‘पिता’ बनल्यानंतर 10 महिन्यांनी ऑस्ट्रेलियन टेस्ट कॅप्टनने केलं लग्न

ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्स विवाह बंधनात अडकला आहे. कमिन्सने गर्लफ्रेंड बेकी बॉस्टन सोबत शुक्रवारी विवाह केला. न्यू क्वीन्स लँडच्या बायरन बे मध्ये कमिन्सचं लग्न झालं.

Aug 01, 2022 | 3:03 PM
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Aug 01, 2022 | 3:03 PM

ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्स विवाह बंधनात अडकला आहे. कमिन्सने गर्लफ्रेंड बेकी बॉस्टन सोबत शुक्रवारी विवाह केला. न्यू क्वीन्स लँडच्या बायरन बे मध्ये कमिन्सचं लग्न झालं. तिथे कमिन्सने Chateau Du Soliel नावाचं रिसॉर्ट बुक केलं होतं. या विवाहसोहळ्याला ऑस्ट्रेलियाचे अनेक दिग्गज क्रिकेटर्स उपस्थित होते.

1 / 5
पॅट कमिन्स आणि बेकी बॉस्टन मागच्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात आई-बाबा बनले. बेकीने गोंडस मुलाला जन्म दिला. आता 10 महिन्यानंतर त्यांनी लग्न केलं आहे. कमिन्स आणि बॉस्टनचं मागच्यावर्षी लग्न होणार होतं. पण कोरोनामुळे हे लग्न टळलं.

2 / 5
बेकी बॉस्टन आणि पॅट कमिन्स मागच्या 9 वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. 2013 मध्ये त्यांच्यात प्रेमसंबंध सुरु झाले. 2020 मध्ये कमिन्सने लग्नासाठी बेकीला प्रपोज केलं होतं. वर्ष 2020 मध्ये दोघांचा साखरपुडा झाला. आता ते विवाहबंधनात अडकले आहेत.

3 / 5
पॅट कमिन्सने स्वत:ची ओळख बनवली आहे. बेकी बॉस्टन ब्रिटनची रहिवाशी आहे. बेकी इंटिरियर डिझायनर आहे. तिचं ऑनलाइन स्टोर सुद्धा आहे. दोघांच्या लग्नाला मिचेल स्टार्क, टिम पेन, नॅथन लायन उपस्थित होते.

4 / 5
कमिन्सचा मित्र आणि ऑस्ट्रेलियाचा ऑफ स्पिनर नॅथन लायनने 24 जुलैला लग्न केलं. त्याने एमा मॅकार्थी बरोबर लग्न केलं. नॅथन लायनच हे दुसर लग्न आहे. पहिल्या पत्नीपासून त्याला दोन मुली आहेत.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें