Maharshtra News LIVE : कल्याणजवळ गुन्हे शाखेची मोठी कारवाई; 2 पिस्तुलं,10 काडतुसं जप्त
Supreme Court on Shiv Sena Party and Symbol Hearing LIVE Updates in Marathi : शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टात आजही सुनावणी झाली. कपिल सिब्बल यांच्याकडून ठाकरे गटाच्या बाजूने युक्तीवाद करण्यात आला. याविषयीचे सर्व अपडेट्स जाणून घ्या..

LIVE NEWS & UPDATES
-
सोलापूर : भाजप नगरसेविका श्रीदेवी फुलारी यांच्याविरोधात मोर्चा
सोलापूर महानगरपालिकेच्या भाजप नगरसेविका श्रीदेवी फुलारी यांच्याविरोधात आम आदमी पार्टी आणि स्थानिक नागरिकांनी मोर्चा काढला. सोलापूर मनपाच्या शाळेसाठी आरक्षित असणाऱ्या चार हजार स्क्वेअर फुट जागेवर बंगला बांधल्याचा स्थानिकांनी आरोप केला. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते सोलापूर महानगरपालिकेवर मोर्चा काढत आंदोलन करण्यात आले.
-
नाशिक : नेपाळ सीमेलगतचा सराईत गुन्हेगार लासलगाव पोलिसांच्या जाळ्यात
नेपाळ सीमेलगतचा सराईत गुन्हेगार लासलगाव पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. विंचूर दुकानफोडी प्रकरणात खुर्शीद अब्दुल हमीद खानला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून तांब्याच्या वायर, सॅन्ट्रो कारसह 4.51 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. न्यायालयाकडून आरोपीला 21 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
-
-
मुंबई : साठे कॉलेजबाहेर विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठे कॉलेजबाहेर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये नोंदणी मोहीम करताना जागेवरून बाचाबाची झाली. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून मागील पंधरा दिवसापासून विविध कॉलेजमध्ये सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे. साठे कॉलेजच्या बाहेर सुद्धा मनसेचे हे नोंदणी अभियान राबवले जात आहे. दरवर्षीप्रमाणे आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सुद्धा नोंदणी अभियान सुरू केलं. यावेळी जागेवरून वाद झाला आहे.
-
कांदिवली : नंदनवन अपार्टमेंटच्या गॅस पाइपलाइनला आग
कांदिवलीतील नंदनवन अपार्टमेंटमध्ये गॅस पाइपलाइनला आग लागल्याने खळबळ उडाली आहे. आग लागल्यानंतर संपूर्ण इमारतीत घबराट पसरली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले आहे. इमारतीजवळून गेलेल्या हाय व्होल्टेज वायरमध्ये शॉर्ट सर्किट झाले. त्यानंतर बिल्डिंगच्या गॅस पाइपलाइनने पेट घेतला. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
-
जुन्नर तालुक्यात चिमुकलीवर अत्याचार, पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी सुरू
जुन्नर तालुक्यात चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी सुरू केली आहे. या प्रकरणातील आरोपीने चिमुकलीची हत्या करण्यासाठी नेमकं कोणतं हत्यार वापरलं, याचा शोध पोलीस घेत आहेत. घटनास्थळावरील प्रत्येक बाबीची बारकाईने तपासणी केली जात असून, या प्रकरणातील पुरावे संकलित करण्याचं कामही सुरू करण्यात आलं आहे.
-
-
मिरा रोड बेकरी गोळीबार प्रकरणातील फरार मोक्का आरोपी अख्तर मर्चंटला दिल्ली विमानतळावरून अटक
मिरा रोड बेकरी गोळीबार प्रकरणातील फरार मोक्का आरोपी अख्तर मर्चंटला दिल्ली विमानतळावरून अटक करण्यात आली. खंडणीसाठी गोळीबाराचा प्रयत्न करणाऱ्या मुख्य सूत्रधाराच्या साथीदाराला काशिमीरा पोलीस अन् गुन्हे शाखेने पकडलं. व्हॉट्सॲपवरून खंडणी मागणाऱ्या मर्चंटला पोलीस कोठडीसाठी न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
-
अंबरनाथच्या एसीपी स्क्वॉडची ड्रग्ज माफियांवर धडक कारवाई
अंबरनाथच्या एसीपी स्क्वॉडने ड्रग्ज माफियांवर धडक कारवाई करत 271 ग्रॅम एमडी, तसेच 20 लाख रुपयांची रोकड हस्तगत केली. 4 पुरुष आणि 2 महिलांना अटक करण्यात आली असून चौघेजण अद्याप फरार आहेत.
-
-
ओमराजे निंबाळकरांवर टीका करणार नाही, तो आपल्यात होता – उद्धव ठाकरे उद
उद्धव ठाकरेंनी धाराशिवच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. ओमराजे निंबाळकरांवर मी टीका करणार नाही, तो आपल्यात होता , असं यावेळी ठाकरे म्हणाले. आपल्याला लढायचं आहे, तुम्ही मनाने इथे आहात ना ? असा सवाल त्यांनी विचारला.
-
सिंहगड किल्यावर मारहाण करणाऱ्या टोळक्यावर कारवाई झालीच पाहिजे – रुपाली ठोंबरे
सिंहगड किल्यावर आठ वर्षाच्या मुलीने बर्मुडा घातल्यामुळे तिच्या वडिलांना टोळक्याने मारहाण केली गुन्हेगारी वृत्तीच्या टोळक्यावर कारवाई झाली पाहिजे , अशी मागणी रूपाली ठोंबरे यांनी केली. मारहाण करणारी टोळकी जर स्वयंघोषित धर्मरक्षक समजत असतील तर तुमच्या या गुन्हेगारीला कोणीही थारा देणार नाही, असं त्यांनी सुनावलं.
मुलींनी किंवा महिलांनी घातलेल्या कपड्यांवरून गुन्हेगारी प्रवृत्ती दाखवत असाल तर ती सहन केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
-
कल्याणजवळ ठाणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई; 2 गावठी पिस्तुलं,10 जिवंत काडतुसं जप्त; दोघांना अटक
कल्याणजवळील बल्याणी परिसरात ठाणे गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत 2 गावठी पिस्तुलं आणि 10 जिवंत काडतुसं जप्त केली. परिसरात दहशत माजवणारा सराईत गुन्हेगार रोशन गोंधळी आणि त्याचा साथीदार कृष्णा यादव यांनाही अटक केली.
