Sushant Singh Rajput : रक्षाबंधननिमित्त सुशांतच्या आठवणीने बहीण श्वेता इमोशनल, बालपणीचा फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा

सुशांतची बहीण अनेकदा त्याची आठवण काढत जुने फोटो शेअर करत असते. गेल्या वर्षीही राखीच्या निमित्तानं तिनं सुशांतसोबत अनेक फोटो शेअर करून एक भावनिक पोस्ट लिहिली होती. (Sushant Singh Rajput's sister Shweta got Emotional on Raksha bandhan, Shared their childhood photo on social media)

1/8
भाऊ आणि बहिणीचं विशेष नातं रक्षाबंधनाच्या दिवशी (Raksha Bandhan 2021) साजरं केलं जातं. या दिवशी सर्व भाऊ - बहिणी एकमेकांसोबतचे भांडणं आणि राग सोडून हा दिवस एकत्र साजरा करतात. आज रक्षाबंधनाच्या विशेष प्रसंगी सुशांत सिंह राजपूतची बहीण श्वेता सिंह कीर्तीला त्याची आठवण आली आहे.

2/8
सुशांतची बहीण श्वेताने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. आज तिला तिच्या भावाची खूप आठवण येत आहे.

3/8
तिनं सुशांतसोबत लहानपणीचा एक फोटो शेअर केला ज्यात दोघंही हसताना दिसत आहेत.

4/8
एका चाहत्याने लिहिलं – ‘मिस यू सुशांत. आम्ही तुम्हाला कधीही विसरणार नाही, तुम्ही आमच्या हृदयात सदैव जिवंत असाल.’ सुशांतनं कोट्यवधी लोकांची मनं जिंकली आहेत आणि जगभरातील कलाकारांसाठी तो प्रेरणा आहे. दुसरीकडे, आणखी एका चाहत्यानं लिहिलं – ‘सुशांत नेहमी आमच्या हृदयात जिवंत राहील.’

5/8
सुशांतची बहीण अनेकदा त्याची आठवण काढत जुने फोटो शेअर करत असते. गेल्या वर्षीही राखीच्या निमित्तानं तिनं सुशांतसोबत अनेक फोटो शेअर करून एक भावनिक पोस्ट लिहिली होती. तिनं लिहिलं- माझ्या गोड लहान बाळाला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा. आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो... आणि नेहमीच करू. तुझा नेहमीच आम्हाला अभिमान होता आणि नेहमीच राहील.

6/8
सुशांतचे चाहते आजही त्याची आठवण करतात. ते त्याचे जुने फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकतंच, सुशांतचा फेसबुक प्रोफाईल फोटो बदलल्यावर चाहत्यांना धक्का बसला.

7/8
सुशांतच्या फेसबुक प्रोफाइलचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत होते. सुशांतच्या टीमनं त्याचं प्रोफाईल पिक्चर अपडेट केलं आहे.

8/8
14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूतनं जगाचा निरोप घेतला. तो त्याच्या मुंबईतील घरी मृतावस्थेत आढळला. सीबीआय या प्रकरणाच्या तपासात गुंतली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI