Maharashtra Breaking News LIVE : कल्याण डोंबिवलीतील 27 गावातील त्या कर्मचाऱ्यांना केडीएमसी देणार नियुक्ती पत्र
Maharashtra Political News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

जालना शहर महानगरपालिका प्रशासनाची मागील काही दिवसापासून बेकायदेशीर अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम सुरूच आहे. आतापर्यंत अनेक अतिक्रमणांवर पालिका प्रशासनाने हातोडा टाकत ही अतिक्रमणे जमीनदोस्त केली. शहरातीलच संजय नगर आणि मिलत नगर भागात पुन्हा एकदा डीपी रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा करणारी बारा अतिक्रमणे पालिका प्रशासनाने पाडून टाकली. यामुळे वाहतुकीसाठी हा रस्ता मोकळा होणार आहे. दरम्यान जालना शहरातील रस्ते मोकळे होण्याच्या उद्देशाने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी मार्च 2026 मध्ये इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेला खाजगीरीत्या प्रविष्ट होण्यासाठी 17 नंबरचा अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असून इच्छुक विद्यार्थ्यांना एक ऑगस्ट पासून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येईल.
LIVE NEWS & UPDATES
-
रायगड: मनसे विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय पदाधिकारी प्रशिक्षण शिबीराचं आयोजन
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या 19 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय पदाधिकारी प्रशिक्षण शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे. स्डिस्कव्हर रिसॉर्ट, कर्जत, रायगड या ठिकाणी हे शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. 31 जुलै ते 1 ऑगस्ट 2025 या कालावधीतील या शिबीरासाठी मनसे नेते अमित ठाकरे देखील हजर आहेत
-
रायगड: दोन उनाड कुत्र्यांचा लहान मुलावर हल्ला
म्हसळा शहरात उनाड कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली असून आज दोन उनाड कुत्र्यांनी एका लहान शाळकरी मुलावर शाळेत जात असताना हल्ला केला. मात्र सावध झालेल्या या चिमुरड्याने कसंबसं या श्वानाच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली. या घटनेचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
-
-
कल्याण डोंबिवलीतील 27 गावातील त्या कर्मचाऱ्यांना केडीएमसी देणार नियुक्ती पत्र
कल्याण डोंबिवलीतील 27 गावातील त्या कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश15 ऑगस्ट रोजी केडीएमसी नियुक्ती पत्र देणारशिवसेना आमदार राजेश मोरे यांच्या केडीएमसी आयुक्तांसोबत बैठकीत निर्णय -
धाराशिवच्या महिला रुग्णालयात शिरला साप
धाराशिवच्या महिला रुग्णालयात शिरला साप
रुग्णालयात साप शिरल्याने रुग्णांमध्ये भीती, वर्षभरात चार ते पाच वेळेस साप आढळल्याची माहिती
रुग्णालयात अनेक रुग्णांवर उपचार सुरू असताना साप शिरल्याने एकच गोंधळ
मनियार जातीच्या सापाचा रुग्णालय परिसरात खुला वावर
रुग्णालय परिसरात असलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे रुग्णालय सापाचा वावर
-
मंत्रिपद राहणार, खातं जाणार, माणिकराव कोकाटेंना क्रीडा खातं : सूत्रांची माहिती
कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचं खातेबदल करण्याचा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोकाटे आणि आणि क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यात खात्यांची अदलाबदल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार माणिकराव कोकाटे यांचं कृषीखातं क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे.
-
-
इगतपुरीच्या हर्ष व्यास याची एशियन पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण कमाई
इगतपुरीच्या हर्ष व्यास याने एशियन पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत 2 सुवर्ण पदकं पटकावत भारताचं नाव उंचावलं. हर्षने व्हिएतनाममध्ये झालेल्या स्पर्धेत ही कामगिरी केली. हर्षचं या विजयानंतर इगतपुरी जोरदार स्वागत करण्यात आलं. तसेच हर्षची आता रशियात होणाऱ्या अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
-
प्रांजल खेवलकरांसह सर्व आरोपींना न्यायलयीन कोठडी
या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. प्रांजल खेवलकरांसह सर्व आरोपींना न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शिवाजी नगर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. त्यानुसार खेवलकरांसह इतर 4 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रांजल खेवलकर हे रोहिणी खडसे यांचे पती आहेत.
-
धनंजय मुंडे यांची मंत्रिपदासाठी लॉबिंग?
धनंजय मुंडे यांची मंत्रिपदासाठी लॉबिंग करत असल्याचं म्हटलं जात आहे. धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 2 वेळा भेट घेतली. मुंडेंनी काल आणि आज (30 आणि 31 जुलै) मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुंडेंना कृषी खात्यातील घोटाळ्यांच्या आरोपामध्ये क्लिन चिट मिळाली. त्यानंतर आता मुंडेंना मंत्रिमंडळात घेतलं जाणार का? अशी चर्चा आहे.
-
जलसंधारण विभागातील भरती रखडल्याने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांचं आंदोलन
तीन ते चार वर्षांपासून जलसंधारण विभागातील भरती रखडल्याने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे पुण्यात आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनाला जळगावमधील विद्यार्थ्यांनी देखील पाठिंबा दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करावी अशी मागणी करण्यात आली आहे. मागील चार वर्षांपासून आम्ही सरळ सेवा भरतीचा अभ्यास करत आहोत .मात्र शासन भरती न काढता आमच्या संयमाची परीक्षा घेत असल्याची प्रतिक्रिया यावेळी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
-
भाजप नेते किरीट सोमय्या नाशिकमध्ये दाखल
भाजप नेते किरीट सोमय्या नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेतली. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यात बैठक सुरू झाली आहे. भोंगेमुक्त नाशिक संदर्भात पोलिस आयुक्तांची सोमय्या यांनी भेट घेतली.
-
ट्रम्पच्या टॅरिफवर पियुष गोयल यांचे विधान
ट्रम्प यांच्या टॅरिफ घोषणेनंतर सरकारने संसदेत महत्त्वाची माहिती दिली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले की, सरकार देशाच्या हितासाठी आवश्यक पावले उचलत आहे.
-
माणिकराव कोकाटेंकडून खाते काढून घेण्याचा निर्णय- सूत्र
माणिकराव कोकाटे यांना विधानसभेतील रमी प्रकरण चांगलंच भोवणार अशी चर्चा रंगली आहे. त्यांच्याकडे असलेलं कृषिमंत्रीपद काढून दुसरं देण्याचा निर्णय घेतल्याचं सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार आणि तटकरे यांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं बोललं जात आहे.
-
मालेगाव खटल्यातील आरोपी निर्दोष सुटल्यानंतर भाईंदरमध्ये जल्लोष
NIA कोर्टाने मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, कर्नल पुरोहित आणि त्यांच्या सहकाऱ्यांना निर्दोष मुक्त केल्यानंतर भाईंदर पश्चिमेतील शिवसेना गल्लीनाका येथे फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.
-
साईबाबांच्या नाण्यांची पुरातत्व विभागाकडून खात्री करा- राधाकृष्ण विखे पाटील
साईबाबांच्या नाण्यांवर काही लोकांनी बऱ्याच काळ धंदा केला आहे.दावे -प्रतिदावे करणाऱ्यांकडील नाणी जमा करून पुरातत्व विभागाकडून शहानिशा करावी अशी मागणी अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
-
धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाला – प्रकाश सोळुंके
बहुजन समाजाला आजपर्यंत मंत्रीपद मिळालं नाही, ही खंत प्रकाश सोळुंके यांनी प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केली आहे. मात्र आमदार धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाला आपला कुठलाही विरोध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं असून त्यांना आमदार प्रकाश सोळुंके यांनी शुभेच्छा दिल्या आहे.
-
प्रांजल खेवळकर यांना कोर्टात हजर करणार
खराडी ड्रग्स पार्टी प्रकरणात प्रांजल खेवळकरांची रवानगी आज येरवडा जेलमध्ये होण्याची शक्यता आहे.प्रांजल खेवलकरांसह 4 आरोपींना पुणे पोलिसांचे गुन्हे शाखा 4 वाजता कोर्टात हजर करणार आहे.
-
आतंकवादाला जात धर्म रंग पंथ नसतो; जितेंद्र आव्हाडांचे मालेगाव प्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तताबाबत वक्तव्य
जितेंद्र आव्हाडांनी मालेगाव प्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याबाबत मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की, “जो काही न्याय दिला असेल त्याच्या विरोधात किंवा बाजूने बोलण्याचा मला अधिकार नाही.ज्या दिवशी बॉम्ब ब्लास्ट मध्ये सर्व आरोपींना शोधलं आरडीएक्स कोणाच्या घरी होतं शोधून काढलं.आरडीएक्स आलं कुठून हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच राहिलाय 65 किलो आरडीएक्स आलं कुठून?आतंकवादाला जात धर्म रंग पंथ नसतो” असं म्हणत त्यांनी अनेक सवालही उपस्थित केले.
