कच्चा मुळा ते लाल मांस.. हे 4 पदार्थ खाणं टाळा, कॅन्सरचा असतो धोका

मानसी मांडे,  Tv9 मराठी

|

Updated on: Feb 09, 2023 | 8:30 AM

Feb 09, 2023 | 8:30 AM
आयुर्वेदतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या दैनंदिन जीवनात खाल्ल्या जाणाऱ्या काही पदार्थांमुळे आपल्याला त्रास होऊ शकतो. हे पदार्थ असे आहेत जे एका ठराविक प्रमाणातच खाल्ले पाहिजेत.  कच्च्या मुळ्यापासून ते लाल मांस, असे काही पदार्थ आहेत, जे दररोज खाणं भारी पडू शकतं. यांचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने कॅन्सरसह इतर अनेक आजार होण्याचा धोका असतो. त्यामुळे हे काही पदार्थ खाण्याआधी 10 वेळा विचार केलेला इष्ट ठरतो. ते पदार्थ कोणते हे जाणून घेऊया.

1 / 5
रेड मीट : गोमांस, डुकराचे मांस किंवा बकरीचे मांस जास्त प्रमाणात किंवा रोज खाल्ले तर पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. हे जड अन्न आहे, जे पचण्यास सोपे नाही. त्यामुळे कोलोरेक्टल कॅन्सर होण्याचा धोका असतो.

2 / 5
सुकी भाजी: तुम्हाला माहीत आहे का की सुक्या किंवा कोरड्या भाज्या या पचायला खूप कठीण असतात. त्यांचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरातील वात वाढू शकतो व त्यामुळेही त्रास होऊ शकतो

3 / 5
कच्चा मुळा : आयुर्वेदानुसार, मुळ्यामध्ये औषधी गुणधर्म आढळतात, जे आपले पोट निरोगी ठेवण्यास मदत करतात. पण तुम्ही जर दररोज कच्चा मुळा सलॅडच्या स्वरूपात सेवन करत असाल तर त्यामुळे शरीरातील पोटॅशिअमची पातळी वाढू शकते व थायरॉईडची समस्या निर्माण होऊ शकते.

4 / 5
आंबवलेले अन्न : ढोकळा, चीज, दही, इडली आणि डोसा हे पदार्थ आंबवलेले मानले जातात आणि ते नियमितपणे खाणे शरीरासाठी चांगले नाही. यामुळे जळजळ होणे, पित्त वाढणे किंवा रक्ताचे विकार होऊ शकतात, असे तज्ज्ञांनी नमूद केले आहे.

5 / 5

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI