Maharashtra Breaking News LIVE 13 March 2025 : राज्यातील ग्राहकांना दूध दरवाढीचा फटका बसणार
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 13 मार्च 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

LIVE NEWS & UPDATES
-
राज्यातील ग्राहकांना दूध दरवाढीचा फटका बसणार
मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील ग्राहकांना दूध दरवाढीचा फटका बसणार आहे. गाईच्या आणि म्हशीच्या दूधदरात 2 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दूध दरवाढीची अंमलबजावणी ही 15 मार्चपासून करण्यात येणार आहे. गाईच्या दुधाचं दर हे 58 तर म्हशीचं दूध 75 रुपये प्रतिलीटर असे असणार आहेत.
-
नाशिकमधील घरफोड्या चर्चेचा विषय, चोरट्यांचा धुमाकूळ
नाशिकमधील घरफोड्या चर्चेचा विषय बनला आहे.नागरिकांसह पोलिसांच्याही घरी चोरीच्या घटना घडल्या आहेत. गेल्या पंधरवाड्यात ८ ते १० घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. म्हसरूळ परिसरातील चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना पकडण्याचे नाशिक पोलिसांसमोर आव्हान आहे.
-
-
खोक्या भोसलेच्या अडचणी वाढ, वनविभाग घेणार मोठी अॅक्शन
सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या अडचणीत वाढ होणार आहे. वन विभागाच्या जागेत घर बांधल्या प्रकरणी वन विभागाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वन विभागाच्या गट क्रमांक 51 वर खोक्या भोसलेने अतिक्रमण करून घर बांधले आहे. वन विभागाने मालकी हक्क दावा दाखल करण्यासाठी त्याला सात दिवसाची मुदत दिली आहे.
-
सतीश उर्फ खोक्या भोसलेला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा, पोलिसांना मोठं यश
प्रयागराज न्यायालयाकडून खोक्या भोसलेला ट्रांसिट रिमांड मिळाल्याने पोलिसांना यश मिळाले आहे. आता त्याला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
-
मालाड पश्चिम परिसरात तृतीयपंथीयांचा पाणीपुरी स्टॉलवर धुमाकूळ
मालाड पश्चिम परिसरात होळीचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या तृतीयपंथीयांना स्टॉलधारकाने पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने तृतीयपंथीयांनी तोडफोड केली आहे. चार ते पाच तृतीयपंथीयांनी स्टॉल वरील सामान फेकून दिले. त्यानंतर स्टॉल धारकाने बांबूने तृतीयपंथीयांची धुलाई केली. अद्याप या प्रकरणी पोलिस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.
-
-
तपासणीसाठी आलेल्या उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या घरी जळल्याची धक्कादायक घटना
विरारमध्ये 12 वी कॉमर्स च्या तपासणीसाठी आलेल्या उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या घरी जळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विरारच्या नानाभात या परिसरात राहणाऱ्या प्रिया रोड्रिंक्स या शिक्षिकेच्या घरी ही घटना घडली आहे. उत्तर पत्रिका जळाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना समोर आली. याबाबत बोलींज पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून, जळालेल्या उत्तरपत्रिका आपल्या ताब्यात घेऊन ते पुढील तपास करत आहेत. बारावी कॉमर्सच्या ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स या विषयाच्या 175 उत्तर पत्रिका होत्या. उत्तरपत्रिका नेमक्या कशामुळे जळाल्या याचं नेमकं कारण समोर आलं नाहीये.
