शहरातील पीरशहा खुंट येथे क्षुल्लक कारणावरुन दोन गटांत जोरदार भांडण झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे या भांडणाने टोकाचे स्वरुप धारण केल्यानंतर येथे दगडफेकदेखील झाली.
अहमदनगर : शहरातील पीरशहा खुंट येथे क्षुल्लक कारणावरुन दोन गटांत जोरदार भांडण झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे या भांडणाने टोकाचे स्वरुप धारण केल्यानंतर येथे दगडफेकदेखील झाली.
1 / 5
मिळालेल्या माहितीनुसार पीरशहा खुंट येथे एका सलूनच्या दुकानात नंबर लावण्याच्या कारणावरून हा किरकोळ वाद झाला. नंतर या वादाने उग्र स्वरुप धारण केले. त्यातच दोन गट आमनेसामने आले.
2 / 5
या हाणामारीत तीन ते चार जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन गटातील या भांडणात बाजूला उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोडही करण्यात आली.
3 / 5
घटनेची माहिती होताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तत्काळ होत दोन्ही बाजूच्या जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला.
4 / 5
या प्रकरणानंतरआता पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच कोतवाली पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल केला गेलाय.