Maharashatra News Live : मुंबईत सीएनजी उपलब्ध नसल्याने लोक त्रस्त, वाहनांच्या लांब रांगा
Maharashtra News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

राज्यभरात 10 हजार 720 अपघात झाले आहेत. अपघातात सर्वाधिक घटना मुंबईत पण अपघातातील सर्वाधिक मृत्यू पुणे ग्रामीण येथे झाले आहेत. मुंबईत नऊ महिन्यात 1 हजार 878 अपघात झाले आणि 262 मृत्यू नोंदविले गेले, तर पुणे ग्रामीण भागात झालेल्या अपघातात 764 जणांचा मृत्यू झाला आहे. समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातात देखील 16 टक्के वाढ झाली आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर 29 टक्के घट झाली आहे. तर नवले पूल येथे देखील अपघातांची संख्या वाढली आहे. नवले पूल परिसरात प्रति तास वेगमर्यादा 30 किलोमीटर होणार. नवले पूल अपघातानंतर जड वाहनांना आणि इतर वाहनांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनावर स्पीड गण लावून जागेवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तर, धुळ्यात तापमानाचा पारा पुन्हा एकदा घसरला. धुळे शहराचे तापमान आठ अंशाच्या ही खाली. तापमानात मोठी घट झाल्याने थंडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
LIVE NEWS & UPDATES
-
मुंबईत सीएनजी उपलब्ध नसल्याने लोक त्रस्त, वाहनांच्या लांब रांगा
मुंबईत सीएनजी उपलब्ध नसल्याने लोक त्रस्त झाले आहेत. ऑटो रिक्षा आणि टॅक्सींच्या लांब रांगेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मुंबई उपनगरातील अनेक सीएनजी पंपांवर ऑटो रिक्षा आणि टॅक्सींच्या लांब रांगा दिसत आहेत. सीएनजी पुरवठा बंद झाल्यामुळे सीएनजी पंपावर रांगा लागल्या होत्या.
-
हदगाव नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट व शिवसेना शिंदे गटाचं शक्तिप्रदर्शन
हदगाव नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट व शिवसेना शिंदे गटाचं शक्तिप्रदर्शन
शिवसेना शिंदे गटाकडून रोहिणी वानखेडे या नगराध्यक्ष पदासाठी मैदानात
तर शिवसेना ठाकरे गटाकडून सीमा गडप्पा यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल
खासदार नागेश पाटील आष्टीकर विरुद्ध आमदार बाबूराव कदम व माजी खासदार सुभाष वानखडे यांची प्रतिष्ठा पणाला
-
-
बुलढाणा नगर परिषद निवडणुकीसाठी आजी, माजी आमदारांच्या पत्नी आमने सामने
बुलढाणा नगर परिषद निवडणुकीसाठी आजी, माजी आमदारांच्या पत्नी आमने सामने आल्याचं पहायला मिळत आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजा गायकवाड विरुद्ध भाजपाचे नेते तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या पत्नी अर्पिता शिंदे या निवडणूक लढणार आहेत, त्यामुळे आता या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
-
पुणे : सिंहगड कॉलेज परिसरात तरूणाचा खून
पुण्यातील सिंहगड कॉलेज परिसरातील एका इमारतीजवळ एका तरुणाचा खून झाला आहे. कोयत्याने मारहाण खून करण्यात आला आहे. सय्यद असे मृत्यू तरुणाचे नाव असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून तो अंदाजे 20 वर्षांचा आहे. सध्या पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
-
भंडाऱ्यात सर्वत पक्ष स्वबळावर लढणार
भंडारा जिल्ह्यातील चार नगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी त्यांच्या उमेदवारांचं मोठ्या शक्तीप्रदर्शनासह आज शेवटच्या दिवशी नामांकन दाखल केले. भंडारा जिल्ह्यात भंडारा, तुमसर, पवनी आणि साकोली या चार नगरपालिकेच्या निवडणुका होत आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी अस्तित्वात असली तरी, भंडारा जिल्ह्यात ना महायुती झाली ना आघाडी झाली. त्यामुळं सर्वच राजकीय पक्षांनी त्यांचे उमेदवार उभे केले असून आता सर्वच पक्ष निवडणुकीच्या रणधुमाळीत स्वबळावर लढणार आहेत.
