावर मुख्यमंत्रीपद दिल्याचा मोठा दावा कोर्टात कपिल सिब्बल यांनी केला.

  • 12 Aug 2026 03:33 PM (IST)

    विधीमंडळात पडलेली फूट आपोआप वाढत गेली

    विधीमंडळात पडलेली फूट आपोआप वाढत गेली. कपिल सिब्बल यांचा कोर्टात जोरदार युक्तीवाद. पक्षात फूट पडली अगोदर स्पष्ट नव्हते. सध्या न्यायाधिशांची आपआपसात चर्चा सुरू आहे.

  • 12 Aug 2026 03:30 PM (IST)

    तुम्ही सीएम झाल्यास आपोआप सर्वजण तुमच्याकडे येतील- कपिल सिब्बल

    कोर्टात वकील कपिल सिब्बल यांनी मोठे विधान केले. कपिल सिब्बल यांनी म्हटले की, तुम्ही सीएम झाल्यास आपोआप तुमच्याकडे येतील.

  • 12 Aug 2026 03:29 PM (IST)

    निवडणूक आयोगावर कपिल सिब्बल यांचे आरोप

    शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणात सुनावणी सुरू आहे. यावेळी वकील कपिल सिब्बल यांनी गंभीर आरोप निवडणूक आयोगावर केले. निवडणूक आयोगच अडकताना दिसतंय.

  • 12 Aug 2026 03:26 PM (IST)

    कठीण परिस्थितीमध्ये कोणताही निर्णय लोकशाही पद्धतीने घेतला जावा- कोर्ट

    कठीण परिस्थितीमध्ये कोणताही निर्णय लोकशाही पद्धतीने घेतला जावा, असे कोर्टाने नमूद केले. फेब्रुवारीत नेते का बदलले असा सवाल कोर्टाने केला.

  • 12 Aug 2026 03:25 PM (IST)

    कपिल सिब्बल यांना कोर्टाचा अत्यंत मोठा सवाल

    प्रतिज्ञापत्रात संख्या कमी अधिक असेल तर कसे ठवायचे हा मोठा सवाल कोर्टाने कपिल सिब्बल यांना केला .

  • 12 Aug 2026 03:24 PM (IST)

    2013 पासून उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आहेत- कपिल सिब्बल

    बाळासाहेब ह्यात नाहीत, 2013 पासून उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आहेत, कपिल सिब्बल यांची कोर्टात माहिती.

  • 12 Aug 2026 03:20 PM (IST)

    फूट म्हणजे नक्की काय? कोर्टाकडून मोठा सवाल..

    फूट म्हणजे नक्की काय असा मोठा सवाल नुकताच कोर्टाने शिवसेना ठाकरे गटाला विचारला आहे.

  • 12 Aug 2026 03:19 PM (IST)

    समाजवादी प्रकरण आणि शिवसेनेचा संबंध नाही- कपिल सिब्बल

    नुकताच समाजवादी पक्षाच्या मुद्द्यावर कपिल सिब्बल यांनी म्हटले की, समाजवादी प्रकरण आणि शिवसेनेचा संबंध नाही.

  • 12 Aug 2026 03:18 PM (IST)

    सुप्रीम कोर्टाची अत्यंत मोठी टिप्पणी

    कोर्टाने सुनावणीदरम्यान मोठी टिप्पणी केली, तुम्ही जे संघटनात्मक दावे करत आहात, ते बरोबर वाटत असल्याचे कोर्टाने कपिल सिब्बल यांना म्हटले.

  • 12 Aug 2026 03:14 PM (IST)

    तुम्ही ज्या संघटनात्मक गोष्टी सांगत आहात त्या बरोबर वाटत आहेत

    तुम्ही ज्या संघटनात्मक गोष्टी सांगत आहोत, त्या बरोबर वाटत असल्याचे कोर्टाने कपिल सिब्बल यांना म्हटले.

  • 12 Aug 2026 03:10 PM (IST)

    निवडणूक आयोगाने जे केले ते त्यांच्या कक्षाबाहेरचे- कपिल सिब्बल

    निवडणूक आयोगाने जे केले ते त्यांच्या कक्षाबाहेरचे आहे. कपिल सिब्बल यांचे गंभीर आरोप. यादरम्यान कोर्टाने मोठा प्रश्न सिब्बल यांना केला.

  • 12 Aug 2026 03:08 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांची नियुक्ती लोकशाही पद्धतीने झाली- कपिल सिब्बल

    पक्षप्रमुखांची निवड योग्य पद्धतीने केली. उद्धव ठाकरे यांची नियुक्ती लोकशाही पद्धतीने झाल्याचा मोठा दावा कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आला.

  • 12 Aug 2026 03:06 PM (IST)

    आयोगाला सोयीनुसार निर्णय घ्यायचा होता- कपिल सिब्बल

    आयोगाला सोयीनुसार निर्णय घ्यायचा होता, त्यामुळे त्यांनी चुका काढल्याचा मोठा दावा कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आला.

  • 12 Aug 2026 03:04 PM (IST)

    पक्षात फूट पडलेलीच नाही कपिल सिब्बल यांचा दावा

    पक्षात फूट पडलेलीच नाही, कपिल सिब्बल यांनी कोर्टात सर्वात मोठा दावा केला. त्यांच्या या दाव्यावर कोर्टाकडून काही प्रश्न उपस्थित करण्यात आली.

  • 12 Aug 2026 03:03 PM (IST)

    आयोगाने विधीमंडळातील फूट समजून निर्णय घेतल्याचा दावा कपिल सिब्बल यांचा

    आयोगाने विधीमंडळातील फूट समजून निर्णय घेतल्याचा दावा कपिल सिब्बल यांनी केला. राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये 13  नेत्यांची निवड करण्यात आली- कपिल सिब्बल..

  • 12 Aug 2026 02:59 PM (IST)

    सूरत, गुवाहाटीला गेले आणि मुख्यमंत्री झाले..

    सूरत गुवाहाटीला गेले आणि त्यानंतर मुख्यमंत्री झाल्याचे कपिल सिब्बल यांची कोर्टात म्हटले.

  • 12 Aug 2026 02:56 PM (IST)

    कोर्टाकडून ठाकरे गटाला मोठा सवाल..

    आयोगाला जे पाहिजे, ते सर्व आम्ही दिले. या संदर्भातील कागदपत्रे आयोगाकडे सादर करण्यात आलीत. फेब्रुवारीत नेते काय बदलले असा मोठा सवाल कोर्टाने कपिल सिब्बल यांना विचारला..

  • 12 Aug 2026 02:53 PM (IST)

    कपिल सिब्बल यांचा कोर्टात मोठा दावा..

    आयोगाने घटनांच्या बदलाबद्दल विचारले नसल्याचा दावा कोर्टात शिवसेना ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांनी केला.

  • 12 Aug 2026 02:51 PM (IST)

    काही नेते निवडले गेले तर काही नियुक्त करण्यात आले- कपिल सिब्बल

    काही नेते निवडले गेले तर काही नियुक्त करण्यात आले. कपिल सिब्बल यांचा दावा. नेते आणि उपनेते कसे निवडले याची माहिती कोर्टात दिली, असल्याचे कपिल सिब्बल यांनी म्हटले.

  • 12 Aug 2026 02:48 PM (IST)

    2018 मध्ये झालेले बदल आम्ही आयोगाला कळवले- कपिल सिब्बल

    नेते आणि उपनेते निवडले याची सर्व माहिती आम्ही दिल्याचा दावा कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आला.  2018 मध्ये झालेले बदल आम्ही आयोगाला कळवले.

  • 12 Aug 2026 02:47 PM (IST)

    कपिल सिब्बल यांचा मोठा दावा. 

    आम्ही संपूर्ण माहिती निवडणूक आयोगाला दिली. कपिल सिब्बल यांचा मोठा दावा. कोर्टात जोरदार युक्तीवाद सुरू

  • 12 Aug 2026 02:43 PM (IST)

    पक्षाला कार्यालयाचा पत्ता सांगावा लागलो- कपिल सिब्बल

    पक्षाला कार्यालयाचा पत्ता सांगावा लागलो, तो कोर्टात सांगितला. कपिल सिब्बल यांचा मोठा दावा.

  • 12 Aug 2026 02:40 PM (IST)

    कोर्टात काही कागदपत्रे दाखवायची आहेत- कपिल सिब्बल

    शिवसेना पक्ष आणि चिन्हावर कोर्टात सुनावणी सुरू झाली. यावेळी कपिल सिब्बल यांनी म्हटले की, कोर्टात काही कागदपत्रे दाखवायची आहेत.

  • 12 Aug 2026 02:35 PM (IST)

    गडचिरोली जपतलाई आश्रम शाळेत फॉरेन्सिक टीमकडून तपासणी, सीसीटीव्ही तपासून हार्ड डिस्क ताब्यात

    गडचिरोली जपतलाई आश्रम शाळेत फॉरेन्सिक टीमकडून दुसऱ्यांदा तपासणी करण्यात येत आहे.   पहिल्या तपासणी फॉरेन्सिक टीमला काही हाती न लागल्यामुळे दुसऱ्यांदा ही फॉरेन्सिक टीम आता दाखल झाली आहे. शाळेतील सीसीटीव्ही तपासून हार्ड डिस्क पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

    या शाळेतील पाण्याचे नमुनेही फॉरेन्सिक टीमने घेतले असून चौकशीला मोठा वेग आला आहे.

  • 12 Aug 2026 02:29 PM (IST)

    पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा मृत्यू ? वरिष्ठ पत्रकाराच्या दाव्याने खळबळ

    पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा मृत्यू, असा मोठा दावा पाकिस्तानचे वरीष्ठ पत्रकार वजाह एस. खान यांनी केला आहे.  इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू झाला, म्हणून  गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांना भेटू दिलं जात नाहीये, असा दावा त्यांनी केला आहे.

  • 12 Aug 2026 02:22 PM (IST)

    आयआयटी बॉम्बे परीक्षा गैरप्रकार प्रकरणी चौघांना अटक

    आयआयटी बॉम्बे परीक्षा गैरप्रकार प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून मोबाईल आणि इतर उपकरणंही जप्त करण्यात आली आहेत. आयआयटी बॉम्बे कॅम्पसमधील केंद्रीय संस्कृत विद्यापीठाकडून शिपाई भरती परीक्षा घेण्यात आली होती.

  • 12 Aug 2026 02:08 PM (IST)

    लोकसभेचं कामकाज सुरू होताच विरोधकांचा गदारोळ

    लोकसभेचं कामकाज सुरू होताच विरोधकांचा गदारोळ सुरू झाला. विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.  सरकार चर्चेसाठी तयार आहे, पण विरोधक चर्चेपासून पळ काढतायत, असा आरोप जे. पी . नड्डा यांनी केला.

  • 12 Aug 2026 02:04 PM (IST)

    बीडमध्ये भाजपाची तिरंगा रॅली संपन्न, हजारो शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग

    स्वातंत्र्यदिनानिमित्त हरघर तिरंगा हे अभियान राबवले जात असून या पार्श्वभूमीवर बीडमध्ये भाजपाच्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात आली. शहरातील सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स परिसरातून सुरू झालेल्या या रॅलीचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात करण्यात आला. रॅलीमध्ये विविध शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी तसेच जेन झी युवक देखील सहभागी झाले होते. तसेच या रॅलीसाठी लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते.

  • 12 Aug 2026 01:55 PM (IST)

    मनोज जरांगे पाटील यांची दौऱ्यावर प्रतिक्रिया

    जरांगे पाटील म्हणाले की,”गेल्या चार ते पाच दिवसात भयंकर मराठ्यांची लाट उसळल्याच पाहायला मिळालं, शेवटी मराठ्यांना कळालं की हे लोक आता आपल्यावर अन्याय करायला लागले आहेत.यालाच खरी जागृती आणि सावध राहणे असे म्हणतात. पश्चिम महाराष्ट्रामुळे अख्खा महाराष्ट्र ढवळून निघालेला आहे. मराठी प्रचंड तुटून पडलेले आहेत, कारण इतका अन्याय मराठ्यांवर नाही करायचा, इतक्या देशाच्या भावनेने मराठा समाजाकडे बघू नका. तुम्हाला हे राज्य दूषित करायचं आहे मात्र ते आम्हाला होऊ द्यायचं नाही,देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे, संजय शिरसाट, हे दोन महान नेते झाले आहेत.”

  • 12 Aug 2026 01:47 PM (IST)

    मनोज जरांगे पाटील यांचा बावनकुळे यांना खोचक टोला

    मनोज जरांगे पाटील यांचा बावनकुळे यांना खोचक टोला “बावनकुळे यांनी सर्वांच्या चौकशी केल्या तर सर्वांना नील सर्टिफिकेट मिळेल,बावनकुळे हेच ओरिजनल न्यायाधीश होऊ शकतात दुसरं कोणीही नाही. बावनकुळे यांना जर वकिलाचा झबला घातला तर लयच बेक्कार दिसतील,डोक्यावर टोपी तुरा आणि कंबरेला तंबाखूचा बटवा हा गडी चांगला दिसेल. मी लोकांच्या गाडीत बसतो तर हे माझ्याकडे बघतात मग यांच्याकडून गाड्या कुठून आल्या? निवडणुकीमध्ये उभा राहण्याच्यापूर्वी यांचं राजकारणात काय होतं हे शोधा.”

  • 12 Aug 2026 01:42 PM (IST)

    मनोज जरांगे पाटील यांची डिफेंडर वरून ट्रोल झाल्यावर प्रतिक्रिया

    मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “यामधून एक संदेश घेण्यासारखा आहे तो म्हणजे आमचा समाज सुखी होऊच नये इतक्या जळणाऱ्या अवलादी आहेत, हे मराठ्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे, शेवटचं आंदोलन अंतरवालीतच होणार, पण काहीही सांगता येत नाही दाट शक्यता आहे मुंबईत घुसण्याची, कारण मराठे काही दम खाण्याच्या मार्गावर दिसत नाही,”

  • 12 Aug 2026 01:38 PM (IST)

    लवकरच तुम्हाला मोठ्या घडामोडी दिसतील- संजय शिरसाट

    संजय शिरसाट संजय राऊत यांच्याबद्दल म्हणाले की,”मागच्या गोष्टी काढून उपयोग नाही. काढायला बसलो तर उबाठाची सत्ता घालवण्यासाठी त्यांच्याच पक्षातील लोक होते हे समोर येईल. लवकरच तुम्हाला मोठ्या घडामोडी दिसतील.”

  • 12 Aug 2026 01:33 PM (IST)

    संजय शिरसाट यांची संभाजीनगर फसवणूक प्रकरणावर प्रतिक्रिया

    संजय शिरसाट यांनी संभाजीनगर फसवणूक प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “मजेशीर बातमी आलीय ही. एक महिला जी ७० वर्षांची आहे. संजय शिरसाट थायलंडला घेवून जाणारेत म्हणून पैसे घेत होती . तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. माझ्या नावावर पैसे मागत असतील पोलिसांत गुन्हा दाखल करा. अशा अफवांवर पसरवू नका”

  • 12 Aug 2026 01:27 PM (IST)

    बीडमध्ये भाजपाची तिरंगा रॅली संपन्न, हजारो शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग

    स्वातंत्र्यदिनानिमित्त हरघर तिरंगा हे अभियान राबवले जात असून या पार्श्वभूमीवर बीडमध्ये भाजपाच्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात आली. शहरातील सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स परिसरातून सुरू झालेल्या या रॅलीचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात करण्यात आला. रॅलीमध्ये विविध शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी तसेच जेन झी युवक देखील सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. भाजप नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वात ही रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये लोकप्रतिनिधी व पदाधिकारी सहभागी झाले होते.

  • 12 Aug 2026 01:22 PM (IST)

    माजी भाजप खासदार संजीव नाईक यांचं क्लस्टरवरून मोठं विधान

    माजी भाजप खासदार संजीव नाईक यांचं क्लस्टरवरून मोठं विधान, “आमचा विरोध नाही पण जे चुकीचं चाललं ते आम्ही खपवून घेणार नाही. एकत्र बसून चर्चा करू. उपमुख्यमंत्री एकनाथशिंदे यांना देखील माहिती देऊ. मात्र जे कोण दलाल आहेत त्त्यांच्या नोटांचा नंबर पण आम्ही योग्यवेळी सांगू. आम्हाला नवी मुबंईचा विकास करायचा आहें फक्त.”

  • 12 Aug 2026 01:16 PM (IST)

    आम्ही येणार म्हणूनच सफाई झालीय-संजय शिरसाट

    संजय शिरसाट म्हणाले, आम्ही येणार म्हणूनच सफाई झालीय. विद्यार्थी म्हणाले की कच्ची फळे मिळतात, जेवण मिळत नाही वेळेवर. कंत्राटदारांना सांगितले आहे जमत असेल तर करा…खर्च करूनही चांगले जेवण मिळत नसेल तर कसं चालणार. विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्यावर आम्ही आलोय. सचिवांनाही घेवून आलोय. पैसे देवून बदनाम होतोय. उपकंत्राटदाराला नफा कमी मिळतो म्हणून दर्जा खालावतो. यातून मार्ग काढला जाईल. अनधिकृतरित्या काहीजण राहतात. काहीजण नोकरीही करतात. नेमके विद्यार्थी कोण व घुसलेले कोण याचा शोध घेवून फौजदारी गुन्हे दाखल करण्यास सांगितले आहे”

  • 12 Aug 2026 01:05 PM (IST)

    पुणे-मुंबई कनेक्टिंग लिंकवरील वाहतूक आज तीन तास बंद

    पुणे-मुंबई कनेक्टिंग लिंकवरील वाहतूक आज तीन तास बंद राहणार असून, वाहनचालकांसाठी लोणावळा घाटातून पर्यायी मार्ग उपलब्ध करण्यात आला आहे. पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक दुपारी १२ ते ३ या वेळेत बंद ठेवण्यात आली आहे. औढें परिसरात एक्स्प्रेस वे वर बॅरिकेड्स लावण्यात आले असून, आपत्कालीन परिस्थितीतील यंत्रणांची तयारी तपासण्यासाठी येथे मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी कनेक्टिंग लिंकचा वापर न करता लोणावळा घाटमार्गे मुंबईच्या दिशेने प्रवास करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

  • 12 Aug 2026 12:55 PM (IST)

    घाटकोपर दरड दुर्घटनेप्रकरणी उपसभापती सचिन अहिर यांची प्रतिक्रिया

    “ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. स्थानिक नगरसेवक, अग्निशमन दल, महापालिकेचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. यात सहा जणांचा मृत्यू झाला असून मी पाहणीला गेलो तेव्हा तिथे आणखी एक माणूस सापडला. आणखी दोन जण गाडली गेली आहेत. कायमस्वरूपी पुनर्वसन व्हायला हवं यासाठी मी उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे.  मुख्यमंत्री निधीतूनही काही मदत मिळते का याबाबत पाठपुरवा करणार आहे,” अशी माहिती उपसभापती सचिन अहिर यांनी घाटकोपर दरड दुर्घटनेप्रकरणी दिली आहे.

  • 12 Aug 2026 12:45 PM (IST)

    भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री होण्याची दाट शक्यता

    भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री होण्याची दाट शक्यता आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या आजच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

  • 12 Aug 2026 12:40 PM (IST)

    मी सभागृहात बसून प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणार- अमित शाह

    विरोधकांनी चर्चेसाठी पत्र द्यावं, उत्तर द्यायला आम्ही तयार आहोत. कोण पळून गेले हे लोक ठरवतील. मी सभागृहात बसून प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणार, अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली.

  • 12 Aug 2026 12:30 PM (IST)

    भरत गोगावले यांना रायगडचं पालकमंत्रीपद देण्यासंदर्भात शिवसेना आग्रही

    रायगडच्या पालकमंत्रीपदासंदर्भात एकनाथ शिंदे आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे. ‘वर्षा’वरील बैठकीत एकनाथ शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आठवण करून दिली. अधिकाऱ्यांना सांगूनही अद्याप ऑर्डर का निघाली नाही, असा सवाल शिंदेंनी केला. भरत गोगावले यांना रायगडचं पालकमंत्रीपद देण्यासंदर्भात शिवसेना आग्रही आहे.

  • 12 Aug 2026 12:19 PM (IST)

    गृहमंत्री 20 दिवस कुठे गायब? संसदेत येतात सर सभागृहात का येत नाहीत- राहुल गांधी

    गृहमंत्री वीस दिवस कुठे गायब आहेत? संसदेत येतात तर सभागृहात का येत नाहीत, असा सवाल राहुल गांधींनी केला आहे. अमित शाह यांनी लाठीचार्जचे आदेश दिले असल्यास राजीनामा द्यावा, अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे.

  • 12 Aug 2026 12:16 PM (IST)

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह फक्त लेक्चर देत आहेत- राहुल गांधी

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह फक्त लेक्चर देत आहेत. विद्यार्थ्यांवर हल्ल्याचे आदेश कोणी दिले? पॅलेट गन चालवण्याचे आदेश कोणी दिले? गृह विभागच कारवाईचे आदेश देत असत, अशी प्रतिक्रिया राहुल गांधींनी दिली आहे.

  • 12 Aug 2026 12:10 PM (IST)

    सरकारने शेतकऱ्यांशीही चर्चा केली नाही- राजू शेट्टी

    शक्तीपीठ महामार्गाविरोधात आम्ही रस्त्यावरती लढाई लढणार आहोत. सरकारने शेतकऱ्यांशीही चर्चा केली नाही. सरकार आपली जबाबदारी टाळत आहे, असे आरोप राजू शेट्टी यांनी केले आहेत.

  • 12 Aug 2026 12:06 PM (IST)

    शक्तीपीठ महामार्गाविरोधात मविआची पत्रकार परिषद

    21 तारखेला शक्तीपीठविरोधात सांगलीत मोर्चा निघणार आहे. विश्वजीत कदम, विशाल पाटील या मोर्चात सहभागी होणार आहेत. शक्तीपीठ महामार्गामुळे शेतीचे दोन तुकडे होत आहेत, असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. शक्तीपीठ महामार्गाविरोधात मविआने पत्रकार परिषद घेतली आहे.

  • 12 Aug 2026 12:00 PM (IST)

    सरकारकडे लपवण्यासारखं असं काहीही नाही – अमित शाह

    मी सभागृहात बसून प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणार. अधिवेशन सुरु झाल्यापासून मी दररोज संसदेत येतोय… सरकारकडे लपवण्यासारखं असं काहीही नाही. पळून गेले वगैरे असे शब्द हल्लीच ऐकायला भेटत आहे… असं वक्तव्य अमित शाह यांनी केलं आहे.

  • 12 Aug 2026 11:57 AM (IST)

    गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या सामूहिक सर्पदंश घटने संदर्भात अखेर धानोरा पोलीस ठाण्यात तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल 

    गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या सामूहिक सर्पदंश घटने संदर्भात अखेर धानोरा पोलीस ठाण्यात तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.  मुख्याध्यापक अधीक्षक व अधीक्षिका अशा तिघ्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांचा तपास सुरू आहे. गडचिरोली आश्रम शाळेत निष्काळजीपणा दुर्लक्षपणा केल्याने मुख्याध्यापक प्रशांत विलास ताटपल्लीवार, महिला अधिक्षिका भाग्यश्री ज्ञानेश्वर चिलमवार व अधिक्षक भास्कर रामचंद्र भोयर अशा तिघ्यांवर धानोरा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. या शाळेच्या चौकशी समितीत चार सदस्यांची गडचिरोली समाज कल्याण आदिवासी विभागाचे अधिकाऱ्यांनी चौकशी करून अहवाल सादर केला. सध्या सर्पदंशामुळे आजारी असलेल्या दोन मुली पैकी एकाची परिस्थिती गंभीर असून तीन दिवसापासून बेशुद्ध अवस्थेत ही मुलगी आहे.

  • 12 Aug 2026 11:50 AM (IST)

    महाराष्ट्र सरकारने मोटार कॅब आणि परमिट संदर्भातील नियमांमध्ये केले महत्त्वाचे बदल

    इलेक्ट्रॉनिक मीटर असलेल्या मोटार कॅबच्या अधिकृत चालकाला मराठी भाषेचे कार्यज्ञान असणे बंधनकारक करण्यात आले. चालकाला मराठीचे आवश्यक ज्ञान नसल्याचे आढळल्यास, परवाना देणाऱ्या प्राधिकरणाकडून एक महिन्याची मुदत देऊन मराठी शिकण्याची संधी दिली जाणार आहे. मुदतीत पालन न केल्यास चालकाचे अधिकृत वाहन चालविण्याचे परवाना-प्राधिकरण तीन महिन्यांपर्यंत निलंबित करू शकते. सातत्याने नियमभंग झाल्यास अधिकृतता रद्द करण्याचीही तरतूद आहे. तसेच, परमिटधारकासाठीही मराठी भाषेचे कार्यज्ञान आवश्यक करण्यात आले असून, परमिट नूतनीकरणाच्या वेळी प्राधिकरणाच्या समाधानापर्यंत मराठीचे ज्ञान असणे बंधनकारक राहणार आहे.

  • 12 Aug 2026 11:40 AM (IST)

    जळगावमधील द्रौपदी नगर परिसरातून घरासमोर उभी कार चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर

    जळगावमधील द्रौपदी नगर परिसरातून घरासमोर उभी कार चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. कार चोरून घेऊन जाताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. संजय दिनकर पाटील यांच्या कारची चोरी झाली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्यांचा पोलिस शोध घेत आहेत.

  • 12 Aug 2026 11:30 AM (IST)

    अमरावती सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू…

    अमरावती सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. मागील काही दिवसांपासून  पावसाचा खंड मोठ्या प्रमाणावर होता. पावसामुळे बळीराजाला दिलासा मिळणार. अमरावती जिल्ह्यातील धरण अजूनही मोठ्या मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

  • 12 Aug 2026 11:20 AM (IST)

    हिंगोली- एफडीएच्या कारवाईनंतर महाराज भजियेवाले हॉटेल बंद

    खिचडीमध्ये आळ्या निघाल्याचा व्हिडिओ भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर एफडीएने हॉटेलची तपासणी केली होती. तपासणी केली असता हॉटेलमध्ये अ-स्वच्छता, न्यूज पेपरमध्ये भजे देणे ह्या सह विविध बाबी निदर्शनास आल्यानंतर एफडीएने कारवाई करत हॉटेलचा तात्पुरता परवाना निलंबित केला आहे

  • 12 Aug 2026 11:16 AM (IST)

    गोंदिया जिल्ह्यातील बोंडगावदेवी-खांबी मार्गावरील पूल जीर्ण झाल्याने बसफेरी बंद

    गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खांबी हे परिसरातील प्रमुख व महत्त्वाचे गाव असून बोंडगावदेवी-खांबी मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते…. मात्र या मार्गाच्या मध्यभागी असलेला पूल जीर्ण झाल्याने साकोली आगाराने या मार्गे सुरु असलेली बससेवा गेल्या महिनाभरापासून बंद केली आहे. परिणामी खांबीसह परिसरातील गावातील शाळकरी विद्यार्थी, वृद्ध, महिला तसेच सर्वसामान्य प्रवाशांना मानसिक त्रास आणि आर्थिक भूर्दड सहन करावा लागत आहे…. बोंडगावदेवी-खांबी मार्गावरील या पुलाच्या समस्येकडे लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने पुलाच्या नुतनीकरणासाठी निधी व प्रशासकीय मंजुरी द्यावी…. पुलाचे मजबूत बांधकाम करून पावसाळ्यातील वाहतुकीची समस्या कायमस्वरूपी दूर करावी. तसेच या मार्गावरील बससेवा पूर्ववत करण्याची मागणी गावकऱ्यांनी तसेच शालेय विद्यार्थ्यांनी केली आहे…

  • 12 Aug 2026 10:50 AM (IST)

    ठाकरेंना CM होऊ देऊ नका, म्हणून राऊतांनी बैठक घेतली- नरेश म्हस्के

    राऊतांनी उद्धव ठाकरेंना विरोध करायला लावला होता. ठाकरेंना CM होऊ देऊ नका,म्हणून राऊतांनी बैठक घेतली होती. शिंदेंसोबत जाणारा पहिला जिल्हाध्यक्ष नरेश म्हस्के आहे. राऊतांचा माझ्यावरचा राग मी समजू शकतो. संजय राऊत हे फेकूचंद आहेत. आमची बंद मूठ ही बंद राहूद्यात असे नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे.

  • 12 Aug 2026 10:40 AM (IST)

    महाराष्ट्र सरकारने मोटार कॅब आणि परमिट संदर्भातील नियम बदलले

    महाराष्ट्र सरकारने मोटार कॅब आणि परमिट संदर्भातील नियमांमध्ये केले महत्त्वाचे बदल. इलेक्ट्रॉनिक मीटर असलेल्या मोटार कॅबच्या अधिकृत चालकाला मराठी भाषेचे कार्यज्ञान असणे बंधनकारक करण्यात आले. चालकाला मराठीचे आवश्यक ज्ञान नसल्याचे आढळल्यास, परवाना देणाऱ्या प्राधिकरणाकडून एक महिन्याची मुदत देऊन मराठी शिकण्याची संधी दिली जाणार आहे.

  • 12 Aug 2026 10:30 AM (IST)

    मुंबईत भररस्त्यात गुंडगिरीचं प्रदर्शन, बेसबॉल स्टिकने मारण्याचा प्रयत्न

    वांद्रे पोलीस स्टेशन आणि DCP कार्यालयापासून 3 मिनिटांच्या अंतरावर एक धक्कादायक प्रकार घडला. कारला ओव्हरटेक केल्याच्या रागातून फिटनेस ट्रेनरला अडवून हॉकी स्टिकने मारहाण केली. 9 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12.15 वाजताच्या सुमारास वांद्रे तलावासमोर ही घटना घडली.

  • 12 Aug 2026 10:20 AM (IST)

    मनोज जरांगे पाटील यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याचा शेवटचा दिवस

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांच्या पाटण आणि सातारा शहरात सभा होणार आहेत. सोलापूर, माढा, कवठे महाकाळ, बोरगाव, कराड या ठिकाणी सभा घेतल्यानंतर आज जारांगे पाटील पाटण दौऱ्यावर.

  • 12 Aug 2026 10:10 AM (IST)

    10 दिवसांनंतर धुळ्यात पावसाची हजेरी, अरुणावती नदीला पूर

    पावसामुळे जोयदा परिसरातील अरुणावती नदीला पूर आला आहे. नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने जोयदा-सांगवी रस्ता सध्या वाहतुकीसाठी बंद झाला आहे. पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने वाहनचालकांनी या मार्गावरून प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात येत आहे. अचानक आलेल्या पुरामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून, परिसरातील नागरिकांची गैरसोय होत आहे.