-
सीसीटीव्हीत दिसलेला तो व्यक्ती कृष्णा आंधळे नाहीच; नाशिक पोलिसांकडून महत्त्वाची माहिती
नाशिक पोलिसांकडून आता एक नवीनच स्पष्टीकरण समोर आलं आहे. सीसीटीव्हीत दिसलेला तो व्यक्ती कृष्णा आंधळे नाहीच असा दावा आता नाशिक पोलिसांनी केला आहे. कृष्णा आंधळे नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात फिरत असल्याचा नागरिकांनी दावा केला होता. नागरिकांच्या दाव्यानंतर पोलिसांकडून शोध मोहीम देखील सुरु केली होती. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे चेक करत ओळख पटवण्याचा प्रयत्नही पोलिसांकडून सुरू आहे. मात्र आता सीसीटीव्हीत दिसलेला तो व्यक्ती कृष्णा आंधळे नाहीच असा दावा नाशिक पोलिसांनी केला आहे. मात्र पुन्हा त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
-
-
होळीदिवशी पैसै आल्याने लाडक्या बहिणी आनंदी; पैसे काढण्यासाठी भली मोठी रांग
लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचं चित्र सध्या नंदुरबारमध्ये पाहायला मिळत आहे. पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांची भलीमोठी रांग दिसत आहे. होळी सणाच्या सणानिमित्त अकाउंटवर आलेले पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर सकाळपासून महिलांनी गर्दी केली आहे. तसेच होळी सणा निमित्ताने योजनेचे पैसे मिळाल्याने महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
-
मालाड पश्चिम परिसरात तृतीयपंथीयांचा पाणीपुरी स्टॉलवर धुमाकूळ
मालाड पश्चिम परिसरात होळीचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या तृतीयपंथीयांना स्टॉलधारकाने पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने तृतीयपंथीयांनी तोडफोड केली. पैसे मागण्यासाठी गेलेल्या चार ते पाच तृतीयपंथीयांकडून स्टॉलची तोडफोड करण्यात आली. तृतीयपंथीयांनी स्टॉलवरील सामान फेकून दिलं. स्टॉलधारकाने बांबू घेऊन तृतीयपंथीयांची धुलाई केली.
-
बीडमधील आणखी एक मारहाणीचा व्हिडिओ समोर
बीडमधील आणखी एक मारहाणीचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये ओमकार सातपुते तरुण एका मुलाला मारहाण करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्येही अमानुष पद्धतीने मारहाण केली जात आहे. काल ओमकार सातपुते याला दादा खिंडकर यांनी मारहाण केलेला व्हिडिओ समोर आला होता. ओमकार सातपुते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुतेचा चुलत भाऊ आहे. आता ओमकार सातपुते याच्याकडून एका तरुणाला मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.
-
राज्य अर्थसंकल्पात नगरविकास विभागाच्या १० हजार कोटींच्या निधीला कात्री
राज्य अर्थसंकल्पात नगरविकास विभागाच्या १० हजार कोटींच्या निधीला कात्री लावण्यातत आली आहे. त्यामुळे राजकीय साठमारीत राज्यातील शहरांमधील विकासकामांचा वेग मंदावणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, निधी कपातीमुळे विकास कामांना खिळ बसेल आणि त्याचा परिणाम थेट निवडणुकीवर होऊ शकतो.
-
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने जाहीर केली धक्कादायक आकडेवारी
नाशिक- महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने धक्कादायक आकडेवारी जाहीर केली आहे. नाशिकच्या गोदावरीतील पाण्याला गुड टू एक्सलांट असा शेरा म्हणजे पाणी पिण्यायोग्य आहे. गुड टू एक्सलांट शेरा म्हणजे मिनरल वॉटरचे पाणी. राज ठाकरेंनी नदी प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला असताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची आकडेवारी चर्चेत आली आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारी आणि शेऱ्यावरून नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. गोदावरीतील पाणी पिण्यायोग्य असल्याचा दावा केल्यानं गोदाप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
-
धुलीवंदनासाठी बाजारपेठा सजल्या
होळी आणि धुलीवंदनासाठी लोणावळ्यातील बाजारपेठा सजल्या हेत धुलीवंदनासाठी पिचकारी आणि रंगांच्या किंमतीत 30 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले. लोणावळा शहरात होळी आणि धुलीवंदनाची धामधूम सुरू झाली आहे. धुलीवंदनासाठी बाजारात विविध रंग, पिचकार्या आणि रंगांची खेळणी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
-
होळीसाठी 13 विशेष रेल्वे
उन्हाळ्याच्या सुटीत लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना मोठी गर्दी असते. ही बाब विचारात घेऊन पुणे रेल्वे विभागाने होळीनिमित्त पुणे ते दानापूर, गोरखपूर आणि मुझफ्फरपूरसाठी एकूण 13 विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून रेल्वे स्टेशनवर मोठा मंडप टाकण्यात आला आहे.
-
पुण्यात महायुतीत धुसफूस
काँग्रेसच्या माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी नुकतेच शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. धंगेकर यांनी शिंदे यांचा सेनेत प्रवेश केल्यानंतर महायुतीत वादाचा भडका उडाला आहे. आधी चंद्रकांत पाटील यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. तर आता राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा रवींद्र धंगेकर यांना फैलावर घेतलं आहे.
-
कर्ज काढून दिवाळी, राऊतांची सरकारवर टीका
९ लाख ३२ हजार कोटींचा राज्यावर कर्ज आहे , कर्ज काढून राज्य चालवलं जात आहे , राज्य लुटलं जात आहे, कर्जाच्या ओझं दिवसेंदिवस वाढत आहे , हे माहीत असताना लाडक्या बहिणी सारख्या योजना आणल्यात आणि आता ते बंद करण्याच्या मार्गावर आहे शिवभोजन थाळी सारख्या गरिबांच्या योजना , शिधा योजना अश्या अनेक योजना बंद केल्या , राज्य कस चालवणार असा प्रश्न , कर्ज काढून दिवाळी साजरी करणं किंवा निवडणुकात मतं विकत घेणं म्हणजे हा कर्जबाजारी महाराष्ट्राची तिजोरी या लोकांनी महिलांचा मते विकत घेण्यासाठी वापरली, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
-
सतीश यांचा काटा काढण्यासाठी जादूटोण्याचा प्रयोग
आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश तात्याबा वाघ (वय 58, रा. फुरसुंगी, सासवड रस्ता) यांच्या खुनाचा मुख्य सूत्रधार हा अक्षय जावळकर, तर त्याला भरीस घालणारी ही मोहिनी वाघच असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. त्यांनी सतीश यांचा काटा काढण्यासाठी जादूटोण्याचा प्रयोग केल्याचा धक्कादायक प्रकार आरोपपत्रातून समोर आला आहे.
-
मुंबईत डिझेल दोन रुपयांनी स्वस्त
मुंबईत इंधन स्वस्त झाले. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठा दिलासा मिळाला आहे. IOCL च्या आकड्यांनुसार, मुंबईत पेट्रोलच्या किंमतीत 44 पैसे प्रति लिटरची कपात दिसली. तर किंमत 103.50 रुपये प्रति लिटर झाली आहे. तर डिझेलच्या किंमतीत सर्वाधिक 2.12 रुपये इतकी कपात झाली आहे. त्यानंतर डिझेलची किंमत 90.03 रुपये प्रति लिटर झाले.
-
उन्हाचे चटके, शाळेची वेळ कमी करा
उन्हाचे चटके बसू लागले आता तरी शाळेची वेळ कमी करा चिमुरड्यांची सरकारकडे आर्त हाक दिली आहे. सध्या उन्हाची दाहकता वाढू लागल्याने त्याच्या झळा आता लहान लहान मुलांनाही बसू लागले असून शाळेची वेळ कमी करा अशी मागणी आता विद्यार्थ्यांबरोबर पालकांनीही केली आहे.
-
काही दिवसांनी लाडकी बहीण योजनाही बंद करतील – संजय राऊत
शिवभोजन, शिधासारख्या योजना बंद केल्या जा आहेत. सत्ताधाऱ्यांनी महिलांची मतं विकत घेतली, काही दिवसांनी लाडकी बहीण योजनाही बंद करतील – संजय राऊत यांचा घणाघाती हल्ला.
-
गोंदियात धक्कादायक प्रकार, शेतशिवारात गळा कापलेल्या अवस्थेत आढळला तरुणाचा मृतदेह
गोंदियाच्या आमगाव तालुक्यातील सावंगी-पदमपूर शेतशिवारात गळा कापलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळला. होळीच्या पर्वावर हत्या झाल्याने खळबळ. मृत तरूण हा काल संध्याकाळीच घराबाहेर पडला होता. घटनास्थळी आमगाव पोलीस दाखल झाले असून तपास करण्यात येत आहे.
-
पिंपरी- चिंचवड शहरात वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच
पिंपरी- चिंचवड शहरात वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. पिंपरी- चिंचवड मधील मोशीत दोन गटाच्या वादात 3 दुचाकींची आणि एक चारचाकी वाहनांची 10 ते 15 जणांनी तोडफोड केली. बुलेटच्या सायलेन्सर मधून फटाके का वाजवतो म्हणून विचारले असता केली वाहनांची तोडफोड. दुपारी देखील शहरात ४- ५ वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. पुन्हा एकदा रात्री उशिरा किरकोळ कारणावरून तीन वाहन फोडण्यात आली.
-
होळी सणावर पोलिसांच्या निर्भया पथकाची नजर
होळी सणावर पोलिसांच्या निर्भया पथकाची नजर असणार. महिलांची छेड काढल्यास थेट तुरुंगाची हवा खावी लागणार. होळी आणि धुळवडीच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी गैरप्रकार टाळण्यासाठी 5 हजाराहून जास्त पोलीस बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरवणार आहेत. महिलांच्या दामिनी पथकाची खास गस्त असणार. महिलांच्या अंगावर रंग किंवा पाणी फेकणे छेडछाड, विनयभंग होण्याची शक्यता लक्षात घेऊन यावर आवर घालण्यासाठी पोलीस महीलांचे पथक नेमण्यात आले आहे.
-
जळगाव विमानतळावरची सर्व उड्डाणे रद्द
जळगाव विमानतळावर उतरणाऱ्या विमानांना अडथळा निर्माण झाल्याने आज १३ मार्च रोजीची सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. अहमदाबाद, पुणे तसेच सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत, अशी माहिती विमानतळ प्राधिकरणाचे प्रवक्ते यांनी दिली आहे.काल १२ मार्च रोजीची सुद्धा सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली होती. अचानक विमानसेवा रद्द झाल्यामुळे शेकडो प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली असून वेगवेगळ्या विमानतळांवर अडकून पडलेल्या प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली आहे.
-
नादुरुस्त ‘शिवनेरी’, ‘शिवशाही’ बस निघणार मोडीत
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) आयुर्मान संपलेल्या आणि नादुरुस्त ७२ ‘शिवशाही’ आणि ‘शिवनेरी’ बस मोडीत काढण्याचा निर्णय पुणे ‘एसटी’ विभागाने घेतला आहे. शुक्रवारी (२१ मार्च) या बसचा लिलाव करण्यात येणार असून, केंद्र सरकारच्या ‘मेटल स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशन’मधील (एमएसटीसी) एजन्सीमार्फत या नादुरुस्त बससाठी बोली लावण्यात येणार आहे. या माध्यमातून अडीच ते तीन कोटी रुपये प्राप्त होण्याचा अंदाज ‘एसटी’ महामंडळाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
-
बीड पोलिसांनी खोक्या भोसलेचा ताबा घेतला
बीडवरुन गेलेल्या पोलीस पथकाने खोक्या भोसलेचा ताबा घेतला. आज 11 वाजता त्याला प्रयागराज येथील कोर्टात हजर करण्यात येणार आहे. काल यूपी पोलिसांनी सतीश ऊर्फ खोक्या भोसलेला प्रयागराज येथून ताब्यात घेतलं होतं.
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला 14 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने बुधवारी दिले. त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. पिंपरी-चिंचवड मधील मोशीत दोन गटाच्या वादात तीन दुचाकींची आणि एक चारचाकी वाहनांची 10 ते 15 जणांनी केली तोडफोड. बुलेटच्या सायलेन्सर मधून फटाके का वाजवतो म्हणून विचारले असता केली वाहनांची तोडफोड. दुपारी देखील शहरात 4- 5 वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. पुन्हा एकदा उशिरा रात्रीच्या सुमारास किरकोळ कारणावरून तीन वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.
Published On - Mar 13,2025 8:08 AM