एलसीबीचे अधिकारी भाऊसाहेब गायकवाड यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांचा वापर कोणत्या गंभीर गुन्ह्यासाठी किंवा घातपातासाठी होणार होता का, याचा तपास सुरू केला आहे. कल्याण न्यायालयाने दोन्ही आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली;
-
कथित ऑडिओ रेकॉर्डिंग प्रकरणी ॲट्रॉसिटी आणि बदनामीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या विजय चौधरींना जामीन मंजूर
नंदुरबार – व्हायरल कथित ऑडिओ रेकॉर्डिंग प्रकरणी ॲट्रॉसिटी आणि बदनामीच्या गुन्ह्यात अटक असलेल्या विजय चौधरी यांना नंदुरबार जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला होता.
माजी खासदार डॉ.हिना गावित यांच्या भावाच्या तक्रारीवरून दाखल गुन्ह्यात जामीन विजय चौधरी वर अजून नंदुरबार आणि अक्कलकुवा मध्ये एक एक गुन्हा दाखल करण्यात आला होता.
-
राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला गर्दी होवू नये म्हणून कलम १४४ लावलं का?
राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला गर्दी होवू नये म्हणून कलम १४४ लावलं का ? असा आरोप पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला. आज आम्हाला पोलीस परवानगी मिळेल अशी अपेक्षा आहे. विरोध किती झाला तरी आम्ही कार्यक्रम करू. पुण्यातला कार्यक्रम फक्त मुलींसाठी आहे कारण हे शहर राजमाता जिजाऊ , आणि सावित्रीबाई फुले यांच शहर आहे. पुण्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्कॅनरवरती विद्यार्थ्यांची माहिती भरली जाईल आणि त्यांना एक टॅग दिला जाणार आहे, असे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी सांगितले.
-
बोगस कुणबी प्रमाणपत्राविरोधात ओबीसी बांधव थेट जात पडताळणी कार्यालयात
बोगस कुणबी प्रमाणपत्र देऊ नका या मागणीसाठी ओबीसी बांधव थेट जात पडताळणी कार्यालयात पोहचले. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेच्या प्रतिमेला दुग्धभिषेक करत घोषणाबाजी करण्यात आली. ओबीसी पदाधिकाऱ्यांची आंदोलक मनोज रांगेवर टीका केली. सोलापुरातील ओबीसी बांधवांनी बुधवारी जात पडताळणी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना विनंती केली. राज्यासह सोलापुरात बोगस कुणबी प्रमाणपत्रांचा सुळसुळाट झाला आहे. कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अनेक जन कागदपत्रात खाडाखोड करत आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी ओबीसी बांधवांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका करत संताप व्यक्त केला.
-
तर त्यांनी हार पत्करली आहे- मंत्री योगेश कदम
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा असे जर कपिल सिब्बल मागणी करत असतील तर याचा अर्थ त्यांनी त्यांची हार पत्करलेली आहे, हे पक्षचिन्ह त्यांना मिळणार नाही हे त्यांनी मान्य केलेलं आहे, असा टोला मंत्री योगेश कदम यांनी लगावला. सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे माझं एवढे सांगणे आहे की ज्यावेळी आमची बाजू समोर येईल त्यावेळी सत्य जगासमोर येईल. देवदत्त कामत यांनी जे विधान माझ्याबाबत केलेलं आहे तो टेक्निकल विषय आहे आणि त्या मी केलेल्या किंवा मी जोडलेल्या पुरवणीचा दाखला त्यांनी त्या ठिकाणी दिलेल्या त्याचा सुनावणीशी फार जास्त संबंध येत नाही. पक्ष हा ठाकरेंचा नाही तर पक्ष आणि पक्षाचे चिन्ह हे बाळासाहेब ठाकरेंचं आहे हे सगळ्यात आधी लक्षात ठेवावं कपिल सिब्बल हे वारंवार त्याच त्याच गोष्टी पुन्हा नव्याने सुप्रीम कोर्टात सांगत आहेत यापुर्वीही त्यांनी हेच मुद्दे मांडले होते, असे कदम म्हणाले.
-
शिक्षक नियुक्तीसाठी पालक-विद्यार्थी आक्रमक
वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील चांधईच्या पालक व विद्यार्थ्यांचा आक्रोश करत आहेत. शिक्षकांची कमतरता असल्याचा पालक व विद्यार्थ्यांचा आरोप आहे.आज पंचायत समिती कार्यालयातच विद्यार्थ्यांनी शाळा भरवली होती. शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आला. शाळेत मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचीही तक्रार करण्यात आली. तातडीने शिक्षकांची नियुक्ती करण्याची पालक व विद्यार्थ्यांनी मागणी केली.
-
देवझिरी येथील ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
जळगावच्या चोपडा तालुक्यातील देवझिरी येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.रेशनधान्य मिळत नसल्याने तसेच रेशन दुकानदारा विरोधात मागण्यांसाठी ग्रामस्थांची घोषणाबाजी करत आंदोलन केले. रेशन दुकानदारा बद्दल अनेकदा तक्रारी देऊनही कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. रेशन दुकानदाराचा परवाना निलंबित करावा व आम्हाला नेहमीच रेशन धान्य मिळावं अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
-
आम्हाला चिन्ह देणार नसाल तर गोठवा- सामंत
आम्हाला चिन्ह देणार नसाल तर गोठवा, असे मोठे विधान अरविंद सावंत यांनी केले.
-
शिंदेंनी चुकीचे पाऊले उचलली- कामत
शिंदेंनी चुकीची पाऊले उचलल्याचे कोर्टात कामत यांनी म्हटले.
-
राजकीय पक्षांच्या विरोधात जाऊन शिंदे मुख्यमंत्री झाले- कामत
राजकीय पक्षांच्या विरोधात जाऊन शिंदे मुख्यमंत्री झाले, कोर्टात मोठा दावा.
-
शिंदेंनी उचललेली पाऊले चुकीची- कामत
शिंदे मुख्यमंत्री झाले पण त्यांनी उचललेली पाऊले चुकीची असल्याचे मोठे विधान कामत यांनी कोर्टात केले..
-
शिंदेंच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून आले, ते त्यांना ठाकरेंनी दिलं..
शिंदेंच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून आले, ते त्यांना ठाकरेंनी दिलं, आता ते बोलतात मीच अध्यक्ष, कामत यांचा जोरदार युक्तीवाद,
-
शिंदेंना संधी दिली म्हणजे अध्यक्ष त्यांना सिस्टिम मानायला लागले का?- कामत
शिंदेंना संधी दिली म्हणजे अध्यक्ष त्यांना सिस्टिम मानायला लागले का? असाही सवाल यादरम्यान उपस्थित केला गेला.
-
शिस्तभंगाच्या कारवाईचा विचार करा- कामत
ज्या पद्धतीने सरकार तयार झाले, त्यानंतर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले.
-
हे विभागण्यासारखे आहे का? असा मोठा सवाल कोर्टाने उपस्थित केला
हे विभागण्यासारखे आहे का? असा मोठा सवाल कोर्टाने उपस्थित केला आहे. थोडेफार विभागण्यासारखे आहे, असे कामत यांनी कोर्टात सांगितले.
-
आज आम्ही शिंदेंना अपात्र घोषित करू शकतो का? कोर्ट
आज आम्ही शिंदेंना अपात्र घोषित करू शकतो का? असा सवास न्यायमूर्तीनी कामत यांना केला.
-
राजकीय पक्ष असल्याचे सांगून कारवाईपासून वाचू शकत नाही- देवदत्त कामत
राजकीय पक्ष असल्याचे सांगून कारवाईपासून वाचू शकत नाही, असे मोठे विधान नुकताच देवदत्त कामत यांनी केले.
-
बंडखोरी झाली, त्यावेळी पक्षात कोण- कोण होते, हे महत्वाचे- कामत
बंडखोरी झाली, त्यावेळी पक्षात कोण कोण होते हे अत्यंत महत्वाचे असल्याचे देवदत्ता कामत यांनी म्हटले.
-
ठाकरेंसाठी धोक्याची घंटा..
शिंदे पक्षात राहिले नाही तर त्यांच्यावर होणारे दावे कसे राहतील. इतर पर्यायांचा विचार केला पाहिजे होता, जो केला गेला नााही.
-
निवडणुकीत उमेदवार राजकीय पक्ष ठरवत असतो- कामत
निवडणुकीत उमेदवार राजकीय पक्ष ठरवत असतो, असे मोठे विधान देवदत्त कामत यांनी कोर्टात केले.
-
देवदत्त कामत यांचा मोठा युक्तीवाद
टर्म संपली असली तरीही आमदार अपात्रतेचे प्रकरण महत्वाचे असल्याचे मोठे विधान ठरवतो.
-
विधीमंडळ आणि राजकीय पक्ष वेगळा- देवदत्त कामत
विधीमंडळ आणि राजकीय पक्ष वेगळा असल्याचे मोठे विधान देवदत्त कामत यांनी कोर्टात केले.
-
शिंदेंना चिन्ह दिलं जाऊ शकत नाही- कपिल सिब्बल
सुनावणीदरम्यान कपिल सिब्बल यांनी म्हटले की, शिंदेंना चिन्ह दिलं जाऊ शकत नाही, ते गोठवा
-
शिवसेना ठाकरेंचा पक्ष शिंदेंनी त्याचा फायदा घेतला- कपिल सिब्बल
शिवसेना ठाकरेंचा पक्ष शिंदेंनी त्याचा फायदा घेतला, असल्याचा मोठा दावा कपिल यांनी केला.
-
अध्यक्ष चुकले असतील तर कोर्ट आम्हाला दिलासा देऊ शकते- देवदत्त कामत
आमदार अपात्रतेवर देवदत्त कामत यांनी युक्तीवाद सुरू केला. अध्यक्ष चुकले असतील तर कोर्ट आम्हाला दिलासा देऊ शकते, असे त्यांनी म्हटले.
-
धनुष्यबाण चिन्ह गोठवा, कपिल सिब्बल
धनुष्यबाण चिन्ह गोठवा, अशी मोठी मागणी कपिल सिब्बल यांनी कोर्टात केली आहे.
-
शिवसेना हा पक्ष ठाकरेंचा आहे- कपिल सिब्बल
कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी सुरू आहे. आता कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद संपला असून शेवटी त्यांनी म्हटले की, शिवसेना हा पक्ष ठाकरे यांचाच आहे.
-
गुवाहाटीला कोण कसे गेले, यावर मला आता बोलायचे नाही- कपिल सिब्बल
गुवाहाटीला कोण कसे गेले, यावर मला आता बोलायचे नसल्याचे मोठे विधान कपिल सिब्बल यांनी केले.
-
आमदार ज्या हॉटेलमध्ये होते, तिथे भाजपाचे राज्य होते- कपिल सिब्बल
आमदार ज्या हॉटेलमध्ये होते, तिथे भाजपाचे राज्य होते, असे मोठे विधान कोर्टात कपिल सिब्बल यांनी केले.
-
सत्ता स्थापन झाली, त्यावेळी विरोधा पक्षालासोबत घेतले- कपिल सिब्बल
सत्ता स्थापन झाली, त्यावेळी विरोधा पक्षालासोबत घेतल्याचे मोठे विधान कपिल सिब्बल यांनी केले.
-
राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष पक्षपातीपणाने वागले- कपिल सिब्बल
राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष पक्षपातीपणाने वागले असे मोठे विधान कपिल सिब्बल यांनी कोर्टात केले.
-
विधिमंडळाच्या पत्राच्या आधारावर देवेंद्र फडणवीस हे राज्यपालांना भेटले- सिब्बल
विधिमंडळाच्या पत्राच्या आधारावर देवेंद्र फडणवीस हे राज्यपालांना भेटले, असे मोठे विधान कपिल सिब्बल यांनी केले.
-
कपिल सिब्बल यांचा अत्यंत मोठा दावा
23 जूनच्या निर्णयानुसार, पक्ष शिंदेंना देण्यात आल्याचे कपिल सिब्बल यांनी म्हटले.
-
हे प्रकरण कोर्टात असताना आयोगाने थेट निर्णय दिला- कपिल सिब्बल
हे प्रकरण कोर्टात असताना आयोगाने थेट निर्णय दिला, असा युक्तीवाद कोर्टात कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आला.
-
शिंदेंकडून पक्ष आणि चिन्ह जाणार?
आयोगाने काहीही न विचार करता पक्ष आणि चिन्ह दिलं, असे मोठे विधान कपिल सिब्बल यांनी केले.
-
शिंदेंकडून काढून घेऊन अजय चाैधरींना देणे योग्यच होते- कपिल सिब्बल
शिंदेंकडून काढून घेऊन अजय चाैधरींना देणे योग्यच होते, असे मोठे विधान कपिल सिब्बल यांनी केले.
-
अजय चाैधरी यांच्या पत्रावर शंका घेण्याचे कारण नव्हते- कपिल सिब्बल
अजय चाैधरी यांच्या पत्रावर शंका घेण्याचे काहीही कारण नव्हते, असे कपिल सिब्बल यांनी कोर्टात म्हटले.
-
कपिल सिब्बल यांचा अत्यंत मोठा दावा
पक्षात फुट पडल्यानंतर ठाकरेंनी चाैधरीकडे गटनेते पद दिल्याचा युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी केला.
-
उद्धव ठाकरे हे निवडलेले नेते होते- कपिल सिब्बल
उद्धव ठाकरे हे निवडलेले नेते होते, असा अत्यंत मोठा दावा कपिल सिब्बल यांनी कोर्टात केला.
-
आमदार असोत किंवा नसोत पक्ष हा आयोगाकडे अधिकृत नोंदीत असतो- कपिल सिब्बल
आमदार असोत किंवा नसोत पक्ष हा आयोगाकडे अधिकृत नोंदीत असतो, कपिल सिब्बल यांचा मोठा दावा.
-
एकवेळ दुसऱ्या पक्षात विलीन होऊ शकतात, पण पक्ष घेऊ शकत नाही- कपिल सिब्बल
एकवेळ दुसऱ्या पक्षात विलीन होऊ शकतात, पण पक्ष घेऊ शकत नाही, म्हणत कपिल सिब्बल यांनी मोठा दणका नुकताच एकनाथ शिंदे यांना दिला.
-
आमदारांना राजकीय पक्षाचे ऐकावे लागले- कपिल सिब्बल
आमदारांना राजकीय पक्षाचे ऐकावे लागले, असे मोठे विधान कोर्टात कपिस सिब्बल यांनी केले.
-
विधीमंडळातील पक्ष म्हणजे राजकीय पक्ष नाही- कपिल सिब्बल
विधीमंडळातील पक्ष म्हणजे राजकीय पक्ष नाही, असे कलम सांगतो.
-
काहीही न विचारता आयोगाने चिन्ह आणि पक्ष दिला..
काहीही न विचारता निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्ष दिल्याचे मोठे विधान कपिल सिब्बल यांनी केले.
-
10 व्या सूचीविरोधात अध्यक्ष कसे जाऊ शकतात?- कपिल सिब्बल
10 व्या सूचीविरोधात अध्यक्ष कसे जाऊ शकतात? असा मोठा प्रश्न कपिल सिब्बल यांनी कोर्टात उपस्थित केला.
-
निवडणूक आयोगावर मोठा आरोप
अपात्रतेची केस होती का? एवढाच प्रश्न आयोगाकडून विचारण्यात आल्याचे कपिल सिब्बल यांनी म्हटले.
-
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी सुरू झाली. आजही ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तीवाद केला जातोय.
-
पक्ष आणि चिन्हावर थोड्याच वेळात सुनावणी
पक्ष आणि चिन्हावर थोड्याच वेळात सुनावणीला सुरूवात होईल.
-
वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास रास्ता रोको करण्याचा शेतकरी बांधवांचा इशारा
जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातील हलदोला शेत शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतातून जाणाऱ्या विजेच्या पोल वरील तार अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडल्यानंतर या मागील आठवडाभरापासून ठिकाणचा वीजपुरवठा पूर्णतः खंडित झालाय,त्यामुळे शेतकऱ्यांची सोयाबीन कपाशी यासह इतर पिके पूर्णतःधोक्यात आली असून पाण्याअभावी करपू लागली आहे,तर काही ठिकाणची पिकं ही वाळल्याचही समोर आलंय. त्यामुळे शेतकरी बांधव मोठ्या संकटात आहे. महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याने तक्रार दाखल करूनही बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नसल्याने शेतकऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा घेत जालना संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे.
-
प्रकाश आंबेडकर यांनी रिपब्लिकन पक्षात यावं- रामदास आठवले
“बाळासाहेब आंबेडकर हे सीनियर नेते आहेत. त्यांना माझ्यापेक्षा राजकारणातील जास्त अनुभव आहे. ते जर आले तर त्यांच्या अध्यक्षतेखाली काम करण्यात मला आनंद वाटेल. रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य हे माझं मंत्रिपद घालवण्यासाठी होऊ नये, तर अजून एक-दोन मंत्री होण्यासाठी व्हावं. असा आपला प्रयत्न आहे. माझ्यासाठी मंत्री पद महत्त्वाचं नाही, रिपब्लिकन पक्षाच ऐक्य महत्त्वाच आहे. सगळे नेते एकत्र आले तर एकाच झेंड्याखाली, आमची ताकद वाढू शकते. आणि रिपब्लिकन पक्षातील कार्यकर्त्यांना संधी मिळेल. 90 मध्ये मी जेव्हा मंत्री झालो तेव्हा प्रकाश आंबेडकर, गवई, कावडे यांनी मला पाठिंबा दिला असता तर, त्या वेळेला रिपब्लिकन पक्षाचे दहा बारा मंत्री झाले असते. त्यावेळी शरद पवारांना माहीत होतं की रिपब्लिकन पक्ष जर आपल्या सोबत आला नाही तर सत्ता मिळवून अवघड आहे. त्यांना माहिती होत भाजपा सेनेची ताकत वाढली आहे. त्या वेळी जर आमचा एकत्र येण्याचा निर्णय झाला असता तर आमचे 25पेक्षा अधिक आमदार झाले असते. रिपब्लिकन पक्ष हा ताकतवान पक्ष म्हणून महाराष्ट्रात उभा राहिला असता. मात्र ती वेळ गेली. त्यावेळेस आम्ही एकत्र असतो तर मोठा फायदा झाला असता, मात्र आता ही वेळ गेलेली नाही. मी काही वंचित बहुजन आघाडीत जाणार नाही, मात्र ऐक्य करायचं असेल बाळासाहेब आणि रिपब्लिकन पक्षात आलं पाहिजे. कारण हा डॉक्टर बाबासाहेबांचा पक्ष आहे. हा गट तो गट करण्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पक्षात आपण मोमेंट उभी केली तर, रिपब्लिकन पक्षाला मोठा यश मिळेल असं रामदास आठवले यांनी वक्तव्य केलं.
