मध्यमवर्गीय कुटुंबासाठी ‘या’ 5 गाड्या आहेत परफेक्ट, चांगलं मायलेज आणि शानदार लूक

कोणत्याही मध्यमवर्गीय कुटुंबासाठी कार खरेदी करणे हे एक स्वप्न असतं. जर ही पहिली कार असेल तर ती अधिकच खास बनते.

Apr 23, 2021 | 10:13 AM
अक्षय चोरगे

| Edited By: अनिश बेंद्रे

Apr 23, 2021 | 10:13 AM

कोणत्याही मध्यमवर्गीय कुटुंबासाठी कार खरेदी करणे हे एक स्वप्न असतं. जर ही पहिली कार असेल तर ती अधिकच खास बनते. कार आपल्या अनेक गरजा पूर्ण करते. अशा परिस्थितीत आज आम्ही तुमच्यासाठी 5 अशा कार आणल्या आहेत ज्या तुमच्यासाठी परफेक्ट ठरतील शिवाय तुमच्या खिशाला परवडतील.

1 / 6
मारुती सुझुकी स्विफ्ट : आपण कमी किमतीत ही दमदार कार आपलीशी करु शकता. मारुती सुझुकीच्या स्विफ्टची (Maruti Suzuki Swift) किंमत 6.7 लाख ते 9.75 लाख रुपयांपर्यंत आहे. यावर्षी या कारला नवा लूक मिळाला आहे.

2 / 6
ह्युंदाय ग्रँड i10 Nios : तुम्हाला दमदार फीचर्ससह एखादी परफेक्ट कार हवी असल्यास तुमच्यासमोर Hyundai Grand i10 Nios हा चांगला पर्याय आहे. यात तुम्हाला सीएनजीपासून ते टर्बो, पेट्रोल आणि डिझेलपर्यंत सर्व इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. ही कार मध्यमवर्गीय कुटुंबासाठी परिपूर्ण कार आहे.

3 / 6
निसान मॅग्नाईट : तुम्हाला कॉम्पॅक्ट एसयूव्ही हवी असेल तर तुम्ही निसान मॅग्नाईट (Nissan Magnite) ही एसयूव्ही खरेदी करू शकता. या कारची किंमत 6.65 लाख रुपये इतकी आहे. तुम्हाला या वाहनाचे टॉप मॉडेल घ्यायचे असेल तर 11.63 लाख मोजावे लागतील.

4 / 6
ह्युंदाय वेन्यू : जर तुम्हाला निसान मॅग्नाईट ही कार पसंत पडली नाही, तर तुमच्यासमोर ह्युंदाय वेन्यू (Hyundai Venue) या कारचा पर्याय आहे. ही एक कॉम्पॅक्ट एसयूव्ही असून या कारची सुरुवातीची किंमत 8.10 लाख रुपये इतकी आहे. या कारच्या टॉप मॉडेलची किंमत 14.20 लाख रुपये इतकी आहे.

5 / 6
टाटा टियागो (Tata Tiago) ही लहान मध्यमवर्गीय कुटुंबासाठी उत्तम कार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ही कार अव्वल दर्जाची आहे. या कारची सुरुवातीची किंमत 5.85 लाख रुपये इतकी आहे. तर या कारच्या टॉप मॉडेलसाठी तुम्हाला 8.16 लाख रुपये द्यावे लागतील.

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें