Maharashatra News Live : नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
Maharashtra News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

आज महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ आणि काही महत्त्वाच्या हालचाली पाहायला मिळत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेणार आहेत. ज्यामुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे, कल्याण-डोंबिवली निवडणुकीच्या तोंडावर भाजपने मोठी राजकीय खेळी केली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख चेहरा दीपेश म्हात्रे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोष केणे यांना पक्षात सामील करून शिंदे गट आणि विरोधी पक्षांना मोठा धक्का दिला आहे. मनसेची आज शिवतीर्थावर मुंबई अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसोबत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तर रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक असणार आहे. याव्यतिरिक्त, आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगली दौऱ्यावर असणार आहेत. जिथे थार आणि स्कॉर्पिओ बक्षीस असलेल्या भव्य बैलगाडा शर्यतीचा थरार रंगणार आहे. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
LIVE NEWS & UPDATES
-
सांगोला तालुक्यातील कोळे गाव परिसरात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड
सांगोला तालुक्यातील कोळे गाव परिसरात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड
उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांची कारवाई
जुगार खेळणाऱ्या 35 लोकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
20 पेक्षा अधिक महागड्या गाड्या पोलिसांनी केल्या जप्त
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे रहिमतपूर येथे आगमन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे रहिमतपूर येथे आगमन
अजित पवार यांच्या ओपन जीप रॅलीला रहिमतपूर गावातून सुरुवात
रहिमतपूर येथील गांधी चौकात अजित पवार यांची पक्षप्रवेशानिमित्त जाहीर सभा
कार्यक्रमाला मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील आणि जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित
-
-
शिंदे गटाचा भाजपला धक्का, दोन माजी नगरसेवकांचा पक्षात प्रवेश
भाजपच्या पक्ष प्रवेशानंतर आता शिंदे गटही आक्रमक
भाजपाच्या दोन माजी नगरसेवकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
प्रवेशासाठी शेकडो कार्यकर्ते डोंबिवलीतून ठाण्याच्या दिशेने रवाना
शिवसेना शिंदे गटाचा भाजपला धक्का
-
विलेपार्ले एसबी रोडवरील खड्ड्यामुळे नागरिक त्रस्त
विलेपार्ले एसबी रोडवरील खड्ड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. हा खड्डा एसव्ही रोडच्या मध्यभागी आहे आणि अनेक दिवसांपासून त्याच स्थितीमध्ये आहे. दरम्यान आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी या खड्ड्याचा फोटो ट्विट करून महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या खड्ड्यात आतापर्यंत अनेक अपघात झाल्याचा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.
-
सिंधुदुर्ग: पालकमंत्री नितेश राणेंचा नागरी सत्कार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 192 वाडीवस्त्यांची आणि 25 रस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून घेण्यात आला. या निर्णयामुळे जातीवाचक वाडीवस्त्यांची व रस्त्यांची नावे बदलेला देशातील पहिला जिल्हा सिंधुदुर्ग ठरला आहे. या निर्णयाची दिल्लीपर्यंत दखल घेण्यात आली आहे. हा ऐतिहासिक निर्णय घेणारे पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वंचित समाजाच्या वतीने संविधानिक हितकारिणी महासंघातर्फे नितेश राणे यांचा ओरोस येथील जिल्हा पत्रकार भवनाच्या सभागृहात नागरी सत्कार करण्यात आला.
-
-
नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
बीड जिल्ह्यातील नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांनी आज अंतरवाली सराटी मध्ये मराठा आंदोलक मनोज जरंगे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. जरांगे पाटील आणि नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांच्यात काही विषयांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
-
इचलकरंजी: पाच वर्षीय चिमुकलीला बसला विजेचा धक्का
इचलकरंजी शहरातील रिंगरोडवरील मथुरा हायस्कूल समोर महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाच वर्षांची चिमुकली राधिका रमेश चव्हाण (रा. अब्दुललाट) हिला 11 हजार केव्ही च्या उघड्या फिडर पिलर मधून विजेचा जबर धक्का बसला. या घटनेत चिमुकली गंभीर जखमी या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. महावितरणच्या हलगर्जी कारभारावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
-
प्रकाश आंबेडकरांनी घेतली महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट
फलटण येथे महिला डॉक्टरने आत्महत्या केली होती. आज वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर हे बीडच्या वडवणीतील येथे या डॉक्टरच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या प्रकरणी पीएसआय गोपाळ बदनेला अटक करण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.
-
नंदुरबारच्या देवगोई घाटाजवळ दरीत स्कूल बस कोसळली, एका विद्यार्थ्याचा मृत्यू
नंदुरबारच्या देवगोई घाटाजवळ दरीत स्कूल बस कोसळल्याची घटना घडली आहे. बस जवळपास 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात एका विद्यार्थाचा मृत्यू झाला आहे. तर जखमींना अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
-
एमसीए निवडणुकीतील शरद पवारांच्या पॅनेलचे उमेदवार मोतीश्रीवर
मोठी बातमी समोर आली आहे. एमसीए निवडणुकीतील शरद पवारांच्या पॅनेलचे सर्व उमेदवार उद्धव ठाकरेंच्या भेटीला पोहचले आहेत. तब्बल 16 गाड्यांता ताफा हा मातोश्रीवर पोहचला आहे. एमसीए निवडणुकीत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे मतदार आहेत. तर आमदार मिलिंद नार्वेकर, अजिंक्य नाईक आणि जितेंद्र आव्हाड हे उमेदवार आहेत.
-
नाशिक पोलिसांची एमडी विरोधात धडक कारवाई, ड्रग्स विकणाऱ्या टोळीसह हॉटेल मालकालाही अटक
नाशिक पोलिसांची एमडी ड्रग्स विकणाऱ्यांविरोधात धडक कारवाई केली आहे. पोलिसांनी ड्रग्स विकणाऱ्या टोळीसह हॉटेल मालकालाही अटक केली आहे. नाशिक पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कारवाई करण्यात आली. कपिल देशमुख असं अटक करण्यात आलेल्या हॉटेल मालकाचे नाव आहे. तर शोएब खान, शेख मुस्तफा आणि मोफीज मुजम्मिल असं अटक करम्यात आलेल्या 3 संशयतांची नावं आहेत.
-
राधाकृष्ण विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्याला बच्चू कडूंकडून 1 लाख रुपयांचं बक्षिसाची घोषणा
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वक्तव्यानंतर बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. जो विखे पाटलांची गाडी फोडेल त्याला एक लाख रुपयांचे बक्षीस देणार अशी घोषणा बच्चू कडू यांनी अमरावतीत केली आहे. तसेच मला विखे पाटलांची गाडी दिसली तर मी फोडणार कडू, असा इशाराही कडुंनी दिला.
बच्चू कडू यांनी कर्जमाफीबाबत केलेल्या वक्तव्यावरुन संताप व्यक्त केला. नाव राधाकृष्ण पण कृत्य मात्र कंसाचं, अशा शब्दात बच्चू कडूंनी टीका केली. मुख्यमंत्र्यांनी या कंसाची अवलाद हाकलून लावावी. तसेच शुकर माना की लोक तुम्हाला मारत नाहीत, नालायकी थांबवा, अशा शब्दात बच्चू कडू यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना सुनावलं.
-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सोमवारी बैठक
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोमवारी बैठक घेणार आहेत. शिवतीर्थ या निवासस्थानी मनसे नेते विभाग प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांसोबत ही बैठक घेणार आहेत. संध्याकाळी 6 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईतील मतदार याद्यांच्या निरीक्षणासाठी एक दोन जणांच्या निवडी संदर्भात ही बैठक बोलावण्यात आली आहे.
-
चंद्रहार पाटलांकडून श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं
चंद्रहार पाटलांकडून श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे. बोरगावमधील 500 एकर मैदानावर भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं.
-
लोणावळा नगरपालिकेसाठी भाजप स्वबळावर लढणार: बाळा भेगडे
तळेगाव नगरपरिषदेसाठी संतोष दाभाडे कमळ चिन्हावर लढणार आहेत. तसेच लोणावळा नगरपालिकेसाठी भाजप स्वबळावर लढणार असल्याचं माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी म्हटलं आहे.
