AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लिंगबदल करणाऱ्या अनाया बांगरकडून आनंदाची बातमी, अखेर ते स्वप्न पूर्ण होणार; बऱ्याच दिवसांपासून…

लिंग बदल करण्यापूर्वी अनाया बांगर क्रिकेटपटू होती. पण लिंग बदल केल्यानंतर तिच्या स्वप्नांना ब्रेक लागला होता. पण आता हे स्वप्न पुन्हा एकदा पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. कारण पुढच्या वर्षी मार्च महिन्यापासून महिला क्रिकेट खेळताना दिसेल.

| Updated on: Aug 25, 2026 | 7:48 PM
Share
माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगरने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. अनायाने सांगितलं की, लवकरच ऑस्ट्रेलियात आपल्या क्रिकेट कारकि‍र्दीला सुरुवात करणार आहे. (फोटो-Instagram)

1 / 5
अनाया बांगरला ऑस्ट्रेलियात महिला क्रिकेट खेळण्याची परवानगी मिळाली आहे. यासाठी अनायाने क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे आभार मानले आहेत. अनायाने भारतीय क्रिकेटपटू सरफराज आणि मुशीर खानसोबत मुंबईत एज ग्रुप क्रिकेट खेळले आहे. पण लिंग बदल केल्यानंतर क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहिली. पण ऑस्ट्रेलियात क्रिकेट खेळण्यासाठी तिला एक अट पूर्ण करावी लागणार आहे. (फोटो-Instagram)

2 / 5
अनायाला ऑस्ट्रेलियात महिला क्रिकेट खेळण्यासाठी टेस्टोस्टेरॉन लेवल कमी केल्याचे पुरावे द्यावे लागणार आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या पॉलिसीनुसार, अनायाचा टेस्टोस्टेरॉन एक वर्षापर्यंत 10 नॅनो प्रति लिटर कमी झालं पाहीजे. दुसरीकडे, आयसीसीने 2023 मध्ये मेल प्यूबर्टीतून गेलेल्या ट्रान्सजेंडर खेळाडूला बंदी घातली होती. (फोटो-Instagram)

3 / 5
अनाया बांगर या टेस्टमध्ये पास झाली तर मार्च 2027 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या एखाद्या राज्याकडून प्रीमियर क्रिकेट खेळू शकते. अनायाला ऑस्ट्रेलियात जाऊन खेळणं भाग आहे. कारण बीसीसीआयने अद्याप ट्रान्स महिला खेळाडूंच्या खेळण्याबाबत पॉलिसी तयार केलेली नाही. (फोटो-Instagram)

4 / 5
अनाया बांगरने 14 मार्च 2026 रोजी थायलंडमध्ये सर्जरी केली होती. जेंडर अफर्मिंग सर्जरी केल्यानंतर अनाया पूर्णपणे फिट आहे. तसेच काही वेळ फलंदाजीचा सरावही केला. अनाया डावखुरी फलंदाज असून ऑस्ट्रेलियात खेळताना दिसणार आहे. (फोटो-Instagram)

5 / 5
Follow Us