-
कठोर शिक्षा आरोपीला दिली पाहिजे- जुन्नर घटनेवर अभिनेता स्वप्नील जोशी
अभिनेता स्वप्नील जोशी जुन्नर घटनेवर म्हणाला की ,“जितकी ही घृणास्पद घटना आहे, तितकीच कठोर शिक्षा आरोपीला दिली पाहिजे. कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून भविष्यात अशा गुन्हेगारांना आळा बसेल.”
-
इगतपुरी तालुक्यातील सप्रेवाडी जिल्हा परिषद शाळेची इमारत धोकादायक
इगतपुरी तालुक्यातील सप्रेवाडी जिल्हा परिषद शाळेची इमारत धोकादायक; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. शाळेच्या षटकोनी इमारतीचा स्लॅब गळतोय, भिंतींना मोठे तडे. किचन शेडचीही दुरवस्था; उंदीर-घुशींचा मोठ्या प्रमाणात वावर. कडधान्य व शालेय अन्नधान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान. केंद्रप्रमुखांच्या पाहणीत या इमारतीत विद्यार्थ्यांना बसवू नये असा स्पष्ट शेरा. शाळा व्यवस्थापन समितीची प्रत्यक्ष पाहणी. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नवीन शाळा इमारत बांधण्याची मागणी. शाळेतील सर्व विद्यार्थी आदिवासी समाजातील. शिरसाठे ग्रामपंचायतीकडे नवीन इमारतीसाठी एकमुखी ठराव. नवीन इमारतीसाठी प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी ग्रामस्थांची मागणी
-
मुलुंडच्या एमटी अग्रवाल पालिका रुग्णालय ला. काँग्रेसकडून टाळे भेट
मुलुंडच्या एम. टी. अग्रवाल पालिका रुग्णालयातील असुविधांमुळे सामान्य नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. कोट्यवधींचा खर्च करून देखील या रुग्णालयात प्रशिक्षित डॉक्टर आणि रुग्णालयीन कर्मचाऱ्यांचा अभाव असल्यामुळे रुग्णांवर योग्य ते उपचार होत नसल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते राकेश शेट्टी यांनी केला आहे. आज काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धडक देऊन रुग्णालयाचे डीन राजुसिंग राठोड यांच्या हातात कुलूप आणि साखळी देत 15 दिवसांच्या आत जर रुग्णालयामध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली नाही तर काँग्रेस कडून या रुग्णालयाच्या मुख्य दरवाजाला टाळे लावण्याचा इशारा दिला आहे. निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर सत्ताधारी पक्षाकडून घाईघाईत या रुग्णालयाचे उद्घाटन केल्यामुळे उपनगरवासीयांना या गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप राकेश शेट्टी यांनी केला आहे.
-
उद्यापासून व्यवहारिक मराठीचं ज्ञान येत नसेल तर कारवाई होणार- प्रताप सरनाईक
“उद्यापासून व्यवहारिक मराठीचं ज्ञान येत नसेल तर कारवाई होणार, एक महिन्याच्या मुदतीनंतर मराठी न आल्यास परवाना तीन महिने रद्द करणार” असं परिवहन मंत्री प्रताप सरनाई म्हणाले.
-
मराठी सक्तीची अंमलबजावणी उद्यापासून सुरु करतोय- प्रताप सरनाईक
प्रताप सरनाईक मराठी सक्तीवर म्हणाले की,” मराठी सक्तीची अंमलबजावणी उद्यापासून सुरु करतोय, कुणाच्या रोजीरोटीवर गदा आणण्याचा आमचा प्रयत्न नाही. मग्रुरी करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई होणारच.
-
अहिल्यानगर जिल्ह्यातील फुलशेतीचे क्षेत्र घटले
अहिल्यानगर जिल्ह्यातील फुलशेतीचे क्षेत्र घटले. फुलशेतीचे क्षेत्र तब्बल ३१२ हेक्टरने घटले. गेल्या वर्षी १,१४८ हेक्टरवर असलेले फुलशेतीचे क्षेत्र यंदा ८३६ हेक्टरवर आले. पावसाची सुरुवातीला कमतरता आणि सततच्या ढगाळ वातावरणामुळे फुलशेतीला फटका. येत्या सण-उत्सवांच्या काळात फुलांची आवक घटण्याची शक्यता असून, त्यामुळे फुलांचे दर वाढण्याची शक्यता
-
मला आनंद आहे की अमेरिकेच्या राजदूतानी महाराष्ट्राची स्तुती केली- अमृता फडणवीस
अमृता फडणवीस म्हणाल्या की,” मला आनंद आहे की अमेरिकेच्या राजदूतानी देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राची स्तुती केली आहे.. महाराष्ट्र आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्टीने भारताचा महत्त्वाचा राज्य आहे आणि मुंबई त्याची राजधानी असल्याने महत्त्वाची आहे… देवेंद्र फडणवीस दिवस-रात्र महाराष्ट्रासाठी काम करत आहे… ते मोदींच्या नेतृत्वाखाली काम करत असल्याने असे चांगले काम करणे जास्त सोपं होतं… या चांगल्या कामांचा श्रेय मोदींजीना जातो.”
-
वाढीव पाणपट्टी दरवाढी विरोधात कोल्हापुरात ठाकरेसेनेचे आंदोलन
वाढीव पाणपट्टी दरवाढी विरोधात कोल्हापुरात ठाकरेसेनेचे आंदोलन सुरु आहे. कोल्हापूर पालिकेच्या प्रस्तावित पाणीपट्टी दरवाढी विरोधात आंदोलन सुरु आहे.
-
बदनापूर तालुक्यातल्या हलदोला शेत शिवारातील विजेच्या पोलवरील तार चोरी गेल्याची घटना समोर
जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातील हलदोला शेत शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतातून जाणाऱ्या विजेच्या पोल वरील तार अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडल्यानंतर या मागील आठवडाभरापासून ठिकाणचा वीजपुरवठा पूर्णतः खंडित झालाय,त्यामुळे शेतकऱ्यांची सोयाबीन कपाशी यासह इतर पिके पूर्णतःधोक्यात आली असून पाण्याअभावी करपू लागली आहे,तर काही ठिकाणची पिकं ही वाळल्याचही समोर आलंय. त्यामुळे शेतकरी बांधव मोठ्या संकटात आहे. महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याने तक्रार दाखल करूनही बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नसल्याने शेतकऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा घेत जालना संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे.
-
गोंदियातील बुकी सोंटू जैन यांच्या प्रतिष्ठानांवर आयकर विभागाची धाड…
क्रिकेट बुकी सोंटू जैन यांच्या गोंदियातील निवासस्थान आणि दोन प्रतिष्ठानांवर नागपूर येथील आयकर विभागाच्या पथकाने एकाच वेळी धाड टाकून चौकशी केली…. जयस्तंभ चौकातील हॉटेल लॅवीश इन, गोरेलाल चौकातील कुरतावाला कापड दुकान तसेच सिव्हिल लाइन काका चौकातील जैन यांच्या निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत चौकशी केली…. काल नागपूर येथील आयकर विभागाचे पथक गोंदियात दाखल झाले. या पथकाने सोंटू जैन यांच्या दोन प्रतिष्ठान आणि निवासस्थानी एकाच वेळी धाड टाकली…. मोठ्या प्रमाणात आयकर बुडवल्याच्या संशयातून ही चौकशी केल्याची माहिती मिळाली आहे… विशेष म्हणजे सोंटू जैन दोन वर्षापूर्वी क्रिकेट बुकी म्हणून चर्चेत आले होते…. क्रिकेट सट्टयातून कोट्यवधी रुपयांची कमाई केल्याची बाब उघडकीस आली होती आणि त्यावेळी नागपूर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करून कोट्यवधी रुपयांची रोकड व सोन्याचे दागिने जप्त केले होते….
-
मालेगावात बस आणि ट्रकचा भीषण अपघात..
मालेगावात बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात 23 प्रवासी जखमी तर दोघांचा मृत्यू झाला आहे. चाळीसगाव रोडवरील दहिवाळ शिवारात हा अपघात झाला असून जखमींना शासकीय आणि खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बसमध्ये जवळपास 50 पी पेक्षा जास्त प्रवासी असल्याची माहिती समोर येत आहे. जखमींची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.
-
अमरावतीच्या चांदूर रेल्वे मध्ये अपघातात ब्रेन डेड झालेल्या धिरज कलावटे या तरुणाचा अवयवदानाचा निर्णय..
अमरावतीच्या चांदूर रेल्वे मध्ये अपघातात ब्रेन डेड झालेल्या धिरज कलावटे या तरुणाने अवयवदानाचा निर्णय घेतला आहे. धिरज यांचे डोळे अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दान करण्यात येणार. एक किडनी रिम्स हॉस्पिटल अमरावती येथे प्रत्यारोपणासाठी देण्यात येणार. दुसरी किडनी किंग्सवे हॉस्पिटल, नागपूर येथे नेण्यात येणार. लिव्हर न्यू एरा हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपणासाठी नेण्यात येणार. अवयव वेळेत पोहोचवण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करून वाहतूक केली जात आहे. धिरज संतोष कलावटे वय 29 यांचा चांदूरजवळ अपघात झाला. अपघातात गंभीर दुखापत झाल्याने त्यांना ब्रेन डेड घोषित करण्यात आले. कुटुंबीयांनी दुःखद प्रसंगी अवयवदानाचा निर्णय घेतला.
-
माजलगाव उपविभागीय कार्यालयावर पीकविम्यासाठी शेतकऱ्यांचा भव्य बैलगाड्या-ट्रॅक्टर मोर्चा
बीडच्या माजलगाव येथे पीकविम्यासाठी उपोषणाला बसलेल्या विशाल जाधव यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर भव्य बैलगाडा आणि ट्रॅक्टर मोर्चा काढला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला हेक्टरी 17500 रुपयांचा पीकविमा तातडीने मंजूर करावा, या मागणीसाठी शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले होते. प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय न घेतल्यास आगामी काळात जिल्हाव्यापी रास्ता रोको करण्याचा इशारा जागर प्रतिष्ठानने दिला आहे. काल एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले तसेच टायर देखील पेटवण्यात आले होते तर आज बैलगाड्यांसह ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला आहे.
-
मंत्रालयात आरटीओ अधिकाऱ्यांसोबत मंत्री प्रताप सरनाईक यांची बैठक सुरू
मंत्रालयात आरटीओ अधिकाऱ्यांसोबत मंत्री प्रताप सरनाईक यांची बैठक सुरू आहे. व्यावसायिक प्रवासी वाहनचालकांसाठी व्यवहारिक मराठी अनिवार्य असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. नियमांच्या अंमलबजावणीबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची बैठक सुरू आहे. ऑटो टॅक्सी चालविणाऱ्या प्रत्येक चालकाला व्यवहारिक मराठी भाषा येणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यासंदर्भातील नियमावली आणि अंमलबजावणीची प्रक्रिया परिवहन मंत्री स्पष्ट करणार.
