33 वर्षीय अभिनेत्री अंगीरा धारचा आज वाढदिवस आहे. अंगाराचा जन्म 25 मे 1988 रोजी झाला होता. अंगारा अशी एक कलाकार आहे जिनं अभिनयासोबतच इतर क्षेत्रांमध्येही उत्तम काम केलं आहे.
1 / 5
अंगीरा धार बँग बाजा बारात या वेब सीरिजमधील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते.
2 / 5
अंगीरा धारनं आपल्या करिअरची सुरूवात टीव्ही प्रॉडक्शनद्वारे केली. यादरम्यान ती स्क्रिप्ट लिहिणं, संपादन, शुटिंग या संदर्भातील काही तांत्रिक कौशल्ये शिकली. इतकंच नाही तर टीव्ही प्रॉडक्शनबरोबरच अनेक टीव्ही जाहिरातींमध्ये अंगीरा झळकली.
3 / 5
अभिनेत्रीच्या बॉलिवूड कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं तर तिनं आनंद तिवारी दिग्दर्शित ‘लव स्क्वेअर फूट’ या चित्रपटातून प्रवासाला सुरुवात केली. या चित्रपटात अंगीरा विकी कौशलसोबत झळकली होती.
4 / 5
अजय देवगन आणि अमिताभ बच्चनसोबत अंगीरा धार 'मेडे' चित्रपटातही झळकली. याद्वारे तिला तिच्या कारकिर्दीचा टर्निंग पॉईंट मिळाला.