Photo : वादळाची भीषणता, समुद्राच्या लाटा झेललेल्या ‘गेट वे ऑफ इंडिया’ परिसरातील फोटो

महाराष्ट्रामध्ये तौक्ते चक्रीवादळाने मोठा हाहा:कार माजवला आहे. रायगड, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

1/6
Tauktae Cyclone photo 1
महाराष्ट्रामध्ये तौक्ते चक्रीवादळाने मोठा हाहा:कार माजवला आहे. रायगड, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुंबईमध्ये तर या वादळाचे रौद्र रुप पाहायला मिळाले. तौक्ते चक्रीवादळाच्या थैमानाचे काही फोटो समोर आले आहेत.
2/6
Tauktae Cyclone photo 2
तौक्ते चक्रीवादळामुळे अरबी समुद्र खवळला होता. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतील परिस्थिती विषद करणारे अनेक व्हिडीओ आणि फोटो समोर येत आहेत.
3/6
Tauktae Cyclone photo 3
एएनआयने ट्विट केलेल्या फोटोमध्ये मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरातील चक्रीवादळाची स्थिती फोटो सांगत आहेत.
4/6
Tauktae Cyclone photo 4
समुद्रातील पाणी थेट गेटवे ऑफ इंडियाच्या पायथ्यावर आदळत होते. सोमवारचं दिवसभरातील हे सर्वात मोठं आणि भयंकर असं वादळ होतं. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे.
5/6
Tauktae Cyclone photo 5
मुंबईतल्या समुद्र किनाऱ्याशेजारीच असणाऱ्या वानखेडे स्टेडियमला देखील वादळाचा फटका बसला. या वादळात स्टेडियमधील एक स्टँड कोसळलेलं पाहायला मिळालं तर एका साईट स्क्रीनचंही नुकसान झालं.
6/6
Tauktae Cyclone photo 6
तौक्ते चक्रीवादळानंतर मुंबईतील समुद्र किनारी मोठा कचरा बघायला मिळाला.