Osmanabad | औषध फवारणीसाठी शेतकऱ्यांना मिळणार ड्रोन, प्रशिक्षणही देणार जिल्हा परिषद

Osmanabad | औषध फवारणीसाठी शेतकऱ्यांना मिळणार ड्रोन, प्रशिक्षणही देणार जिल्हा परिषद

| Edited By: | Updated on: Mar 12, 2022 | 3:36 PM

उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतात औषध फवारणीसाठी ड्रोन (Drone) देण्यात येणार आहे. उस्मानाबाद जिल्हा परिषदेने (ZP) हा निर्णय नुकताच घेतला आहे. जिल्ह्यातील 8 तालुक्यात प्रत्येकी 1 ड्रोन देण्यात येणार आहे.

उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतात औषध फवारणीसाठी ड्रोन (Drone) देण्यात येणार आहे. उस्मानाबाद जिल्हा परिषदेने (ZP) हा निर्णय नुकताच घेतला आहे. जिल्ह्यातील 8 तालुक्यात प्रत्येकी 1 ड्रोन देण्यात येणार असून ते ड्रोन चालविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे वेळेची बचत होणार आहे. आधीच नैसर्गिक संकटामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यात पिकांवरचे विविध रोग यामुळेही शेतकऱ्याचे नुकसान होत आहे. या रोगांवर औषध फवारणी करण्याचा खर्चही जास्त आहे. शिवाय वेळही अधिक लागतो. त्या पार्श्वभूमीवर ड्रोनच्या मार्फत शेतात औषधफवारणी केल्यास वेळेची बऱ्याच प्रमाणात बचत होणार आहे. उस्मानाबाद येथील शेतकऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.

Published on: Mar 12, 2022 03:29 PM