-
जुन्नत तालुक्यात चिमुकलीची अत्याचारानंतर हत्या, आरोपी अटक
जुन्नत तालुक्यात चिमुकलीची अत्याचारानंतर हत्या करण्यात आली. घरा शेजारी राहणाऱ्या तरुणाने अत्याचार करत 10 वर्षीय चिमुकलीची हत्या केली आहे. आरोपी 25 वर्षांचा असून तो शेतमजून असल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे.
-
पिंपळवंडीतील चिमुकलीच्या हत्येच्या निषेधार्थ रास्ता रोको
पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे दहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेने संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज ग्रामस्थांनी पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केलं आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करून चिमुकलीला न्याय मिळावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
-
नाशिक जिल्ह्यात पुन्हा सौम्य भूकंपाचे धक्के
नाशिक जिल्ह्यात पुन्हा सौम्य भूकंपाचे धक्के
नाशिकच्या पेठ तालुक्यात आज सकाळी ९ वाजता जाणवले सौम्य भूकंपाचे धक्के
गोंदे, करंजाळी, भायगाव, देवगाव, आडगाव भुवन, एकदरे परिसरात जाणवले भूकंपाचे धक्के.
भूकंपाच्या धक्क्यांमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण
कोणतीही जीवितहानी किंवा मनुष्यहानी नाही.
नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
-
समृद्धी महामार्गावर गोवंश मांस वाहतुकीचा पर्दाफाश
इगतपुरी पोलिसांची मोठी कारवाई
समृद्धी महामार्गावर गोवंश मांस वाहतुकीचा पर्दाफाश
इगतपुरी बोगद्याजवळ पिकअप गाडीसह गोवंश मांस जप्त
विनापरवाना व बेकायदेशीर वाहतूक करताना कारवाई
तब्बल १ हजार किलो मांस व जनावरांचे अवयव जप्त
जप्त मांसाची अंदाजे किंमत २ लाख २० हजार रुपये
महिंद्रा पिकअपसह एकूण ३ लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत
मोहम्मद अशरफ अली अहमद सय्यद (वय २९) याच्याविरुद्ध इगतपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
-
शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड
शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड
हिंगणघाट तालुक्यातील जामगाव, गोविंदपूर शिवारात शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा
रोख रक्कम, मोबाईल, वाहनांसह २७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
जुगार प्रकरणी १९ जणांवर हिंगणघाट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या गुन्ह शोध पथकाची कारवाई
-
ठाण्यात शिवसेना-भाजप वाद वाढणार?
ठाण्यात शिवसेना भाजप वाद वाढण्याची शक्यता आहे. भाजप नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांचा आज गडकरी रंगायतन इथे जनता दरबार भरणार आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या परिवहन विभागाशी संबंधित कार्यक्रमासाठी भाजपचा एकही प्रमुख नेता उपस्थित नव्हता.ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मात्र भाजपकडून ठाण्यात नाईक यांच्या माध्यमातून वाढवण्यात येणाऱ्या सक्रियतेमुळे शिवसेनेचे नेते नाराज असल्याचा पक्षांतर्गत सूर पाहायला मिळत आहे. जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासोबतच पक्ष संघटन मजबूत करण्याचा भाजपचा प्रयत्न अशी चर्चा आहे.
-
कर्जत-जामखेडचा राजकीय आखाडा तापला; रोहित पवारांच्या वक्तव्याला राम शिंदेंचा पलटवार
कर्जत-जामखेडचा राजकीय आखाडा तापला आहे. रोहित पवारांच्या ‘तिसऱ्यांदा पाणी पाजणार’ वक्तव्याला राम शिंदेंनी पलटवार केला आहे. ‘कोण पडतंय, कोण जिंकतंय आणि कोण कोणाला पाणी पाजतंय, हे मैदानात बघू’, असा टोला शिंदेंनी लगावला. कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनावेळी राम शिंदेंचा रोहित पवारांना नाव न घेता टोला लगावला. त्यामुळे रोहित पवार विरुद्ध राम शिंदे संघर्ष पुन्हा चर्चेत आलाय. विधानसभा निवडणुकीला अवकाश असतानाच कर्जत-जामखेडचा राजकीय आखाडा तापला आहे.
-
दहावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरूवात
दहावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास आजपासून सुरूवात झाली आहे. फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू आहे. दहावीच्या परीक्षेसाठी नियमित शुल्कासह ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे.
-
धुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठा बदल, आता डॉ. अजित पाठक नवे अधिष्ठाता
भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय धुळे यांच्या अधिष्ठाता पदावर प्रशासकीय बदल झाला आहे. डॉ. सयाजी व्ही. भामरे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी डॉ. अजित पाठक यांची शासनाकडून नवीन अधिष्ठाता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे .
-
पांडवकडा धबधब्यात 16 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू
खारघरमधील पांडवकडा धबधबा येथे 16 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. पांडवकडा धबधब्यावर जाण्यास बंदी आहे. त्यानंतरही कुर्ला येथील पाचजण पांडवकडा धबधब्यावर पोलिसांची नजर चुकवून आले होते. या पाच जनांपैकी सोळा वर्षीय प्रणव मिश्राचा बुडून मृत्यू झाला आहे. प्रवणच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
-
खारघरमधील पांडवकडा धबधबा इथं 16 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू
खारघरमधील पांडवकडा धबधबा इथं 16 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. पांडवकडा धबधब्यावर जाण्यास नागरिकांना बंदी करण्यात आली. कुर्ला इथले पाचजण पांडवकडा धबधब्यावर पोलिसांची नजर चुकवून आले होते. पाच जणांपैकी सोळा वर्षीय प्रणव मिश्राचा बुडून मृत्यू झाला आहे.
-
अंमली पदार्थांच्या व्यसनाला आळा घालण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देशव्यापी रणनीतीची तयारी
देशातील तरुणाईमध्ये वाढत असलेल्या अंमली पदार्थांच्या व्यसनाला आळा घालण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघप्रेरित 32 संघटना एकत्रितपणे देशव्यापी रणनीती आखण्याच्या तयारीत आहेत. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम जवळील गुडीलोवा येथे 19 ते 21 ऑगस्ट दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत भाजप, विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसह 32 संघटना मंथन करणार आहेत. या बैठकीत अमली पदार्थांचा वाढता विळखा, त्यांचे तरुणांवर होणारे परिणाम आणि भविष्यातील उपाययोजनावर विशेष मंथन होणार आहे.
-
सरोगसीच्या माध्यमातून मुलं देतो म्हणत तब्बल ४७ लाख ८८ हजारांची फसवणूक!
सरोगसीच्या माध्यमातून मुलं देतो म्हणत तब्बल ४७ लाख ८८ हजारांची फसवणूक करण्यात आली. धाराशिवमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून मुलं देण्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील फिर्यादीला मुली आहेत, मुलगा नसल्याने सरोगसीच्या माध्यमातून मुलं देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली. प्रकरण उघडकीस आल्यानंतर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची आरोपींनी धमकी दिली. आधी रोख आणि ऑनलाइन पद्धतीने ४७ लाख ८८ हजार रुपये उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. धनंजय मदने यांच्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
डोंबिवली स्कायवॉकवर फेरीवाल्यांचा धिंगाणा!
डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाच्या स्कायवॉकवरील फेरीवाल्यांच्या अतिक्रमावर पालिका-पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. या कारवाईदरम्यान फेरीवाल्यांचा माल खाली फेकत असल्याचा आरोप करण्यात आला. यावरून फेरीवाले आणि पालिका-पोलिसांमध्ये वाद झाला. महिला फेरीवाल्यांसह काही फेरीवाल्यांची पोलिसांसोबत झटापट झाली. यावेळी तब्बल अर्धा तास स्कायवॉकवर गोंधळ निर्माण झाला होता. संपूर्ण प्रकाराचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
-
लॉरेंस बिश्नोई टोळीच्या नावाने कुटुंबाला १० लाखांच्या खंडणीचे ई-मेल
प्रताप नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुर्वेनगर इथल्या एका ६० वर्षीय रहिवाशाला आणि कॅनडामध्ये काम करणाऱ्या त्यांच्या मुलीला मंगळवारी लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने ई-मेल आले आहेत. यामध्ये १० लाखांची मागणी करण्यात आली असून, पैसे न दिल्यास त्यांना जीवाने मारण्याची आणि त्या महिलेचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याची उघड धमकी देण्यात आली आहे. कॅनडातील एका खासगी कंपनीत कार्यरत असलेल्या मुलीने मंगळवारी संध्याकाळी तिचे ई-मेल खाते उघडल्यावर तिला बिश्नोई टोळीकडून एक संदेश आढळला.
या मेलमध्ये १० लाखांची मागणी करण्यात आली होती आणि पैसे न दिल्यास तिच्या जीवाला धोका निर्माण होईल आणि तिचे फोटो ऑनलाईन लीक केले जातील, असा इशारा देण्यात आला होता. तिने तातडीने स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली आणि नागपूरमधील तिच्या वडिलांशीही संपर्क केला. तिच्या वडिलांनाही असाच एक ई-मेल आला, ज्यामध्ये १० लाखांची तीच मागणी आणि जीवाला धोका असल्याचा इशारा होता. कुटुंबाने राणा प्रताप नगर पोलीस ठाण्यात संपर्क साधला आहे, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून ही तक्रार सायबर क्राइम सेलकडे वर्ग केली आहे.
-
आमदारांच्या गावात चिमुकलीवर अत्याचारानंतर खून; १० वर्षीय मुलीच्या हत्येनं जुन्नर हादरलं!
जुन्नरच्या आमदारांच्या गावातच चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे. अवघ्या १० वर्षीय मुलीला घराशेजारी राहणाऱ्या तरुणाने ओळखीचा गैरफायदा घेत शेतात नेलं आणि अत्याचार करून तिची हत्या केल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झालं आहे. संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, घटनेने नातेवाईक आणि ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. आरोपीवर कठोरात कठोर कारवाईची मागणी होत आहे.
-
नाशिक महापालिकेत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे घेणार आढावा बैठक
नाशिक महापालिकेत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आढावा बैठक घेणार आहेत. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनाचा आढावा घेणार आहेत. गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचीही पंकजा मुंडे माहिती घेणार आहेत. शहरातील विविध भागात नवीन एसटीपी प्लांट उभारण्याचं काम सुरू आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नदी प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा होणार आहे. महापालिका आयुक्तांसह सर्व प्रमुख अधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
-
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या साधूग्रामच्या जागेसाठी अतिरिक्त एक हजार एकर भूसंपादनाला स्थगिती
नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या साधूग्रामच्या जागेसाठी अतिरिक्त एक हजार एकर भूसंपादनाला स्थगिती देण्यात आली आहे. नाशिक महापालिकेच्या तात्पुरती भूसंपादन प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेण्याचं निर्देश न्यायालयाने प्रशासनाला दिले आहेत. एकतर्फी जमीन अधिग्रहणास न्यायालयाने स्थगिती दिली आहे. शेतकरी कृती समितीच्या याचिकेनंतर न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे. महापालिकेकडून अतिरिक्त एक हजार एकर क्षेत्र अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. शेतकऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्यानंतर कृती समितीने न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी ३ सप्टेंबरला पुन्हा सुनावणी होणार आहे.
सुप्रीम कोर्टात आज शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर महत्त्वाची सुनावणी होणार आहे. आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा तसंच पक्षावरील अधिकाराचा प्रश्न त्यांच्या युक्तिवादाच्या केंद्रस्थानी आहे. मागील सुनावणीदरम्यान ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही आक्षेप घेत गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. आयोगाने आपल्या अधिकारक्षेत्राच्या मर्यादा ओलांडल्याचा दावा त्यांनी केला होता. सिब्बल यांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर शिंदे गटाकडून बाजू मांडली जाणार असून, या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. यासह देश- विदेशातील, राज्यातील, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील इतर अनेक घडामोडी जाणून घेण्यासाठी हा ब्लॅाग फॅालो करा.
Published On - Aug 19,2026 8:04 AM
