By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.
भंडारा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात मध्यरात्री लागलेल्या आगीत 10 बालकांचा मृत्यू झाला आहे. तर 7 बाळांना वाचवण्यात यश आलं आहे.
या दुर्घटनेत अधिकाधिक बालिकांचा मृत्यू झालाय. त्यामुळे भंडाऱ्याच्या आगीनंही ‘लक्ष्मी’लाच गाठल्याचं पाहायला मिळत आहे.
या दुर्घटनेत भंडाऱ्यातील उरसालामध्ये राहणाऱ्या सुकेशनी धर्मपाल आगरे या आईने आपली अवघ्या 12 चिमुकली गमावली आहे.
सुकेशनी यांच्या चिमुकलीसह आणखी 6 मुली आणि 3 मुलांचा या दुर्घटनेत बळी गेला आहे.
या नवजात बालकांच्या मृत्यूला जबाबदार कोण?, असा प्रश्न चिमुकल्यांचे पालक विचारत आहेत.
सुकेशनी यांनी देखील आपल्या चिमुकल्या लेकीच्या आठवणीत हंबरडा फोडला आहे. सुकेशनी यांच्यासह इतर बाळाच्या मातांची देखील अशीच अवस्था झाली आहे.
आमच्या बाळांना एकदा शेवटचं भेटू द्या, असं म्हणत या पालकांनी आपल्या चिमुकल्यांच्या आठवणींत हंबरडा फोडला आहे.