Maharashtra Breaking News LIVE : गडचिरोलीतील दुर्गम-नक्षलग्रस्त भागात पोलीस कर्मचाऱ्यांकडून दिवाळी साजरी
Maharashtra Political News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 22 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर पर्यंत सप्तशृंगी देवीचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्री 12 वाजेपर्यंत खुलं राहणार… पहाटे 5 ते रात्री 12 पर्यंत मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं राहणार… तर डोंबिवली गणेश मंदिरात दिवाळी पहाट निमित्त जय्यत तयारी सुरु आहे. विद्युत रोशनी व रांगोळ्यांनी परिसर उजळला आहे. शंखनाथ नृत्यकला व ढोल-ताशांच्या गजरात सांस्कृतिक कार्यक्रमांची शानदार मेजवानी पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी दिवाळीचा उत्साह आहे तर, दुसरीकडे, जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यात यंदा परतीच्या पावसाने सर्व दूर हजेरी लावल्याने जलसाठ्यातील आणि विहिरीतील पाणी पातळी वाढली. त्या अनुषंगाने भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची पेरणी पूर्ण करण्याची तयारी केली आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी सोयाबीनची सोंगणी करून आता रबी हंगामाकडे लक्ष केंद्रित केलंय. यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्र, क्रिकेट, मनोरंजन, सामाजिक , राजकारण अशा विषयातील महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
LIVE NEWS & UPDATES
-
गडचिरोलीतील दुर्गम-नक्षलग्रस्त भागात पोलीस कर्मचाऱ्यांकडून दिवाळी साजरी
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातील पोलीस स्टेशन आणि बेस कॅम्पमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांनी दिवाळी साजरी केली. कुटुंबांपासून दूर राहून जवान आपलं कर्तव्य बजवत असतात. अशात या जवानांनी कर्तव्य पार पाडण्यासह सणाचाही आनंद लुटला. जवानांनी आपल्या पोलीस स्टेशनमध्ये दिवाळी साजरी करून एक दुसऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
-
अंबरनाथमध्ये भाजपकडून शिवसेनेला आणखी दोन धक्के
अंबरनाथमध्ये भाजपने शिवसेनेला आणखी दोन धक्के दिले आहेत. दुर्गेश चव्हाण आणि सचिन गुंजाळ या दोघांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपाची स्वबळावर पालिका निवडणूक लढवण्याची तयारी सुरु आहे का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
-
-
ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचं निधन, वयाच्या 84 वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचं निधन झालं आहे. असरानी यांनी वयाच्या 84 वर्षी घेतला अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्यावर गेल्या 5 दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपाचारादरम्यान त्यांची प्राणज्योत माळवली. असरानी यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
-
जळगाव सराफा बाजारात सोन्याच्या दरात तब्बल 2 हजार 300 रुपयांनी वाढ
जळगावच्या सराफ बाजारात सायंकाळी सोन्याच्या दरात तब्बल 2 हजार 300 रुपयांनी वाढ झाली आहे. सोन्याचे दर जीएसटी 1 लाख 33 हजार 500 रुपयांवर पोहोचले आहेत. सोन्याच्या दरात तीन दिवसांपासून घसरण सुरू होती. आज (20 ऑक्टोबर) देखील दिवसभरात सोन्याच्या दरात 800 रुपयांनी घसरण झाली होती. मात्र 9 तासानंतर सायंकाळी 7 वाजता सोन्याच्या दरात तब्बल 2 हजार 300 रुपयांनी वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात कुठलीही वाढ झाली नाही.
-
नांदेड: खासगी ट्रॅव्हल्स आणि एसटी बसचा समोरासमोर अपघात
-नांदेडमध्ये खासगी ट्रॅव्हल्स आणि एसटी बसचा समोरासमोर अपघात झाला. देगलूर – नांदेड रस्त्यावरील बागन टाकळी परिसरात अपघात घडला. या अपघात एकूण 12 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातात 5 ते 6 प्रवासी गंभीर जखमी असून त्यांना नांदेडच्या देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पाऊस सुरू असल्याने वळण रस्त्यावर अपघात झाल्याची माहिती आहे.
-
-
ठाण्यात महाविकास आघाडी सोबत मनसे पुन्हा एकदा एकत्र
ठाण्यात महाविकास आघाडी सोबत मनसे पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. ठाण्यातील तुळजाभवानी मातेच्या दीपोत्सवासाठी महाविकास आघाडीसोबत मनसेचे नेते अविनाश जाधव यांची उपस्थिती होती. जितेंद्र आव्हाड, राजन विचारे, केदार दिघे आणि अविनाश जाधव पुन्हा एकत्र आले. तुळजा भवानी मातेची महाआरती करण्यात येणार आहे.
-
ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा
ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या शुभेच्छा दिल्या.
Wishing Hindus, Jains and Sikhs across Britain a joyful and peaceful Diwali and Bandi Chhor Divas.
Earlier this month I lit a diya in Mumbai as a symbol of devotion, joy, and renewed bonds.
As we celebrate this Festival of Lights, let’s keep building a Britain where everyone… pic.twitter.com/uE6ZmBPUhs
— Keir Starmer (@Keir_Starmer) October 20, 2025
-
बनावट मतदारांची यादी सार्वजनिक करा, शिवसेना नेत्याचे राज ठाकरेंना आव्हान
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांना उत्तर देताना शिवसेना नेते संजय निरुपम म्हणाले, “मी त्यांना आव्हान देतो की त्यांनी ज्या 94 लाख तथाकथित बनावट मतदारांचा उल्लेख केला आहे त्यांची संपूर्ण यादी सार्वजनिक करावी.”
#WATCH | Mumbai | On the allegations made by MNS chief Raj Thackeray against the Election Commission, Shiv Sena leader Sanjay Nirupam says, “I challenge him to make public the full list of the 94 lakh so-called fake voters he’s talking about… The opposition has developed this… pic.twitter.com/Y7naNl8Ha0
— ANI (@ANI) October 20, 2025
-
बंजारा समाजाला एसटी आरक्षण द्या, जालन्यात आमरण उपोषण
हैदराबाद गॅझेट लागू करून बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी मागील 3 दिवसापासून जालना शहरातल्या अंबड चौफुली भागात विजय चव्हाण या बंजारा बांधवाच आमरण उपोषण सुरू आहे.आज आमरण उपोषणाचा 4 था दिवस असून ज्या पद्धतीने मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू झालं तसेच आम्हालाही लागू करा अशी मागणी यावेळी उपोषणकर्त्याने केली.
-
केंद्र सरकारने १ हजार ५६६ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे – एकनाथ शिंदे
मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने १ हजार ५६६ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. यामुळे पूरग्रस्तांना मदत देण्याच्या प्रक्रियेला अधिक वेग येणार असून, त्यांच्यापर्यंत ही अतिरिक्त मदत लवकरात लवकर पोहचवणे शक्य होणार आहे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
-
वरळीत दीपोत्सव, प्रथमच भव्य विद्युत रोषणाईचे आयोजन
वरळीत दीपोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी वरळीत प्रथमच भव्य विद्युत रोषणाईचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी बॉडी बिल्डिंग मिस्टर एशिया संदिप सावळे, वर्ल्ड व्हिसलिंग चॅम्पियन निखिल राणे, सिने अभिनेते विजय पाटकर ,जयवंत वाडकर यांनी आपलीं उपस्थित दर्शविली .उद्योजक आकाश गुप्ता यांच्या माध्यमातून दीपावली निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
-
राज्याचे माजी अर्थमंत्री महादेव शिवणकर यांचे निधन
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी सिंचन आणि अर्थमंत्री तसेच माजी खासदार महादेव शिवणकर यांचे निधन झाले आहे. गोंदिया जिल्ह्याचे शिल्पकार म्हणून महादेव शिवणकर यांची ओळख होती. त्यांचे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे.
-
मुंबई: दादर मार्केटमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
दिवाळीची खरेदी अंतिम टप्प्यात आली आहे. दिवाळी निमित्त आज दादर मार्केटमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. सकाळपासूनच फुलं, दिवे, फराळाच्या सामानाच्या खरेदीसाठी ग्राहकांची लगबग पहायला मिळत आहे.
-
लासलगाव: झेंडूच्या फुलांना भाव नसल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा
नाशिकमधील लासलगावमधील शेतकरी नाराज आहेत. याचे कारण म्हणजे झेंडूच्या फुलांना अपेक्षित भाव मिळत नाहीये. दसऱ्याला 15-20 रुपये किलो भाव मिळाला, दिवाळीत 50-60 रुपये अपेक्षित होता. मात्र सध्या फक्त फक्त 20-22 किलो दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची मेहनत वाया गेली आहे.
-
बीडमध्ये भर चौकात तरुणांच्या दोन गटांमध्ये राडा
बीड शहरातील गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये तरुणांच्या दोन गटात राडा झाला. गाडीला कट लागल्याच्या कारणातून या दोन गटात मारामारी झाली. बराच वेळ हा सगळा प्रकार सुरू होता. यामध्ये एक जण जखमी झाला आहे. पोलीसांनी घटनास्थळी पोहोचत दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. पोलीस कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून दोन्ही गटातील तरुणांवर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
झाडावर चढलेल्या तरुणाला लागला शॉक
पुण्यातील बोबेवाडी परिसरात तरुण झाडाची फांदी तोडण्यासाठी झाडावर चढला आणि त्याला इलेक्ट्रिक शॉक लागला. शॉक लागल्यानंतर बेशुद्ध अवस्थेत तो झाडाच्या फांदीला अडकला. अखेर तरुणाला खाली उतरवून त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.
-
कल्याणमध्ये दोन पोलीस स्टेशनमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
कल्याणमध्ये वेगवेगळ्या दोन पोलीस स्टेशनमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षकासह पोलीस कॉस्टेबला लाच घेताना अटक करण्यात आली. कल्याण खडकपाड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम गंगाराम जोशी सह पोलीस कॉस्टेबल विजय वामन काळे या दोघांना अटक झाली आहे.
-
सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण
जळगावच्या सराफ बाजारात सलग तिसऱ्या दिवशी सोन्या चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात 800 रुपयांनी तर चांदीच्या दरात तब्बल 4 हजार रूपयांनी घसरण झाली आहे. सोन्याचे दर जीएसटी 1 लाख 31 हजार रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 70 हजार रुपयांवर आले आहे. ऐन दिवाळीत सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून सराफ दुकानामध्ये खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली आहे.
-
सरकार झोपायचं सोंग घेत आहे- रोहित पवार
“सरकार झोपायचं सोंग घेत आहे. आम्ही आंदोलन करत आहोत. लोकांच्या अडचणी मांडण आमचं काम करत आहोत. आमचा संघर्ष सुरूच राहील. सरकारला गुडघ्यावर आणू,” असं आमदार रोहित पवार म्हणाले.
-
श्रीकृष्णनगरमध्ये स्मृती चिन्हाचे सुशोभीकरण उद्घाटन खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते
बोरीवली (पूर्व) येथील श्रीकृष्णनगरमधील आप्पासाहेब सिधये मार्गावर, श्री स्वामी समर्थ मठाजवळ उभारण्यात आलेल्या स्मृती चिन्हाच्या सुशोभीकरणाचे उद्घाटन आज उत्साहात पार पडले. या कामाचे सुशोभीकरण उत्तर मुंबईचे खासदार आणि केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री मा. श्री पीयूष गोयल यांच्या खासदार निधीतून तसेच गणेश खणकर यांच्या संकल्पनेतून करण्यात आले आहे. या उद्घाटन सोहळ्याला खासदार श्री गोपाळ शेट्टी आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते मा. प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत स्मृती चिन्हाचे उद्घाटन करण्यात आलं आहे.
-
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षाचा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पायात चप्पल न घालण्याचा पण .
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी दसऱ्यापासून चप्पल न घालण्याचा पण केला आहे. खरडून गेलेल्या जमिनी दुरुस्त करण्यासाठी मनरेगाचे पैसे कधी मिळणार तोपर्यंत शेतकरी शेतात उत्पन्न कसे घेणार हा शेतकऱ्यासमोर प्रश्न आहे. राज्य सरकारने दिलेले पॅकेज शेतकऱ्यासाठी पुरेसं नाही त्यामुळे संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
-
मेधा कुलकर्णीवर गुन्हा दाखल व्हावा : रुपाली ठोंबरे
शनिवारवाडा प्रकरणानंतर रुपाली ठोंबरे यांनी मेधा कुलकर्णी यांच्यावर निशाणा साधला आहे. मेधा कुलकर्णीवर गुन्हा दाखल व्हावा असं वक्तव्य रुपाली ठोंबरे यांनी केलं आहे. केंद्रीय नेत्यांनी मेधा कुलकर्णींना समज द्यावी असंही रुपाली ठोंबरे म्हणाल्या आहेत.
-
भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड ठाकरेंच्या शिवसेनेत
नाशिकमधील भाजप पदाधिकाऱ्याने ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करतात. यावेळी ‘नरकासूर कोण ते वेगळं सांगण्याची गरज नाही’ असं उद्धव ठाकरेंनी भाजपाला टोलाही लगावला आहे.
-
रोज 12 शेतकरी आत्महत्या करतात, लाज वाटत नाही का? : बच्चू कडू
आमदार बच्चू कडू यांनी शेतकरी आत्महत्या आणि सोयाबीनला मिळणाऱ्या कमी भावावरून सरकारवर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली आहे. आमच्या बोलण्याचं एवढं तुम्हाला दुःख होते, पण तुमच्या धोरणांमुळे रोज आमच्या १२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, त्याचं काय करायचं? असा संतप्त सवाल त्यांनी विचारला. शेतकऱ्यांना ५०० ते ३००० रुपये क्विंटलने सोयाबीन विकावे लागत आहे. हमीभाव खरेदी केंद्रे सुरू न केल्याबद्दल त्यांनी सरकारला थेट लाज वाटत नाही का, असाही प्रश्न बच्चू कडूंनी केला
-
जळगावच्या सराफ बाजारात मोठी घसरण, लक्ष्मीपूजनापूर्वी सोने-चांदीचे दर कोसळले
यंदा दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोन्याच्या दरात तब्बल ८०० रुपये प्रति तोळा आणि चांदीच्या दरात तब्बल ४,००० रुपये प्रति किलोने मोठी घसरण नोंदवली गेली आहे. या घसरणीनंतर जळगाव सराफ बाजारात सोन्याचे दर १ लाख २७ हजार २०० रुपये प्रति तोळा (१०० ग्रॅम) तर चांदीचे दर १ लाख ६५ हजार रुपये प्रति किलोवर आले आहेत. दिवाळी आणि लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी करण्याची परंपरा असल्याने दरातील या मोठ्या घसरणीमुळे ग्राहकांना खरेदीसाठी मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे, ज्यामुळे सराफ बाजारात उत्साह संचारला आहे.
-
कितीही लवंगी बॉम्ब फोडले, तरी आता महायुतीचा आयटम बॉम्ब फुटल्याशिवाय राहणार नाही : एकनाथ शिंदे
आगामी निवडणुकांच्या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. गेल्या वेळेस मी इथेच बोललो होतो की विधानसभेत लँडस्लाईड मतदान होईल आणि निवडून येऊ. आता येणाऱ्या महापालिका निवडणुकीतही तेच होणार आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काही दिवसांपूर्वी निवडणूक घ्या, असे म्हणणारे विरोधक आता पराभवाच्या भीतीने ‘निवडणुका पुढे घ्या’ असे सांगत आहेत. पराभव दिसू लागला की लगेच महायुती आणि निवडणूक आयोगावर आरोप करणे हा त्यांचा रोजचा धंदा झाला आहे. या लोकांनी कितीही लवंगी बॉम्ब फोडले, तरी आता महायुतीचा आयटम बॉम्ब फुटल्याशिवाय राहणार नाही. लोक त्यांची हार लपवण्यासाठी ईव्हीएम आणि निवडणूक आयोगावर टीका करत आहेत, पण काहीही झाले तरी विजय हा महायुतीचाच होणार, असे ठाम मत त्यांनी मांडले.
-
केंद्राकडून अतिवृष्टीग्रस्तांना मोठ्या मनाने मदत : एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी राज्यातील शेतकरी आणि नुकसानीवर भाष्य केले. सध्या शेतकरी संकटात आहे, बळीराजाच्या डोळ्यात अश्रू होते. मात्र, आम्ही बांधावर जाऊन शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार, महायुती सरकारने नुकसान भरपाईपोटी मोठी मदत जाहीर केली आहे आणि ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली आहे. यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना विनंती केली, कारण राज्यावर मोठे संकट होते आणि केंद्राने मोठ्या मनाने मदत केली, असे त्यांनी स्पष्ट केले.
-
ठाणेकरांनीच मला मोठं केलं – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाण्यात दिवाळी पहाट उत्सवाच्या निमित्ताने प्रचंड उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व ठाणेकरांना दीपावलीच्या मनापासून शुभेच्छा दिल्या. “ठाण्यामध्ये फिरत असताना प्रचंड उत्साह, जोश आणि जल्लोष पाहायला मिळाला, तरुणाई ओसंडून वाहत होती,” असे त्यांनी नमूद केले. धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेली उत्सवाची परंपरा आजही ठाण्यात कायम आहे. सण-उत्सवाच्या माध्यमातून सगळे लोक एकत्र आले पाहिजे, ही भावना ठेवून हे कार्यक्रम साजरे केले जातात. ठाणेकरांच्या आशीर्वादानेच आपण मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री झालो, त्यामुळे आपल्यावर ठाणेकरांचे आशीर्वाद कायम आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांनी हे सण-उत्सव वाढवले, त्यामुळे ठाण्याला ‘उत्सवाच्या पंढरी’चे आगळेवेगळे महत्त्व आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
-
पराभव दिसू लागल्याने निवडणुका पुढे ढकला असं म्हणत आहेत – एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला
आधी निवडणुका लवकर घ्या असं म्हणत होते. आता त्यांना पराभव दिसू लागला म्हणून पुढे ढकला निवडणुका असा धोशा लावला आहे, असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. पराभव दिसायला लागल्यावर महायुतीवर आरोप करतात असंही ते म्हणाले. राज ठाकरेंच्या आरोपांनंतर एकनाथ शिंदे यांनी ही टीका केली.
-
“आम्ही नेहमीच युतीचा धर्म पाळला” – शिंदे गटाच्या युती प्रस्तावावर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया
शिवसेना शिंदे गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या युतीचा प्रस्ताव आलेला असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रवक्त्या सायली दळवी यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले. “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच युतीचा धर्म पाळला आहे. उलट टीका करण्याचं काम नेहमी शिंदे गटाकडूनच झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केवळ त्या टिकेला उत्तर दिलं आहे.” असं त्या म्हणाल्या.
-
नागपूर – महानगरपालिकेच्या मुख्यालयात काँग्रेसचं आंदोलन
नागपूरमध्ये महानगरपालिकेच्या मुख्यालयात काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे. शहरांतील विविध समस्यांवरून काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करत आहे. या प्रश्नांवरून महापालिका प्रशासनला जाब विचारला जात आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींची जवानांसोबत दिवाळी साजरी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवानांसोबत दिवाळी साजरी केली. पंतप्रधान मोदी यांनी INS विक्रांतला दिली भेट. पंतप्रधान मोदींनी सर्व देशवासियांना दिवाळीच्या दिल्या शुभेच्छा.
-
-सरकारकडे शेतकऱ्यांसाठी वेळ नाही, हे दुर्दैव – रोहित पवार
संजय शिरसाट यांच्या कृतीतून अहंकार दिसला. सरकारकडे शेतकऱ्यांसाठी वेळ नाही, हे दुर्दैव. शासन आपल्या दारी योजनेत शेतकऱ्यांच्या दारी गेले, ही योजना सत्तेत येण्यासाठी आणली. आता मात्र त्या शेतकऱ्यांचा विसर पडला असे रोहित पवार यांनी म्हटले.
-
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
जालन्यातील अंबड चौफुली परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे.भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. परी दीपक गोस्वामी असं या मृत चिमुकलीचं नाव असून, ही घटना जालना शहरातील यशवंत नगर परिसरात घडली आहे.
-
दोन दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात कुठलीही वाढ नाही
जळगावच्या सराफ बाजारात गेल्या दोन दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात कुठलीही वाढ झालेली नाही. भाव स्थिर असल्याचं पहायला मिळत आहे. कालच्या दिवशी रविवारी देखील सोन्या आणि चांदीच्या दरात कुठलीही वाढ झाली नसल्याचे पहायला मिळालं. आज देखील सकाळी मार्केट उघडल्यानंतर सोन्याने चांदीच्या दरात कुठलीही वाढ झालेली नाही.
-
महाराष्ट्राचे माजी वित्तमंत्री महादेवरावजी शिवणकर यांचं निधन
महाराष्ट्राचे माजी वित्तमंत्री माजी खासदार आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते महादेवरावजी शिवणकर यांचे वृद्धापकाळाने आज निधन झालं. महादेवराव शिवणकर हे आमगाव विधानसभेचे आमदार आणि चिमूर लोकसभेचे खासदार म्हणून त्यांनी कार्यकाळ सांभाळला आहे ते महाराष्ट्राचे माजी जलसंपदा मंत्री आणि माजी वित्तमंत्री या पदावर त्यांनी कारभार केला. जनसंघापासून भाजपाचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्या समावेश होता.
-
मी भाजपचा भक्त आहे – महेश कोठारे
“मी भाजपचा भक्त आहे, मी मोदीजींचा भक्त आहे, मुंबईत नक्कीच कमळ फुलेल. जेव्हा मी पियुष गोयल यांच्या प्रचारासाठी आलो होतो, तेव्हा मी म्हटलं होतं की ते खासदार निवडून देत नाहीत, तर मंत्री निवडून देत आहेत. आता जर या विभागातून नगरसेवक नसेल तर महापौर निवडला जाईल” असं अभिनेते महेश कोठारे म्हणाले.
-
श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा
दरवर्षीप्रमाणे डोंबिवलीमध्ये हजारोच्या संख्येने तरुणाई या ठिकाणी उपस्थित होऊन दिवाळी सण साजरा करते. या पहाट मध्ये गणेश मंदिर संस्थान वेगवेगळ्या संघटना एकत्र करून नृत्य सह सामाजिक कार्यक्रम आयोजित केले त्याचे आभार, असे खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटले. यासोबतच त्यांनी विरोधकांना देखील दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
-
अतिवृष्टीच्या संकटाने शेतकरी हतबल
अतिवृष्टीच्या संकटाने शेतकरी हतबल झालाय. गुजगव्हाण येथील शेतकऱ्याने ट्रॅक्टर चालवून नष्ट केले सोयाबीन पीक,अतिवृष्टी, वाढलेला खर्च आणि शासनाच्या उदासिनतेमुळे शेतकऱ्यांचा नाईलाज
-
दिवाळी निमित्त पैशावर फायटर कोंबड्यांची झुंझ लावून जुगार
कोंबड्यांची झुंज लावून जुगार खेळणाऱ्या टोळीला वानवडी पोलिसांनी केली अटक. जुगार खेळणाऱ्या टोळीवर पोलिसांनी कारवाई करत ६ जणांना पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या. कारवाईत पोलिसांनी तब्बल 5,11,880 रुपये किमतीचा मुद्देमाल केला जप्त
-
डोंबिवली फडके रोड परिसरात पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम
डोंबिवली फडके रोड परिसरात पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम. या कार्यक्रमात आकर्षित डॉ अक्षय कुलकर्णी याचा शंख नाद. या शंख वादन याचा अनुभव घेण्यासाठी मोठी गर्दी
-
पुण्यातील सिग्नलवर थांबुन फुलांची विक्री करणाऱ्या मुलांसाठी अभ्यंगस्नान व फराळ
पालकांच्या आर्थिक बिकट परिस्थितीने शिकण्याच्या आणि खेळण्याच्या वयात रोजीरोटीसाठी सिग्नलवर फुले विक्री करणाऱ्या निरागस मुलांसाठी पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या वतीने पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील गुडलक चौकात अभ्यंगस्नानाचे आयोजन…
-
नाशिकमध्ये रिक्षा चालकाची युतीला मारहाण
मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नाशिकच्या रविवार कारंजा येथे गाडीला कट मारल्यामुळे खाली पडलेल्या युतीने जाब विचारला असता केली मारहाण. रिक्षा चालकाकडून अश्लील शिवीगाळ करत युवतीला करण्यात आली धक्काबुक्की
-
लोंढे पिता-पुत्राची अंबड पोलीस ठाण्यात रवानगी
न्यायालयीन कोठडीत गेलेला आरपीआयचा जिल्हाप्रमुख प्रकाश लोंढे व त्याचा मुलगा दीपक लोंढे खंडणी प्रकरणी नाशिकच्या अंबड पोलिसांच्या ताब्यात… बंगला बळकावण्याप्रकरणी लोंढे टोळीवर खंडणीचा स्वतंत्र गुन्हा दाखल… चौकशीसाठी मध्यवर्ती कारागृहातून लोंढे याला अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले
-
भाजपच्या माजी नगरसेवक संगीता गायकवाड करणार ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
माजी नगरसेवकांचा महायुतीच्या पक्षांमध्ये प्रवेश करण्याचा कल वाढत असताना गायकवाड यांनी थेट भाजपमधून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा घेतला निर्णय… भाजपाच्या गायकवाड ठाकरेंच्या शिवसेनेत जाणार असल्याने जोरदार चर्चा… संगीता गायकवाड यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रवेश करणार… नाशिकमधून शक्तीप्रदर्शन करत गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते मातोश्रीकडे होणार रवाना… थोड्याच वेळात नाशिकच्या विल्होळी येथून निघणार
-
निवडणुकांवरून महायुतीत नाराजीचा सूर
शिवसेना पदाधिकाऱ्यांची एकनाथ शिंदे यांच्याकडे स्वतंत्र लढण्याची मागणी… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे खासदार आणि नेते श्रीकांत शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीत महायुतीबाबत नाराजीचा सूर उमटल्याची माहीती… नाशिक, नागपूर, अमरावती आणि औरंगाबाद विभागातील पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची इच्छा केली व्यक्त…
Published On - Oct 20,2025 8:13 AM
