Gold Silver Rate | सोन्याच्या किंमती वधारल्या, ऐन लग्नसराईत सोने 50 हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता, वाचा आजचे दर…

कोरोनाची प्रकरणे भारतासह जगभरात झपाट्याने वाढत आहेत. यामुळे पुन्हा गुंतवणूकदारांचा विश्वास डगमगू लागला आहे आणि ते सुरक्षित गुंतवणूकीकडे आकर्षित होऊ लागले आहेत. म्हणूनच होळीपासून सोन्या-चांदीमध्ये निरंतर वाढ होताना दिसत आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:00 PM, 8 Apr 2021
1/5
Gold rate today : कोरोनाची प्रकरणे भारतासह जगभरात झपाट्याने वाढत आहेत. यामुळे पुन्हा गुंतवणूकदारांचा विश्वास डगमगू लागला आहे आणि ते सुरक्षित गुंतवणूकीकडे आकर्षित होऊ लागले आहेत. म्हणूनच होळीपासून सोन्या-चांदीमध्ये निरंतर वाढ होताना दिसत आहे. गेल्या एक आठवड्यात ज्या पद्धतीने हा ट्रेंड चालू आहे, त्यानुसार लवकरच सोने 50 हजारांचा टप्पा गाठेल, असे बाजार तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
2/5
Gold and Silver rates gold price today in Mumbai and Maharashtra Buy gold before gudi padwa 2021
सोने आणि चांदीचा दर
3/5
Silver rate today: जर तुम्ही चांदीबद्दल बोलत असाल, तर 31 मार्च रोजी 999 शुद्ध चांदीची किंमत 62862 रुपये प्रति किलो होती. आज (8 एप्रिल) सकाळी बाजार उघडल्यानंतर हा दर 66905 रुपये प्रति किलोवर होता. अशा प्रकारे एप्रिलमध्ये चांदी 4043 रुपयांनी महाग झाली आहे. 22 एप्रिलपासून लग्नाचा हंगाम सुरू होत आहे. यानंतर, 23 तारीख वगळता संपूर्ण महिन्यात लग्नाचे मुहूर्त आहेत. मेमध्ये देखील 16 दिवस शुभ आहेत.
4/5
MCXवरही सोन्याची किंमत उसळत आहे. दुपारी 3 वाजता, जून डिलिव्हरीसाठीच्या सोन्याचा भाव 213 रुपयांच्या वाढीसह 46575च्या पातळीवर होता. 30 मार्च रोजी जून डिलिव्हरीच्या सोन्याचे भाव 44423च्या पातळीवर बंद झाले होते. तेव्हापासून ते सातत्याने वाढत आहे आणि गेल्या एका आठवड्यात त्यात 2100 रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. ऑगस्ट डिलिव्हरीच्या सोन्याचा भाव यावेळी 261 रुपयांच्या वाढीसह 46864 रुपयांच्या पातळीवर होता.
5/5
MCXवरही चांदीचे वितरण वाढताना दिसत आहे. दुपारी 3 वाजता मे डिलिव्हरीसाठीच्या चांदीचा भाव 358 रुपयांनी वाढून 66992 रुपये प्रतिकिलोवर होता. 30 मार्च रोजी मे डिलिव्हरीच्या चांदीचा भाव 63124 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. गेल्या एका आठवड्यात त्याचे दर 3800 रुपयांपेक्षा अधिकने वाढले आहेत. जुलै डिलिव्हरीच्या चांदीचा भाव 391 रुपयांच्या वाढीसह 67991 रुपयांच्या पातळीवर होता.