AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Breaking News LIVE 4 June 2025 : बंगळुरुतील चेंगराचेंगरीत 14 वर्षीय विद्यार्थीचा मृत्यू

| Edited By: | Updated on: Sep 14, 2025 | 2:45 PM
Share

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 4 जून 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE 4 June 2025 : बंगळुरुतील चेंगराचेंगरीत 14 वर्षीय विद्यार्थीचा मृत्यू

आरसीबीनं 18 वर्षांची प्रतिक्षा संपवत आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. काल झालेल्या फायनलमध्ये आरसीबीने पंजाबचा 6 धावांनी पराभव केला. दरम्यान सिंहगडावर जाणाऱ्या पर्यटकासाठी महत्वाची बातमी, किल्ला आज आणि उद्याही ( 4 व 5 जून) बंद राहणार आहे. गडावरील अतिक्रमण कारवाई अद्याप सुरूच, 30 मे पासून सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनामळे आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. वाळवा तालुक्यातील 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या 8 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत. – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नांदेड आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे. कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता 1600 बेड आरक्षित करण्यात आले आहेत. अमरावती शहरात सहा दिवसात तबल 23 लाखाचा गुटखा जप्त करण्यात आला. अमरावती शहर पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या आदेशावरून शहर पोलिसांनी धाडी टाकून लाखो रुपयांचा गुटखा जप्त व आरोपींना अटकेचे सत्र सुरू केले आहे. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा..

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 04 Jun 2025 10:08 PM (IST)

    अंधेरी पूर्व एमआयडीसी परिसरात  बसला आग 

    अंधेरी पूर्व एमआयडीसी परिसरात एका बसला आग लागल्याची घटना घडली आहे,   मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये काही लोक होते ज्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नसल्याचं वृत्त आहे.

  • 04 Jun 2025 09:49 PM (IST)

    ठाकरे गटाचे 5 खासदार शिवसेना शिंदे गटाच्या संर्पकात?

    ठाकरे गटाचे ५ खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात, सुत्रांची माहिती

    आऊट गोईंग थांबवण्यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू , सुत्रांची माहिती

    संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता , सुत्रांची माहिती

    उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता – , सुत्रांची माहिती

  • 04 Jun 2025 09:09 PM (IST)

    नंदुरबार जिल्ह्याला पावसानं झोडपलं, सलग दुसऱ्या दिवशी पाऊस

    नंदुरबार जिल्ह्याला पावसानं झोडपलं

    नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या परिसरात सलग दुसऱ्या दिवशी  पावसाची हजेरी

    नंदुरबार जिल्ह्यातील काकडदा परिसरात जोरदार पाऊस

    वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी

    बाजारासाठी आलेल्या नागरिकांची उडाली तारांबळ

  • 04 Jun 2025 06:31 PM (IST)

    बंगळुरुतील चेंगराचेंगरीत 14 वर्षीय विद्यार्थीचा मृत्यू

    आरसीबीने आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळाडूंचा सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा सत्कार समारंभ सुरु असताना मैदानाबाहेर असंख्य चाहत्यांनी गर्दी केली. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 10 पेक्षा अधिक चाहत्यांचा मृत्यू झालाय. तसेच 14 वर्षीय विद्यार्थीचाही मृत्यू झालाय.

  • 04 Jun 2025 06:15 PM (IST)

    मैदानात आरसीबीच्या खेळाडूंचा सत्कार, बाहेर चेंगराचेंगरीमुळे चाहत्यांचा मृत्यू

    आयपीएल ट्रॉफी जिंकलेल्या खेळाडूंचा बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळाडूंचा सत्कार करण्यात येत होता. तर दुसऱ्या बाजूला मैदानाबाहेर मृत्यूचा हाहाकार पाहायला मिळाला आहे. स्टेडियमबाहेर आरसीबीच्या चाहत्यांनी तोबा गर्दी केली. या गर्दीत जोरदार चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 10 जणांचा दुर्देवी अंत झालाय. तर अनेक जणांना दुखापत झालीय. दुखापत झालेल्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

  • 04 Jun 2025 06:10 PM (IST)

    आरसीबीच्या रॅलीत चेंगराचेंगरी, बंगळुरुत दुर्घटना, 10 जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची भीती

    आरसीबीने 18 वर्षांनंतर आयपीएल ट्रॉफी जिंकून इतिहास घडवला. आरसीबीच्या या विजयानंतर बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळाडूंचा सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी या स्टेडियममबाहेर क्रिकेट चाहत्यांनी आपल्या लाडक्या खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी तोबा गर्दी केली. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली.  या चेंगराचेंगरीत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

  • 04 Jun 2025 05:56 PM (IST)

    संसदेचे पावसाळी अधिवेशन 21 जुलैपासून सुरू होणार

    संसदेचे पावसाळी अधिवेशन 21 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान होणार आहे.  या अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरचा मुद्दा गाजणार हे नक्की आहे. दुसरीकडे, जातीय जणगणनेच्या तारखा समोर आल्याने विरोधकांकडून एक मुद्दा खेचून घेतला आहे.

  • 04 Jun 2025 05:36 PM (IST)

    बेंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर RCB च्या विजय परेडमध्ये चेंगराचेंगरी, 7 जणांचा मृत्यू

    आरसीबीच्या विजयी परेडमध्ये मोठ्या संख्येने लोक चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर उपस्थित होते. चिन्नास्वामी स्टेडियमजवळ चेंगराचेंगरी झाली आणि त्यात 7 जणांचा मृत्यू झाला. या चेंगराचेंगरीत 20 जण जखमीही झाले आहेत. वृत्तानुसार, 10 जणांची प्रकृती गंभीर आहे. चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महिलांचाही समावेश आहे.

  • 04 Jun 2025 05:27 PM (IST)

    मुंबईतील दहिसर पूर्व येथील झेप्टोच्या गोदामाला आग लागली

    मुंबईतील दहिसर पूर्वेतील झेप्टोच्या गोदामात आग लागल्याची घटना घडली आहे. आगीनंतर झेप्टोमध्ये ठेवलेला सर्व सामान जळून खाक झाले.

  • 04 Jun 2025 05:11 PM (IST)

    जातीय जनगणनेच्या तारखा जाहीर, या दिवसापासून सुरू होणार?

    जनगणना आणि जात जनगणनेची तारीख जाहीर झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही जनगणना दोन टप्प्यात केली जात आहे. त्याचा पहिला टप्पा 1 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होईल तर दुसरा टप्पा 1 मार्च 2027 रोजी सुरू होईल.

  • 04 Jun 2025 02:02 PM (IST)

    शिष्टमंडळासोबतच्या परदेश दौऱ्यानंतर खासदार श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया

    शिष्टमंडळासोबतच्या परदेश दौऱ्यानंतर खासदार श्रीकांत शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहेत. विविध देशात त्यांनी शिष्टमंडळचा दौरा केला. दहशतवादाविरोधात अनेक देश भारतासोबत उभे राहिले असं मत त्यांनी व्यक्त केलं.

  • 04 Jun 2025 01:25 PM (IST)

    बडगुजरांची हकालपट्टी केल्यानंतर संजय राऊत मातोश्रीवर

    नाशिक जिल्ह्यातील उद्धव ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. सुधाकर बडगुजर यांच्यावर पक्षविरोधी वक्तव्य केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सुधाकर बडगुजर यांनी काल मनातील नाराजी, खदखद बोलून दाखवली होती. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकला आलेले, त्यावेळी बडगुजर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच त्यांच्या नाराजीची चर्चा रंगली होती. मात्र आता बडगुजरांची हकालपट्टी केल्यानंतर संजय राऊत मातोश्रीवर पोहोचल्याचं समोर आलं आहे.

  • 04 Jun 2025 01:09 PM (IST)

    कल्याणमधील शिवकालीन दुर्गाडी किल्ल्याची संरक्षक भिंत कोसळली

    कल्याणमध्ये शिवकालीन दुर्गाडी किल्ल्याची संरक्षक भिंत कोसळली आहे. सार्वजनिक विभागाकडून किल्ल्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम सुरु आहे. अर्ध्या तासाच्या पावसात किल्ल्याची संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली आहे.

  • 04 Jun 2025 12:55 PM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेसचे १० जूनला जोरदार शक्तीप्रदर्शन, पवार गटाचे दोन्ही कार्यकर्ते उपस्थित राहणार

    पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. येत्या १० तारखेला राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त अजित पवार गट बालेवाडी येथे, तर शरद पवार गट बालगंधर्व रंगमंदिर येथे स्वतंत्र कार्यक्रम आयोजित करणार आहे. या कार्यक्रमांना अनुक्रमे अजित पवार आणि शरद पवार स्वतः उपस्थित राहणार असून, राज्यभरातील दोन्ही गटाचे कार्यकर्ते या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमांना हजर राहतील अशी अपेक्षा आहे.

  • 04 Jun 2025 12:45 PM (IST)

    सोलापुरात विवाहितेची आत्महत्या, सासू आणि सासऱ्याला पोलिसांकडून अटक

    सोलापुरात एका विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी तिच्या पतीसह सासू आणि सासऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. चारचाकी गाडी आणि पैशाच्या हव्यासापोटी हा छळ झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मोहोळ तालुक्यातील चिंचोलीकाटी येथील या घटनेनंतर मृत महिलेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सासरच्या मंडळींनी पैसे आणि चारचाकी वाहनासाठी केलेल्या छळामुळेच मुलीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे म्हटले आहे. पोलीस आरोपींना वैद्यकीय तपासणी करून न्यायालयात हजर करणार आहेत.

  • 04 Jun 2025 12:22 PM (IST)

    कल्याण-डोंबिवलीत पावसामुळे गटाराचे पाणी रस्त्यावर, नालेसफाईची पोलखोल

    कल्याण-डोंबिवलीत मुसळधार पाऊस पडल्याने पालिकेच्या नालेसफाईची पोलखोल झाली आहे. कल्याणमधील सदानंद चौक परिसरात गटाराचे पाणी रस्त्यावर साचल्याने नागरिकांना आणि वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

  • 04 Jun 2025 11:54 AM (IST)

    सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी

    सुधाकर बडगुजर यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी वक्तव्य केल्यामुळे हकालपट्टी करण्यात आली आहे.

  • 04 Jun 2025 11:49 AM (IST)

    राज्यात १२ जून ते १३ जूनदरम्यान मान्सून सक्रिय होईल

    मान्सूनच्या वाऱ्याची गती मंदावली आहे. अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होताना सध्या दिसत नाही. त्यामुळे पाऊस कमी झालेला सध्या दिसत आहे. मात्र यावर्षीचा पाऊस सरासरी 106% असणार आहे. यावर्षी महाराष्ट्रातसुद्धा मान्सून जास्त पडण्याची शक्यता आहे. राज्यात १२ जून ते १३ जूनदरम्यान मान्सून सक्रिय होईल.

  • 04 Jun 2025 11:35 AM (IST)

    थोड्याच वेळात शिवसेना ठाकरे गटाच्या पत्रकार परिषदेला होणार सुरुवात

    नाशिक – थोड्याच वेळात शिवसेना ठाकरे गटाच्या पत्रकार परिषदेला होणार सुरुवात होणार आहे. जिल्हाप्रमुख डी जी सूर्यवंशी पत्रकार परिषद घेणार आहेत. पत्रकार परिषदेला महानगरप्रमुख विलास शिंदे उपस्थित राहणार तर उपनेते सुधाकर बडगुजर अनुपस्थित असतील. पक्षाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह 10 ते 12 जण नाराज असल्याचं बडगुजर यांनी काल गौप्यस्फोट केला होता.

  • 04 Jun 2025 11:24 AM (IST)

    पुण्यातील विविध भागात पावसाला सुरुवात

    गेली चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. आज सकाळपासूनच पुण्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळत होतं. मात्र आता पावसाला सुरुवात झाली आहे. शहरातील विविध भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे.

  • 04 Jun 2025 11:17 AM (IST)

    सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया एसीबी कार्यालयात जाण्यासाठी निघाल्या

    सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया एसीबी कार्यालयात जाण्यासाठी निघाल्या आहेत. अंजली दमानिया यांना ACB कडून समन्स बजावण्यात आले आहेत. दमानिया आज चौकशीसाठी एसीबी कार्यालयात हजर राहणार आहेत. माजी कृषीमंत्री मुंडेंविरोधात दमानियांचे आरोप असून आरोपांची माहिती देण्यासाठी दमानिया उपस्थित राहणार आहेत.

  • 04 Jun 2025 11:08 AM (IST)

    हगवणे जेसीबी विक्री प्रकरण

    हगवणे जेसीबी विक्री प्रकरणी आता इंडस इंड बँकेच्या लीगल डिपार्टमेंटला आज चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिलेत. तक्रारदार प्रशांत येळवंडे यांना ही महाळुंगे पोलिसांनी चौकशीसाठी बोलाविले आहे. तक्रारदार प्रशांत येळवंडे यांनी जेसीबी खरेदी करताना केलेले रजिस्टर कागदपत्रे ही आरोपी शशांक हगवणे यांच्याकडे असली तरी ज्या ठिकाणी हे रजिस्टर डॉक्युमेंट तयार केली त्या ठिकाणची माहिती घेतली जाणार.

  • 04 Jun 2025 10:58 AM (IST)

    पंजाब पोलिसांच्या स्पेशल सेलची मोठी कारवाई

    मोहालीत जसबीर सिंह नावाच्या एका युटुबरला अटक. पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप. जसबीर हा तीन वेळा पाकिस्तानात जाऊन आल्याची माहिती. ज्योती मल्होत्रा सोबत तो पाकिस्तान आयोगातील दानिश नावाच्या अधिकाऱ्याला भेटल्याची माहिती.

  • 04 Jun 2025 10:57 AM (IST)

    वैष्णवी हगवणे प्रकरण, व्हिसेरा रिपोर्ट आज येणार का?

    वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात राखून ठेवलेला व्हिसेरा रिपोर्ट आज येण्याची शक्यता. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात तिचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप कस्पटे कुटुंबांनी केला होता त्यामुळे हा व्हिसेरा राखून ठेवला होता. हा व्हिसेरा मुंबईमधील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला जातो. या रिपोर्ट मुळे अनेक बाबी समोर येण्याची शक्यता

  • 04 Jun 2025 10:21 AM (IST)

    गिरीश महाजन अत्यंत भ्रष्ट मंत्री – संजय राऊत

    गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील अत्यंत भ्रष्ट मंत्री. गिरीश महाजन यांच्या कार्यालयातील अभिषेक कौल कोण आहे? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

  • 04 Jun 2025 10:17 AM (IST)

    सुधाकर बडगुजर म्हणजे नाशिकची शिवसेना नाही – संजय राऊत

    सुधाकर बडगुजर म्हणजे नाशिकची शिवसेना नाही. सुधाकर बडगुजर आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया. विचाराने कुणी पक्ष सोडला नाही. अजित पवार कधीच नाराज नव्हते असं संजय राऊत म्हणाले.

  • 04 Jun 2025 09:49 AM (IST)

    दक्षिण मुंबईत पावसाटचा जोर वाढला

    दक्षिण मुंबईत पावसाटचा जोर वाढला,  अनेक भागांत पडतोय जोरदार पाऊस.

  • 04 Jun 2025 09:36 AM (IST)

     छत्रपती संभाजीनगर – महापालिका प्रशासनाची अतिक्रमणधारकांविरोधात धडक मोहीम

    छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रशासनाने शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी जोरदार मोहीम सुरू केली .या मोहिमेची सुरुवात शहरातील बीड बायपास भागातून झाली. यावेळी देवळाई चौक ते महानुभव आश्रमापर्यंत 118 अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले.

  • 04 Jun 2025 09:21 AM (IST)

    हगवणे JCB प्रकरणात आता इंडसइंड बँक चौकशीच्या फेऱ्यात 

    हगवणे JCB प्रकरणात आता इंडसइंड बँक चौकशीच्या फेऱ्यात सापडली आहे, म्हाळुंगे पोलिसांनी  लीगल डिपार्टमेंटला आज चौकशीसाठी बोलावलं आहे. JCB कोणी जप्त केला, शशांकने ताबा कसा घेतला ?  याची चौकशी होणार आहे.

  • 04 Jun 2025 09:06 AM (IST)

    मुंबई- संपूर्ण बीकेसी मेट्रो स्टेशन ताडपत्रीने झाकलं

    मुंबई- संपूर्ण बीकेसी मेट्रो स्टेशन ताडपत्रीने झाकण्यात आलं आहे. मेट्रो स्थानकात सध्या डागडुजी आणि वॉल पेटिंगचं काम बाकी आहे. काही दिवसांपूर्वीच आचार्य अत्रे मेट्रो स्थानकात पाणी शिरलं होतं.

  • 04 Jun 2025 08:57 AM (IST)

    मुक्ताईनगर जवळ महामार्गावर ट्रॅव्हलचा भीषण अपघात, 2 ठार, अनेक जखमी

    मुक्ताईनगर जवळ महामार्गावर ट्रॅव्हलचा भीषण अपघात झाला असून त्यात 2 जण ठार झाले आहेत. तर 20 ते 25 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात अडकलेल्यांना क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आलं असून महामार्गावर क्रेनने ट्रॅव्हल हटवण्याचे काम सुरू आहे.

    जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर मुक्ताईनगर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • 04 Jun 2025 08:50 AM (IST)

    नवी मुंबईच्या घणसोली डेपोमध्ये बसला आग

    नवी मुंबईच्या घणसोली डेपोमध्ये बसला आग, एक इलेक्ट्रिक आणि एक डिझेल बस जळून खाक झाली आहे. दुरूस्तासाठी इलेक्ट्रिक बस घणसोली डेपोत आणण्यात आली होती.

  • 04 Jun 2025 08:49 AM (IST)

    कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू, जिल्ह्यात सध्या 8 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आ

    कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. वाळवा तालुक्यातील 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या 8 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर नागपूरमध्ये 2 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून नागपूरमध्ये सध्या 4 कोरोनोबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Published On - Jun 04,2025 8:47 AM

Follow us
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.