फराह खानच्या 'में हूं ना' चित्रपटाची कल्ट क्लासिक चित्रपटात गणना होते. या चित्रपटात राखी सावंतने मिनीचा रोल केलेला.
या चित्रपटासाठी राखी सावंतने खूप विचित्र पद्धतीने ऑडिशन दिलेलं. याची कथा स्वत: फराहने सांगितली. फराह राखीला पाहून हैराण झालेली.
फराहने मॅशेबल इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, "राखीला हा रोल नशिबाने मिळाला. या रोलसाठी आधी दुसऱ्या अभिनेत्रीला कास्ट करण्यात आलं होतं"
त्या हिरॉईनच्या आईने मागणी केली की, शाहरुख खान ज्या हॉटेलमध्ये थांबला आहे, त्याच हॉटेलमध्ये थांबवण्यात यावं. चित्रपट सुरु होण्याआधी खूप डिमांड केल्या. मग तिला काढून आम्ही ऑडिशन सुरु केली. त्यावेळी राखीची एन्ट्री झाली.
फराहने सांगितलं की, "राखी ऑडिशनसाठी बुर्खा घालून आलेली. तिने माझ्या असिस्टेंटला कॅमेरा रोल करायला सांगितला" "आधी तिने बुर्खा उतरवला. कॅमेरा शेक झालेला, कारण ती बिकिनी घालून आलेली. आम्ही तिला लगेच कास्ट केलं नाही. तिचे ऑरेंज केस होते. कसं होणार हा आम्हाला डाऊट होता" असं फराहने सांगितलं.