Maharashtra Breaking News LIVE : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसाकडून दिव्या देशमुखचे अभिनंदन
Maharashtra Political News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

तिसरी ते दहावीपर्यंत तिसरी भाषा शिकण्याचे धोरण नवीन अभ्यासक्रमात काढून टाकण्यात आली आहे. राज्य सरकारने तिसरी ते दहावीसाठी शालेय शिक्षणाचा नवीन अभ्यासक्रम मसुदा तयार केला आहे. www.maa.ac.in अभ्यासक्रम पहाता येणार असून 28 जुलैपासून नागरिकांना अभिप्राय देता येणार आहे. अशी माहिती एससीआरटीचे संचालक राहुल रेखावार यांनी दिली आहे. तर अनेक ठिकाणी पावसाने देखील जोर धरला आहे, त्यामुळे खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला जाणार आहे. 18 हजर क्यूसेक्स वेगाने सुरु असलेला विसर्ग 8 वाजल्यापासून 22 हजार क्यूसेक्सने केला जाणार आहे. अशात नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कल्याण तरुणी मारहाण प्रकरणातील आरोपी गोकुळ याला मानपाडा पोलीस आज पुन्हा न्यायालयात हजर करणार आहेत. वॉचमन मारहाणप्रकरणी दोन दिवसांची पोलीस कोठडी आज संपते आहे. तरुणीला मारहाण, न्यायालय गोंधळ, पोलिसांशी अरेरावी आणि पत्रकारांना धमकी पाहता परिसरात तणाव व संतापाचे वातावरण निर्माण झालं आहे. ताब्यात द्या, धडा शिकवू! आरोपी सुटला तर त्याचे ‘विशेष स्वागत’ करू मनसेपाठोपाठ ठाकरे गटाने इशारा दिला आहे! यासह देश-विदेश, महाराष्ट्र, क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
LIVE NEWS & UPDATES
-
जायकवाडी 83 टक्के भरले, मात्र मराठवाड्यातील धरणे कोरडी
जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असाच पाऊस सुरू राहिल्यास पुढील आठ ते दहा दिवसात जायकवाडी शंभर टक्के भरणार आहे. दुसरीकडे मराठवाड्यातील 75 धरणांची अवस्था दयनीय आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 16 धरणात 19 टक्के पाणीसाठा आहे. जालना जिल्ह्यातील 8 प्रकल्पात 18 टक्के पाणीसाठा. बीड मध्ये 17 प्रकल्पात 54 टक्के पाणीसाठा असल्याची माहिती समोर आली आहे.
-
कोल्हापूर: ‘आप’कडून भ्रष्ट महापालिका यंत्रणेचा निषेध
महापालिकेच्या ड्रेनेज प्रकल्पाचे काम मिळालेल्या ठेकेदाराने बिल काढण्यासाठी अधिकाऱ्यांना टक्केवारी दिल्याचे आरोप करत त्याचे स्क्रिनशॉट सार्वजनिक केले आहेत. यानंतर टक्केवारीत बरबटलेल्या महापालिकेतील भ्रष्ट यंत्रणेचा निषेध करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या प्रतिकात्मक कचरा पेट्यांना नोटा चारून, तसेच महापालिकेसमोर नोटा उधळून आम आदमी पार्टीने निषेध केला.
-
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसाकडून दिव्या देशमुखचे अभिनंदन
दिव्या देशमुखने बुद्धीबळ वर्ल्ड चॅम्पियनशीप जिंकली आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला अतीशय आनंद आहे नागपूर ची महाराष्ट्राची दिव्या देशमुख हिने वर्ल्ड चॅम्पियनशीप जिंकली आहे. तिने आतापर्यंत 35 मेडल जिंकले, त्यापैकी 25 मेडल गोल्ड आहे. ज्या खेळाडूंनी जगातील लेव्हल वर मोठी कामगिरी केली आहे, त्याविषयी आम्ही क्रीडा मंत्री यांच्या सोबत बोलणार आहोत आणि खेळाडूंचा योग्य सन्मान केला जाईल.
-
सिंधुदुर्ग: मनसेकडून उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांना दारूच्या बाटल्यांचा हार घालण्याचा प्रयत्न
सिंधुदुर्गातील राज्य उत्पादन शुल्क विभाग अवैध दारू विक्रीवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत मनसेने अनोखे आंदोलन केले. मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी थेट राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कुडाळ येथील कार्यालयात धडक दिली. यावेळी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त करत गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्यांचा हार उत्पादन शुल्क निरीक्षक मिलिंद गरुड यांच्या गळ्यात घालण्याचा प्रयत्न केला.
-
पहलगाममध्ये दहशतवादी कसे आले? गौरव गोगई यांचा सवाल
पहलगाममध्ये दहशतवादी कसे आले? असा सवाल गौरव गोगई यांनी संसदेत ऑपरेशन सिंदूरबाबत चर्चेदरम्यान उपस्थित केला आहे. ऑपेरशन सिंदूरची सत्यता समोर आली पाहिजे. प्रश्न विचारणं विरोधकांचं कर्तव्य आहे. प्रश्न विचारणार, अंसही गोगई म्हणाले.
-
-
वसईत खड्ड्यांमुळे मालवाहतूक करणाऱ्या रिक्षाचा अपघात
वसईत खड्ड्यामुळे एका तीन चाकी मालवाहतूक करणाऱ्या रिक्षाचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. सकाळी वसई पूर्वेच्या धुमाळ नगर शालीमार हॉटेल समोर मुख्य रस्त्यावर एका ही घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र मालवाहतूक रिक्षाचा समोरील चाक मोडून पडलं. वसईत मुख्य रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना या रस्त्यावरून खड्डे चुकवत मार्ग काढताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे अपघात होत आहेत. प्रशासनाने लवकरात लवकर खड्डे बुजवावे, अशी मागणी केली जात आहे.
-
कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळेत देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यतीचे यशस्वी आयोजन
सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे येथे आज देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी या शर्यतीचा फायनल राऊंड पार पडला. या नागोळेच्या मैदानात प्रथम क्रमांकसाठी रमेश खोत याचा सुलतान आणि राम्या या पिपळगावच्या बैल जोडीने मैदान मारले. सुलतान आणि राम्या हे ऐतिहासिक भव्य राज्यस्तरीय “देवभाऊ केसरी” बैलगाडा शर्यतीचे पाहिले मानकरी ठरले.
-
भारतीय सैन्याच्या कारवाईत 100 पेक्षा जास्त अतिरेकी मारले गेले : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर चर्चा केली जात आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ऑपेरशनबाबत संसेदत माहिती देत आहेत. ऑपेरशन सिंदूरवरील चर्चेतेील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे
- पहलगाममध्ये धर्म विचारुन नागरिकांची हत्या करण्यात आली : राजनाथ सिंह
- 22 एप्रिलच्या पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर करण्यात आलं.
- भारतीय सैन्यानं 6-7 मे रोजी कारवाई केली.
- ऑपरेशन सिंदूरवेळी आपल्याकडे बरेच पर्याय होते : राजनाथ सिंह
- पाकमधल्या दहशतवाद्यांच्या 9 अड्ड्यांवर अचूक निशाणा साधण्यात आला.
- भारतीय सैन्याच्या कारवाईत 100 पेक्षा जास्त अतिरेकी मारले गेले.
-
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्यावतीने बाणेर-बालेवाडी विकासाबाबत बॅनरच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना विचाराला जाब
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने बाणेर-बालेवाडी विकासाबाबत सत्ताधाऱ्यांना विचाराला बॅनरच्या माध्यमातून जाब विचारला आहे. बाणेर – बालेवाडीचा इतका सुंदर विकास कोणी केला…? अशा आशयाचे बॅनर लावण्य़ात आलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयेश मुरकुटे यांच्या वतीने बाणेर बालेवाडी परिसरामध्ये ठिकठिकाणी हे बॅनर लावण्यात आले आहेत. ट्राफिक, रस्ते, खड्डे ड्रेनेज व कचरा… अशा समस्यांचे फोटो बॅनरवर लावून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सत्ताधाऱ्यांवर बॅनरच्या माध्यमातून टिका केली आहे.
-
शिवसेनेचे शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निमंत्रणावरुन शिवसेनेचे एक शिष्टमंडळ मंगळवारी 29 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. निवडणूक आयोगाचे अधिकारी विविध पक्षांच्या प्रतिनिधींना भेटत असतात. त्यानुसार शिवसेनेच्या शिष्टमंडळाला निवडणूक आयोगाने निमंत्रण दिले आहे. या शिष्टमंडळात महाराष्ट्रातून मंत्री श्री. उदय सामंत आणि मंत्री श्री. शंभूराज देसाई आणि काही खासदार निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.
-
वर्ध्यात भाजपाची मंथन बैठक; मुख्यमंत्री फडणवीस LIVE
वर्ध्यात भाजपाची मंथन बैठक सुरु असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेशी , कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. PM आवास योजनेअंतर्गत 30 लाख घरं मंजूर झाल्याचं त्यांनी सांगितलं तसेच विदर्भातील 11 जिल्ह्यात कृषी समृद्धी योजना राबवणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.
-
शनिशिंगणापूरचे माजी विश्वस्त नितीन शेटे यांची आत्महत्या
शनिशिंगणापूरचे माजी विश्वस्त नितीन शेटे यांनी आत्महत्या केली आहे. राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं. शनिशिंगणापूर देवस्थान गैरव्यवहाराबद्दल चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते.
-
शेतीच्या बांधावर पत्ते खेळत माणिकराव कोकाटे यांचा निषेध
बीडच्या सुलेमान देवळात शेतकऱ्यांकडून कृषीमंत्र्यांचा निषेध करण्यात आला आहे. शेतीच्या बांधावर पत्ते खेळत माणिकराव कोकाटे यांचा निषेध केला गेला. शेताच्या बांधावर कोकाटेंच्या फोटोसमोर पत्ते खेलत अनोखं आंदोलन करण्यात आलं.
-
नाशिकच्या पुरोहित संघात वाद, दोन्ही पुरोहित संघात बाचाबाची
नाशिकच्या पुरोहित संघात वाद, दोन्ही पुरोहित संघात बाचाबाची… गंगा गोदावरी पंचकोटी संघाचा कार्यकारणी फलक लावण्यावरून काल रात्री वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. आजी- माजी अध्यक्षांच्या दोन्ही कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली, मात्र पोलिसांच्या मध्यस्थीने वाद निवळला, पोलिसांकडून दोन्ही कार्यकरणीस पोलिसांत हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पुरोहित संघात वाद झाल्याने रामतीर्थ परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.
-
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते राज्यपालांच्या भेटीसाठी दाखल
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते राज्यपालांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. कलंकित मंत्र्यांचे राजीनामे घेण्याची मागणी ते राज्यपालांकडे करणार आहेत.
-
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज लोकसभेत देणार भाषण
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज दुपारी १२ वाजता लोकसभेत भाषण करतील.
-
अशोक चव्हाणांकडून मोदींचं कौतुक
नांदेड- एमपीएससी, यूपीएससी करून तरुण राजकारणात आले तर राजकारणाचा स्तर उंचावेल, असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात केलं. “एक चांगलं नेतृत्व देशाला मिळालं, मोदी साहेबांना मी हॅट्स ऑफ करतो,” असं ते म्हणाले.
-
धाराशिव जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता?
भूम परंडा वाशी मतदारसंघाचे माजी आमदार राहुल मोटे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 25 जुलै रोजी माजी आमदार राहुल मोटे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार होते. मात्र काही कारणास्तव मुहूर्त पुढे ढकलण्यात आला.
-
संजय राऊत यांच्या विरोधात नांदगाव पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल
नांदगाव ( नाशिक ) : खासदार संजय राऊत यांच्या विरोधात नांदगाव पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदगाव भाजप मंडळ अध्यक्षाने तक्रार दाखल केली. राऊत यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याविरुद्ध अपशब्द वापरल्याचा फिर्यादीत उल्लेख करण्यात आला आहे.
-
शुक्रवारी सुद्धा खराडीच्या सूटमध्ये पार्टी, पोलीस करणार चौकशी
शुक्रवारी सुद्धा रंगली खराडीच्या सूटमध्ये पार्टी. शुक्रवारी झालेल्या पार्टीची सुद्धा पुणे पोलीस चौकशी करणार. शुक्रवारी झालेल्या पार्टी मधील लोकांची होणार चौकशी. दोन दिवसांच्या सीसीटिव्ही फुटेजची पोलिस करणार तपासणी. प्रांजल खेवलकर यांनी 3 दिवसांसाठी खराडी मधील दोन सूट केले होते बुक. शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन दिवसांचे होते नियोजन,
-
खडी केंद्र चालकावर महसूल विभागाच्यावतीने कारवाई
धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यामध्ये खडी केंद्र चालकाने अवैधपणे आणि नियमबाह्य दगड उत्खनन केल्याचे निदर्शनास आल्यावर खडी केंद्र चालकावर महसूल विभागाच्यावतीने कारवाई करण्यात आलीय. धाराशिव जिल्ह्यातील खडी केंद्रावरील खदानीची शासनाच्यावतीने मोजणी केली जात आहे.
-
खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग
पुणे – खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात 22 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे मुठा नदीपात्र ओसंडून वाहत आहे.
