AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गरीबांच्या आलिया भट्टने विकत घेतला अक्षय कुमारचा फ्लॅट; पहा फोटो

चांदनीच्या मिमिक्रीच्या व्हिडीओवर खुद्द आलिया भट्टनेही प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे अल्पावधीतच सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला. हुबेहूब आलियाची नक्कल करणाऱ्या चांदनीने सोशल मीडियाद्वारे बराच पैसा कमावला आहे.

| Updated on: Feb 11, 2024 | 8:31 AM
Share
सोशल मीडियाने अनेकांचं नशीब रातोरात पालटलं आहे. या माध्यमातून अनेक इन्फ्लुएन्सर्स आणि कंटेंट क्रिएटर्स लाखोंची कमाई करत आहेत. नेटकऱ्यांच्या प्रतिभेला केवळ व्यासपीठच मिळत नाही, तर त्यातून पैसेही चांगले कमावता येत आहेत. प्रसिद्ध सेलिब्रिटींची नक्कल करून सोशल मीडियावर चर्चेत आलेली अशीच एक कंटेट क्रिएटर म्हणजे चांदनी भाभडा.

1 / 5
अभिनेत्री आलिया भट्टची हुबेहूब नक्कल करून चांदनीला सोशल मीडियावर तुफान प्रसिद्धी मिळाली. सोशल मीडियाद्वारे तिने बराच पैसा कमावला असून आता मुंबईतील अंधेरी परिसरात तिने स्वत:चं घर विकत घेतलं आहे.

अभिनेत्री आलिया भट्टची हुबेहूब नक्कल करून चांदनीला सोशल मीडियावर तुफान प्रसिद्धी मिळाली. सोशल मीडियाद्वारे तिने बराच पैसा कमावला असून आता मुंबईतील अंधेरी परिसरात तिने स्वत:चं घर विकत घेतलं आहे.

2 / 5
चांदनीने वयाची पंचविशी गाठण्याआधीच आयुष्यातील हा मोठा टप्पा गाठला आहे. विशेष म्हणजे तिने अंधेरीतील अभिनेता अक्षय कुमारचा फ्लॅट विकत घेतल्याचं कळतंय. या फ्लॅटच्या गृहप्रवेशाचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

3 / 5
चांदनी अनेकदा आलिया भट्टचे लाइव्ह व्हिडीओ किंवा तिच्या मेकअप टुटोरियलचे व्हिडीओ कॉपी करून तिची हुबेहूब नक्कल करायची. तिचा आवाज आणि हावभाव अगदी आलिया भट्टसारखेच असल्याने तिला अल्पावधीतच प्रसिद्धी मिळाली.

4 / 5
22 वर्षीय चांदनी ही कायद्याचं शिक्षण घेत असून तिला नक्कल करायची खूप आवड आहे. याच आवडीमुळे तिला सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. चांदनीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये ती आलिया भट्टच्या आवाजात पिझ्झा ऑर्डर करताना दिसली. तिचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आणि त्यामुळेच ती प्रकाशझोतात आली.

5 / 5
Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा