Marathi News » Photo gallery » Chanakya Niti According to Chanakya Niti these work should be completed early in life know more
Chanakya Niti | चाणक्य नीतीनुसार ‘ही’ 4 कामे लवकरात लवकर पू्र्ण करा नाहीतर…
चाणक्य नीतीमध्ये अशा अनेक गोष्टी करण्याचा सल्ला देण्यात आला. माणसाने त्याच्या आयुष्यात या गोष्टी लवकर पूर्ण करायला हव्यात नाहीत त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. असे सांगण्यात आले आहे.
चाणक्य नीतीमध्ये आचार्य चाण्याक्यांनी मानवाच्या जीवनाविषयी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. चाणक्य नीतीमध्ये अशा अनेक गोष्टी करण्याचा सल्ला देण्यात आला. माणसाने त्याच्या आयुष्यात या गोष्टी लवकर पूर्ण करायला हव्यात नाहीत त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. असे सांगण्यात आले आहे.
1 / 5
समाजासाठी चांगले काम करा - चाणक्य नीतीनुसार व्यक्तीने जीवनात समाजासाठी काही चांगले काम केलेच पाहिजे. अनेकवेळा एखादी व्यक्ती आपल्या कामात आणि कुटुंबाने इतकी वेढलेली असते की त्याला या सर्व गोष्टींकडे लक्ष देता येत नाही. या गोष्टीमुळे आपल्याला समाजातील लोकांचे दु:ख कळते त्यामुळे आपले दु:ख आपल्याला कमी वाटू लागते.
2 / 5
सामाजिक कार्यासाठी वृद्ध होण्याची वाट पाहू नये. कारण माणसाचा मृत्यू सांगून येत नाही. जर आपण जिवंतपणी कोणाच्या मदतील येणार असू तर त्याहून चांगली कोणतीच गोष्ट नसते.
3 / 5
दान - चाणक्य नीतीनुसार, दान करण्यासाठी व्यक्तीने श्रीमंत होण्याची किंवा वृद्ध होण्याची वाट पाहू नये. एखाद्या व्यक्तीने कमी उत्पन्नातही थोडे दान नक्कीच केले पाहिजे. असे करण्यात अयशस्वी झाल्यास मृत्यूच्या वेळी पश्चात्ताप होऊ शकतो. भारतातील सर्वच धर्म आपल्याला दानाचे महत्त्व सांगतात. त्यामुळे दान ही खूप महत्त्वाची गोष्ट मानली जाते.
4 / 5
उद्यासाठी काम पुढे ढकलू नका- चाणक्य नीतीनुसार व्यक्तीने कोणतेही महत्त्वाचे काम उद्यापर्यंत पुढे ढकलू नये. कारण कधी काय होईल हे कोणालाच माहीत नाही. अशा परिस्थितीत तुमचे काम अपूर्ण राहू शकते आणि ते पश्चातापाचे कारण बनते.