Maharashtra Breaking News LIVE 6 May 2025 : पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जीवनावर बहुभाषिक चित्रपट- मुख्यमंत्री
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 6 मे 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

भारत-पाकिस्तानमध्ये ताणल्या गेलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना स्वसंरक्षणासाठी सराव करण्याचे निर्देश सोमवारी दिले. उद्या म्हणजेच 7 मे रोजी हा सराव होणार असून त्यामध्ये शत्रूने हल्ला केल्यास सुरक्षा यंत्रणा तसंच नागरिकांनी संरक्षणसिद्धता वाढविण्याचा उद्देश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर दुसरीकडे ठाणे जिल्ह्यातून म्हणजेच ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातून 17 पाकिस्तानी नागरिक परतीच्या मार्गावर आहेत. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर ठाण्यातील तात्पुरत्या व्हिसावर आलेल्या नागरिकांना परत पाठवण्याच्या प्रक्रिया पूर्ण केल्या जात आहेत.
पुणे जिल्ह्याला चार दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अद्ययावत निरीक्षणानंतर आता हा अंदाज बदलला असून बुधवारी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे बुधवारपासून पुढील चार दिवस पुणे जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा..
LIVE NEWS & UPDATES
-
तुळजाभवानी मंदिराच्या 1866 कोटीच्या विकास आराखड्याला मंजूरी
धाराशिव – तुळजाभवानी मंदिराच्या 1866 कोटीच्या विकास आराखड्याला शिखर समितीनी मान्यता दिली आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी आभार मानले आहेत.
-
कुंभमेळा प्राधिकरण कायदा
प्रयागराजच्या धरतीवर राज्यात मोठा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत चौंडी येथे अनेक निर्णय घेण्यात आले. नाशिकच्या कुंभमेळा साठी कुंभमेळा प्राधिकरण कायदा करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
-
-
शासकीय मेडिकल कॉलेज निर्मितीला मान्यता
अहिल्यानगर जिल्ह्यात शासकीय मेडिकल कॉलेज निर्मितीला मान्यता दिली. त्याचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असे नाव असणार. अहिल्यानगर मध्ये शासकीय ITI कॉलेज काढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.
-
यशवंत विद्यार्थी योजना
धनगर समजातील विद्यार्थ्यांसाठी यशवंत विद्यार्थी योजना राबविण्यात येणार आहे. धनगर समाजातील 10 हजार विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेतील. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह निर्मिती करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
-
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका 4 महिन्यात घ्या, सुप्रीम कोर्टाने असे आदेश दिले आहेत. महापालिका निवडणुकांना हिरवा कंदील मिळाल्याने शिवसैनिकात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
-
-
विविध मंदिरांच्या विकासासाठी एकूण 5530 कोटी रुपयांचा आराखडा
आज चौंडी येथे मंत्रिमंडळ बैठक झाली. चोंडी येथे 681 कोटींचा आराखड्याला मान्यता दिली आहे. अखिल भारतीय तीर्थस्थळ म्हणून त्यांना विकसित करण्यात येणार आहे.तुळजाभवानी मंदिर 1862 कोटी, त्र्यंबकेश्वर221 कोटी, महालक्ष्मी मंदिर 1445, माहूरगड 829 कोटी रुपये असे एकूण 5530 कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजूरी देण्यात आली आहे.
-
स्थानिक स्वराज्य संस्थेत OBC ना मोठा दिलासा
ओबीसींच्या जागा कमी न करता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. ओबीसींचे राजकीय आरक्षण कमी न करण्याचे आदेशच सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे ओबीसींसाठी मोठा दिलासा मिळाला आहे.
-
भाजीपाल्याच्या किंमतीत वाढ
वाढलेल्या तापमानाचा भाजीपाल्यावर परिणाम दिसून येत आहे. प्रत्येक भाजीचे दर किलोमागे दहा रुपयांनी वाढले आहेत. भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने भाजीपाला दरात मोठी वाढ झाली आहे. धुळ्यासह अनेक जिल्ह्यात टोमॅटो ,वांगे ,कोबी ,मिरची सह पालेभाजी महागली आहे.
-
मुंबईत उद्या होणाऱ्या माॅक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिस आयुक्तांनी बोलावली बैठक
मुंबईत उद्या होणाऱ्या माॅक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर मुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली .
या बैठकीत उद्याच्या माॅकड्रिल बाबतची रुपरेषा ठरवली जाणार आहे. बैठकित माॅक ड्रील दरम्यान सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रमुखांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जातील. मुंबईतील प्रमुख ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त असेल.
-
अमरावती जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह गारपीट, मेळघाटात वीज कोसळून दोघे ठार, चार जखमी
अमरावती – अमरावती जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह गारपीट झाली., मेळघाटामध्ये वीज कोसळून दोघे ठार, चार जण जखमी झाले. चुणीलाल सावरकर (वय 45) व सुरेश जामूनकर (वय 45) असे मृतांचे नाव आहे.
रात्री विजेच्या कडकडासह अमरावती जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. आजही अमरावती जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
-
नंदुरबार जिल्ह्यात वादळी वाऱ्याचं थैमान, मध्यरात्री वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस..
नंदुरबार जिल्ह्यात वादळी वाऱ्याच थैमान, काल मध्यरात्री वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे कैरी पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून खराब झालेल्या कैरीमुळे उत्पादनात घट झाली. शेकडो हेक्टर वरील कैरीचं नुकसान. शासनाला त्वरित पंचनामे करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी.
-
नाशिक जिल्ह्यात 3 ठिकाणी होणार मॉक ड्रील
नाशिक, मनमाड आणि सिन्नरमध्ये होणार मॉक ड्रील. नाशिक, सिन्नरला असणाऱ्या लष्करी छावण्या, मनमाडला असणारा पेट्रोलियम डेपोमुळे तीन ठिकाणी होणार मॉक ड्रील
-
देशभरात मॉक ड्रिलची तयारी अंतिम टप्प्यात; नाशिकमध्येही जोरदार हालचाल सुरू!
जिल्हाधिकारी कार्यालयात मॉक ड्रिलसंदर्भात महत्त्वपूर्ण नियोजन बैठक पार पडली. आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, अग्निशमन दल व आरोग्य विभाग सतर्क मोडमध्ये. ड्रिलसाठी आवश्यक साहित्यांची जमवाजमव सुरु. प्राथमिक उपकरणांपासून मेडिकल सपोर्टपर्यंत तयारी. रुग्णवाहिका, वायरलेस सिस्टम, आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सज्ज.
-
कल्याण इंदिरा नगर परिसरातील धक्कादायक घटना
दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून शेजाऱ्यांशी वाद. लाकडी दांडक्याने मारहाण करत 19 वर्षीय मुलीची हत्या. घरात घुसून दारूसाठी पैसे न देणाऱ्या इसमासह पत्नी, मुलीला लाकडी दांडक्याने मारहाण. 19 वर्षीय मुलीचा मृत्यू. महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
-
पाकिस्तानच्या माजी उच्चायुक्ताने सांगितली हल्ल्याची तारीख
भारत रशियाच्या विजय उत्सवानंतर 10 किंवा 11 मे रोजी पाकिस्तान विरुद्ध मर्यादीत कारवाई करु शकतो असं पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी दावा केला आहे.
-
Maharashtra Breaking: भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील धुसफूस कायम
आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांच्या स्वागताचा बॅनर लावला नाही… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचे विशेष बॅनर लावले… त्यामुळे अजित पवार आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील सुप्त संघर्षाचा दुसरा अंक पाहायला मिळाला… यापूर्वी पुण्यातील धनगरी ढोल कार्यक्रमाला पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना निमंत्रण देणार नाही असे विधान केले होते… त्यानंतर आता चौन्डी येथे कॅबिनेटच्या बैठकी दरम्यान अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर लावले नाहीत…
-
Maharashtra Breaking: दादर येथील डिसिल्वा शाळेत वाजवण्यात आला सायरन…
मुंबईतील शाळांमध्ये सायरन वाजवून या सायरानची तपासणी करण्यात आली… आज सकाळी नऊच्या ठोक्याला हे सायरान वाजवण्यात आले आणि या सायरनबाबत तपासणी देखील करण्यात आली… भारत पाकिस्तान आणि भारत चीन युद्धा दरम्यान या शाळेत सायरन वाजवून आपतकालीन काळात करण्याचे उपयोजन सांगण्यात आले…
-
Maharashtra Breaking: डोंबिवलीत माहेरी आलेल्या विवाहितेची आत्महत्या ने खळबळ
ठाकुर्लीतील अविनाश निवासमध्ये गळफास लावून केली आत्महत्या… आठ वर्षांपूर्वी तिचे लग्न झाले होते आणि तिला १४ महिन्यांचे मूल आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नसून रामनगर पोलीसाचा तपास सुरू
-
Maharashtra Breaking: भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभर होणार मॉक ड्रिल
भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभर होणार मॉक ड्रिल… मॉक ड्रिल संदर्भात जिल्हाधिकारी कार्यलयात घेतला जाणार आढावा… आपप्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख अधिकारी आणि जिल्अधिकारी यांच्या बैठकीत घेतला जाणार तयारीचा आढावा… मॉक ड्रिल कुठे आणि केव्हा करायचे या संदर्भात केला जाणार विचार
-
मॉक ड्रिल संदर्भात नाशिकमध्ये बैठक
मॉक ड्रिल संदर्भात नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यलयात बैठक घेण्यात येणार आहे. आपप्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्यात ही बैठकीत घेतली जाणार आहे. या बैठकीत मॉक ड्रिल कुठे आणि केव्हा करायचे या संदर्भात चर्चा होणार आहे.
-
मुख्यमंत्री बारामतीवरुन चौंडीकडे जाणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात बारामती विमानतळावर होणार दाखल आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चौंडी येथे होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी बारामतीवरून रवाना होणार आहे.
-
नफ्याचे आमिष दाखवून ९४ लाखांत फसवणूक
जळगावात वृद्ध महिलेला नफ्याचे आमिष दाखवून तिची ९४ लाखांत फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फसवणूक करणाऱ्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. जळगाव आर्थिक गुन्हे शाखेने तीन जणांना अटक केली आहे.
-
वायू प्रदूषणामुळे पुण्यात दम्याचे रुग्ण वाढले
पुणे शहरातील वाहनांमुळे वाढलेले वायू प्रदूषण धूळ परागकण धूम्रपान व ऍलर्जी यामुळे दमा वाढण्याचे प्रमाण पुण्यात वाढत आहे. यामुळे अनेकांच्या दम्याचे निदान झाले आहे. पुण्यात गेल्या काही वर्षात दमा होण्याचे प्रमाण 25 ते 30 टक्क्यांनी वाढल्याचे फुफ्फुस विकार तज्ज्ञांचे मत आहे.
-
डोंबिवलीत माहेरी आलेल्या विवाहितेची आत्महत्या
डोंबिवलीतील ठाकुर्लीतील अविनाश निवासमध्ये माहेरी आलेल्या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. आठ वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. त्यांना १४ महिन्यांचे मूल आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
-
डोंबिवलीत माहेरी आलेल्या विवाहितेच्या आत्महत्येनं खळबळ
डोंबिवलीत माहेरी आलेल्या विवाहितेच्या आत्महत्येनं खळबळ उडाली आहे. ठाकुर्लीतील अविनाश निवासमध्ये महिलेनं गळफास लावून आत्महत्या केली. आठ वर्षांपूर्वी तिचं लग्न झालं होतं आणि तिला १४ महिन्यांचं मूल आहे. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट नसून रामनगर पोलिसांकडून तपास सुरू आहे.
-
भारतातील कांदा आता थेट कराची न जाता दुबईत
नाशिक – भारतातील कांदा आता थेट कराची न जाता दुबईला पाठवला जात आहे. भारत सरकारकडून पाकिस्तानमधून आयातीला बंदी घालण्यात आली. भारतातून दुबईत जाणारे 30 ते 40 कंटेनर व्हाया कराची जायचे. मात्र आता थेट दुबईतच जाणार आहेत. कांद्याच्या स्थानिक बाजारपेठेवर कुठलाही परिणाम होणार नसल्याचे निर्यातदारांचे सांगणे आहे.
-
नाशिक – शिखर समितीच्या बैठकीत आज त्रंबकेश्वर आराखड्यावर चर्चा
नाशिक – शिखर समितीच्या बैठकीत आज त्रंबकेश्वर आराखड्यावर चर्चा होणार आहे. चौंडी येथे मंत्रिमंडळाच्या बैठकीसह शिखर समितीची ही महत्त्वपूर्ण बैठक आहे. राज्याचे प्रधान सचिव शिखर समिती समोर आराखडा सादर करणार आहेत. त्र्यंबकेश्वरसाठी प्रत्यक्षात अकराशे कोटी रुपयांचा आराखडा आहे. आजच्या बैठकीत विकास आराखडा निश्चित होईल असा विश्वास व्यक्त होतोय.
-
ठाणे महापालिकेच्या मालमत्ता करात वाढ
ठाणे महापालिकेच्या मालमत्ता करात वाढ करण्यात आली असून पहिल्याच महिन्यात 95 कोटींची मालमत्ता कर वसुली झाली. मागील वर्षाच्या तुलनेत 12 कोटींची अधिक वसुली झाली. पालिकेने मालमत्ता कर विभागाला 819 कोटी 71 लाख रुपयांच्या कर वसुलीचे उद्दिष्ट दिले आहे.
-
पुणे- अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्यावर गुन्हा दाखल
पुणे- अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून एका तरुणाने तिच्याशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न करून संबंधित प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून राहुल राम कुमार असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.
-
ठाणे जिल्ह्यात ताप, उल्टी, जुलाबाचे रुग्ण वाढले
ठाणे जिल्ह्यात ताप, उल्टी, जुलाबाचे रुग्ण वाढले आहेत. तापाचे एकूण रुग्ण १७३१ आहेत. यापैकी बाह्यरुग्ण विभागात उपचार घेतलेले तापाचे रुग्ण 1264, तर अंतररुग्ण विभागात उपचार घेतलेल्या तापाचे रुग्ण 550 आहेत. बाह्य रुग्णविभागात उपचार घेतलेले जुलाबाचे रुग्ण 12 आहेत, तर अंतररुग्ण विभागात उपचार घेतलेले जुलाबाचे रुग्ण 101 आहेत. शासकीय रुग्णालयात सध्या व्हायरल फिव्हरचे रुग्ण वाढले आहेत.
-
भाडे नाकारणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांची खैर नाह
मुंबईत प्रवाशांना अडचणीत टाकणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी मोठी कारवाई केली. दोन आठवड्यांत ४८,४१७ बेशिस्त चालकांवर ई-चलनाद्वारे दंडात्मक कारवाई करत ४० लाख रुपयांचा दंड वसूली केली. तर भाडे नाकारणाऱ्या २८,८१४ चालकांचे परवाने निलंबित करण्यासाठी आरटीओकडे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत.
-
ठाण्यातून 17 पाकिस्तानी नागरिक परतीच्या मार्गावर
ठाणे जिल्ह्यातून म्हणजेच ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातून 17 पाकिस्तानी नागरिक परतीच्या मार्गावर आहेत. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर ठाण्यातील तात्पुरत्या व्हिसावर आलेल्या नागरिकांना परत पाठवण्याच्या प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. 17 पैकी काही जण नातेवाईकांच्या लग्नासाठी, काहीजण पर्यटनासाठी आणि मित्राला भेटण्यासाठी आले होते.
Published On - May 06,2025 8:18 AM
