Marathi News » Photo gallery » Chief Minister Himanta Biswa Sarma inspects flood and landslide affected areas in Assam; Interaction with flood affected citizens
Assam Flood: आसाममधील पूरग्रस्त व भूस्खलना भागात मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केली पाहणी ; पूरग्रस्त नागरिकांसोबत साधला संवाद
आसाममधील अनेक जिल्हे सध्या पाण्याखाली आहेत. सुमारे 42,28,157 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. त्याचबरोबर पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 71 जणांना जीव गमवावा लागला आहे.
आसाममधील पूरग्रस्त परिस्थितीमुळे जनजीव पूर्णपणे विस्कळीत झाले. सिलचरमध्ये असलेले कॅन्सर रुग्णालय रुग्णांसाठी एक दिवसही बंद ठेवता येत नाही. या रुग्णालयात बाहेरील रुग्णांना सौम्य उपचार दिले जात होते. तसेच केवळ गंभीर उपचार सुविधा आवश्यक असलेल्या रुग्णांना आत ठेवण्यात आले होते.
1 / 6
कचार जिल्ह्यातील सिलचर शहरातील कर्करोग रुग्णालय पुराच्या पाण्याखाली बुडाले आहे. मात्र रुग्णलयात पाणी शिरल्याने रुग्णांना बाहेर नेण्यासाठी आम्ही तराफांचा वापर करत असल्याचीमाहिती रुग्णालयाचे संचालक रवी कन्नन यांनी दिली आहे
2 / 6
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा पूरग्रस्त भागात भेट देत असताना स्थानिक नागरिकांच्या सोबतही संवाद साधताना दिसून आले आहे.
3 / 6
आसाममधील अनेक जिल्हे सध्या पाण्याखाली आहेत. सुमारे 42,28,157 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. त्याचबरोबर पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 71 जणांना जीव गमवावा लागला आहे.
4 / 6
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत पूर आणि भूस्खलनात 9 लोकांचा मृत्यू झाला, तर 5,137 गावे पुराच्या विळख्यात आहेत.
5 / 6
भारतीय लष्कर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF), अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा (F&ES), आसाम पोलिसांचे कर्मचारी तसेच स्वयंसेवक बचाव आणि मदत कार्यात जिल्हा प्रशासनाला मदत करत आहेत.