-
सोलापूरमध्ये महापालिकेच्या शाळेची दुरावस्था; इमारत अत्यंत धोकादायक स्थितीत
एकीकडे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर झालेले असतानाच दुसरीकडे सोलापूर महापालिकेच्या शाळेची दुरावस्था चव्हाट्यावर आली आहे. महापालिकेच्या जयभवानी प्रशालेची इमारत अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याचे पाहायला मिळतेय. या शाळेच्या इमारतीला ठिकठिकाणी तडे गेले असून, पावसाळ्याच्या दिवसात वर्गांमध्ये मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. महापालिकेच्या या शाळेत सध्या एकूण 250 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
-
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आरोपींच्या विरोधातील बहुतांश आरोप हे चुकीचे असल्याचं म्हटलं गेलं. या प्रकरणातील 7 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
-
हिंदुत्ववादी संघटनांना फटाके फोडण्यास पोलिसांकडून मज्जाव
हिंदुत्ववादी संघटनांना फटाके फोडण्यास मालेगावात पोलिसांकडून मज्जाव करण्यात आला. त्यावरून संघटना आक्रमक झाल्या आहेत. जल्लोष करतेवेळी फटाके फोडण्याचा प्रयत्न करत असताना पोलीस आणि हिंदु संघटना कार्यकर्ते यांच्यात वाद पाहायला मिळाला.
-
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणांमध्ये निकाल असाच लागेल असा आम्हाला आधीच वाटत होतं
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणांमध्ये निकाल असाच लागेल असा आम्हाला आधीच वाटत होतं, अशी प्रतिक्रिया आमदार मैलाना मुक्ती मोहम्मद इस्माईल यांनी दिली. 2008 साली ज्या मोटरसायकलवर ठेवून बॉम्ब ब्लास्ट करण्यात आला ती मोटरसायकल साध्वी प्रज्ञासिंह यांच्या नावावर होती त्यानंतर एटीएस कडून तपास सुरू झाला आणि त्यामध्ये जनरल पुरोहित आणि असिमानंद यांचे देखील नाव समोर आले, असे ते म्हणाले.
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
आतंकवाद भगवा न कभी था, ना है, ना कभी रहेगा, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात दिली आहे.
-
ही सणसणीत चपराक -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
भगवा दहशतवाद कोणी आणला? तत्कालीन सरकारने हा शब्द आणला. हिंदू हा सहिष्णू असतो. आजच्या न्यायालयाच्या निकालाने त्यांना दिलेली ही सणसणीत चपराक आहे. न्याय उशीरा मिळाला आहे. पण ठीक आहे, न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
-
हा हिंदुत्वाचा विजय
मला जेंव्हा तपसयंत्रांनी बोलावल तेंव्हा मी सहकार्याच्या भावनेने आले होते. पण मला पोलीस कोठडीत ठेवेल अपमान केला मारहाण केली.’ कोर्टासमोर बोलताना साध्वी प्रज्ञाना रडू कोसळल. पुढे त्या म्हणाल्या, ‘माझा समाजात अपमान झाला. पूर्ण आयुष्य संन्यास घेऊन जगले पण मला लोक वाईट नजरेने बघायचे, अपमानित करायचे. माझ्यावरून भगव्या रंगला कलंकित केल गेले. १७ वर्षात मी पहिल्यांदा आनंदी झाले आहे. अपमानच आयुष्य मी १७ वर्षे जगत होते. भगवाला आतंकवाद बोलल आज भगव्याचा विजय झाला हिंदुत्वाचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया साध्वी प्रज्ञा सिंग यांनी दिली.
-
युपीए लावणे हे चुकीचे – विशेष न्यायालय
प्रकरणात मोक्का हटवण्यात आला. युएपीए लागला तोही योग्य नव्हता असे कोर्टाने निरीक्षण नोंदवले. युपीएचे 16 आणि 17 ही कलमं लावल्या जाऊ शकत नाही असे कोर्टाने निरीक्षण नोंदवले.
