नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील सावरगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या लग्नसमारंभात वऱ्हाड्यांची कोरोनो टेस्ट करण्यात आली.
1 / 6
लग्न समारंभातील वधू- वरासह त्यांच्या 26 पाहुण्यांची सुद्धा कोविड टेस्ट मंगल कार्यालयातच करण्यात आली.
2 / 6
नरखेड तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉय विद्यानंद गायकवाड यांच्या नेतृत्वात कोविड चाचणी पार पडली.
3 / 6
नागपूर जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता आणि लग्न कार्यातून मोठ्या संख्येत कोरोनाचं संक्रमण होत असल्याचे दिसून येत असल्याने अश्या चाचण्या करण्यात येत असल्याचे आरोग्य अधिकारी गायकवाड यांचे म्हणणे आहे.
4 / 6
लग्नसमारंभात कोविड टेस्ट करून नागपूर जिल्ह्यातील वधू वरांनी एकप्रकारे नवीन आदर्श इतरांसाठी निर्माण केला आहे.
5 / 6
नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील सावरगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या लग्नसमारंभात वऱ्हाड्यांची कोरोनो टेस्ट करण्यात आली.