-
-
पुणे: हिंजवडीजवळील जांबे गावात डंपरचा अपघात
पुण्यातील हिंजवडीजवळील जांबे गावात डंपरचा पुन्हा अपघात झाला आहे. डंपरने खाली आल्याने एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. तनवी साखरे असं 20 वर्षीय तरुणीचे नाव आहे. डंपर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. मृत तन्वी साखरे आणि तिचे वडील दुचाकी वरून जात असताना दुचाकी स्लिप झाली आणि तन्वी थेट डंपरच्या चाकाखाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.
-
छत्रपती संभाजीनगर: पैठण नगरपरिषदेमध्ये महायुतीत फूट
छत्रपती संभाजीनगरच्या पैठण नगरपरिषदेमध्ये महायुती फिस्कटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कारण उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. भाजपकडून माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे यांच्या पत्नी मोहिनी सूरज लोळगे यांनी तर शिंदेंच्या शिवसेनेकडून विद्या भूषण कावसानकर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे महायुतीमधील उमेदवार एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळणार आहे.
-
काशिनाथ चौधरी यांच्या भाजप प्रवेशाला स्थगिती
काशिनाथ चौधरी यांच्या भाजप प्रवेशाला स्थगिती देण्यात आली आहे. काशिनाथ चौधरी यांनी काल भाजप प्रवेश केला होता. काशिनाथ चौधरी पालघर साधू हत्या प्रकरणातील आरोपी आहेत.
-
तळोदा नगरपालिकेसाठी दादांच्या राष्ट्रवादीतून योगेश चौधरी यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल
तळोदा नगरपालिकेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नगराध्यक्षपदासाठी योगेश चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. योगेश चौधरी यांनी भाजपा बंडखोरी करत राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. योगेश चौधरी भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक होते.
-
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या बालेकिल्ल्यातच ‘पंजा’ गायब
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय कमेटीचे सदस्य बाळासाहेब थोरात त्यांच्या मतदारसंघातील संगमनेर नगरपालिकेच्या निवडणूकीत स्थानिक आघाडीच्या माध्यमातून निवडणूकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे थोरातांच्या मतदारसंघात असलेल्या नगरपालिका निवडणूकीत काँग्रेसचा पंजा गायब झाला आहे.
संगमनेर नगरपालिकेवर अनेक वर्षांपासून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची एकहाती सत्ता आहे. पक्षातून निलंबित केलेले आमदार सत्यजित तांबे यांनी बाळासाहेब थोरात यांच्या स्थानिक आघाडीची धुरा आपल्या खांद्यावर घेतलीय. महायुतीला शह देण्यासाठी पत्नी मैथीली तांबे यांना अध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. तर आई दूर्गाताई तांबे यांचाही अर्ज दाखल केला.
-
नगरपरिषदा-नगरपंचायतींसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली
नगरपरिषदा-नगरपंचायतींसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी 8 दिवसांची मुदत देण्यात आली होत. आता 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी येत्या 2 डिसेंबरला मतदान होणार आहे. तर 3 डिसेंबरला निकाल लागणार आहे.
-
शिंदेंच्या शिवसेनेच्या शहर विकास आघाडीला पाठिंबा : राजन तेली
शिंदेंच्या शिवसेनेच्या शहर विकास आघाडीला पाठिंबा दर्शवण्यात आला होता. युती झाली नसल्याने शहर विकास आघाडीला पाठिंबा दिल्याची माहिती शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार राजन तेली यांनी दिली आहे.
-
बिबट्यांची नसबंदी करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी : नाईक
बिबट्यांची नसबंदी करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी दिल्याचं नाईक यांनी सांगितलं आहे. सुरुवातीला जुन्नर तालुक्यात बिबट्यांची नसबंदी करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
-
शेख हसीनांना फाशीची शिक्षा; मानवतेविरद्धच्या गुन्ह्यांच्या खटल्यात शेख हसीना दोषी
शेख हसीनांना फाशीची शिक्षा झाली आहे. मानवतेविरद्धच्या गुन्ह्यांच्या खटल्यात शेख हसीना दोषी आढळल्या आहेत. शेख हसीनांच्या विरोधात दाखल याचिकांवर कोर्टाने निकाल दिला आहे.
-
काशिनाथ चौधरींच्या भाजप प्रवेशाला स्थगिती
काशिनाथ चौधरींच्या भाजप प्रवेशाला स्थगिती देण्यात आली आहे. पालघर साधू हत्याकांडात मुख्य आरोपी असल्याचा आरोप असल्याने ही स्थगिती देण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. भाजपने पत्रकार परिषद घेऊन याबद्दल माहिती दिली आहे.
-
अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून बीड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी प्रेमलता पारवे
अजित पवारांच्या राष्ट्रवादी कडून बीड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी प्रेमलता पारवे यांचा नामांकन अर्ज काही वेळापूर्वी दाखल करण्यात आला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीसह एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि शिवसंग्राम एकत्र लढणार असल्याचं निश्चित होत आहे.
-
जामनेरमध्ये भाजपा विरुद्ध महाविकास आघाडीची लढत
मंत्री गिरीश महाजन यांच्या सौभाग्यवती साधना महाजन यांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज भरला आहे. जामनेरच्या नगराध्यक्ष असलेल्या तीन ट्रम्प हॅट्रिक असलेल्या साधना महाजन यांनी आज आपला उमेदवारी अर्ज पुन्हा भरला आहे. या ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत रंगणार आहे.
-
विहिरीत पडला बिबट्या, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
अहिल्यानगरमधील खारेकर्जुने गावातील विहिरीत पडला बिबट्या. सकाळीच वनविभागाने एका बिबट्याला केले होते जेरबंद. आणखी एक बिबट्या आढळून आल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. हा बिबट्या विहिरीत पडला आहे.
-
पुण्यातील नदी पत्रात महिलेचा मृतदेह
पुण्यातील डेंगळे पुल परिसरात नदी पात्रात महिलेचा मृतदेह आढळला असून पोलिसांकडून अधिकचा तपास सुरु. घटनास्थळी पोलीस पोहोचले असून, धरण परिसरातून हा मृतदेह वाहून आलाय का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे..
-
थोड्याच वेळात शेख हसीना यांच्याप्रकरणी निकाल
बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधात तेथील न्यायालयात खटला सुरु आहे. लवकरच यावर निकाल येईल. मागच्यावर्षी त्यांना सत्तेतून बेदखल व्हावं लागलं. त्या बांग्लादेशातून पळून भारतात आल्या.
-
नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रचंड गर्दी
हिंगोलीत नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची प्रचंड गर्दी. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक. हिंगोली ,कळमनुरी, वसमत येथील तहसील कार्यालयात उमेदवारांची उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रचंड गर्दी. नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस.
-
अमित ठाकरे यांची त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यावर पहिली प्रतिक्रिया
“महाराजांच्या सन्मानासाठी लढणं जर गुन्हा मानला जात असेल, तर भविष्यातही असे हजारो ‘गुन्हे’ मी अभिमानाने करेन!” असं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे. नेरूळ येथील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ भव्य पुतळ्याचे उद्घाटन करताना नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी अमित ठाकरेवर नेरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
-
नितीश कुमार यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा बिहारच्या राज्यपालांकडे सोपवला. राज्यपालांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला. येत्या 20 नोव्हेंबरच्या पाटण्याच्या गांधी मैदानात नव्या सरकारचा शपथविधी होणार.
-
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर इथेनॉल घेऊन जाणाऱ्या टँकरला आग
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर जालना जिल्ह्यातल्या जामवाडी शिवारात आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास इथेनॉल घेऊन जाणाऱ्या धावत्या टँकरने पेट घेतल्याची घटना घडली. या घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच जालना महापालिका अग्निशामक दलाचे कर्मचारी दाखल झाले आणि काही वेळानंतर ही आग विझवण्यात आली.
-
पालघर नगरपरिषदेसाठी उमेदवार नगराध्यक्षपदाचे अर्ज भरणार
पालघर नगरपरिषदेसाठी आज भाजपा, शिवसेना आणि महाविकास आघाडीचे तिन्ही नगराध्यक्षपदाचे उमेदवार अर्ज भरणार आहेत. भाजपाकडून माजी गटनेता कैलास म्हात्रे, शिवसेना शिंदे गटाकडून माजी उपनगराध्यक्ष उत्तम घरत आणि महाविकास आघाडीकडील शिवसेना उबाठाचे उपनेते माजी नगराध्यक्ष उत्तम पिंपळे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शिवसेना भाजपा दोन्ही स्वतंत्र लढणार असल्याने पालघर नगरपरिषद मध्ये तिरंगी लढत होणार आहे.
-
ठाकरे बंधू 11 वर्षांनंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी एकत्र
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आहेत. ठाकरे बंधू 2014 मध्ये स्मृतीस्थळी एकत्र आले होते. आता तब्बल 11 वर्षांनंतर ते पुन्हा एकत्र आले आहेत.
-
उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दाखल
उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दाखल झाले आहेत. तिघांनीही बाळासाहेबांना अभिवादन केलं.
-
भद्रावती नगर परिषदेपाठोपाठ भाजपमध्ये राजुरा नगर परिषदेतदेखील बंडखोरी
चंद्रपूर- भद्रावती नगर परिषदेपाठोपाठ भाजपमध्ये राजुरा नगर परिषदेतदेखील बंडखोरी झाली आहे. भाजप नगरसेवक राजेंद्र डोहे यांनी शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश केला. शिवसेना शिंदे पक्षाकडून राजेंद्र डोहे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली. भाजपकडून राजुरा नगराध्यक्षपदासाठी राधेश्याम अडाणी यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाराज झालेल्या डोहे यांनी शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केला. राजेंद्र डोहे हे संघ परिवारातील महत्त्वाचे भाजप कार्यकर्ते आहेत.
-
संजय राऊत बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी संजय राऊत स्मृतीस्थळी दाखल झाले आहेत. राऊतांनी बाळासाहेबांना अभिवादन केलं. प्रकृतीच्या कारणास्तव ते गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल होते. डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते पहिल्यांदाच समोर आले आहेत.
-
खासदार संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी
खासदार संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी पोहोचले. राऊतांकडून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन. आ. सुनील राऊतही होते उपस्थित.
-
सीएनजीचा फटका ठाण्यातही, ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षासाठी लांब रांगा
सीएनजीचा फटका ठाण्यात देखील बसला आहे. सीएनजीच्या तुटवड्यामुळे ठाणे रेल्वे स्थानक बाहेर रिक्षा पकडण्यासाठी प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ठाण्यातील अनेक ऑनलाईन सीएनजी पंप बंद असून ऑफलाइन सीएनजी पंपावर सीएनजी भरण्यासाठी पहाटेपासूनच रांगा आहेत.
-
घायवळ टोळीवर आणखी एक मोक्का
घायवळ टोळीला धक्का, निलेश घायवळ आणि सचिन घायवळसह टोळीवर आणखी एक मोक्का लागला आहे. पुणे पोलिसांकडून 4 था मोक्का दाखल करण्यात आला आहे. बांधकाम व्यवसायिकाला धमकी देत 10 ते 12 फ्लॅट आमच्या नावावर कर म्हणून बांधकाम व्यवसायकाला धमकवून फ्लॅटचा ताबा घेतल्या प्रकरणी मोक्का लावण्यात आला.
-
चंद्रपूर : भद्रावती नगरपरिषद निवडणुकीत भाजपला बंडखोरीचं ग्रहण
चंद्रपूर : भद्रावती नगरपरिषद निवडणुकीत भाजपला बंडखोरीचं ग्रहण लागलं आहे. भाजपचे भद्रावती शहराध्यक्ष सुनील नामोजवार यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश झाला असून नामोजवार यांना काँग्रेस कडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सुनील नामोजवार भद्रावती नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आहेत . अलीकडेच काँग्रेस मधून भाजपमध्ये आलेले अनिल धानोरकर यांना भाजपकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
-
दिल्ली बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर आळंदीत सर्व सुरक्षा यंत्रणा अलर्ट
आळंदीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त वारकरी लाखोंच्या संख्येने दाखल झालेत. त्यामुळे गर्दीचा फायदा घेऊन घातपात तसेच, अन्नातून विषबाधा होणार नाही याची काळजी घेण्यासाठी पोलीसांच्या सर्व सुरक्षा यंत्रणा आळंदीत अलर्ट झाल्या आहेत. तसेच पोलीसांचा तगडा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
-
सीएनजी नसल्यामुळे रिक्षा चालकांना फटका
सीएनजीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे ठाण्यात सीएनजी पंपावरती पहाटे पासूनच रिक्षांच्या लांबच लांब रांगा. ऑनलाइन पद्धतीच्या सीएनजी पंपावर बहुतेक ठिकाणी सीएनजी पंप बंद दिसत आहे. रिक्षावाल्यांचे हाल तर चार चाकी वाहनांना पेट्रोलचा सहारा घ्यावा लागत आहे…
-
निवृत्ती महाराज देशमुख यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी
प्रवचनकार निवृत्ती महाराज देशमुख यांच्या मुलीच्या साखरपुड्याचं प्रकरण सध्या सोशल मीडियावर मोठं चर्चेत आहे. ट्रोलिंगच्या पार्श्वभूमीवर निवृत्ती महाराजांनी “आता बास, आता थांबणार… यापुढे कीर्तन करणार नाही” असं विधान केलं. या वक्तव्यानं त्यांच्या अनुयायांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. संगमनेर तालुक्यातील ओझर खुर्द येथे निवृत्ती महाराज देशमुख यांच्या निवासस्थानी शालेय विद्यार्थ्यांनी निवृत्ती महाराज देशमुख यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली आहे. निवृत्ती महाराज आम्ही तुमच्या सोबत आहोत.
-
निफाड तालुक्याचा किमान तापमानाचा पारा घसरला
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे निफाड तालुका गारठला. गेल्या सहा दिवसांपासून किमान तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअस खाली. कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात 8.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद. वाढत्या थंडीपासून ऊब मिळवण्यासाठी पेटल्या ठिकठिकाणी शेकोट्या. या थंडीमुळे गहू हरभरा शेती पिकांना होणार फायदा…
-
पिंपरी-चिंचवड पोलिसांची धडक कारवाई
पिंपरी-चिंचवड पोलिसांची धडक कारवाई; ऑक्टोबरमध्ये २६ गुन्हेगार तडीपार. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ऑक्टोबर महिन्यात २६ सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून तडीपार केले. यात पाच महिलांचा समावेश आहे. या गुन्हेगारांवर विविध पोलिस ठाण्यांत गंभीर गुन्हे दाखल आहेत.
-
धुळ्यात तापमानाचा पारा पुन्हा एकदा घसरला
धुळे शहराचे तापमान आठ अंशा च्या ही खाली. तापमानात मोठी घट झाल्याने थंडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ. थंडीच्या प्रमाणात वाढ झाल्याने जंजीवन विस्कळीत. थंडी वाढल्याने शहरातील पांजरा नदीकिनारी व्यायाम करणाऱ्यांची वाढली गर्दी…
-
11 नगरपरिषद आणि 6 नगरपंचायत यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस
अर्ज भरण्याच्या करण्यात अखेरच्या दिवशी देखील महायुती किंवा आघाडीची घोषणा नाही… जिल्ह्यात अनेक ठिकाणी महायुतीतले पक्ष आमनेसामने… भगूरमध्ये शिवसेनेला बाजूला करत भाजप राष्ट्रवादी युती, तर सिन्नरमध्ये भाजप सेना आणि अजित दादा राष्ट्रवादी यांच्यात थेट तिरंगी सामना… युती किंवा आघाडी न झाल्याने दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला… गिरीश महाजन, भुजबळ, झिरवाळ, दादा भुसे, कोकाटे यांच्यासमोर आपले गड राखण्याचे आव्हान…
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात..
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये आल्हाद कोलोती यांनी नामांकन अर्ज दाखल केला आहे. मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ निवडणुकीच्या रिंगणात असल्याने चिखलदरा नगरपरिषदेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. राणा दाम्पत्यांनी आल्लाद कलोती यांचे निवासस्थानी स्वागत केले.
-
दुचाकीने घराकडे जाणाऱ्या व्यापाऱ्यांचा नायलॉन मांजाने गळा चिरला
मकर संक्रांत सणाला दोन महिने बाकी असताना नायलॉन मांजाची सर्रास विक्री सुरू आहे. या जीवघेण्या मांजामुळे दुचाकीवरून जाणाऱ्या एका व्यापाऱ्याचा गळा चिरला आहे. ही घटना वैजापूर शहरात महादेव मंदिर रोडवर घडली. विशाल विजय बोथरा असे गंभीर जखमी झालेल्या व्यापाऱ्याचं नाव आहे. व्यापाऱ्यावर नाशिक येथे उपचार सुरू असून गळा गळ्याभोवती तब्बल 13 टाके पडले आहेत. डॉक्टरांनी व्यापाऱ्याला 5 महिने बोलण्यास मनाई केली आहे. या घटनेमुळे बंदी असलेला नायलॉन मांजाची विक्री होतेच कशी असा सवाल उपस्थित केला जात आहे.
Published On - Nov 17,2025 8:17 AM
