PHOTOS : French Open 2021 : सेरेना विलियम्ससह या 4 खेळाडूंची शानदार कामगिरी, चौऱ्या राऊंडमध्ये कुणाला जागा?

23 वेळा ग्रँड स्लॅम विजेती महिला टेनिस खेळाडू अमेरिकेची सेरेना विलियम्सने यंदाच्या दुसऱ्या ग्रँड स्लॅम टुर्नामेंट फ्रेंच ओपनमध्ये शानदार कामगिरी केलीय.

1/5
23 वेळा ग्रँड स्लॅम विजेती महिला टेनिस खेळाडू अमेरिकेची सेरेना विलियम्सने यंदाच्या दुसऱ्या ग्रँड स्लॅम टुर्नामेंट फ्रेंच ओपनमध्ये शानदार कामगिरी केलीय. त्याच बळावर तिने या स्पर्धेतील चौथ्या फेरीत आपली जागा निश्चित केलीय. सेरेनाने शुक्रवारी (4 जून) तिसऱ्या फेरीतील सामन्यात डेनिएल कोलिंसचा 6-4, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. चौथ्या फेरीत तिचा सामना कजाकिस्तानच्या एलेना रायबाकिनासोबत होईल. एलेनाने रशियाच्या एलेना वेसनिनाला 6-1, 6-4 ने पराभूत केलं होतं. (AFP Photo)
2/5
बेलारूसच्या विक्टोरिया एजारेंकाने देखील तिसऱ्या फेरीतील सामन्यात विजय मिळवला आहे. तिने अमेरिकेच्या मेडिसन कीजचा 6-2, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. चौथ्या फेरीत तिचा सामना रशियाच्या अनास्तिसया पावल्युचेनकोवासोबत होईल. अनास्तिसयाने बेलारूसच्या अर्याना साबलेंकाचा 6-4, 2-6, 6-0 असा पराभव केलाय. (AFP Photo)
3/5
पुरुष सिंगलमध्ये जर्मनीचा युवा खेळाडू एलेक्जेंडर ज्वेरेवने सर्बियाच्या लास्लो डेरेचा 6-2 7-5 6-2 असा पराभव करत चौथ्यांदा बार फ्रेंच ओपनच्या राऊड 16 मध्ये प्रवेश केला. चौथ्या फेरीत त्याचा सामना जपानच्या केई निशिकोरीसोबत होईल. (AFP Photo)
4/5
केई निशिकोरीचा सामना स्विट्जरलँडच्या हेनरी लाकसोनेनसोबत होता. मात्र, स्विट्जरलँडचा खेळाडू जखमी झाल्यानं रिटायर झालाय. हा सामना थांबला तेव्हा जपानच्या खेळाडूने 7-5 असा पहिला सेट आपल्या नावावर केला होता. (AFP Photo)
5/5
रशियाच्या डेनिल मेडवेडेवने देखील तिसऱ्या फेरीत विजय मिळवत चौथ्या फेरीत प्रवेश केलाय. त्याने अमेरिकेच्या रिले ओपेल्काचा 6-4, 6-2, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. पुढच्या फेरीत त्याचा सामना चिलीच्या क्रिस्टियन गारिनसोबत होईल. क्रिस्टियनने अमेरिकेच्या मार्कसो गिरोनचा 6-1, 5-7, 6-2, 6-2 असा पराभव केलाय. (AFP Photo)