Aryan Khan Drugs Case | संजय दत्त पासून अरमान कोहली पर्यंत, पाहा कोण कोण आहे ड्रग्ज प्रकरणात सहभागी

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक झाली आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातून एनसीबीने आर्यनला अटक केली आहे. विशेष म्हणजे आर्यनने स्वत: आपल्या लेन्सच्या डब्ब्यातून ड्रग्ज नेल्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परंतू बॉलिवूड आणि ड्रग्स संबंध खूपच जुना आहे.

1/6
 बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणी अटक झाली. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातून एनसीबीने आर्यनला अटक केली आहे. आर्यनच्याआधी सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणाने  संपूर्ण बॉलिवूडला हादरवून सोडले होते.

2/6
बॉलिवूडमधला मुन्ना भाई संजय दत्त त्याला असणाऱ्या व्यसनांमुळेही ओळखला जातो. त्याला व्यसनापासून मुक्त करण्यासाठी अमेरिकेतील एका पुनर्वसन केंद्रात पाठवले होते. या ठिकाणी जाऊन त्याने  उपचार घेतल्यानंतर संजय दत्त पूर्णपणे बरा झाला आणि पुन्हा भारतात परत आला. परंतू अजूनही त्याची मद्यपानाची सवय सुटलेली नाही.

3/6
बॉलिवूडमध्ये ममता कुलकर्णी (Actress Mamta Kulkarni)तिच्या खाजगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चात राहीली आहे. ममता कुलकर्णीने ‘आशिक आवारा’,‘वक्त हमारा है’, ‘दिलबर’यासारख्या अनेक चित्रपटांत काम केले.दरम्यानच्या काळात अभिनेत्री अंडरवर्ल्डमध्ये आणि ड्रग्सच्या दलदलीत वाईटरित्या अडकली होती. ममता कुलकर्णी बद्दल असं नेहमीच म्हटलं जात होतं की, तिने विकी गोस्वामी या अंडरवर्ल्ड ड्रग माफियाशी लग्न केले. परंतु, अभिनेत्रीने याचा कधी उल्लेख केला नाही आणि नेहमीच ती केवळ एक अफवा असल्याचे म्हटले गेले.

4/6
छोट्या पडद्यावरील कॉमेडियन अभिनेत्री  भारती सिंग हिला एनडीपीएस कायद्यानुसार अटक करण्यात आली होती . तिचा नवरा हर्ष या दोघांनीही ते गांजा घेत असल्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्यावर   कारवाई करण्यात आली होती. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधले ड्रग्ज कनेक्शन समोर आले.

5/6
आपल्या करियरच्या सुरुवातीलाच फरदीन खान वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. मीडियाकडून मिळालेल्या माहितीनुसार २००१ साली अंमली पदार्थांच्या सेवनामध्ये त्याला अटक करण्यात आली होती .

6/6
घरात काही ड्रग्स अढळून आल्याने बॉलिवूड अभिनेता अरमान कोहलीला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली होती . त्यानंतर अरमानची चौकशी करण्यात आली होती. अंमली पदार्थ विरोधी पथकाने अंमली पदार्थ विरोधी पथकाने हाजी आली परिसरात छापा टाकला होता. त्यावेळी त्यांनी ड्रग्स पेडलर अजय राजू सिंहला अटक केली. अजयची चौकशी केल्यानंतर अरमान कोहलीचे नाव समोर आले होते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI