अभिनेत्री जायरा वसीमची हिजाबच्या वादामध्ये उडी, भली मोठी पोस्ट शेअर करत म्हणाली की…मी संपूर्ण व्यवस्थेचा विरोध करते…

'दंगल' या पहिल्या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या माजी अभिनेत्री जायरा वसीमने (Zaira Wasim) आपल्या कारकिर्दीत केवळ तीन चित्रपटांमध्ये काम केले. पण इतक्या कमी वेळातही लोकांना तिचे काम खूप आवडले. जायरा वसीमचा अचानक चित्रपटसृष्टी सोडण्याच्या निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसला होतो.

Feb 20, 2022 | 11:29 AM
शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

1 / 5
जायरा सोशल मीडियावरूनही तशी दूरच राहते. मात्र, सध्या जायराची एक पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. आता सायराने कर्नाटकात सुरू असलेल्या हिजाबच्या वादावर पोस्ट शेअर केली आहे. तिने इन्स्टाग्रामवर फेसबुक पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर केला आणि मुस्लिम महिलांच्या समर्थनार्थ ती बोलली आहे.

2 / 5
जायराने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'हिजाबला चॉईस आहे, असे समजणे चुकीचेच आहे. इस्लाममध्ये हिजाब हा पर्याय नसून एक बंधन आहे. जेव्हा एखादी महिला हिजाब परिधान करते, तेव्हा ती देवाने दिलेली जबाबदारी पूर्ण करत असते. जिच्यावर तिचे प्रेम असते आणि तिने स्वतःला त्याच्यासाठी समर्पित केलेले असते.

3 / 5
जायरा पुढे लिहिते की, 'एक महिला म्हणून मी कृतज्ञता आणि नम्रतेने हिजाब घालते. धार्मिक बांधिलकीसाठी महिलांना प्रतिबंधित आणि छळले जात असलेल्या या संपूर्ण व्यवस्थेविरुद्ध मी माझी नाराजी आणि निषेध व्यक्त करते.

4 / 5
मुस्लिम महिलांसोबत भेदभाव करणे आणि त्यांना शिक्षण आणि हिजाब यापैकी एक निवडावे लागेल किंवा ते सोडून द्यावे लागेल अशी व्यवस्था स्थापन करणे अन्याय कारकच आहे. तुमचा अजेंडा चालवण्यासाठी विशिष्ट निवड स्वीकारण्यास तुम्ही त्यांना भाग पाडण्याचा प्रयत्न करत आहात.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें