AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Breaking News LIVE : वादळामुळे गुजरातच्या बोटींनी भाईंदरच्या उत्तन किनाऱ्यावर घेतला आश्रय

| Updated on: Oct 31, 2025 | 1:29 PM
Share

Maharashtra Political News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE : वादळामुळे गुजरातच्या बोटींनी भाईंदरच्या उत्तन किनाऱ्यावर घेतला आश्रय

राज्यातील महापालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वजनिक निवडणुकांसाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (EVM) खरेदी, देखभाल व इतर आवश्यक खर्चासाठी निधीची मागणी कण्यात आली. जवळपास 200 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती. या निधीपैकी 50 कोटी रुपये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र खरेदीसाठी आणि उर्वरित 50 कोटी रुपये सहाय्यक अनुदान म्हणून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नगरविकास विभागाकडून शासन निर्णय जारी झाल्याची माहीती मिळत आहे. तर महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये तात्काळ SIT नेमावी… अशी देखील मागणी करण्यात येत आहे. यासह आरोपींवर कठोर शासन करण्याच्या मागणीसाठी बीड येथील केज शहरात कॅन्डल मार्च काढण्यात आला. कॅन्डल मार्चमध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला पदाधिकाऱ्यांसह विद्यार्थी, विद्यार्थिनींचा मोठा सहभाग होता. तर पावसाने देखील थैमान घातलं आहे. चिपळूण परिसरात रात्रीपासून सतत पाऊस सुरू आहे. पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचलं आहे. कापून ठेवलेला भात ओला होऊन कुजायला सुरुवात झाली आहे. शेतकरी हवालदिल झाला असून आर्थिक फटका बसला आहे… नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्यांनी सरकारकडे मागणी केली आहे. यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्र, क्रिकेट, मनोरंजन, सामाजिक , राजकारण अशा विषयातील महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 31 Oct 2025 01:26 PM (IST)

    सरकारचा पैसा शेतकऱ्यांकडे जात नाही तोवर आंदोलन संपणार नाही – बच्चू कडू

    सरकारचा पैसा शेतकऱ्यांकडे जात नाही तोवर आंदोलन संपणार नाही… सरकारने हात वर केले म्हणून अशी अवस्था झाली आहे. सरकारने आंदोलनाची वेळच येऊ द्यायला नको होती… आंदोलन न करणारे आता कमेंट्स करत आहेत.. शेंगदाण्यची चव माहित नसणाऱ्यांनी काजूवर बोलू नये… असं देखील बच्चू कडू म्हणाले.

  • 30 Oct 2025 04:58 PM (IST)

    डोंबिवलीत फेरीवाल्याचा एकावर जीवघेणा हल्ला

    डोंबिवलीत फेरीवाल्याचा एका व्यक्तीवर  जीवघेणा हल्ला

    रुग्णालयासमोर खराब नारळ विकण्यास विरोध केल्याने फेरीवाल्यांनी चाकूने केला जीवघेणा हल्ला

    हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी,  खाजगी रुग्णालयात उपचार सुरू

    डोंबिवली MIDC परिसरातील एम्स’ हॉस्पिटल परिसरातील घटना

    मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपीचा शोध सुरू

  • 30 Oct 2025 03:54 PM (IST)

    वादळामुळे गुजरातच्या बोटींनी भाईंदरच्या उत्तन किनाऱ्यावर घेतला आश्रय

    अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळामुळे समुद्रात लाटांचा जोर वाढला असून मच्छीमारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गुजरात राज्यातील जाफराबाद येथून निघालेल्या अनेक मासेमारीच्या बोटीने सध्या मीरा-भाईंदरचा उत्तन किनाऱ्यावर आश्रय घेतलेला आहे. वादळाचा धोका लक्षात घेऊन स्थानिक प्रशासन आणि मत्स्य व्यवसाय विभागाने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. समुद्र किनारपट्टीवर पोलीस आणि समुद्र सुरक्षा दलाने गस्त वाढवली आहे उत्तम परिसरातील रहिवाशांनी सांगितले की अचानक बाहेरील राज्यातील बोटिंची संख्या वाढल्याने किनाऱ्यावर हालचाल वाढली असून सर्व बोटी सुरक्षा ठिकाणी थांबवल्या आहेत. हवामान खात्याने पुढील दोन दिवस समुद्र खवळलेला राहण्याचा इशारा दिला आहे.

  • 30 Oct 2025 03:37 PM (IST)

    बीड शहरातील एका व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केलेल्या रुग्णाचा संशयास्पद मृत्यू

    इमामपुर येथील साईनाथ कदम नामक व्यक्तीला रात्री 11 वाजता बीड शहरातील व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले होते‌. त्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. मारहाणीत मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. तर व्यसनमुक्ती केंद्राकडून त्याला फिट आल्यानंतर मृत्यू झाला असं सांगितलं जात आहे. मृतदेह शवविच्छदनासाठी बीडच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आला आहे. मृत व्यक्तीच्या शरीरावर अनेक जखमा दिसत आहेत.

  • 30 Oct 2025 03:13 PM (IST)

    एनडीएचा जाहीरनामा येत्या 24 तासांत प्रसिद्ध होईल: सम्राट चौधरी

    बिहार विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्याबाबत सम्राट चौधरी म्हणाले की, 24 तासांच्या आत प्रसिद्ध केला जाईल. एनडीएचा जाहीरनामा बिहारच्या जनतेला महत्त्वपूर्ण भेट असेल.

  • 30 Oct 2025 03:07 PM (IST)

    अमेरिकेने चीनवरील टॅरिफ रेट कमी केले

    अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीनंतर सहा वर्षांनी ट्रम्प यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत चीनवरील आयात शुल्क57 टक्क्यांवरून 47 टक्के करण्यात आले आहे.

  • 30 Oct 2025 02:55 PM (IST)

    जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करण्याच्या आदेशावर समाधानी नाही : धंगेकर

    जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करण्याच्या आदेशावर समाधानी नसल्याचं धंगेकर यांनी म्हटलं आहे. धर्मादाय आयुक्तांकडे हे अधिकार नसल्याचंही धंगेकरांनी म्हटलं.

  • 30 Oct 2025 02:45 PM (IST)

    शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे नेते महेबूब शेख यांचे मंत्रालयासमोर आंदोलन

    शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे नेते महेबूब शेख यांनी मंत्रालयासमोर आंदोलन केलं आहे. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात त्यांनी हे आंदोलन केलं आहे.

  • 30 Oct 2025 02:31 PM (IST)

    या मोर्चाद्वारे आम्ही नोंदवलेल्या आक्षेपांवर आम्हाला न्याय मिळावा: अनिल परब

    1 नोव्हेंबरच्या सत्याच्या मोर्चाबाबत विरोधकांची पत्रकार परिषद झाली. सत्याच्या मोर्चाबाबत विरोधकांची तासभर बैठकही झाली. “या मोर्चाद्वारे आम्ही नोंदवलेल्या आक्षेपांवर आम्हाला न्याय मिळावा” असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.

  • 30 Oct 2025 02:06 PM (IST)

    जनतेला सत्य समजण्यासाठी 1 नोव्हेंबरचा मोर्चा : अनिल परब

    1 नोव्हेंबरच्या सत्याच्या मोर्चाबाबत विरोधकांची पत्रकार परिषद सुरु आहे. फॅशन स्ट्रीटपासून मोर्चाला सुरुवात होणार आहे.  जनतेला सत्य समजण्यासाठी मोर्चा काढणार असल्याचं अनिल परब यांनी म्हटलं आहे.  तसेच शरद पवार मोर्चाला उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

  • 30 Oct 2025 01:58 PM (IST)

    बैठकीतून नक्कीच चर्चा निघेल-दत्तात्रय भरणे

    बच्चू कडू मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री यांची आज एकत्र बैठक होणार आहे. शेतकरी अडचणीत आहे याबद्दल कुणाचे दुमत नाही,शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे अतिवृष्टी झालेल्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना उभ करणं पहिलं शासनाचे कर्तव्य आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचं दुमत नाही आजच्या बैठकीत या आंदोलनासंदर्भात तोडगा निघेल,बच्चू कडूच्या मागण्या मान्य करण्यासाठी योग्य तो तोडगा निघेल असे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले.

  • 30 Oct 2025 01:50 PM (IST)

    कोण प्रणिती शिंदे, असल्या चिल्लर माणसांना आम्ही ओळखत नाही

    कोण प्रणिती शिंदे, असल्या चिल्लर माणसांना आम्ही ओळखत नाही अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांची खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर केली. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात जर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार असतील तर आम्ही युती करणार नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जीवावर त्या लोकसभेत खासदार झाल्या अन्यथा सोलापूर महापालिकेच्या नगरसेवक ही झाल्या नसत्या. विधानसभेला प्रणिती शिंदे यांनी स्वतःच्या राजकारणासाठी आमच्यासोबत गद्दारी केली त्यामुळे आता काँग्रेस सोबत युती नाही असे कोळी म्हणाले.

  • 30 Oct 2025 01:40 PM (IST)

    यवतमाळ राष्ट्रवादीमय करण्याचे अजितदादांचे आवाहन

    09 वर्षे झाले स्थानीक स्वराज संस्था निवडणूका झाल्या नाहीत. यामधूनच आमदार, खासदार घडतो.जूना नवा वाद न करता आपण सगळ्याना घेऊन चाललो.आपण या निवडणुकीत कमी पडू नका. पोलिस खात्याने दूजा भाव न कराता सगळ्यांना न्याय दिला पहिजे. यवतमाळ राष्ट्रवादीमय करण्याचे आवाहन अजित पवार यांनी केले.

  • 30 Oct 2025 01:30 PM (IST)

    यवतमाळमध्ये अजितदादांना दाखवले काळे झेंडे

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्याला यवतमाळच्या बाभुळगाव मध्ये काळे झेंडे दाखवले. प्रहारच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. काळे झेंडे दाखवत असताना पोलिसांनी काळे झेंडे दाखवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी काठी मारली. बच्चू कडू यांच्या आंदोलनाला भेट दिली नसल्याने काळे झेंडे दाखवले.

  • 30 Oct 2025 01:20 PM (IST)

    सुषमा अंधारे आणि रुपाली पाटील यांच्यात शाब्दिक चकमक

    बीड जिल्ह्यातील वडवणी येथे डॉक्टर महिलेच्या कुटुंबीयांसोबत संवाद साधताना सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादीच्या रूपाली पाटील ठोंबरे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. मी त्या पक्षाची आहे मात्र महिला आयोगाने चुकीची भुमिका घेतली यामुळे उघड भुमिका घेतली असे रूपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या. तर फलटण बारामती लोकसभेत येतं असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

  • 30 Oct 2025 01:10 PM (IST)

    हर्षवर्धन सपकाळ यांची पुन्हा बैठकीला दांडी

    विरोधी पक्षांची निवडणूक आयोगाविरोधात एकजूट झाली आहे. १ नोव्हेंबर रोजी मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे. सत्याचा मोर्चासाठी आज मुंबईत वाय बी चव्हाण सभागृहात बैठक होत आहे. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा एकदा दांडी मारल्याचे दिसते. तर काँग्रेसने या बैठकीसाठी त्यांचे दोन प्रतिनिधी पाठवल्याचे समोर येत आहे.

  • 30 Oct 2025 01:00 PM (IST)

    आज संध्याकाळी शेतकरी नेते-मुख्यमंत्री बैठक

    सर्व शेतकरी नेते आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये आज सायंकाळी सात वाजता मुंबईत बैठक होणार. मुंबईमधील सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ही बैठक बोलावली आहे. बच्चू कडू यांच्यासह सर्व शेतकरी नेते मुंबईसाठी रवाना झाले आहेत.

  • 30 Oct 2025 12:57 PM (IST)

    जैन बोर्डिंगप्रकरणी धर्मादाय आयुक्तांसमोर सुनावणीला सुरुवात

    जैन बोर्डिंगप्रकरणी धर्मादाय आयुक्तांसमोर सुनावणीला सुरुवात झाली आहे. गोखले बिल्डरने जैन बोर्डिंग प्रकरणाची आरोप फेटाळले आहेत. व्यवहार रद्द करण्याची आमची तयारी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. गोखले बिल्डरकडून उत्तर दाखल करण्यात आलं आहे. व्यवहार रद्द झाल्यावर स्टॅम्पड्युटी परत करण्याच्या सूचना द्या, अशी मागणी गोखले बिल्डरच्या वकिलांनी केली.

  • 30 Oct 2025 12:41 PM (IST)

    ठाकरेंच्या सेनेच्या सुषमा अंधारे वडवणीमध्ये दाखल

    ठाकरेंच्या सेनेच्या सुषमा अंधारे वडवणीमध्ये दाखल झाल्या असून त्यांनी डॉक्टर महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. रुपाली ठोंबरे पाटीलही पीडित कुटुंबीयांच्या भेटीला पोहोचल्या आहेत.

  • 30 Oct 2025 12:35 PM (IST)

    धाराशिवमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्काजाम आंदोलन

    धाराशिव शहरातील रस्ते आणि नाल्यांच्या कामावर आलेली स्थगिती उठवावी यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं आहे. धाराशिव शहरातील 140 कोटींच्या रस्ते आणि नाल्यांच्या कामाला दिलेली स्थगिती लवकर उठवावी या मागणीसाठी महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे.

  • 30 Oct 2025 12:23 PM (IST)

    सुषमा अंधारे यांच्याकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू

    बीड- सुषमा अंधारे डॉक्टर महिलेच्या गावात दाखल झाल्या असून पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करणाऱ्या आंदोलकांशी त्या संवाद साधत आहेत. तीन तारखेला आपल्याला फलटणला जायचंय, असं त्या म्हणत आहेत. सुषमा अंधारे यांच्याकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.

  • 30 Oct 2025 12:18 PM (IST)

    वडवणी गावातल्या आंदोलनस्थळी पोहोचल्या सुषमा अंधारे

    पीडित डॉक्टर महिलेच्या कुटुंबीयांची सुषमा अंधारे भेट घेणार आहेत. वडवणी गावातल्या आंदोलनस्थळी त्या पोहोचल्या आहेत. वडवणीत पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यात येत आहे. फलटणमधल्या डॉक्टर महिला आत्महत्येप्रकरणी न्याय मिळावा, अशी त्यांची मागणी आहे.

  • 30 Oct 2025 12:12 PM (IST)

    पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये फेरफार करण्यासाठी डॉक्टरांवर दबाव होता- वर्षा गायकवाड

    “पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये फेरफार करण्यासाठी डॉक्टरांवर दबाव होता. डॉक्टर महिलेचा अपमान केला, तिला धमकावलं गेलं. भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांचा दबाव होता. महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महिला डॉक्टरच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं,” असा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला आहे.

  • 30 Oct 2025 12:08 PM (IST)

    महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी काँग्रेसची पत्रकार परिषद

    “महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था राहिली नाही. रक्षकच भक्षक झाले आहेत. फलटणची महिला डॉक्टर राजकीय दबावाचा सामना करत होती,” असा आरोप काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे. फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी काँग्रेसने पत्रकार परिषद घेतली आहे.

  • 30 Oct 2025 11:57 AM (IST)

    ज्योती मेटे यांनी महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांची घेतली भेट

    महिला डॉक्टरच्या गावात गावकऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी शिवसंग्राम नेत्या डॉक्टर ज्योतीताई मेटे दाखल. डॉक्टर ज्योती मेटे यांनी महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांची घेतली भेट. पाण्याच्या टाकीवर चढून सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी ज्योती मेटे दाखल.

  • 30 Oct 2025 11:51 AM (IST)

    बच्चू कडूंनी मानले मनोज जरांगेंचे आभार

    “मनोज जरांगे हे आपल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. नेते एकत्र आले आणि त्याची मूठ बांधली. ओबीसी नेत्यांना, सर्व पक्षांना आपण पत्र दिले होते. उद्धव ठाकरे यांचा नाही पण त्यांचे खासदार उमेश पाटील यांनी पाठिंबा दिला” असं बच्चू कडू म्हणाले.

  • 30 Oct 2025 11:43 AM (IST)

    भाजपा आमदार सुधीर गाडगीळांचा लेटरबॉम्ब

    आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार सुधीर गाडगीळांनी लेटरबॉम्ब टाकला आहे. पक्षातल्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही,न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,अशी भूमिका जाहीर केली. काँग्रेसमधून भाजपात आलेल्या नेत्यांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.

  • 30 Oct 2025 11:23 AM (IST)

    रस्त्याची अनेक दिवसापासून दुरावस्था

    नांदेडच्या माहूर तालुक्यातील सारखणी-भगवती रस्त्याची अनेक दिवसापासून दुरावस्था. रस्त्यावरील पाणीसाचलेल्या खड्ड्यात बसून शाळकरी मुले व गावकऱ्यांनी केले आंदोलन.आदिवासी बहुल भागात दहा वर्षापासून रस्त्याची दुरावस्था. छोट्या मोठ्या अपघातांना निमंत्रण, शाळकरी विद्यार्थी व रुग्णांना होतोय मोठा त्रास.

  • 30 Oct 2025 10:45 AM (IST)

    बीड – पालीतील कॅनरा बँक फोडली, साडेअठरा लाखांची रोकड लंपास

    बीड तालुक्यातील पाली येथे गुरुवारी पहाटे चोरट्यांनी कॅनरा बँकेत मोठी चोरी केली. या घटनेत जवळपास आठरा लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास बँकेच्या मागील बाजूची भिंत फोडून आत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने लॉकर तोडून रोकड काढून नेली. बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.

  • 30 Oct 2025 10:26 AM (IST)

    बीड – वडवणी तालुक्यातील महिला डॉक्टरच्या गावातील नागरिकांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

    बीडच्या वडवणी तालुक्यातील महिला डॉक्टरने फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असताना एका हॉटेलच्या रूममध्ये गळफास लावून आत्महत्या केली. त्यानंतर एसआयटीच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरणाचा तपास करावा अशी मागणी नातेवाईकांसह, कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून केली जात आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांनी जाहीर माफी मागावी या मागण्यांसाठी आज बीडच्या वडवणी तालुक्यातील महिला डॉक्टरच्या गावातील नागरिकांकडून पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू आहे.

  • 30 Oct 2025 09:55 AM (IST)

    ठाण्यातील रेल्वे प्लॅटफॉर्म तीन आणि चार ची लांबी वाढवणार

    प्रवाशांचा वाढता ताण लक्षात घेता लोकल आता बारा ऐवजी पंधरा डब्याची केली जाणार . यामुळे ठाण्यातील प्लॅटफॉर्म नंबर तीन व चार ची लांबी दीडशे फुटाणे वाढवली जाणार..

  • 30 Oct 2025 09:55 AM (IST)

    लाचखोरी प्रकरणी नायगाव पंचायत समितीचे नऊ गृहनिर्माण अभियंता कार्यमुक्त

    घरकुल योजनेत लाच घेतल्याची आमदार राजेश पवार यांच्यासमोर दिली होती कबुली. नांदेड जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी काढले कार्यमुक्तीचे आदेश. आता आमदार राजेश पवार यांच्याकडून उमरी व धर्माबाद येथील कर्मचाऱ्यांना सावधानतेचा इशारा

  • 30 Oct 2025 09:40 AM (IST)

    नाशिकच्या फेक कॉल सेंटर प्रकरणात आता ईडीची एन्ट्री

    दोन महिन्यांपूर्वी उघड झालेल्या या बनावट कॉल सेंटर घोटाळ्यात ईडीकडून तपास सुरू. चार वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि बँक कर्मचारी रडारवर. अमेरिकन नागरिकांना फसवणाऱ्या या रॅकेटद्वारे महिन्याला तब्बल चार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा संशय

  • 30 Oct 2025 09:30 AM (IST)

    मुंबईतून एमडी ड्रग्स आणून सोलापुरात विकणाऱ्या तस्कराला अटक

    मुंबईतून एमडी ड्रग्स आणून सोलापुरात विकणाऱ्या पुण्यातील तस्कराला करण्यात आलं अटक.सोलापूर शहर गुन्हे शाखेकडून करण्यात आली विशेष कारवाई, एक लाख रुपये किमतीचे 32 ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त. मोहम्मद अझर हैदरसाहब कुरेशी असं अटक केलेल्या तस्कराचं नाव, शहर गुन्हे शाखेची एका महिन्यात दुसरी कारवाई

  • 30 Oct 2025 09:20 AM (IST)

    आज फलटण न्यायालयात महत्वाची सुनावणी

    डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी पीएसआय गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांची पोलीस कोठडीची मुदत संपली. पीएसआय बदने याला याआधी 5 दिवसाची सुनावली होती पोलीस कोठडी तर प्रशांत बनकर याला दुसऱ्यांदा 3 दिवसाची सुनावली होती पोलीस कोठडी. अधिक तपासासाठी दोघांना पोलीस कोठडी मिळावी यासाठी फलटण न्यायालयात हजर केले जाणार…

  • 30 Oct 2025 09:12 AM (IST)

    जरांगेंनी केली सरकारवर जोरदार टीका

    मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील बच्चू कडू यांच्या आंदोलनात सहभागी झाले असून त्यांनी म्हटले की, सरकारने दिलेला शब्द फिरू नये.

  • 30 Oct 2025 08:55 AM (IST)

    टिटवाळा परिसरातील धक्कादायक घटना

    गहाण ठेवलेल्या दागिने परत मिळवण्यासाठी गँगस्टर स्टाईलने सोनाराचे अपहरण करून बेदम मारहाण! 2 लाखांची खंडणी मागत “दरीत फेकून जीवे ठार मारण्याची ही धमकी … तावडीतून सुटल्यानंतर सोनाराची पोलीस ठाण्यात धाव… घटनेने खडवली परिसरात खळबळ; टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल प्रक्रिया सुरू…

  • 30 Oct 2025 08:45 AM (IST)

    नाशिक – बालविवाह प्रकरणी पालकांवर गुन्हा दाखल

    मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण नसतानाही लग्न करून दिल्याने पालकांवर बालविवाह प्रतिबंधक कायदा अंतर्गत तर पतीवर बलात्काराचा गुन्हा दाखल… प्रसूतीसाठी मनपाच्या रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्रकार उघडकीस… प्रसूतीनंतर वैद्यकीय नोंद पोलिसांकडे पाठविल्यानंतर पोलिसांनी पीडित महिलेचा  घेतला जबाब… जबाब नोंदवून घेतल्यानंतर खात्री पटवून पीडित व तिचा पती अल्पवयीन असल्याचे उघडकीस… नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात पालक आणि पतीवर गुन्हा दाखल….

  • 30 Oct 2025 08:35 AM (IST)

    निफाड तालुक्याच्या पूर्व भागात मुसळधार पावसाचे थैमान…

    सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शेतात पाणी साचून तळ्याचे स्वरूप… गोळेगाव, गोंदेगाव, मरळगोई, भरवस फाटा आणि देवगाव या गावातील शेती पिकांचे नुकसान… कांदा, द्राक्ष बाग, तसेच काढणीला आलेला मका, सोयाबीन आणि टोमॅटो या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान… पावसाचे पाणी शेतात साचलेले आणि बुडालेली पिके अशी दृश्ये ड्रोनच्या माध्यमातून…

  • 30 Oct 2025 08:21 AM (IST)

    अक्कलकोट येथे शेतकऱ्यांचा कर्जमाफीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने 7 दिवसापासून आमरण उपोषण सुरु

    उपोषणकर्ते आनंद बुक्कानुरे यांची तब्येत खालावली असून दवाखान्यात उपचार न घेता 7 व्या दिवशीही उपोषण सुरूच… शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ठाकरे गटाचे अक्कलकोट तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे यांचे आमरण उपोषण सुरु…. अक्कलकोट तालुक्यातील कलहिप्परगा गावात गेल्या 7 दिवसांपासून अन्नत्याग उपोषण सुरु आहे… शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा, प्रतीहेक्टरी 50 हजार रुपये अतिवृष्टी नुकसान भरपाई द्या यासह विविध मागण्यांसाठी सुरू आहे उपोषण… जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवणार…

Published On - Oct 30,2025 8:19 AM

Follow us
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.