-
सुप्रीम कोर्टात दाद मागणार
माझी मुलगी वडापाव आणण्यासाठी घराबाहेर पडली होती. नंतर कळालं तिचा देखील ब्लास्ट मध्ये मृत्यू झाला. हा निर्णय आम्हाला मान्य नाही. खूप चुकीचा झाला आहे. हेमंत करकरे यांनी अत्यंत सखोल तपास केला. अनेक पुरावे देखील सादर केले. तरी देखील निर्दोष मुक्तता झाली. आम्ही या विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे शेख लियाकत मोईउद्दीन म्हणाले.
-
कोर्टासमोर बोलताना साध्वी प्रज्ञा यांना कोसळलं रडू
“मला जेव्हा तपास यंत्रणांनी बोलावलं, तेव्हा मी सहकार्याच्या भावनेनं आले होते. पण मला पोलीस कोठडीत ठेवलं, माझा अपमान केला, मला मारहाण केली. माझा समाजात अपमान झाला. संपूर्ण आयुष्य संन्यास घेऊन जगले. पण मला लोक वाईट नजरेनं बघायचे, अपमानित करायचे. माझ्यावरून भगव्या रंगला कलंकित केलं,” असं कोर्टासमोर बोलताना साध्वी प्रज्ञा यांना रडू कोसळलं.
-
मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी कोर्टाचा निकाल
मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. फक्त संशयाच्या आधारावर आरोपींना शिक्षा होऊ शकत नाही, असं कोर्टाने म्हटलंय.
-
दगडफेक झाली होती, गोळीबार झाला होता.. असा सरकारी युक्तिवाद
दगडफेक झाली होती, गोळीबार झाला होता, असा सरकारी युक्तिवाद होता. बाईकवर ब्लास्ट झाला हे सिद्ध झालं नाही, असं कोर्टाने म्हटलंय. आधी नाशिक पोलीस नंतर एटीएस आणि नंतर एनआयए अशा यंत्रणांनी तपास केलेला आहे. बॉम्ब स्फोटानंतर तिथे दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. बोटांचे ठसे सापडले नव्हते. साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या नावाने असलेल्या बाईकचा चेसिस नंबर नीट अढळला नव्हता. नंबरप्लेट व्यतिरिक्त चेसिस नंबर आवश्यक असतो, असं कोर्टाने म्हटलंय.
-
प्रसाद पुरोहित यांनी आरडीएक्स आणल्याचा पुरावा रेकॉर्डवर नाही- कोर्ट
सुरुवातीला सरकारी युक्तिवाद वाचून दाखवला जात आहे. कुणावर काय आरोप आहेत, हे वाचून दाखवलं जात आहे. साध्वी प्रज्ञा यांनी पुढे बसण्याची विनंती केली आहे. बाईक व्यतिरिक्त काही बॉम्ब होते, असा सरकारचा युक्तिवाद होता. बॉम्बस्फोटात ९५ जण जखमी झाले होते. या प्रकरणाचा तीन ते चार एजन्सी तपास करत होते. प्रसाद पुरोहित यांनी आरडीएक्स आणल्याचा पुरावा रेकॉर्डवर नाही, असं कोर्टाने म्हटलंय
-
कर्नल पुरोहितनं आरडीएक्सची व्यवस्था केली, सरकारचा युक्तीवाद
कर्नल पुरोहितनं आरडीएक्सची व्यवस्था केली, असा सरकारचा युक्तीवाद आहे. न्यायाधीश ए. के. लाहोटींकडून निकालाचं वाचन सुरू आहे.
-
न्यायालयात निकालाचं वाचन सुरू
कोर्टात सरकारच्या युक्तीवादाचं वाचन सुरू आहे. कर्नल पुरोहित जपनाम करत आहेत.
-
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालाला सुरुवात
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरांसह आठ जणांचं भवितव्य ठरणार आहे. मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालाला सुरुवात झाली आहे.
-
17 वर्षांनंतर आज लागणार मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल
थोड्याच वेळात मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल लागणार आहे. NIA विशेष न्यायालयात फैसला होणार आहे. न्यायाधीश कोर्टरुममध्ये दाखल झाले असून काही क्षणात हा निकाल लागणार आहे.
-
माणिकराव कोकाटे पुणे दौऱ्यावर, कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन कार्यशाळेत सहभागी होणार
आज कृषीमंत्री माणिकराव कोकाटे पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित केलेल्या बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन कार्यशाळेत सहभागी होणार आहेत. या कार्यशाळेत ते दिवसभर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेच्या माध्यमातून कृषी व्यवसायातील नवनवीन संधी आणि ग्रामीण भागाच्या विकासावर भर दिला जाण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमात कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ, शेतकरी आणि उद्योजक सहभागी होऊन नवीन कल्पना आणि तंत्रज्ञानावर चर्चा करतील.