  • 12 Aug 2026 08:55 AM (IST)

    नाशिकच्या खड्ड्यांवर मुख्यमंत्री फडणवीस पुन्हा घेणार झाडाझडती

    १४ ऑगस्टला मुख्यमंत्री घेणार कुंभमेळा कामांचा आढावा. रस्त्यांची दुरवस्था अन् संथगतीच्या कामांवर मुख्यमंत्र्यांचे पुन्हा लक्ष. मुख्यमंत्र्यांच्या आढाव्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन अॅक्शन मोडवर. शहरातील खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू

  • 12 Aug 2026 08:50 AM (IST)

    भरधाव कार थेट बावनथडी कालव्यात कोसळली, दोन युवक बालंबाल बचावले

    भंडारा-तुमसर मार्गावरील खरबी शेतशिवारात भंडारा कडून तुमसरच्या दिशेने अतिवेगाने जाणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कार थेट बावनथडीच्या कालव्यात जाऊन कोसळली. कालव्यात पाणी असल्याने कारचा बहुतांश भाग पाण्यात बुडाला होता. मात्र, अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी घटनास्थळी धाव घेत दाखवलेल्या तत्परतेमुळे दोन्ही तरुणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. स्थानिकांच्या वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे दोन्ही युवकांचे प्राण वाचले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.

  • 12 Aug 2026 08:40 AM (IST)

    हिंगोली- वसमत बस्थानकातून विद्यार्थ्यांचा बस मधून जीवघेणा प्रवास

    मुलं-मुली एकाच बसमधून गर्दीत प्रवास करत असल्याचा व्हिडीओ समोर. बसच्या क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी; प्रशासनाचे दुर्लक्ष? शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास.. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी सरकारकडून मानव विकास बससेवेची घोषणा हवेत..?

  • 12 Aug 2026 08:30 AM (IST)

    आईने आवळला गळा, मुलाने डोक्यात सायकलचा पंप मारला; बापाची निर्घृण हत्या

    करणसिंग रामसिंग पवार, असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव. चाळीसगाव तालुक्यातील आंबेहोल येथील खळबळजनक घटना. गहाण ठेवलेली मोटरसायकल सोडवण्यासाठी पैसे मागितल्यानंतर नवरा-बायकोमध्ये झाला होता वाद. दारू पिऊन त्रास देणे तसेच परस्पर जमीन विकल्याच्या कारणावरून आधीच कुटुंबात सुरू होते वाद

  • 12 Aug 2026 08:20 AM (IST)

    नंदुरबार जिल्ह्यात तब्बल १२ दिवसांच्या खंडानंतर पावसाचे पुन्हा आगमन.

    नंदुरबार शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात रात्रीपासून जोरदार पावसाची हजेरी. रात्रभर झालेल्या पावसामुळे खरीप पिकांना मिळणार नवसंजीवनी.  पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा. पावसामुळे जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता. रात्रभरच्या पावसाने वातावरणात गारवा; नागरिकांनाही दिलासा….

  • 12 Aug 2026 08:20 AM (IST)

    घाटकोपर येथील साकीनाका गौसिया चाळवर कोसळली दरड.

    मुंबईतील घाटकोपर येथील साकीनाका गौसिया चाळ परिसरात रात्रीभर पडलेल्या पावसामुळे डोंगराचा काही भाग कोसळला. या घटनेत दोन ते तीन घरांवर दरड कोसळली असून पाच ते सहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दोन जण ठार झाल्याची माहिती मिळतंय.

राज्यात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला. त्यामध्येच शिवसेना पक्ष आणि चिन्हावर काल सुनावणी झाली. आजही सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे राज्याच्या नजरा आहेत. कपिल सिब्बल यांनी कोर्टात अजून बोलण्याचा वेळ मागितला. सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या रिसेप्शनमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पोहोचल्या नसल्याने विविध चर्चांना उधाण आले. या रिसेप्शनमध्ये देशभरातील मोठ्या नेत्यांनी हजेरी लावली. सुनील तटकरे यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाबाबत विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. मुंबईच्या घाटकोपर परिसरात मोठी दरड कोसळली आहे. काही जण अडकल्याची भीती असून बचावकार्य सुरू करण्यात आले. राज्यात आज काही ठिकाणी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. यासह राज्यातील, देश-विदेशातील, क्रीडा-मनोरंजन क्षेत्रातील आणि इतरही बातम्या जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

Published On - Aug 12,2026 8:18 AM

Follow Us
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर भोजन...
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर स्नेहभोजन अन् बाप्पाचे दर्शन
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह...
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह संध्याकाळी ७ वाजता उपस्थिती
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
दिशा सालियान प्रकरणात मोठा ट्विस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरे...
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणात नवा ट्वीस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरेंचं नाव नाहीच...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णायक सुनावणी? शिंदेंचे वकील करणार...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णयाक सुनावणी... शिंदेंचे वकिल करणार युक्तिवाद
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण