AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय बोलता काय ? समोसा, इडली आपली नाही, मग कोणी आणली ?, ११ पदार्थ जे भारतीय नाहीत…

तुम्ही आवडीने खात असलेला समोसा ते जिलेबी हे पदार्थ मुळात भारतीयच नाहीत. सध्या आपण इतिहास उकरुन काढत असलो तरी या इतिहासामुळे भारतात अनेक पदार्थ आले आणि येथलेच झाले. शाकाहारींचा एकमेव आधार असलेला 'पनीर' देखील आपला नाही. गुलाब जामून पासून ते जिलेबीपर्यंत सगळे पदार्थ आपण आवडीने स्वीकारले आहेत. ते आपलेच आहेत असे वाटत असले तरी ते परकीयांनी आपल्याला दिले आहेत. आपली संस्कृती जे जे चांगले ते स्वीकारत आलेली आहे. अशा भारतातल्या 11 डीशेस आपण आवडीने रेचवतो आणि आपला जठाराग्नी शांत करतो...तृप्तीचा ढेकर देतो ते परकीयांनी देण आहेत...

| Updated on: Mar 24, 2025 | 6:34 PM
 गुलाब जाम -   गुलाब जामुन भारतीय नाहीए ? बरं,का ? असे म्हटलं जात हा गोड पदार्थ पर्शिया आणि भूमध्य समुद्रातून भारतात आला. तुर्की शासकांद्वारे तो भारतात आला असावा असे म्हटले जाते. आणखी एक आख्यायिका अशी आहे की तो भारतात मुघलांमुळे आला.परंतू त्यावर पर्शियन प्रभाव होता.'गुलाब' हा मूळचा पर्शियन शब्द आहे.लुकमत अल कादी नावाची एक आगळी पर्शियन मिठाई आहे जी गुलाब जामूनसारखीच दिसते.

1 / 11
विंदालू -  विंदालू हा एक लोकप्रिय खाद्य पदार्थ  गोव्यातील आहे. तिखट विंदालू किंवा विंदालू, पोर्तुगीज भाषेतील 'कार्ने दे विन्हा डी'अल्होसचे हे अधिक मसालेदार नाव आहे. जी लसूण आणि मांसाची एक रेसिपी असून त्यात व्हिनेगर आणि वाईन वापरली जाते.  मडेइरा येथे ख्रिसमसमध्ये ही डीश आवडीने खाल्ली जाते. १५ व्या शतकात पोर्तुगीजांनी गोव्यात विंडालू आणले होते आणि गोव्यातील लोकांनी त्याला आपलेसे केले.

2 / 11
चहा -  चहा देखील भारताचा नाही. पण हेच सत्य आहे. चहाची उत्पत्ती चीनमध्ये झाली आहे. ब्रिटिशांनी भारतात चहा आणला आणि आसाम, दार्जिलिंग आणि इतरत्र त्याची व्यावसायिक लागवड सुरू केली.  भारतात, विशेषतः ईशान्येकडील भागात जंगली चहा नेहमीच प्यायला जात असे आणि कदाचित त्याचे वैदिक सोम असावे असे म्हणतात बुवा कोणाला माहीती ?

3 / 11
जिलेबी -  दुधासोबत किंवा रबडीसोबत चवीने खाल्ली जाणाऱ्या जिलेबीचे मूळ मध्यपूर्वेतील आहे बर का ! आणि भारतात ती उशिरा आली. विशेष म्हणजे हे नाव पर्शियन-अरबी शब्द झलाबिया किंवा फ्रिटरवरून आले आहे आणि ज्या प्रदेशातील ते आवडते खाद्य आहे.उत्तर आफ्रिका, युरोपचे काही भाग, मध्य पूर्व, आशियात तिला वेगवेगळी नावे आहेत. उदा. फनेल केक, चेबाकिया, झलेबिया, झुल्बिया, ग्वारामरी, पिटुलित्सी, झोलबिया, पिट्टुले आणि जिलापी अशी अनेक नावे जिलेबीला आहेत.

4 / 11
इडली - इडलीच्या शोधाचे दोन सिद्धांत प्रचलित आहेत. काही इतिहासकारांच्या मते कन्नड ग्रंथांमध्ये इडलीचे संदर्भ मिळतात - शिवकोटियाचार्य यांचे ९२० इसवी सन वद्दारधने किंवा चावुंदराय दुसरा यांचे १०२५ इसवी सनातील लोकोपकार यात संदर्भ आहेत.काहींच्या मते इडली ८०० ते १२०० इसवी सनाच्या दरम्यान भारतात प्रवास करणाऱ्या हिंदू इंडोनेशियन राजांसाठी बनवल्या जात होत्या. दक्षिण भारत आणि मलेशिया, इंडोनेशिया, श्रीलंका यांच्यात नैसर्गिकरित्या अनेक खाद्यपदार्थांमध्ये म्हणून समानता आहे.

5 / 11
फिल्टर कॉफी  हो, चहाप्रमाणेच, कॉफी देखील भारतीय वंशाची नाही. असे म्हटले जाते की बाबा बुदान, एक सूफी, मक्काहून तीर्थयात्रा केल्यानंतर येमेनहून त्यांनी भारतात कॉफी बीन्स आणले होते. अखेर कर्नाटकातील चिक्कमंगलुरू येथे ते स्थायिक झाले आणि त्यांनी कॉफीची लागवड सुरू केली आणि अशा प्रकारे कॉफी देखील आपली झाली.

6 / 11
दाल-भात  आपला आवडता पदार्थ म्हणजे दाल चावल, प्रत्यक्षात शेजारच्या नेपाळमध्ये त्याचा उगम झाला. तेथेही त्याला दाल भातच म्हणतात बरं का.. दाल भाताच्या एका प्लेटमध्ये सामान्यतः भाजीपाल्याचे पदार्थ आणि काही मसालेदार लोणचे असते.'दाल भात पॉवर २४ तास' ही एक लोकप्रिय नेपाळी म्हण या संतुलित जेवणावर तयार झाली. गिर्यारोहणा दरम्यान टिकून राहण्यास दाल भात मदत करतो.

7 / 11
बिर्याणी -  झोमॅटोवर सर्वाधिक ऑर्डर होणारा भारतातील हा पदार्थ... पिझ्झा, पास्ता आणि नूडल्सला मागे टाकत बिर्याणी ही ऑनलाईन ऑर्डर होणारा पदार्थ देखील प्रत्यक्षात पर्शियातून आपल्याकडे आला होता! या शब्दाचा मूळ अर्थ पेरिसियन भाषेत बिर्याणी म्हणजे 'भात' असा होतो.

8 / 11
पनीर  'पनीर' हा भारतीय शाकाहारी लोकांचा हा निर्विवाद राजा म्हटला जातो.मात्र, तो इराण किंवा अफगाणिस्तानातून रेशीम मार्गाने भारतात आला आहे. दक्षिण भारतात त्याची लोकप्रियता कमी असल्याने यावरून हे स्पष्ट होते. असा अंदाज आहे की तो भारतातून पश्चिमेकडे गेला असावा.भगवान कृष्ण आणि लोणी, ताक यांच्याबद्दलच्या अनेक कथा आहेत पण पनीरची एकही कहाणी नाही.पनीर हा पर्शियन शब्द  peynir  शब्दापासून तो आला आहे. पेनीर नावाचे चीज संपूर्ण पश्चिम आशियामध्ये खाल्ले जाते.

9 / 11
 समोसा - भारतीयांचा आवडता असलेला समोसा हा मूळचा पर्शियाचा आहे.पर्शिया म्हणजे आताचा इराण होय. रेशीम मार्गाने भारतात समोसा देखील आला होता. 'समोसा' हे नाव पर्शियन शब्द "साम्बुसक" पासून आले आहे! तेथे समोशात मांस, काजू आणि मसाले भरलेले असायचे आणि  भारतात त्यात बटाट्याची भाजी भरली गेली !

10 / 11
राजमा  राजमा-तांदूळ हा उत्तर भारतीय घरांमध्ये आवडती डीश असते. परंतु राजमा किंवा लोबिया किंवा लाल राजमा मूळात भारतात कधीच लागवड केला जात नव्हता. तो मेक्सिकन वंशाचा आहे, जरी तो प्रथम पेरूमध्ये पिकवला गेला असला तरी, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेतही मोठ्या प्रमाणात प्रवास करणाऱ्या पोर्तुगीजांनी भारतात तो आणला असे मानले जाते.

11 / 11
Follow us
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?.
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?.
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती.
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने.
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.
पहलगाम हल्ला कोणाच्या आदेशावरून? पाकिस्तानी पत्रकाराचा खळबळजनक दावा
पहलगाम हल्ला कोणाच्या आदेशावरून? पाकिस्तानी पत्रकाराचा खळबळजनक दावा.
परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे - मुख्यमंत्री फडणवीस
परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे - मुख्यमंत्री फडणवीस.