AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bollywood Actresses : बॉलिवूडच्या या लीडिंग लेडीज बनल्या सवत, दोन सख्ख्या बहिणींच्या नशिबीही…

अभिनेत्री समांथा रुथ प्रभु हिने नुकतंच दुसरं लग्न केलं. घटस्फोटित डायरेक्टर राज निदिमोरूशी लग्न करत ती दुसरी पत्नी बनली. तिच्याआधीही अनेक अभिनेत्रींनी घटस्फोटित व्यक्तीशी संसार करत दुसरी पत्नी बनून संसार थाटला. त्यात दोन सख्ख्या बहिणींचाही समावेश आहे. कोण आहेत त्या अभिनेत्री ?

| Updated on: Dec 03, 2025 | 12:37 PM
Share
प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभु हिने नुकतंच दुसरं लग्न केलं. द फॅमिली मॅनचा दिग्दर्शक असलेल्या  राज निदिमोरूशी तिने लग्नगाठ बांधली असून ती त्याची दुसरी पत्नी बनली. पण एखाद्याशी लग्न करून दुसरी बायको बनलेली ती काही पहिलीची अभिनेत्री नाही, समांथापूर्वी करीना कपूर, श्रीदेवी, लारा दत्ता, शिल्पा शेटी यांसारख्या अनेक अभिनेत्रींनी घटस्फोटीत व्यक्तीशी लग्न केलं आहे. या लिस्टमध्ये अनेकींची नावं आहेत.

1 / 9
करीना कपूर -  अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान हे बॉलिवूडचं रॉयल, लोकप्रिय कपल मानलं जातं. करीना ही सैफची दुसरी पत्नी आहे. त्याआधी 21 वर्षांचा असताना नवाब सैफ अली खानने 33 वर्षीय अमृता सिंगशी लग्न केले होते. सैफ आणि अमृताने त्यांच्या पालकांच्या इच्छेविरुद्ध लग्न केले, परंतु 13 वर्षांच्या संसारानंतर दोघं वेगळे झाले. त्यानंतर सैफची अनेक रिलेशन्स होती, अखेर टशच्या सेटवर त्याची करीनाशी ओळख झाली, दोघं जवळ आले. 5 वर्ष एकमेकांना डेट केल्यावर 16 ऑक्टोबर 2012 मध्ये त्यांनी लग्न केलं.

2 / 9
 करीश्मा कपूर - अभिनेता अभिषेक बच्चनसोबत झालेला साखरपुडा मोडल्यानंतर करिश्मा कपूरने दिल्लीतील व्यावसायिक संजय कपूरशी लग्न केले. पण करिश्मापूर्वी संजयचे लग्न नंदिताशी झाले होते. 2002 साली त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर 29 डिसेंबर 2003 साली करिश्मा-संजयचा शाही विवाह झाला. अखेर 11 वर्षांनी त्यांचाही संसार मोडला. दोघांना समायरा आणि कियान अशी दोन मुलं आहेत.

3 / 9
हेमा मालिनी -  सुपरस्टार धर्मेंद्र यांनी 1954 साली वयाच्या 19 व्या वर्षी प्रकाश कौरशी पहिलं लग्न केले. पण नंतर ते बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले. विवाहित असूनही ते तिच्या प्रेमात होते. विवाहीत व्यक्तीशी नातं जोडायचं नसल्याने सुरूवातील हेमा मालिनी या नात्यासाठी तयार नव्हत्या, पण नंतर त्यांनी होकार दिला. अनेक वर्ष डेट केल्यावर 1979 साली हेमा मालिनी व धर्मेंद्र यांनी लग्न केलं, त्यासाठी त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारल्याच्याही चर्चा होत्या.

4 / 9
नीलम कोठारी - अभिनेत्री नीलम कोठारीच्या आधी टीव्ही अभिनेता समीर सोनीचे लग्न मॉडेल राजलक्ष्मी खानविलकरशी झाले होते. पण, लग्नाच्या अवघ्या सहा महिन्यांनंतर त्यांच्या नात्यात अडचणी येऊ लागल्या आणि ते वेगळे झाले. त्यानंतर 2007 साली नीलम आणि समीर यांची भेट टीव्ही निर्माती एकता कपूरमुळे झाली, ती त्यांची कॉमन फ्रेंड होती. अखेर 24 जानेवारी 2011 रोजी त्यांनी लग्न केलं.

5 / 9
शिल्पा शेट्टी -  पहिल्या पत्नीपासून विभक्त झाल्यावर राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी एकमेकांजवळ आले. लंडनमधील एक श्रीमंत आणि यशस्वी उद्योगपती राज कुंद्रा याचं पूर्वी कविताशी लग्न झाले होते. पण शिल्पामुळे आपला संसार मोडल्याचा दावा तिने केला. मात्र राजच्या सांगण्यानुसार,तो जेव्हा शिल्पा शेट्टी हिला भेटला, त्याच्या 1 वर्ष आधीच तो कवितापासून विभक्त झाला होता. अनेक आरोप, अटकळी, चर्चा यानतंर 22 नोव्हेंबर 2009 साली शिल्पा-राज यांचं लग्न झालं.

6 / 9
लारा दत्ता - माजी मिस युनिव्हर्स लारा दत्ता हिने 16 फेब्रुवारी 2011 रोजी प्रसिद्ध टेनिसपटू महेश भूपतीशी लग्न केले. हे महेशचं दुसरं लग्न होतं. आधी मॉडेल श्वेता जयशंकरशी त्याचं लग्न झालं होते. श्वेताने लारावर तिचं घर तोडल्याचा आरोप केला होता.

7 / 9
 शबाना आझमी - प्रसिद्ध लेखक  जावेद अख्तर हे शबाना आझमी यांना भेटले तेव्हा त्यांचे हनी इराणीशी आधीच लग्न झाले होते. पण, दोघांमध्ये तणाव निर्माण झाला आणि ते वेगळे झाले. नंतर जावेद आणि शबाना यांचे प्रेम फुलले आणि घटस्फोटानंतर लगेचच त्यांनी मुस्लिम रितीरिवाजांनुसार लग्न केले. जावेद व हनी इराणी यांना फरहान आणि झोया ही दोन मुले आहेत. शबाना यांचं त्यांच्यावर स्वतःच्या मुलांसारखंच प्रेम आहे.

8 / 9
रविना टंडन - फिल्म डिस्ट्रीब्यूटर अनिल थडानी याचं पूर्वी रमु सिप्पी यांची मुलगी नताशा सिप्पीशी लग्न झाले होते. पण, नंतर परस्पर संमतीने त्यांचा घटस्फोट झाला. अनिलचे ग्लॅमरस बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडनसोबत वाढणारे संबंध हे त्याचे कारण असल्याचे अफवा पसरल्या.  स्टम्प्डच्या चित्रीकरणादरम्यान रवीना आणि अनिल यांची भेट झाली आणि ते प्रेमात पडले. त्यांनी 22  फेब्रुवारी 2004 साली लग्न केलं आणि आता ते आनंदी वैवाहिक जीवन जगत आहेत.

9 / 9
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.