-
आदिवासी आश्रम शाळेत भिंत कोसळून एका विद्यार्थिनीचा मृत्यू, संस्थाचालकांवर कारवाई करण्याची मागणी
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट येथील नागापूर येथील वसंतराव नाईक आदिवासी आश्रम शाळेत भिंत कोसळल्याने एका १४ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. तर तीन विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या. या घटनेनंतर माजी आमदार राजकुमार पटेल आणि त्यांचे पुत्र रोहित पटेल यांनी आश्रमशाळेचे संस्थाचालक आणि मेळघाटचे भाजप आमदार केवलराम काळे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. घटनेतील मृत विद्यार्थिनीचा मृतदेह आदिवासी प्रकल्प कार्यालयासमोरून नेत असताना राजकुमार पटेल आणि रोहित पटेल यांच्यासह आमदार काळे यांचे कार्यकर्ते समोरासमोर आले, ज्यामुळे त्यांच्यात बाचाबाची झाली. यानंतर चिखलदरा पोलिसांनी राजकुमार पटेल आणि त्यांच्या मुलाला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, आश्रमशाळेच्या प्रशासनाकडून दोघांना निलंबित करण्यात आले असून, या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समितीही नेमण्यात आली आहे.
-
वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ प्रकरणी पुणे पोलिस उचलणार कठोर पावले
पुणे शहरात वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्याच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी आता कठोर पाऊले उचलली आहेत. गेल्या दीड वर्षांत शहरात अशा १४० हून अधिक घटनांची नोंद झाली असून यात १४२ जणांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यात अल्पवयीन मुलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे. त्यामुळे, यापुढे वाहनांची तोडफोड करणाऱ्या आणि ज्यांच्यावर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत, अशा आरोपींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना थेट तुरुंगात पाठवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.
-
प्रांजल खेवलकरला कोर्टात केले जाणार हजर
पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिस कोठडीत असणाऱ्या प्रांजल खेवलकरांना आज कोर्टात हजर केले जाणार आहे.
-
मुंबईच्या विशेष न्यायालयात निकाल
मुंबईच्या विशेष न्यायालयात हा निकाल सुनावला जाणार आहे.
-
मालेगाव बॉम्बस्फोटाचा आज निकाल
मालेगाव बॉम्बस्फोटाचा आज निकाल लागणार आहे. या निकालाकडे सर्वांच्या नजरा आहेत.
-
मोदींच भारताकडे लक्ष नाही- संजय राऊत
संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत म्हटले की, मोदींचा भारताकडे लक्ष नाही
-
त्या तीन महिलांचा पार्टीशी संबंध नाही
पोलीस तपासात माहिती समोर. न्यायालयात खेवलकरांची पोलीस कोठडी मागताना पोलिसांनी दिलं होतं संशयित तीन महिलांचा शोध घेण्याचं कारण. पार्टीमध्ये आणखी तीन महिलांचा समावेश होता, मात्र पोलीस येताच त्या महिला तिथून निघून गेल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं. मात्र पोलीस तपासात या महिलांचा पार्टीशी कोणताही संबंध नसल्याचे तपासात स्पष्ट झालय.
-
कोयना धरणाचा पाणी विसर्ग आणखी कमी करणार
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस कमी झाल्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 4 फुटांवरून 2 फुटांपर्यंत खाली करून फक्त 10,571 क्युसेक पाणी विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. एकूण 12,671 क्युसेक विसर्ग सुरू रहाणार आहे.
-
बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला
बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. नाशिकच्या चेहडी रोड परिसरातील गाडेकर मळा खर्जुल मळा परिसरात बिबट्याचा वावर. पाळीव कुत्र्यावर हल्ला करत बिबट्याने केले ठार. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. परिसरात पिंजरा लावण्याची नागरिकांकडून मागणी
-
उद्यापासून दहावी बारावीच्या परीक्षेसाठी करता येणार नोंदणी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी मार्च 2026 मध्ये इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेला खाजगीरीत्या प्रविष्ट होण्यासाठी 17 नंबरचा अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असून इच्छुक विद्यार्थ्यांना एक ऑगस्ट पासून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येईल.
Published On - Jul 31,2025 8:18 AM
