GK : टोमॅटो की चिकन? कोणते सूप आरोग्यासाठी चांगले?
Tomato Soup VS Chicken Soup: तुमच्यापैकी अनेकजण टोमॅटो सूप आणि चिकन सूप पीत असलीत. आज आपण आरोग्यासाठी कोणता पर्याय उत्तम आहे, याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
बापू गायकवाड |
Updated on: Jan 30, 2026 | 11:43 PM
Share
चिकन सूप आणि प्रथिने: चिकन सूपमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते, जे स्नायूंच्या मजबुतीसाठी आणि शरीराच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असते. आजारपणातून सावरताना डॉक्टर अनेकदा चिकन सूप पिण्याचा सल्ला देतात.
1 / 5
टोमॅटो सूपमधील अँटीऑक्सिडंट्स: टोमॅटो सूपमध्ये 'लायकोपीन' नावाचे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असते, जे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास आणि त्वचेला टवटवीत ठेवण्यास मदत करते.
2 / 5
रोगप्रतिकारशक्ती: चिकन सूपमध्ये अमिनो ॲसिड्स असतात, जे श्वसनविकाराच्या त्रासात (उदा. सर्दी-खोकला) आराम देतात आणि छातीतील कफ कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे हिवाळ्यात हे सूप अधिक फायदेशीर ठरते.
3 / 5
पोषक तत्वांची तुलना: टोमॅटो सूपमध्ये व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम भरपूर असते, तर चिकन सूपमध्ये लोह (Iron) आणि व्हिटॅमिन बी-12 सारखी जीवनसत्त्वे असतात जी ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतात.
4 / 5
निष्कर्ष: दोन्ही सूपचे स्वतःचे फायदे आहेत. जर तुम्हाला तातडीची ऊर्जा आणि स्नायूंची ताकद हवी असेल, तर चिकन सूप उत्तम आहे. मात्र, जर तुम्हाला हलका आहार आणि अँटीऑक्सिडंट्स हवे असतील, तर टोमॅटो सूप फायदेशीर ठरते.