-
जय पवारांच्या उमेदवारीच्या चर्चांना अजितदादांकडून पूर्णविराम
जय पवारांच्या उमेदवारीच्या चर्चांना अजित पवारांकडून पूर्णविराम लावण्यात आला आहे. जय पवार नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवणार नसल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे. बारामतीत गुरुवारी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार असल्याचंही अजितदादांनी सांगितलं आहे.
-
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी भूमिका मांडली आहे : मोहोळ
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रकरणी विरोधकांकडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर टीका होत असताना मोहोळ यांनी बाजू घेत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी भूमिका मांडली आहे.”
-
संशोधन करण्याची गरज का? ड्रोन प्रकरणावर सचिन अहिरांची प्रतिक्रिया
हे दुर्दैव आहे. सर्वसामान्य माणसांना ड्रोन उडवायचे असेल तर परमिशन घ्यावी लागते. संवेदनशील परिसर आहे त्या परिसरातील व्यक्तीना माहिती देणे गरजेचे नाही का? एमएमआरडीला गरज लागली. संशोधन करण्याची गरज का? ड्रोन का उडवले काही माहिती नागरिकांना दिले का? उद्धव ठाकरे यांना पोलीस भेटून गेले बोलण काय झाले माहिती नाही. मुख्यमंत्री यांच्या घराच्या बाहेर ड्रोन फिरवले त्यांना माहिती नाही असे होईल का? अशी प्रतिक्रिया सचिन अहिर यांनी दिली आहे.
-
पंढरपूरात भाजपाने चिन्हावर निवडणूक लढवण्याचा घेतला निर्णय
नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली असून यंदा भाजपाने चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परिचारक गटाच्या सौ.वैशाली सुनील वाळूजकर आणि समाधान आवताडे यांच्याकडून माजी नगराध्यक्ष साधना भोसले यांना उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न सुरू
-
पुणे प्रकरणात चौकशी सुरु आहे- अजित पवार
मी माझ्या हातून कधीही चुकीची गोष्ट होऊ देत नाही. माझे नातेवाईक असले तरीही अधिकाऱ्यांनी दबावाखाली काम करु नये. FIR दाखल झाला आहे, चौकशी सुरु आहे. सत्य समोर येईल. चुकीच्या आरोपांमुळे बदनामी होते असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
-
टीईटी निर्णयाविरोधात शिक्षक संघटनेचा मोर्चा
टीईटी परीक्षा बाबतचा शासन निर्णय रद्द व्हावा यासाठी धुळ्यात मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. शहरातील शिवतीर्थापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शिक्षकांच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला आहे.
-
कल्याण-डोंबिवलीत भाजपची राजकीय खेळी
कल्याण-डोंबिवलीत भाजपची राजकीय खेळी दिसून आली. अनेक माजी नगरसेवक, ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते भाजपच्या गोटात दाखल होत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. डोंबिवली जिमखाना मैदानात भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम होईल.
-
मातोश्री परिसरामध्ये ड्रोनमुळे खळबळ
मुंबईच्या बांद्रा मातोश्री परिसरामध्ये ड्रोन उडताना दिसल्याने परिसरामध्ये माजली खळबळ , मात्र अवघ्या काही मिनिटातच मुंबई पोलिसांकडून याबाबतचा खुलासा करण्यात आला. एमएमआरडीएने परवानगी घेऊन बिकेसी आणि खेरवाडी परिसरात ड्रोन उडवल्याची नवी माहिती समोर आलीये.मुंबई पोलिसांनी याबाबत अधिकृत स्पष्टीकरण दिलंय.खेरवाडी, बीकेसी आणि आसपासच्या परिसरात पाॅड टॅक्सीसाठी एमएमआरडीएने सर्वेक्षण केलंय.याबाबतची परवानगी घेऊन हे ड्रेन ऊडवण्यात आलेयत. मातोश्री या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे राहतात त्यामुळे हा परिसर अतिशय संवेदनशील मानला जातो अचानक या परिसरामध्ये ड्रोन सापडल्याने नेमके ड्रोन कोणी पाठवले असा प्रश्न उपस्थित केला जात होता त्यावर आता पडदा पडलाय.