-
श्रीक्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग भाविकांनी गजबजले, दर्शनासाठी लांबच लांब रांगा
आज, श्रावण महिन्यातील पहिल्याच सोमवारी पुणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग भाविकांनी गजबजून गेले आहे. रात्रीपासूनच येथे मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली असून, दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या या पवित्र स्थळी शिवशंकराच्या दर्शनासाठी भाविकांमध्ये उत्साह दिसून येत आहे.
-
सांगलीतील वारणा आणि कृष्णा नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ
सांगली जिल्ह्यात सध्या वारणा आणि कृष्णा नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. वारणा नदी सध्या पात्राबाहेर वाहत असून, कृष्णा नदीची पाणी पातळी तब्बल २५ फुटांवर पोहोचली आहे. यामुळे दोन्ही नद्यांच्या आसपासच्या शेतीत पाणी शिरले असून, पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे.
-
बुलढाण्यात धर्म विचारत नग्न करून तरुणाला बेदम मारहाण, खामगाव शहर बंदची हाक
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे एका दलित युवकाला धर्म विचारत नग्न करून बेदम मारहाण करण्यात आली होती. या घटनेच्या निषेधार्थ दलित संघटना आक्रमक झाल्या असून आज विविध दलित संघटनांनी खामगाव बंदच आवाहन केले आहे. या दलित युवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक करून त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी खामगाव शहर बंदची हाक देण्यात आली आहे. आज सकाळपासूनच खामगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. त्याला सर्व स्तरातून पाठिंबा सुद्धा मिळत आहे.
-
आज वर्ध्यात भाजपची विदर्भ विभागीय बैठक, 700 हून अधिक भाजप पदाधिकारी सहभागी होणार
आज वर्ध्यात भाजपची विदर्भ विभागीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विदर्भातील महत्त्वाचे मंत्री या बैठकीसाठी वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लक्षात घेता ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. वर्ध्यातील चरखा गृह येथे होणाऱ्या या बैठकीच्या उद्घाटन सत्राला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत विदर्भातील विविध जिल्ह्यांमधून ७०० हून अधिक भाजप पदाधिकारी सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, कामगार मंत्री आकाश फुंडकर, पालकमंत्री पंकज भोयर, सुधीर मुनगंटीवार, हंसराज अहिर, तसेच विदर्भातील खासदार आणि आमदार उपस्थित राहणार आहेत. बैठकीच्या समारोपीय सत्रामध्ये वर्ध्यातील ४५० शक्ती केंद्र प्रमुख सहभागी होतील.
-
उजनी आणि वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या दमदार पावसामुळे भीमा नदीला पूर…….
उजनी आणि वीर धरणातून 60000 क्यूसेक इतके पाणी भीमा नदी पात्रात सोडल्यामुळे भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे…….. भीमा नदी पात्रातील पुंडलिक मंदिरासहं इतर छोट्या मोठ्या मंदिरांना पाण्याने दिला वेडा…….. भीमा नदीपात्रावर असलेला ब्रिटिश कालीन पूल गेला पाण्याखाली… भीमा नदीपात्रालगत असलेल्या महाद्वार घाट, चंद्रभागा घाट, कुंभार घाटावर देखील पाणी… नदीकाठच्या ग्रामस्थांना प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा…
-
पुणे शहरासह उपनगरात हलक्या पावसाच्या सरी
पुणे शहरासह उपनगरात हलक्या पावसाच्या सरी… पुणे शहरासह उपनगरात सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू… आज शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याची शक्यता…
-
आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार
श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. आज श्रावणातील पहिला सोमवार आहे. त्यामुळे पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी जमली आहे.
-
खराडीतील ड्रग पार्टीतील निखिल पोपटाणी आणि श्रीपाल यादव सराईत गुन्हेगार
निखिल पोपटाणीवर कोंडवा पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे. 2022 मध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीपाल यादव वर बंडगार्डन पोलीस स्टेशन, निगडी, आणि कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. श्रीपाल यादव वर लोकसेवकावर हल्ला जुगार आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हे दाखल आहेत. खराडीतील या पार्टीत एकनाथ खडसे यांचे जावई डॉक्टर प्रांजल खेवलकर आरोपी आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी काल सुनावणीत म्हटलं होतं. मात्र त्या आरोपाचे त्यांच्या वकिलाकडून युक्तीवादामध्ये आमच्यावर कुठलेही गुन्हे नसल्याचे युक्तिवादात म्हटल्याने नेमके कोण आरोपी हा प्रश्न पडला होता. सात जणांपैकी या दोघांवर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल असल्याचे समोर आला आहे.
Published On - Jul 28,2025 8:23 AM