-
रब्बी हंगामातील शेती कामांची लगबग;मराठा आंदोलक मनोज जरांगेनी चालवला ट्रॅक्टर
सध्या रब्बी हंगामातील मशागतीची कामे सुरू असून शेतकरी बांधव शेती कामांमध्ये व्यस्त असताना पाहायला मिळत आहे.अशातच मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटी गावचे सरपंच पांडुरंग तारख यांच्या शेतामध्ये ट्रॅक्टर द्वारे मशागत करण्याचा आनंद घेतला आहे.या शेतीमध्ये पूर्वी ड्रॅगन फ्रुट होते,आता यामध्ये अंजीर लावणार आहे. शिवाय मात्र आपण शेतकरी कुटुंबातील असून शेतीचा कामाचा विसर पडू नये यासाठी मशागत करत आहोत असं देखील जरांगे पाटील यांनी सांगितलं.
-
दिपक पवार यांचा मोठा आरोप
तिसऱ्या भाषेच्या सक्तीच अंदोलन अजूनही सुरू आहे. ज्या मराठी शाळा सुरू आहेत त्याची वाताहत व्हावी हा शासनाचा पालिकेचा प्रयत्न आहे. मुंबईत १० भूखंड आहेत त्यावर व्यावसायिकच लक्ष आहे. मुंबईतल्या मराठी माणसाला जसे बाहेर फेकल गेलं तसं हा एक प्रयत्न आहे. मुलाना पालकांना मराठी शाळा नको अस वातावरण निर्माण केलं जात आहे. मुंबईतल्या मोक्याच्या जमिनी लाटण्याचा प्रयत्न आहे.इमारत पाडून टॉवर उभा करण्याचा प्रयत्न केला जात आहे.टॉवर होतो तेव्हा त्याची घर कमिशन कोणाला जात हे पहा, असा गंभीर आरोप दिपक पवार यांनी केला आहे.
-
माळशेज घाटात बाईक रायडरांची धोकादायक स्टंटबाजी
माळशेज घाटात बाईक रायडरांची धोकादायक स्टंटबाजीने अपघाताची शक्यता बळावली आहे. आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास ७ ते ८ बाईक रायडरांचा माळशेज घाटात धुमाकूळ दिसला. विदाऊट नंबर प्लेट असलेल्या गाड्यांवरून जीवघेणी स्टंटबाजी सुरू होती. रविवार असल्याने घाटात पर्यटकांची मोठी गर्दी झाला होती. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला.घटनेच्या वेळी घाट परिसरात एकही पोलिस कर्मचारी उपस्थित नव्हता मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चार चाकी गाडी जात असल्याने एखादी गाडी दरीत कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
-
मातोश्रीच्या परिसरात ड्रोनच्या घिरट्या
मातोश्री निवासस्थान परिसरात ड्रोनच्या घिरट्यांनी खळबळ उडाली आहे. हा ड्रोन नेमका कुणाचा आहे आणि कुणी तो उडवला हे अद्याप समोर आलेले नाही. मातोश्रीवर नजर ठेवण्यासाठी हा ड्रोन उडत असल्याचा आरोप उद्धव सेनेच्या नेत्यांनी आरोप केला आहे. तर भाजप नेत्यांनी केवळ लक्ष वेधण्यासाठी असा प्रयोग करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे.
-
पार्थ पवारांच्या गंडलेल्या घोटाळ्यावर मुळशी पॅटर्न २ चित्रपट बनावा-लक्ष्मण हाके
१८०० कोटींची महार वतनाची जागा ३०० कोटीत लाटण्याचं काम पार्थ पवारने केलं. आई वडीलांकडून मुलं संस्कार शिकत असतात. पार्थ पवार दोन तीन वर्षांचे होते. तेव्हा अजित पवार व सुनेत्रा पवारांनी बारामतीच्या सोनगावमधील ३ एकर महार वतन लाटले आणि पार्थ पवारच्या नावे केले, बारा खडी शिकायच्या वयात सातबारा फिरवण्याची कला पार्थ पवारांना शिकवण्यात आली. बापाने ७० हजार कोटी पचवले साधी ढेकर दिली नाही. पार्थ पवार १५०० कोटींच्या घोटाळ्यात सापडले. ‘नया है वह’ म्हणत त्यांना सोडूनच दिले जाईल, असे ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले.
-
बदलत्या हवामानाचा गहू पिकाला फटका…
येवला तालुक्यातील पाटोदा येथील शेतकरी योगेश घोरपडे यांनी दोन एकरातील गहू पिकावर फिरवला नांगर… अवेळी पाऊस व हवामानातील अनियमिततेमुळे गहू पीक झाले पूर्णपणे खराब… उत्पादन खर्चही वसूल न होणार असल्याने शेतकऱ्याचा हतबल निर्णय… शेतकऱ्याची सरकारकडे नुकसानभरपाईची मागणी…
-
पुण्यात बिबट्यांचा टोळीनं वावर, वाढत्या संख्येनं ग्रामस्थ भयभीत
पुण्यात बिबटे टोळीनं वावरतायेत, यामुळं बिबट्यांची संख्या किती वाढलीये हे यातून अधोरेखित होतंय. दहा चौरस किलोमीटरच्या परिघात एक बिबट्या अशी संख्या वनविभागाने गृहीत धरलेली आहे. मात्र जुन्नरमध्ये एकाचवेळी तीन-तीन बिबटे आढळलेत. त्यामुळं बिबट्यांची संख्या उत्तर पुणे जिल्ह्यात वाढलीये, हे स्पष्ट झालंय. हेचं बिबटे गुजरातच्या वनतारासह विविध राज्यातील वनक्षेत्रात कधी स्थलांतरित केले जाणार? याकडे भयभीत झालेल्या ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.
-
डोंबिवलीत दीपेश म्हात्रे यांच्या भाजप प्रवेशाची उलटी गणती सुरू!
माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील स्वतः दीपेश म्हात्रे यांना घेण्यासाठी पोहोचले मोठे गाव येथील निवासस्थानी… काही क्षणांतच निघणार भव्य मिरवणूक — डोंबिवली जिमखाना मैदानात होणार ऐतिहासिक पक्षप्रवेश… ठिकठिकाणी कार्यकर्त्यांची गर्दी, फटाक्यांचा जल्लोष आणि घोषणांचा गजर.. प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार अधिकृत प्रवेश… ठाकरे गटातून भाजपात मोठा ‘पॉलिटिकल ट्रान्स्फर’ — डोंबिवलीत उत्साहाची लाट!…
-
भाजप पक्ष प्रवेशाचा निर्णय का घेतला ? प्रवेशानंतर सविस्तर सांगेन – दीपेश म्हात्रे
भाजप पक्ष प्रवेशाचा निर्णय का घेतला ? प्रवेशानंतर सविस्तर सांगेन… कार्यकर्त्यांचा उत्साह रिसेल घेऊन मी प्रवेशासाठी निघालो… प्रवेश या ठिकाणी पोचून पत्रकारांना पत्रकार परिषद घेऊन भाजपमध्ये का चालू आहे याचा सविस्तर माहिती देणार… माझी कोणावरती नाराजगी नाही साडेअकरा वाजता सर्व विशेष स्पष्ट करणार… डोंबिवली मध्ये भगवत वातावरण आहे हिंदूंचा पुरस्कार करणाऱ्या राष्ट्रीय पक्षाची प्रवेश करतोय… बरेचसे सरप्राईज प्रवेश देखील होणार… दिपेश म्हात्रे यांच्यासह काही नगरसेवक पदाधिकारि पक्ष प्रवेश करणार
-
कल्याण पूर्वेत शिवसेना एकनाथ शिंदे गटeची जबरदस्त बाजी
भाजपमध्ये जाण्याआधीच महेश गायकवाड यांची पुन्हा शिवसेनेत एंट्री! भाजप प्रवेशाआधीच शिंदे गटाची झटपट चाल — महेश गायकवाड पुन्हा शिवसेनेत. कल्याण पूर्व व उल्हासनगर विधानसभा संपर्कप्रमुखपदी महेश गायकवाड यांची नियुक्ती. गणपत गायकवाड यांच्या गोळीबार नंतर महेश गायकवाड यांनी महायुतीत बंड करत .. महायुतीचे उमेदवार सुलभा गायकवाड यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरल्याने शिंदे गटातून करण्यात आली होती हक्कलपट्टी. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसापासून महेश गायकवाड रवींद्र चव्हाण आणि भाजप नेत्यांच्या संपर्कात
-
राज ठाकरे यांनी बोलवली महत्त्वाची बैठक
मनसेचे नेते, मुंबई अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची तसेच इतर शहर अध्यक्षांची शिवतीर्थ येथे बैठक. आगामी निवडणुकीच्या निमित्ताने मनसेच्या रणनितीबाबत उद्या बैठकीत होणार चर्चा. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने राज ठाकरे युतीबाबत स्पष्टता देतील का? याकडे लक्ष. नगरपालिका निवडणुकीत यावेळी नवीन चेहरांना दिली जाणार संधी
-
जरांगे पाटलांची सुपारी दिल्याच्या आरोपानंतर मराठा क्रांती मोर्चा मुंडे विरोधात आक्रमक
धनंजय मुंडेची नार्को टेस्ट केलीच पाहिजे, कारण धनंजय मुंडेने राज्यात अनेक मर्डर घडवून आणल्याचा आरोप. नार्को टेस्ट केल्यानंतर धनंजय मुंडेचा भ्रष्टाचार ओपन होईल आणि महाराष्ट्रात भूकंप होईल. मुंडे हा मोठा ब्लॅकमिलर असून त्यातून सत्ता मिळवून मोठी गँग तयार केली. पक्षातील अनेक नेत्यांना याने ब्लॅकमेल केलेय त्यामुळे त्याची पक्षातून हकालपट्टी करू शकत नाही. अजितदादाना देखील मुंडेने ब्लॅकमेल केले असावे म्हणून ते त्याला पक्षातून काढत नाहीत. दादाचे दादापण आता राहिले नाही त्यामुळे ते काहीही कारवाई करू शकत नाहीत.
-
कल्याण-डोंबिवलीत सह अनेक ग्रामीण भागात बत्ती गुल
सकाळपासून कल्याण पूर्व, डोंबिवली पूर्व-पश्चिम सह अनेक ग्रामीण आणि शहरी भागात l बत्ती गुल. २२० केव्ही पाल सबस्टेशनला पडघा वरून जाणारी अती उच्चदाब वाहिनी तुटल्याने पुरवठा ठप्प. महावितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू. मात्र विज पुरवठा बंद असल्याने याचा पाणीपुरवठ्यावरही मोठा परिणाम — नळ कोरडे, नागरिक त्रस्त
\\
-
भाजप पक्ष प्रवेशाचा निर्णय का घेतला ? प्रवेशानंतर सविस्तर सांगेन
कार्यकर्त्यांचा उत्साह रिसेल घेऊन मी प्रवेशासाठी निघालो. प्रवेश या ठिकाणी पोचून पत्रकारांना पत्रकार परिषद घेऊन भाजपमध्ये का चालू आहे याचा सविस्तर माहिती देणार. माझी कोणावरती नाराजगी नाही साडेअकरा वाजता सर्व विशेष स्पष्ट करणार
-
नाशिकमध्ये थंडीचे आगमन, नाशिककरांना गुलाबी थंडीचा अनुभव
पावसाळा नुकताच संपल्यानंतर नाशिकमध्ये थंडीचे दमदार आगमन झाले आहे. शहरात गुलाबी थंडीचा अनुभव नाशिककर घेत असून, थंडीचा पारा हळूहळू घसरू लागला आहे. थंडीत वाढ होत असल्यामुळे, शरीराला उष्णता आणि तंदुरुस्ती मिळावी या उद्देशाने नागरिकांनी आता घराबाहेर पडण्यास सुरुवात केली आहे. शहरातील अनेक मैदानांवर सकाळच्या वेळी कसरतीसाठी आणि व्यायामासाठी नागरिकांची गर्दी वाढलेली दिसत आहे.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये पदवी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पदवी आणि पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्रे मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. या प्रमाणपत्रांवरील दंड (पेनल्टी) आणि विलंब शुल्क (लेट फी) पूर्णपणे माफ करण्यात आले आहे. ३१ जानेवारी २०२६ पर्यंत विद्यार्थ्यांना या सवलतीचा लाभ घेता येणार आहे. डिसेंबर २०२६ मध्ये होणाऱ्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी सध्या नोंदणी सुरू आहे, याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे सहज उपलब्ध व्हावीत यासाठी विद्यापीठाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
-
नाशिकच्या निफाडमध्ये बिबट्याची दहशत; पाळीव कुत्र्यांना केले भक्ष्य, सीसीटीव्हीमध्ये कैद
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात बिबट्याने मोठी दहशत माजवली आहे. कोठूरे येथील बापू मोरे यांच्या घरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा बिबट्या कैद झाला आहे. या बिबट्याने पाळीव कुत्र्यांना आपले भक्ष्य बनवल्यामुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या दहशतीमुळे ग्रामस्थांनी तात्काळ पिंजरा लावून या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी वन विभागाकडे केली आहे.
-
लोणावळा-तळेगाव पालिका निवडणुकीत भाजप स्वबळावर लढणार
लोणावळा आणि तळेगाव नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची भूमिका स्पष्ट झाली आहे. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा नगरपालिकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार आहे. येथे नुकत्याच १३ प्रभागांमधील २७ इच्छुक उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या आहेत. भेगडे यांनी स्पष्ट केले की, मावळ विधानसभेच्या स्तरावर युती झाली पाहिजे, केवळ एका नगरपालिकेसाठी नाही, पण राष्ट्रवादीकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
-
बिबट्याच्या हल्ल्याविरोधात आंदोलन करणं भोवलं, 15 जणांवर गुन्हा दाखल
पुणे परिसरात बिबट्याच्या वाढत्या हल्ल्याच्या निषेधार्थ बेल्हे-जेजुरी महामार्गावरील रोडेवाडी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करणे ग्रामस्थांना चांगलेच महागात पडले आहे. आंदोलनकर्त्यांनी महामार्ग तब्बल पाच तास रोखून धरल्यामुळे, पारगाव पोलीस ठाण्यामध्ये आंदोलकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये देवदत्त निकम, दामू घोडे, डॉक्टर सुभाष पोकळे, अरुण गिरे यांच्यासह एकूण १५ जणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
-
डोंबिवलीत ‘फ्रेंडशिप रन 2025’ चा उत्साह शिगेला
डोंबिवलीत आज ‘फ्रेंडशिप रन 2025’ ला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. मैत्री, तंदुरुस्ती आणि एकतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे आयोजन कल्याण-डोंबिवली रनर्स (KDR) ने अभिमानाने केले आहे. काही वेळातच, प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून ‘एकत्र धावा, बळकट व्हा’ या ब्रीदवाक्याने या स्पर्धेला अधिकृतपणे सुरुवात होणार आहे. मागील वर्षी ६००० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवलेल्या या शर्यतीत, यावर्षीही २१.१ किमी (हाफ मॅरेथॉन), १० किमी, ५ किमी आणि लहान मुलांसाठीची १.६ किमी फन रन अशा विविध श्रेणींचा थरार डोंबिवलीकरांना अनुभवता येणार आहे.
-
कल्याण-डोंबिवलीत भाजपची मोठी राजकीय खेळी
ठाकरे गटाचा बालेकिल्ला ढासळला, बडा नेता भाजपच्या गळाला; राजकारणात मोठा भूकंपhttps://t.co/eprQNICEPV #UddhavThackeray #BJP
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 9, 2025
Published On - Nov 09,2025 8:59 AM
